जनवरी 7, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा १५.   १ योहान ३:४-६ स्टीफन विल्यम्स

 

पाप म्हणजे स्वैराचार

  • ख्रिस्ती लोक ढोगी आहेत अशी लोक टीका करतात हे तुम्हाला माहीत आहे का? 
    हा मोठा मनोरंजक आरोप आहे; कारण ख्रिस्ती लोक चांगले असलेच पाहिजेत असे गृहीत धरून  त्यावर आधारित केलेला हा आरोप आहे. 
    ही वस्तुनिष्ठ चांगुलपणाच्या नैतिकतेची कल्पना कोठून आली?
    ही मूर्तिपूजक किंवा नास्तिकांकडून आलेली कल्पना नाही. तर ही नक्कीच ख्रिस्ती कल्पना आहे. त्यात गृहीत धरलेले आहे की चांगुलपणाचा एक दर्जा आहे. 
    जेव्हा ख्रिस्तामधील देवाची तुम्हाला ओळख होते तेव्हाच केवळ तुमच्या पापाचा गांभीऱ्याने समाचार घेतला जातो .
    पुढच्या शास्त्रभागात योहान नैतिकतेचा विषय हाताळतो – म्हणजे जे देवाचे लोक आहेत, ते पाप गांभीऱ्याने घेतात. कारण त्यांचे अशा   देवाशी नातेसंबंध प्रस्थापित झालेले असतात की जो नीतिमान व प्रभू असा दोन्ही आहे.

शास्त्राभ्यास

सर्व पाप देवाचे प्रभुत्व नाकारणारे आहे (वचन ४)

जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे (३:४).

  • “पाप” हा शब्द अनेक संदर्भात अनेक गोष्टींसाठी वापरला आहे. आज बहुतेक बाबतीत “पाप ” हा शब्द क्वचितच वापरला जातो. चूक झाली तर सहसा सामाजिक चांगुलपण मोडले अशा अर्थाने पापाचा संबंध लावला जातो. किंवा कोणाचे तरी मन दुखेल असे कृत्य झाले असे समजले जाते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत सत्य बोललात, आणि कोणीतरी तो गुन्हा मानला तर तुम्ही कितीही सभ्यता दाखवली, तरीही तुम्ही चूक करणारेच ठरवले जाता.
    •           पण बायबल पापाची अगदी स्पष्टपणे व्याख्या देते.
    •           एका बाजूने पापाविषयी नकारात्मक अर्थाने बोलले जाते – एखादी गोष्ट करण्यात आपण अपयशी.
    ▫         रोम ३:२३ – पाप म्हणजे “लक्ष्य चुकणे,”  पूर्णतेत कमी पडणे.
    ▫         १ योहान १:९ – पाप म्हणजे ज्यात नीतिमत्वाची कमतरता असते.
    •           पुष्कळदा पापाविषयी बोलताना पापाच्या सक्रियतेविषयी बोलले जाते. ती केवळ एक “चूक” किंवा लांडी-   लबाडी नसते.
    ▫         रोम १४:२३ – विश्वास धरून जे काही केलेले नसते ते सर्व पाप असते.
    ▫         याकोब ४:१७ – तुम्हाला जे योग्य वाटते, ते न करणे म्हणजे पाप होय.
    ▫         १ योहान ५:१७ – सर्व प्रकारचे अनीतिचे वर्तन म्हणजे पाप होय.
    ▫         आणि येथे ४थ्या वचनात स्पष्ट म्हटले आहे की “पाप हा स्वैराचार आहे.”
    •           योहान आपल्या लक्षात आणून देत आहे की जे पाप करतात ते “सर्व” स्वैराचार करतात. सर्व पाप स्वैराचार   आहे. याचा अर्थ                   काय?
    ▫         आपल्या व्याख्येपलीकडचा एक दर्जा आहे. योग्य काय अयोग्य काय याची व्याख्या सांगणारा एक नियम आहे. आपण तो तयार               करत नाही. तर तो वस्तुनिष्ठ व परिपूर्ण आहे.
    ▫         त्याचा दर्जा देवाचे चारित्र्य व नीतिमत्त्व हा आहे.
    ▫         या दृष्टिकोनातून जाणूनबुजून अथवा नकळत पाप करणे हे एकाच वर्गात मोडतात – देवाच्या परिपूर्ण नीतिमत्वाचा नियम मोडणे
    •           दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पापाला अनेक अनैतिकतेचे पैलू असताना सर्वात मोठी समस्या म्हणजे खुद्द देवाला न जुमानणे.                  आपण मूठ आवळून त्याला नकार दर्शवतो आणि त्याचे नाम धुळीस मिळवतो.
    •           जर पाप म्हणजे” स्वैराचार” आहे तर सर्व पाप देवाला, त्याच्या नियम घालून देण्याच्या स्थानावरून हटवण्याचा  प्रयत्न करणारे               आहे. देवाचे देवत्व नीचावस्थेला आणणारे आहे. ही “निरागसपणे केलेल्या चुकेहून” अधिक काही आहे.

पापाविरुद्धच्या लढ्यात दोन गोष्टींची मदत (व. ५-६)

  • बहुधा आपण पापाच्या गांभीऱ्याची संवेदनाच हरवून बसतो. पापाविषयीची संवेदना बोथट होत जाणे सहज शक्य असते. हे विश्वासी बंधो, नुकतेच तू केव्हा आपल्या पापाची कबुली दिलीस आणि त्याच्या गांभीर्याचा तुला अनुभव आला?
    •           जसे पाप सक्रियतेने देवाला धिक्कारते, तसे पाप दूर करणे म्हणजे सक्रियतेने त्याविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखे आहे. योहान                   आपल्याला संवेदनशीलता पुन्हा प्राप्त करण्याचे दोन मार्ग समजून घेण्यास मदत करतो.

१.  ख्रिस्ताच्या कार्यावर मनन (व. ५)

तुम्हाला माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. त्याच्या ठायी पाप नाही (३:५)

  • पुन्हा आपल्याला जे माहीत आहे, त्याची आठवण करून देण्यात आली आहे. उपाय नवीन काहीतरी नाही. तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात तर आपल्याला जे आधीपासून ठाऊक आहे त्याच्या आठवणीने पुन्हा आपला मने आपण ताजीतवानी करायची आहेत.
    •      या वचनांकडे नीट लक्ष देऊन पाहा की येशूच्या “येण्याचा” उद्देश काय आहे?
    ▫  पाप दूर करणे – ते काढून टाकण्यासाठी
    ۰   योहान १:२९; इब्री ९:२६

▫         ती पापे स्वत:वर घेणे
۰         १ पेत्र २:२४;  इब्री ९:२८
•           पण लक्षात घ्या की त्याचा हेतू त्याचा पापाशी काही संबंध असण्यामुळे नव्हता. पापाशी तर त्याचे पूर्णपणे    शत्रुत्व होते. वास्तविक तो पापाचा समाचार घेण्यासाठी आला, यातून त्याची कृपा व प्रीती निदर्शनास येते. तो    सर्वस्वी केवळ आपल्यासाठी आला. त्याला मुळीच पाप ठाऊक नव्हते.
▫         २ करिंथ ५:२१; इब्री ७:२६; १ पेत्र १:१९२:२२
•           पापाशी दोन हात करण्यासाठी ख्रिस्ताच्या कार्यावर मनन करण्याने कसे साह्य प्राप्त होते?
▫         त्यामुळे आपल्या प्रभूची इच्छा (आपणही निष्पाप व्हावे ) समजून घेण्यास व त्याला संतुष्ट करणारे जीवन जगण्यास मदत होते.
▫         आता सध्या  विचारपूर्वक आपण करत असलेल्या पापाच्या भयंकर दुष्टतेचा आठवण करण्यास ते मदत करते. या पापावर मी आता                   विचार करत असताना मी आठवण करायला हवी की देवाचा पुत्र माझ्या या पापासाठी मरण पावला. प्रत्येक पापाचे मोल देवाच्या पुत्राचे
मरण आहे.

२.  ख्रिस्ताच्या नातेसंबंधात जडून राहणे (व. ६)

जो कोणी त्याच्याठायी राहातो, तो पाप करत नाही जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही ( ३:६)

  • ख्रिस्ताच्या कार्यावर व त्याच्या येण्याचा उद्देश यावर मनन करण्याने पापाचे गांभीर्य समजण्यास मदत होते. योहान आपल्याला आणखी दुसरी मदत देतो.
    •           पाप हा एक लढा आहे. कदाचित पापावर धीम्या गतीने विजय प्राप्त होईल. पण योहान आपल्याला आठवण  करून देतो की                 अगदी सोप्या प्रकारे आपण पापावर  विजय मिळवल्याची हमी मिळवू शकतो.
    •           जो कोणी त्याच्यामध्ये राहतो तो पाप करत राहत नाही.
    ▫         विषय आहे हे, किंवा ते. तुम्ही देव आणि धनाची एकाच वेळी सेवा करू शकत नाही. अग्नी आणि  बर्फ एकत्र राहू शकत नाहीत.
    ▫         तो निष्कलंक, पवित्र आहे. त्याच्या सतत संपर्कात राहिले म्हणजे त्याचा प्रभाव पडणारच. या नातेसंबंधातील तो एक बळकट
    दुवा आहे – आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो.
    ▫         प्रत्येक पापासाठी आशा आहे – पूर्ण मुक्ती ख्रिस्ताकडूनच मिळते! उपचार नव्हे, औषधपाणी नव्हे; पळवाट नव्हे – तर मुक्ती!
    •           जर माझ्या जीवनात पापे असतील आणि त्यामुळे माझ्या जीवनात बदल झाल्याचे दिसत नसेल तर त्याचा अर्थ काय ? यावर
    योहान सत्याने एक जोरदार प्रहार करतो:
    ▫         याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये राहत नाही.
    ▫         जर ही अवज्ञेची जीवनरहाटी चालू राहिली तर एवढा एक पुरावा पुरेसा आहे : जो पाप करत राहातो, त्याने खरोखर ख्रिस्ताची
    भेट घेतलेली नाही की तो ख्रिस्ताला ओळखत नाही.
  • जितका अधिक काळ आपण पापात राहू, तितकी आपले तारण झाल्याची खात्री कमी होत राहणार. तुमचे तारण केवळ देवासमोरील तुमचे कायदेशीर स्थान असणे नव्हे.  तो  देवाशी असलेला नातेसंबंध होय. आणि  नातेसंबंधांना पुरावा असतो. देवाशी नातेसंबंध असण्याचा पुरावा म्हणजे रूपांतर होत जाण्याची प्रक्रिया सतत चालू असणे.

चर्चा/ मननासाठी प्रश्न

  • तुमचे अंत:करण पापाकडे झुकलेले आहे का? आपल्या अंत:करणाची परीक्षा करा – नुकतेच तुम्ही केव्हा पापाला पाप म्हणून देवासमोर प्रामाणिकपणे पापाची कबुली दिली? की पापकबुली करण्यापेक्षा अधिक तुम्ही     आपल्या चुकीच्या कृत्यांचे समर्थन करत राहता? तुम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवणारे आहात की पापकबुली     करणारे आहात? सावध राहा. तारणाचा पुरावा देवासाठी मृदू अंत:करण असणे हा आहे.
    •           पापाविरुद्धच्या तुमच्या लढ्यात अधिक सक्रिय होण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलाल?

 

Previous Article

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का? लेखक : ट्रेवीस मायर्स

Next Article

देवाची सुज्ञता लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

You might be interested in …

ख्रिस्तजन्म – गव्हाणीचा अर्थ

जॉन पायपर काही विहिरी कधीच कोरड्या पडत नाहीत. काही क्षितीजं तुम्ही त्यांच्या निकट जाताना अधिकच विस्तारू लागतात. काही गोष्टी अनंतकालापर्यंत  मागं पोचतात, अनंतापर्यंत पुढे जातात आणि त्यांचे रहस्य खोल खाली जात राहते अन् त्यांची उंची […]

ख्रिस्तजन्म आणि घरी असण्याची आपली ओढ

गेरीट डॉसन स्कॉटलंडचा एक तरुण किनाऱ्यावर असलेले आपले घर सोडून समुद्रावरच्या सफरीला गेला. कुटुंबातील लोकांना  काहीही न सागता तो अचानक निघाला. सफरीच्या  त्याच्या ओढीने आपल्या आईवडिलांना आपले अचानक जाणे कसे वाटेल याचा विचारही त्याच्या मनाला […]