जनवरी 14, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्तजन्मदिनी भग्न जनांची कशी काळजी घ्याल?

केटलिन मिलर

आनंद व दु:ख यांचे प्रसंग  जितके मी अनुभवते व इतरांनाही पाहते तितकी माझी खात्री होत आहे की ख्रिस्त जन्मदिन हा जीवनाच्या गोड गोष्टी अधिक गोड करतो आणि कठीण गोष्टी अधिक कठीण करतो.

आपल्यातील काही जणांना हा नाताळ इतका उत्साहपूर्ण असेल की आपण आपली घरे दिवे,  संगीत आणि प्रियजनांना बोलवून  भरून टाकू. इतर काही जणांना आपल्याकडे नाही याची जाणीव किंवा जे गमावले त्याच्या आठवणीत प्रत्येक दिवस तग धरून काढावा लागतो. “या जगात तुम्हाला क्लेश होतील” (योहान १६:३३) हे ख्रिस्ताचे शब्द लक्षात घेता आपण अशा दोन्ही प्रकारच्या नाताळांतून जाण्याची शक्यता आहे.  

ज्यांना निराशेच्या व वेदनेच्या गडद  मोसमाला तोंड द्यावे लागते त्यांना देवाच्या अभिवचनातून समाधान मिळेल की, “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो” (स्तोत्र ३४: १८) आणि ते त्याच्या जवळ येतील. त्याच वेळी ज्यांना कृतज्ञता व आनंदाचा उज्ज्वल मोसम अपेक्षित आहे ते अशा भग्न ह्रदयी जणांच्या समीप येऊन आपल्या देवाची दया व करुणा प्रदर्शित करतील.

या सणाच्या दिवसात ज्या तारणाऱ्याचा आपण उत्सव साजरा करतो तो आपले अश्रू पाहतो ( स्तोत्र ५६:८) आपल्या जवळ येतो (स्तोत्र १४५ :१८) आणि तो नेहमीच आपल्याबरोबर आहे (मत्तय २८:२०). तसेच आपणही त्याची प्रेमदया आपल्या भोवताली सहन करणाऱ्या लोकांना दाखवत असताना त्यांना घरी बोलावू या, त्यांच्या गरजेचा भार उचलू या व हे स्थिरतेने त्यांच्यामध्ये करू या.

१. दु:ख सहन करणाऱ्यांची आठवण करा

 जोशाने सणात आनंद करताना आपल्यालाही पूर्वी कठीण मोसम आले होते हे विसरणे सोपे आहे. जे आपल्या सहचारिणीच्या सान्निध्याचा आनंद घेत आहेत त्याना विसर पडला असेल की नाताळाच्या वेळी आपण कसे एकटे पडत असू. जे आता आपल्या घरी स्थिर आहेत त्यांना विसर पडला असेल की फिरतीच्या नोकरीमध्ये आपण किती अस्थिर होतो. ज्यांना आता आर्थिक स्थिरता लाभली आहे त्यांना पूर्वीच्या सणांचा विसर पडला असेल की बिल भरताना, कुटुंबाला पोसताना, आणि मुलांना बक्षीस देण्याच्या त्यागाने त्यांनी किती काळजीत हा दिवस  घालवला होता.

आपल्या भूतकाळातील परीक्षांचा विचार करताना जी अभिवचने व उत्तेजन आपण घट्ट धरले होते त्यांची आठवण करून जे संकटात आहेत त्यांच्याशी आपण समरूप होऊ शकतो. “ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे” (२ करिंथ १:४) . आपल्या दु:ख सहनाची आठवण इतरांसाठी आपले ह्रदय मृदू करते .

मी कठीण परिस्थितीतून जात असताना जे सतत माझी विचारपूस करत व विचारपूर्वक मदत करत त्यांची  काळजी अर्थभरित होती. आपण पण अशा लोकांच्या गरजा विचारून  छोट्या गटांमध्ये प्रार्थना करू शकतो. जेव्हा तुम्हाला त्यांची आठवण येते तेव्हा त्यांना मेसेज पाठवा. जे नाताळच्या वेळी एकटे आहेत त्यांना काही गोडधोड करून पाठवा. किंवा कामातील तुमच्या झगडणाऱ्या  सहकाऱ्याला उत्तेजनपर नोट लिहा. सणाच्या आठवड्यात कठीण दिवशी फोन करून त्यांच्याशी बोलू शकता. असे करून तुम्ही त्यांना दाखवता की त्यांच्या दु:खाकडे दुर्लक्ष केले जात नाही.

येशू या दिवशी जगात आला तो आपला  “दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक” (इब्री. २:१७) म्हणून. त्याच्यासारखेच आपण  दयाळू, विश्वासू राहू या, दु:ख सहन करणाऱ्यांना आपल्या ह्रदयात बाळगू या व ते प्रकट करू या.

२. त्यांना आमंत्रण द्या

जेव्हा ह्या  सणात एकमेकांसमवेत असण्यासाठी भर दिला जातो  तेव्हा दु:ख हे एकाकी टाकू शकते. पण हा सण इम्मानुएलाचे स्वागत करण्यासाठी उभारला गेला आहे (मत्तय १:२३). हा देव नेहमीच आमच्या बरोबर आहे. त्याचे जीवन व मरण आपल्याला त्याच्यासोबत अखंड सहभागिता ठेवण्यासाठी व  कोणी अलग करू शकणार नाही अशा प्रीतीसाठी आमंत्रण करते (रोम ८:३८,३९). जसे ख्रिस्ताने आपले स्वागत केले आहे तसेच आपण एकमेकांचे स्वागत करावे अशी आज्ञा तो आपल्याला करतो. त्यामुळे त्याचे गुण आपल्याद्वारे प्रकट होतील व देवाचा गौरव होईल (रोम १५:७) .
एकाकी जनांना आपल्या घरी सण साजरा करण्यासाठी बोलावणे हे  सहजस्फूर्तीने व अडचण सोसून  करावे लागणार आहे. आपण त्यांना एखादा ख्रिसमस चित्रपट  पाहण्यासाठी, आपल्याबरोबर चर्चला येण्यासाठी किंवा आपल्याबरोबर भोजन करण्यासाठी आमंत्रण करू शकतो.  “एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो” (स्तोत्र ६८:६). देवाने येशूला आपल्याबरोबर असण्यासाठी पाठवले ते आपण ह्यावेळी खुल्या मनाने दाखवू या.

३. त्यांच्या गरजा भागवा

बहुधा इतरांची संकटे इतकी  मोठी असतात आणि  आपल्याला वाटते की देवानेच हस्तक्षेप करावा, त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांना उभारी द्यावी कारण केवळ तोच हे करू शकतो. आपण अशी प्रार्थना करत असतानाच त्यांच्या गरजा  भागवता येईल याची संधी दवडू नये. जो शब्द देही झाला त्याने आपल्यामध्ये वस्ती करताना भोजन दिले, बरे केले आणि गरजा भागवल्या.

कदाचित नुकतेच काम गमावलेल्या पालकाच्या मुलांसाठी तुम्ही बक्षिसे देऊ शकाल किंवा चर्चमधील वृध्द व्यक्तीला त्यांच्या नातवाकडे नेवून भेटवू शकाल. आणि जर कशी मदत करायची हे सुचत नसेल तर नम्र व्हा आणि त्यांनाच विचारा. असे केल्याने तुम्ही त्यांना योग्य मदत देऊ शकाल.
आपण इतरांच्या मोठमोठ्या समस्या सोडवू शकत नाही पण त्यांच्या सामान्य गरजा पुरवून आपल्या मेंढपाळाने त्यांच्या खोल गरजा पुरवाव्या म्हणून आपण प्रार्थना करू शकतो.

४. तेथे हजर व्हा

दु:ख सहन करणाऱ्या लोकांशी सत्य बोलल्यानंतर  आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहतो कारण अजून काही बोलायचे राहिलेले नसते. जेव्हा जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये धास्तावलेल्या लोकांबरोबर रिपोर्ट ऐकण्याची वाट पाहत थांबलेले असतो, आपल्या दिवाणखाण्यात रडणाऱ्या व्यक्तीचे हात हातात घेतो, तेव्हा आपण पवित्र आत्म्यावर भरवसा ठेवू शकतो की “आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो”  (रोम ८:२६).
आपल्या देव सतत आपल्याबरोबर आहे. जरी आपण सर्वत्र असू शकत नाही तरी आपण आपल्या शांत सान्निध्याने त्यांना सांत्वन देऊ शकतो.

५. जगाचा प्रकाश परावर्तित करा

सणामध्ये आनंद व दु:ख दोन्ही आपल्या सभोवती असताना आपण प्रार्थना करणे जरुरीचे आहे. आपल्याभोवती जे आहेत त्यांच्यासाठी प्रभुने आपल्याला मृदू ह्रदय द्यावे, आपण जे दुरुस्त करू शकत नाही ते देवाने करावे, आपण दयेचे पात्र बनावे म्हणून देवाने आपल्याला समंजसपणाचा आत्मा द्यावा आणि देवाने आपल्याला वापरावे म्हणून आपल्याला उत्सुक मन द्यावे म्हणून प्रार्थना करावी.

पहिला ख्रिस्तजन्मदिन ही वरून आलेली उदयप्रभा होती (लूक १:७८-७९). आपला दयाळू देव आपल्याला अंधारात प्रकाश देण्यासाठी आला आणि आपले पाय शांतीच्या मार्गावर नेण्यासाठी आला – मग हा सण आपल्यासाठी अधिक गोड असो किंवा कठीण असो.  आपण ज्याचा   सण  साजरा करतो तो  भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी म्हणून आला आहे  (यशया ६१:१) आणि ह्या मोसमामध्ये आपण त्याची करुणेची, सुज्ञतेची, विश्वासूपणाची  सेवा पुढे नेत हा जगाचा  प्रकाश परावर्तित करू या.

Previous Article

ख्रिस्तजन्मदिन तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही

Next Article

जेव्हा येशू पुन्हा येईल

You might be interested in …

तुमच्यासाठी येशू कोण आहे वनिथा रिस्नर

शुभवर्तमान ही चांगली बातमी आहे हे मला ठाऊक आहे पण मी हे सहज विसरते की ही आश्चर्यकारक रीतीने चांगली बातमी आहे. माझ्या ह्रदयाने याचे पुनरावलोकन करावे म्हणून मी देवाला विचारत होते की मला माझे पाप […]

देवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस

  देवाचे  मार्ग अनाकलनीय आहेत आपण कधी कधी देवाकडे स्पष्टीकरणाचा आग्रह धरत नाही. पण तो काय करत आहे याची आपणच कल्पना करतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या बाबतीत प्रत्यक्षात काय घडत आहे यावर विचार केल्याशिवाय आपल्याला होत […]

सात वचनांमध्ये विवाहाची कहाणी

डेविड मॅथीस नुकताच मी एका प्रगल्भ जोडीचा विवाह लावला. वधू आणि वर दोघांनीही तिशी ओलांडली होती. ते दोघेही विश्वासात आणि जीवनात स्थिर होते आणि आपण कशावर उभे आहोत ते त्यांना माहीत होते – देवाच्या वचनावर. […]