दिसम्बर 28, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमच्या आनंदाचा विध्वंस करणारा गर्व 

जोनाथन वूडयार्ड

                            

मी एक गर्विष्ठ माणूस आहे. खरंच. या विभागातला मी एक प्रमुख तज्ज्ञ आहे. मी ढोंग करत नाहीये. मला प्रामाणिक आणि नितळ व्हायचे आहे. गर्वामुळे येणाऱ्या समस्या मी प्रत्यक्ष  अनुभवल्या आहेत. मी खूप वेळा गर्व या पापाला माझ्यावर ताबा दिला आणि त्याने माझे कधीच भले झाले नाही. स्वत:बद्दलच्याच विचाराने मला केवळ हताश केले आणि माझ्या जीवनातला आनंद हिरावून घेतला. गर्व नाशकारक आहे असे म्हणण्यात मुळीच चूक नाही.

सुयुद्ध करा


गर्व हा नेहमीच देवाशी झगडत असतो. हे युध्द तुम्हाला करायचे नाही आणि ते तुम्ही जिंकू शकत नाही
.
गर्वाचे धोके आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. मग्रूरी, स्वकेंद्रितपणा आणि स्वगौरव हे ख्रिस्ती व्यक्तीचे गुण नाहीत. जर असे तुम्ही असे स्पष्ट ऐकले नसले तरी अंतरंगात तुम्हाला समजले असेलच की आपण गर्व काढून टाकायला हवा. तरी काही कारणाने माझ्यासारखे लोक अनेक अनेक वेळा गर्व व उद्धटपणाशी झगडत असतात. आपल्याला धोका दिला जातो तरी आपण त्याच्याशी धडक द्यायला जातो. आणि त्यामुळे आपण सर्वच येथे धोक्यात आहोत. प्रत्येक ह्रदयात गर्व हा दडपलेला असतो. या गर्वाबरोबर सरळ युध्द करण्यास तयारी करण्याची गरज आहे. हे सुयुद्ध करण्यास तयारी करण्यासाठी मला तुम्हाला फक्त मदत करायची आहे.

गर्व हा आमच्या रक्तात भिनलेला आहे.

चार्ल्स ब्रिजेस म्हणतात, “गर्व हा श्रेष्ठत्वासाठी झगडत असतो.” सी जे महेनी म्हणतात, “गर्व म्हणजे जेव्हा पापी लोक देवाच्या स्थितीला येण्याची महत्वाकांक्षा बाळगतात आणि आपण देवावर अवलंबून आहोत हे मान्य करण्याचे नाकारतात; कारण गर्व हा आपल्या रक्तात भिनलेला आहे.” या बाबीशी कोणत्या न कोणत्या तरी बिंदूला कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच झगडत असतो.
जेव्हा आपण गर्वाच्या धोक्याबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्याला देवाच्या ठिकाणी उंचावून, आपण स्वतंत्र आहोत असे जगाला सिध्द करण्याची आपल्या सर्वांमध्ये असलेली जी इच्छा आहे तिच्या धोक्यासंबंधी बोलत असतो. जेव्हा मी स्वतंत्र, मोठा, सामर्थ्यवान, सक्षम आहे असा दिसतो तेव्हा जगाने माझी प्रशंसा करायला मी कारण देतो. आणि जेव्हा हे घडते तेव्हा त्यांच्या स्तुतीसोबत मला आनंद मिळतो.

शेवटचे वाक्य आपल्याला गर्वाच्या समस्येत खोलवर नेते. कारण ब्लेस पास्कल ह्या तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे, “सर्वजण आनंदाचा  शोध करतात. माणसाच्या प्रत्येक कृतीमागे हीच प्रेरणा असते, अगदी जे गळफास घेतात त्यांचीही.”
गर्व हेच  मुख्य वचन देतो. “जर माझ्याभोवती असणाऱ्याची स्तुती, प्रशंसा मी  मिळवली तर मी आनंदी – सुखी होईन.” असाच विचार आपण करतो.

गर्वाशी आनंदाने मुकाबला करा

आपली भक्ती व्हावी म्हणून आपल्याला निर्माण केले गेले अशी लबाडी गर्व सांगतो. तर शुभवर्तमान हे सत्य सांगते की आपण भक्ती करावी म्हणून निर्माण केले गेलो आहोत.
जॉन ओवेन यांनी म्हटले आहे “पापाला मारा नाहीतर ते तुम्हाला मारून टाकील.”  गर्व हेच करेल. तो तुम्हाला ठार करील आणि नरकात पाठवील.” “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ आहे” (नीती१६:१८). हे सत्य आहे. नाश येईल कारण “परमेश्वर गर्विष्टांचे पुरेपूर पारिपत्य करतो” (स्तोत्र ३१:२३).
गर्विष्ठ लोकांवर जो नाश प्रभू निश्चितच पाठवील तो जर तुम्हाला टाळायचा असेल तर आपण त्याच्याशी लढायला हवे.

पण गर्वाचा त्याग करून नम्र होण्याकडे आपण कसे झुकू शकतो? यासाठी बरीच धोरणे आहेत, पण येथे मी  एकावरच तुमचे लक्ष केंद्रित करू इच्छितो. गर्वाशी आनंदाने मुकाबला करा. यावर थोडे स्पष्टीकरण:

गर्वाचा नाश करणारी गुरुकिल्ली

प्रथम सुवार्तेचे आपले ज्ञान गर्वाच्या कारणालाच उद्ध्वस्त करते. कृपेची सुवार्ता आपल्या अहंपणाच्या देवाला भेटते आणि आपल्या दुष्टपणाची जाणीव करून देते. वधस्तंभावरच्या तारणाऱ्याच्या बातमीच्या प्रकाशात हा अहंपणाचा देव तितका चांगला दिसत नाही. दुसऱ्या शब्दांत “ सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत” हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपला गर्व अगदीच मूर्ख दिसतो.

सुवार्ता आपल्या अहंपणाच्या देवाला खाली पाडते. देवाने आपल्यावर इतकी प्रीती केली आहे की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र जगण्यासाठी, मरण्यासाठी आणि पुन्हा उठण्यासाठी पाठवला यासाठी की आपला आपल्या स्वर्गीय पित्याशी समेट व्हावा ( योहान ३:१६, रोम ५:१०, २ करिंथ ५:१८, इफिस २:१६; कलसै १:२२). ह्या एकाच प्रकारे आपण वाचू शकतो – आपल्या वतीने येशूने हे कार्य करणे आवश्यक होते (प्रेषित १७:३).

सुवार्ता आपल्याला आठवण करून देते की आपल्याला पापापासून, मरणापासून व नरकापासून  वाचवण्यासाठी  देवाच्या पुत्राला आपल्या ठिकाणी मरावे लागले. अहंपणाचा देव हा कमकुवत देव आहे. तो आपल्याला नाशापासूनही वाचवू शकत नाही. जेव्हा शुभवर्तमान आपल्याला सांगते की आपण जन्मापासून पापी आणि दुष्ट आहोत (स्तोत्र ५१:५) तेव्हा गर्व बाळगणे कठीण होते. ज्यांना ठाऊक आहे की ते स्वत:ला वाचवू शकत नाहीत आणि त्यांना दुसऱ्या कोणाच्या तरी मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी गर्व हा वेडेपणा आहे.

दुसऱ्या शब्दांत कृपेची सुवार्ता अहंपणाच्या देवाला चिरडून टाकते. आपण देवासारखे कसे नाहीत हे दाखवते आणि आपल्याला  तारण देणाऱ्या देवाची स्तुती करायला ती आपल्याला मुक्त करते. पण हीच केवळ चांगली बातमी नाही – आपला स्वत:सबंधीचा दृष्टिकोन आपल्याला नम्र व दु:खी करतो, हे खरे असले तरी तो आपल्याला काहीच करायला भाग पाडत नाही. आपल्याला आनंद, सुख मिळायला हवे. त्यासाठी सुवार्ता आपल्या मुक्त करते.

गर्वापासून रिक्त व आनंदाने समृध्द

माझे ह्रदय लोकांच्या स्तुतीमध्ये आनंद शोधत असे. पण येशू हा देवाच्या सानिध्यात आनंद देतो. “ त्याच्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत” (स्तोत्र १६;११) हे पाहायला आपले डोळे उघडतो. देव माझा तारणारा यामध्येच  अंतिम संपत्ती, सार्वकालिक आनंद मिळतो.

गर्व हा सुखासंबंधी आहे. माझ्यासाठी लोकांची स्तुती प्रशंसा मिळवणे यात हे सुख  असे. तरी माणसांपासून मिळणारा आनंद हा माझ्या प्रभूला, ख्रिस्ताला ओळखणे (फिली. ३:८) या आनंदाच्या तुलनेत कचऱ्याप्रमाणे आहे. खरा पूर्ण, टिकावू आनंद माणसांच्या स्तुतीमध्ये मिळत नाही तर आपली जी अमूल्य संपत्ती जो ख्रिस्त त्याला स्तुती देण्यातच मिळतो.

गर्वाचे प्राथमिक वचन म्हणजे ‘माझ्या सभोवती असणाऱ्यांची स्तुती प्रशंसा जर मी मिळवली तर मी सुखी होईन’
हे दिसतंय का तुम्हाला? आपण सर्वच आनंदी सुखी राहण्याची इच्छा करतो. आपण सर्वच आनंदाचा शोध करतो. गर्व लबाडी करून आपल्याला सांगतो की जर आपण देवाच्या ठिकाणी आपल्याला उंच केले तर आपण सुखी होऊ. जर मी त्या ठिकाणी पोचलो तर लोकांची स्तुती प्रशंसा मिळवीन आणि माझ्या जीवाला आनंद मिळेल.

सुवार्ता याहून चांगले वचन देते. होय सुवार्ता सांगते की आपण दुष्ट आहोत व प्रशंसा होण्यास पात्र नाही. ती आपल्याला खाली आणते. पण मग सुवार्ता आपल्याला वर उठवते. ती सांगते की आपण पापी असता आपला देवाबरोबर समेट करण्यासाठी ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. ती आपल्याला उंचावते. आपल्याला “देव” करण्यासाठी नाही तर आपला देव व प्रभू याची स्तुती गाण्यासाठी मुक्त करते.

Previous Article

आपण अधिक चांगल्या देशाची उत्कंठा धरतो

Next Article

मोठी मिळकत मिळावी म्हणून प्रार्थना करणे चुकीचे आहे का?

You might be interested in …

देवाच्या दीनांना दिलासा (III)

जुळं स्तोत्र ५३ अक्षरश: १४ व्या स्तोत्रासारखंच. दोनच गोष्टींमध्ये भिन्न आहे. (१) पाचवं वचन निराळं आहे. (२) देवाचं एलोहीम नाव यात आठ वेळा आलं आहे. १४ व्या स्तोत्रात ४ वेळा एलोहीम व ४ वेळा यहोवा […]

धडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स

  ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग १ जेव्हा लोक मंडळीची सहभागिता सोडून जातात किंवा जात नाहीत तेव्हा बहुधा कोणती कारणे देतात? •           हे मुद्दे संदर्भासाठी लक्षात घेतल्यास कोणाला “ख्रिस्ती आहे” किंवा “ख्रिस्ती नाही” असे घोषित […]

व्याधींमध्येही भीतीमुक्त

कॅथरीन बटलर एक वर्षापूर्वी मी आणि माझ्या मुलांनी आमच्या एका मित्राला दवाखान्यात भेट दिली. त्याला एम्फिसिमाचा (फुप्फुसाचा एक आजार) पुन्हा एक अटक आला होता. हे त्याचे दुखणे बराच काळाचे होते. अनेक उपचारांचे कोर्सेस, कित्येक दिवस […]