दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

त्याने एकाकरता सर्वस्व विकले डेविड मॅथिस

येशूने एका माणसाबद्दल एका वाक्याचा दाखला सांगितला की “त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले.” तो एक व्यापारी होता. त्याला इतके मौल्यवान काही सापडले की त्याला प्रिय वाटणाऱ्या सर्व खजिन्यापेक्षा ते सरस होते. “स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणार्‍या कोणाएका व्यापार्‍यासारखे आहे; त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला” (मत्तय १३:४५-४६).

एक अत्यंत मोलवान मोती. अत्यंत भारी असा केवळ एकच मोती. इतका महान, इतका मोलवान की त्याने सर्व काही विकले – त्याचे इतर सुंदर मोतीही- एका सर्वांत अमोल मोत्यासाठी.

येशूने जोडी-जोडीने दाखले शिकवले

ह्या दाखल्याची येशू दुसऱ्या एका वाक्याच्या दाखल्याशी जोड देऊन शिकवतो. तो ही एका वाक्यात सांगितलेला दाखला आहे – शेतात लपलेल्या ठेवीसबंधीचा  (मत्तय १३:४४). येशू शिकवताना असे बहुधा शिकवत असे. दोन उदाहरणांची जोड, प्रत्येकाचा भर वेगळा तरी एकच सामान्य मुद्दा.

त्या आधी मत्तय १३ मध्ये मोहरीचा दाणा व खमीर यांचा दाखला सांगितला (मत्तय १३:३१-३३). यामध्ये त्याने जगामध्ये देवाचे राज्य पूर्णत्वाने आणण्याचा देवाचा अद्भुत मार्ग दाखवला. मत्तय १३:४४-४६ मध्ये तो त्याच्या राज्याची अत्युच्च किंमत दाखवतो. अशी जोड देऊन शिकवण्याने मुद्दा जोरदारपणे मांडला जातोच पण त्यामुळे चित्र विकसित होते आणि अर्थाला नव्या छटा मिळतात.

ठेव आणि मोती

पहिल्या दाखल्यामध्ये (मत्तय १३:४४) लपलेली ठेव ही अचानक मिळाली. तो मनुष्य काही ती हेतुपूर्वक शोधत नव्हता. आश्चर्य म्हणजे त्याने दिलेला आनंदाचा व धक्कादायक प्रतिसाद: आनंदाने तो जातो आणि ते शेत विकत घेण्यास आपले सर्व विकतो. त्या ठेवेशी तो अडखळला आणि त्याचे ह्रदय आनंदाने भरून गेले. दुसऱ्या दाखल्यामध्ये (मत्तय १३:४५-४६) आपल्याला एक व्यापारी दिसतो. तो शोधत आहे.  वर – खाली, जवळ – दूर सर्वत्र शोधत  आहे. त्याला मोत्यांची किंमत नक्कीच माहीत आहे. प्राचीन काळी मोती हे फार किंमती मानले जात. त्यांना सोन्यापेक्षा अधिक मागणी असे. आणि हा व्यापारी फक्त मोती शोधत नव्हता तर किंमती मोती, सुंदर मोती, मोलवान मोती. त्याची चव ही उच्च प्रतीची होती. त्याची नजर तीक्ष्ण होती.

त्या व्यापाऱ्याचे जीवन जगातील सर्वांत किंमती वस्तूंचा शोध करण्यास बांधले गेले होते. आता त्याला एक मोती सापडतो इतका सुंदर इतका किमती की तो जातो आणि आपले सर्वस्व विकतो. येथे अचानक मिळालेल्या ठेवीवर भर नाही तर जाणीवपूर्वक कलेल्या शोधाच्या परिपूर्तीवर आहे. आता त्याला मिळालेल्या आनंदावर भर नाही तर त्या वस्तूच्या अमोल किंमतीवर आहे.

सर्वांचा त्याग करण्यास योग्य
हे दोन्ही दाखले एकत्रित रीतीने एक चित्र दाखवतात. जे आपण पूर्वीच पाहिले आहे. सापडलेल्या नव्या वस्तूसाठी मनुष्य आपले सर्वस्व विकतो. शोध जरी अचानक लागला असला किंवा हेतुपूर्वक केला असला तरी मनुष्य अशा एका मोलवान गोष्टीकडे आला आहे की तो इतका उत्सुक (आणि आनंदी) झाला आहे की त्या ठेवेच्या सर्वांहून अधिक असलेल्या किमतीपुढे – त्या मोत्याच्या अमाप मोलापुढे – तो सर्वांची हानी सोसायला तयार आहे.

कोणताच दाखला किंमत कमी करत नाही. खरं तर दोन्ही दाखले त्याकडे लक्ष वेधतात: अक्षरश: “आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व.” या शिष्यत्वाची किंमत आहे – खूप महान किंमत. पण येथे गुरू हाच ती ठेव आहे. ह्याची किंमत सर्वांना इतकी मागे टाकणारी आहे की आनंदाने आपण त्याला “लाभ” म्हणतो. हा एक मोती इतका किमती आहे की अनेक मिशनरी व  हुतात्म्यांनी डेविड लिव्हिंगस्टन सोबत म्हटले, “ मी काहीच त्याग केला नाही.”

अशा रीतीने ख्रिस्ताचे राज्य आपल्याकडे येते म्हणजे कसे? येशूला अनंत मोलाची ठेव किंवा सर्वात किमती मोती म्हणून आपण कसे स्वीकारतो? सर्वात अधिक किंमतीचा किंवा सर्वाधिक मोलाचा ही मत्तय १३ मधील कल्पना आपल्याला नव्या करारातील निदान  दोन चित्रांकडे निर्देश करते.

अतिशय मोलवान

पहिले आहे बेथानी येथील अभिषेक (योहान १२:३-८, आणि मार्क १४:३-९). मार्था सर्वांना वाढत होती. नुकताच पुनरुत्थान झालेला लाझारस मेजाजवळ टेकून बसला होता. त्यांच्या बहिणीने मरीयेने तेव्हा “अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले” (योहान १२:३). येथे महाग ह्या शब्दासाठी मत्तय १३ मध्ये मोलवान हा मोत्यासाठी वापरलेलाच शब्द वापरला आहे. अर्थातच तो अभ्यंग इतका अस्वस्थ करणारा,  किमती होता की शिष्य विशेषत: यहूदाने आपली कळकळ प्रगत केली. “हे सुगंधी तेल तीनशे रुपयांना विकून ते गरिबांना का दिले नाही?” (योहान १२:५).

एक दिनार हा कामकऱ्याचा रोजगार होता. त्या कूपीची किंमत एखाद्या कामगाराने आठवड्यातले ६ दिवस याप्रमाणे वर्षभर काम केले तर जी कमाई होईल तितकी होती. बहुतेक करून मरीयेची ही भविष्यासाठी तरतूद होती. आणि जरी ती इतकी किमती होती तरी तिला येशू यापेक्षा जास्त मोलवान वाटला. तिला तो सर्वांहून अधिक मोलाचा वाटला. तिने आपले भविष्य त्याच्या पायावर ओतले. आणि हे करण्याने तिने दाखवून दिले की येशू तिच्यासाठी सर्वांहून मोलवान आहे.

सर्वाधिक मोलवान

पौल फिलीपै. ३ मध्ये हाच शोध, त्याग आणि आनंद दाखवतो. कदाचित त्याला तो स्वत: येशूच्या दाखल्यातील व्यापारी म्हणून पाहतो का? जर तसे असेल तर येशूच्या सर्वाधिक मोलापुढे कोणते “किमती मोती” त्याने कमावले होते? तो त्यांची यादी देतो: “मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी; आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे” (फिली ३:५-६).

त्याच्या कर्मठ धर्माच्या संप्रदायाचा पुढारी असताना त्याच्याकडे जन्मजात अशी मोठी परंपरा होती व यासोबत त्याने स्वत:च्या प्रयत्नाने संपादन केलेले कार्य होते. हे सर्व अर्थातच मोलवान मोती होते. आणि तो एका मोलवान ठेवेशी धडकला; ज्याने त्याला आपल्यासमोर आणले, त्याच्या घोड्यावरून खाली पडले आणि त्याचे डोळे उघडले. ही ठेव पौलापासून लपलेली होती आणि तरीही ती तो केव्हापासून शोधत होता. आता पौलाने येशूला सर्वात मोलवान मोती असे पहिले आणि त्याने आपले सर्वस्व हानी असे मानले – आपली जन्मजात परंपरा आणि कमावलेले सर्व काही. “तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो” (फिली ३:८). येशू हा लाभ त्याच्यासाठी अनंत किमतीची ठेव झाला आणि सर्वाधिक मोलवान मोती झाला.

देवाने त्याच्या दैवी चांगुलपणानुसार येशू या व्यक्तीमध्ये देह धरण केला. “कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते” (कलसै २:९). त्याला तुमचा एकमेव मोलवान म्हणून घेण्याने तुमच्या जीव धोक्यात येणार नाही किंवा संकुचित होणार नाही. आपल्याला जे बाधा करते त्यावर तो रामबाण उपाय आहे.आपले क्षुद्र ह्रदय विस्तारण्याचे साधन आहे, आपण सर्व शोधत असलेला तो आश्चर्यकारक उपाय आहे.

 

 

 

Previous Article

जर देवाने मला मुलगी दिली तर ग्रेग मोर्स

Next Article

तुमचे भटकणारे अंत:करण उपकारस्तुतीने भरून टाका जॉन ब्लूम

You might be interested in …

देवावरआशा ठेवण्याचे धाडस करा मार्क रोगॉप

ह्या जगामध्ये आपण आक्रोश करतच जन्माला येतो. जरी आपल्या कोणालाच तो क्षण आठवत नाही तरी आपल्या मातेच्या उदरातली ते उबदार आणि सुरक्षित सीमा सोडताना आपण एक मोठा विरोध करत ते मोठे रडणे करतो. हंबरडा फोडतच […]

बंडखोरीविषयी मुलांना ताकीद देणे

जॉन पायपर तरुणांना ( आणि प्रौढ लोकांनाही ) बंड करण्याच्या पथावर जाऊ न देण्याची ताकीद  देणे हे अत्यावश्यक आहे कारण हा रस्ता त्यांना त्यांच्या नाशाकडे नेतो हे वारंवार सिद्ध होत असते. तरुण जेव्हा या रस्त्यावर […]

हजार छोट्या परीक्षा

स्कॉट हबर्ड जेव्हा मी कामावरून परतलो आणि किचनमध्ये गेलो तेव्हा मला जाणवले की मी एकटा नव्हतो. क्षणभर मी घुटमळलो, मग मला सावरून मी लाईट उघडले. आणि ते तिथे होते, सर्व दिशांनी माझ्याकडे पाहात. भांडी. सिंकमध्ये […]