दिसम्बर 26, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उधळ्या पुत्रांच्या पालकांसाठी सात उत्तेजने

जॉन पायपर

प्रश्न

पास्टर जॉन, वीस वर्षांच्या एका उधळ्या पुत्राची मी आई आहे. लूक १५ हा अध्याय मी पुन्हा पुन्हा वाचते. मी त्याचा खूप अभ्यास केला आहे. जर तुम्ही  अशा उधळ्या पुत्राच्या/ कन्येच्या  पालकांशी बोलला तर या परिच्छेदातून तुम्ही त्यांना कशी आशा द्याल? मी दारात उभी राहून त्याची वाट पाहत असताना माझे जीवन  त्या गोष्टीतील पित्यासारखे   दिसावे अशी माझी इच्छा आहे.”

उत्तर

या परिच्छेदामध्ये उत्तेजनासाठी अनेक पातळ्या आहेत. तर या दाखल्यातून निदान सात उत्तेजनपर मुद्दे आपण पाहू या.

१. देव पातक्यांचा पाठपुरावा करतो.

हा दाखला जेव्हा येशू जकातदार व पाप्यांबरोबर जेवतो अशी टीका केली गेली तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून दिलेल्या तीन दाखल्यांपैकी एक आहे. तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो” (लूक १५:२). मग येशूने हरवलेले मेंढरू, हरवलेले नाणे व हरवलेला पुत्र यांचे दाखले सांगितले.

म्हणून हे तिन्ही दाखले दाखवतात की जेव्हा येशू पाप्यांबरोबर जेवत आहे तेव्हा देव काय करत आहे. देव कोणत्याही प्रकारे पापाशी तडजोड करत नाही. ख्रिस्त काही पाप्यांबरोबर जेवून पापी बनत नाही, तो योहान ३:१७ हे करत आहे: “देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.

यामुळे या दाखल्यातील पिता हे देवाचे चित्र आहे, जो ख्रिस्ताद्वारे कार्य करून या उधळ्या पुत्रांना वाचवायला पाहत आहे. हेच मुलभूत चित्र आहे ह्यामुळे आपल्याला उत्तेजन मिळायला हवे.

२. उधळे पुत्र घरी आल्याने देवाला आनंद होतो.

या तिन्ही दाखल्यांमध्ये एक पापी परत आल्याने आनंद साजरा केला जातो. “त्याप्रमाणे ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणार्‍या आनंदापेक्षा पश्‍चात्ताप करणार्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो” (लूक १५:७). आणि उधळ्या पुत्राच्या दाखल्यात बाप म्हणतो,

 “लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला … आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू” (लूक १५:२२-२३). म्हणून या तिन्ही दाखल्यांत देवाचे ह्रदय दिसते की, असे उधळे पुत्र घरी आल्याने त्याला आनंद होतो.

३. यामध्ये दोष नाही तर देव दाखवला आहे.

या तिन्ही दाखल्यांत ज्या स्त्रीने नाणे हरवले, किंवा ज्या मेंढपाळाने मेंढरू हरवले किंवा ज्या पित्याने मुलाला गमावले

त्यांच्या दोषावर लक्ष केंद्रित केले नाही. हा इथे मुद्दा नाही. उधळ्या पुत्राच्या दाखल्यात तर हे स्पष्ट आहे कारण तेथे पिता हा देवाचे चित्र दखवतो. जो निश्चितच परिपूर्ण पिता आहे आणि तरीही त्याचा पुत्र त्याने गमावला. तर येथे आपल्याला या दाखल्यांत देवावर  लक्ष केंद्रित करायला उत्तेजन दिले आहे, आपल्यावर नाही. आपल्या दोषांवर नाही तर ज्या प्रकारचा देव या दाखल्यात दिला आहे त्याच्याशी आपण व्यवहार करतो.

४. देव विपत्तीतून विवेक आणू शकतो.

उधळ्या पुत्राने त्याच्या जीवनाच्या संकटातील सर्वात खालच्या पातळीवर असताना ह्रदय बदल होण्याचा अनुभव घेतला. डुकरांचे अन्न तो खाऊ लागला; “अशा वेळी  तो शुद्धीवर येऊन म्हणाला” (लूक १५:१७). जेव्हा तो अगदी आशाहीन होता  तेव्हा  त्याने संजीवनाचा अनुभव घेतला.

५. देवाचे ह्रदय त्याच्या मुलांकडे धाव घेते.

आता ह्या दाखल्यातील सर्वात कोमल,  सुंदर, सामर्थ्यशाली क्षण. तो असा प्रभावी असावा या इच्छेनेच येशूने दाखला सांगितला. तो म्हणजे जेव्हा पिता आपला पुत्र दूरवर आहे असे पाहतो, तेव्हा तो त्याला भेटायला धावत जातो – चालत नव्हे धावत . “तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले” (लूक १५:२०). तेव्हा त्याने पहिले, भावले, धावत गेला, मिठी मारली, मुके घेतले. हे चित्र आपण आपल्या मनात ठेवू या.  फक्त देवाचे चित्र म्हणून नव्हे तर आपली ह्रदये अशीच कोमल आणि उत्सुक असावी म्हणून.

६. देव मृतांना उठवू शकतो.

पिता मुलाच्या जीवनात झालेला बदल वर्णन करताना तो मेलेल्यातून जीवनात आला असे म्हणतो.

“ हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे” (लूक १५:२४). हे उत्तेजनदायी आहे कारण पिता मुलाची भयानक अवस्था कमी करत नाही. मुलगा मेला होता. मानवी दृष्टिकोनातून त्याला काहीच आशा नव्हती. म्हणून तुमच्या उधळ्या  पुत्राची कठीणता, बेफिकिरी, कटूपणा, उपहास पाहून असा विचार करू नका की हे कधीच बदलणार नाही. हे बदलू शकते. तो मेला होता आणि आता तो जिवंत आहे.

७. देव दोन्ही मुलांना घरी आमंत्रण येण्यास आमंत्रण करतो.

अखेर हे लक्षात  घ्या की या बापाला एकच नव्हे तर दोन उधळे पुत्र होते. जेव्हा येशू जकातदार व पापी लोकांबरोबर जेवत होता तेव्हा तिथे दोन प्रकारचे हरवलेले लोक होते. एक जकातदार आणि पापी आणि दुसरे शास्त्री व परूशी.

उधळ्या पुत्र हा जकातदार व पापी यांचा  प्रतिनिधी  आहे . आणि दुसरा पुत्र हा शास्त्री व परूशी यांचा प्रतिनिधी आहे. आपला पिता धाकट्या मुलाचे परत येणे साजरे करतो हे पाहून त्याला राग आला. नव्या जीवनाचा त्याला राग आला. हा मुलगा वडिलांशी आपले नाते हे नात्याचा आनंद  घेण्याऐवजी विशेष अधिकार मिळणे असे पाहतो- अगदी शास्त्री परूश्यांसारखेच. तर अशा भटकलेल्या पुत्राला पिता काय प्रतिसाद देणार?

मी जर्मनीत असताना शत्रूंवर प्रेम करणे याबद्दल सत्र घेताना काही लोक म्हणाले, – “येशूने परूशांना गळ घालणे शक्यच नाही. तो त्यांच्याशी फक्त नकारात्मक च बोलला. त्याने त्यांना विश्वास ठेवण्यास कधीच पाचारण केले नाही.” त्यावेळी मी त्यांना दाखवून दिले की असे म्हणणे कुठे घेऊन जाते. वचन २८ पाहा. “तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला.”  आणि त्याचा पिता बाहेर आला- जसा उधळ्या पुत्रासाठी आला तसाच. तो बाहेर आला आणि त्याने या कायद्यानुसार वागणाऱ्या मुलाला गळ घातली, विनंती केली.

तर याचा समारोप असा होईल : ही  सात  करणे ह्रदयात ठेऊ या. आणि लक्षात  ठेवा; येशूने म्हटले, “त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला” ( लूक १८:१)

Previous Article

छिन्नविछिन्न जीवनातून देव काय करू शकतो

Next Article

ईयोब १:१-५

You might be interested in …

कोमट कसे राहू नये

लेखक: ग्रेग मोर्स अनेक वर्षे मी समजत होतो की मी ख्रिस्ती आहे -पण मी नव्हतो. माझे आणि देवाचे नाते आहे हे मी शपथेवर सांगे- पण तसे नव्हते. मी कोणत्याही क्षणी मेलो तरी स्वर्गात माझे स्वागत होईल […]

गेथशेमाने बाग

लेखांक ४                                          (२) प्रार्थनेचा अर्थ : उपासना. उपासनेचा ख्रिस्ती अर्थ: देव मानवाची भेट. दोघांची देवाणघेवाण. त्यानं देवपण द्यायचं, मानवानं ते घ्यायचं. देवाची तारणाची योजना… तारण म्हणजेच देवपण. देवानं द्यायचं, मानवानं घ्यायचं. हा जिव्हाळा.. प्रीतीचा […]

लक्ष विचलित  झाल्यास तुम्हाला मोठी किंमत द्यावी लागेल लेखक: जॉन ब्लूम

येशूने शुभवर्तमानात पुन्हा पुन्हा सांगितलेले वाक्य असे आहे, “कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको” (मार्क ४:२३). जर आपण शहाणे असू तर येशू जे काही सांगतो ते आपण ऐकू, विशेष करून त्याने वारंवार सांगितले ते. […]