Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 1, 2018 in जीवन प्रकाश

व्यस्त असण्यापेक्षा चांगले

व्यस्त असण्यापेक्षा चांगले

                                                                                                                                      –  कॉलीन नोबेल

आपल्या युगाचा आक्रोश आहे;  “व्यस्त” (बिझी)
“तू कसा आहेस?” “व्यस्त”
“काम कसं चाललंय?” व्यस्त
“मुलं कशी आहेत?” “ती इतकी बिझी आहेत की त्यांना सगळीकडं नेताना मला टॅक्सी ड्रायव्हरसारखं वाटतयं.”
“आज शॉपिंग मॉल कशी होती?” “खूपच बिझी.”
“मला जरा मदत करतोस का?” “सध्या मी फार कामात आहे.”

आपल्या जीवनाच्या व्यस्तपणाचा जलद वेग हा देवाला बाजूला ढकलतो व तो आपल्याला शीण आणू शकतो. आपल्यातील कित्येक जण या व्यस्तपणाने आपल्याला हाताळण्यापूर्वी आपण त्याला  कसे हाताळावे याचे मार्ग शोधतात. तरीही प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची मर्यादा वाढतच राहते — फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर इत्यादींच्या  कृपेने. आपण नेहमीच उपलब्ध आहोत, घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत, कोणतीही गोष्ट साध्य करण्याची आपली क्षमता आहे अशा अपेक्षांना आपण बळी पडतो. तर ही अशी सर्वसमर्थ, सर्वज्ञ, सर्वव्यापी असण्याची मागणी आपल्या सर्वांवर मोठा तणाव आणते यात नवल नाही.

यात आणखी काही घटकांची भर घाला — अपुरी झोप, सकस अन्न न खाण्याच्या सवयी, चहा-कॉफीचे व्यसन, लोकांना आपली ओळख कशी असायला हवी ही अपेक्षा, फक्त बसून काम करण्याची आवड — हे सर्व चिंता व अस्वस्थपणा प्राप्त करण्याच्या पाकक्रिया आहेत.
तर अशा या आपल्या स्वयंपाकघरात आपण मुख्य आचारी असतो. आपल्या जीवनाच्या मिश्रणामध्ये काय पदार्थ घालायचे ह्याची निवड आपण करू शकतो. त्यानुसार आपल्या पोटाला जड वाटेल किंवा निरोगी आणि तजेलदार वाटेल. २४/७ ची धांदल ही मोठ्या प्रमाणात आपण स्वत: बनवलेली असते. जसे लोक शरीर शुद्धीसाठी पथ्य पाळतात तसे आपण टी व्ही व डीजीटल पथ्य पाळले तर आपल्या जीवनात किती गोष्टी आणू शकतो हे आपल्याला समजेल. हे डीजीटल युग जुनी समस्याच दुसऱ्या वेशात घेऊन आले आहे. ती म्हणजे देवाची भूमिका आपण स्वत: घेणे. जर २४/७ कार्यरत असणारे हे जग येशूकडे विसाव्यासाठी आले आणि नियमितपणे काम, व्यस्तता, विचलित करणाऱ्या गोष्टींपासून एक दिवस विसावा घेतला (मत्तय ११:२८) तर काय होईल बरे? हो, आठवड्यातून एक दिवस देवाला देण्याची सवय लावली तर जे अस्वस्थ जग सतत व्यस्ततेमध्ये शांतीच्या शोधात आहे त्याला आपण काय बरे देऊ शकू?

१. आठवड्यातून एक दिवस देवामध्ये विसावा घेणे हे आपल्याला देवाची तीव्र ओढ आहे असे दाखवते.

आपली धडपड थांबवून देवावर लक्ष केंद्रित करणे हेच सांगते की आपला दर्जा, आर्थिक फायदे, बढती, यश  आणि आपले लक्ष विचलित करणाऱ्या इतर सर्व गोष्टी या सर्वांपेक्षा आपण ज्या देवावर प्रीती करतो. त्याच्याकडे लक्ष लावतो.
आपण प्रीती करत असलेल्या व्यक्तीबरोबर संधी मिळाली तरी वेळ न घालवणे ही बाब त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवण्याची आपली इच्छा कमी होत आहे हेच दाखवते. तिच्याबरोबर आपल्याला लाभलेल्या सुंदर क्षणांची आठवण आणि भविष्यात आपल्यासाठी काय आहे याचे विचार आपण गमावून बसतो. जेव्हा आपण खास रीतीने व निर्धाराने एक दिवस बाजूला काढून देवावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण जुन्या कराराच्या लोकांप्रमाणे देवाची आज्ञा पूर्ण करतो (निर्गम १६:२३,२५). आपण जगाला इशारा देतो की, आपली अंत:करणे देवाची आहेत.
एक दिवस भक्ती व विसाव्यासाठी जतन करणे ह्याद्वारे लोकांना समजते की आपली अंत:करणे त्याची आहेत.

२. आठवड्यातून एक दिवस विसाव्यासाठी काढून ठेवणे हे आपला देवावर भरवसा आहे याचे चिन्ह आहे.
आठवड्यातला एक दिवस वर्तमानात तग धरण्याची धडपड व भविष्याची तयारी सोडून देणे हे दाखवते की सध्यासाठी आपल्याला देवाचा पुरवठा आहे व त्याची भविष्यासाठी असलेली अभिवचने ही खात्रीपूर्ण आहेत असा आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो.
जेव्हा आपण आठवड्यातून एक विसाव्याचा दिवस घेण्याची सवय लावतो तेव्हा जुन्या करारातील संतांबरोबर आपण उभे राहतो. ते देवाने त्यांच्या गरजा पुरवाव्या म्हणून त्याच्यावर विश्वास टाकत होते (निर्गम १६:२२-३०). आपण येशूसमवेत उभे राहतो कारण सैतान त्याने त्याच्या गरजा पुरवाव्या म्हणून त्याला गळ घालत असताना “मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने वाचेल” (मत्तय ४:४), असे म्हटले याची आपण आठवण करतो.
आमची रोजची भाकर आज आम्हांस दे, या प्रार्थनेशी आपण सचोटीने जगतो. आणि मग देवाने तसे करावे म्हणून त्याच्यावर भरवसा ठेवतो. आपण मर्यादित मानवप्राणी असताना, त्या अमर्याद देवावरचा आपला विश्वास जाहीर करतो जो आपल्याला सर्व आशीर्वादांनी भरून टाकतो (इफिस १:३; १ तीम. ६:१७). जेव्हा आपण कामात खूपच व्यस्त असतो आणि तरीही आपण विसाव्याचा दिवस देवाबरोबर आनंदाने घालवतो तेव्हा आपण आपला त्याच्यावरचा भरवसा अधिकच मोठ्याने जाहीर करतो.

३. आठवड्यातून एक विसाव्याचा दिवस घेतल्याने आपण ख्रिस्त सर्वोच्च आहे हे जाहीर करतो.

आठवड्यातील एक दिवस देवाबरोबर घालवण्याने आपल्या स्वत:च्या कामगिरीची आपल्या ह्रदयावरील पकड आपण ढिली करतो व येशूने आपल्यासाठी जे केले त्याची एकमेकांना आठवण करून देतो. कितीही प्रयत्न करून जे आपण साध्य करू शकत नाही ते येशूने आपल्यासाठी साध्य केले आहे. आपण हा विसावा घेतल्याने हे सांगतो की त्याने त्याच्या पित्याचे परिपूर्ण आज्ञापालन केलेले आहे (रोम ८:३-४). आपण हे घोषित करतो की आपल्या फावल्या वेळातील छंद, अस्वस्थ झोप देऊ शकत नाही तो विसावा येशूने आपल्याला देऊ केला आहे (मत्तय ११:२८-३०). जे प्रभूमध्ये मरण पावतात त्यांना त्यांच्या कष्टांपासून विसावा मिळत असल्याने (प्रकटी १४:१३) आठवड्यातून एक दिवस विसावा घेतल्याने आपल्याला याची आठवण करून दिली जाते व भविष्यासाठी आपली तयारी होते, जेव्हा प्रत्येक गुडघा येशूपुढे टेकेल व प्रत्येक जिव्हा तो प्रभू आहे हे कबूल करील (फिली २:१०-११). आपण जाहीर करतो की आमची महत्त्वाकांक्षा ही करीयर, प्रतिष्ठा जोपासणे, पृथ्वीवरची आपली कामगिरी पाड पाडणे — यांपेक्षा खूपच मोठी आहे आणि ती म्हणजे ख्रिस्त गाजवणे.

४. आठवड्यातून एक दिवस विसावा घेतल्याने आपले स्वातंत्र्य आपण जाहीर करतो.

तातडीच्या विळख्यातून आणि न संपणाऱ्या कामातून, आठवड्यातून एकदा आपण आपली सुटका करून आपल्याला आठवण करू देतो की आपण या गोष्टींचे  गुलाम नाहीत. देवाने प्रथम आठवड्यातून एक दिवस विसावा घेण्याची जेव्हा आज्ञा दिली तेव्हा तो इस्राएलांना आठवण करण्यास सांगत होता की देवाने त्यांना मिसर देशाच्या गुलामीतून सोडवले आहे (अनुवाद ५:१५). परंतु इस्राएलांना व आपल्याला ही शारीरिक सुटका, त्यापेक्षा मोठ्या असलेल्या म्हणजे पाप व मरण याच्या सुटकेचे केवळ चित्र होते (रोम ६६:१५-२३). आपल्याला स्वतंत्रतेसाठी पाचारण झाले आहे (गलती ५:१३) हे आता आपण इस्राएलांपेक्षा अधिक स्पष्टपणे पाहू शकतो म्हणून आपली आठवण व उत्सव मोठा आहे.

आठवड्यातून एक दिवस विसावा घेणे ही आपल्यावर बळजबरी नाही तर ही एक मोठी इच्छा आहे जी आपल्याला थांबायला, आठवण करायला, पुढे बघायला, आणि उपासना करायला लावते. आपण हे स्वातंत्र्य स्वत:हून निवडले आहे हा संदेश व्यवसायाच्या बंधनात जे अडकले आहेत व या विळख्यातून आपली सुटका होऊ शकत नाही असे वाटते त्यांनी ऐकण्याची अत्यंत गरज आहे.