अप्रैल 22, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

येशूला दुःख का सहन करावे लागले?

जॉन पायपर

प्रश्न
माझा प्रश्न असा आहे: देवाने येशूला ते गौरव देण्यासाठी त्याला सार्वजनिक ठिकाणी दुःख सहन का करावे लागले? येशू आपल्यासाठी पूर्णपणे एकाकीपणात किंवा प्रसिद्धीस न येत परिपूर्ण, कायद्याचे पालन करणारे, पर्यायी जीवन जगू शकला नसता का? मला माहीत आहे की त्याने एकट्याने मोहांना तोंड दिले होते. तसाच तो शांतपणे मरण पावला असता, नंतर उठला असता तर मृत्यू आणि पापावर मात केली असती का, सार्वजनिक ठिकाणी दुःख सहन करूनच का? किंवा जर त्याने असे केले असते, तर त्याला ‘नंतरचे’ गौरव मिळाले नसते का? त्याला सार्वजनिक ठिकाणी दुःखसहन करून लवकर मरणे आवश्यक होते का? त्याच्या सार्वजनिक दु:खाचा आणि त्याच्या शाश्वत गौरवाचा संबंध काय आहे?

उत्तर

एका अर्थाने हा जर-तर असा प्रश्न आहे; ज्याला बायबल खरोखर थेट हाताळत नाही (“जर येशू परिपूर्ण, पापरहित जीवन जगला असता आणि वयाच्या ८५ व्या वर्षी नैसर्गिक मृत्यू झाला असता तर – त्याचे जीवन आणि मृत्यू आपल्याला वाचवू शकले असते का?”) बायबल त्या शक्यतेवर विचार करण्यात जास्त वेळ घालवत नाही. आणि म्हणून आपण तिथे जाण्याची गरज नाही. तरीही, या विशिष्ट प्रश्नाचे आणि अशा प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करताना, आपल्याला आश्चर्य वाटते की देवाने हे एका विशिष्ट मार्गाने केले – देवाने त्याच्या पुत्राने वेदनादायक, सार्वजनिकरित्या, अत्यंत दुःख सहन करावे अशी योजना केली – आणि त्याने ते अशा प्रकारे का केले यावर आपण गंभीर मनन करण्याची गरज आहे.

ख्रिस्ताने सार्वजनिक रीतीने भरलेली किंमत

क्रूसावर चढवण्याच्या सार्वजनिक दुःखाशिवाय ख्रिस्ताच्या परिपूर्णतेद्वारे आपली सुटका साध्य होऊ शकली असती का या प्रश्नावर मी विचार केला आहे. बायबलमध्ये असे का घडू शकले नाही याची किमान सहा कारणे मला दिसतात – दुसऱ्या शब्दांत, क्रूसावर चढवलेल्या ख्रिस्ताचे सार्वजनिक, भयानक दुःख आपल्या तारणासाठी आवश्यक होते.

१. पूर्वनियोजित योजना

पहिले आणि कदाचित सर्वात स्पष्ट कारण म्हणजे जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने हे विशिष्ट दुःख पूर्वनियोजित केले होते. देवाची शाश्वत योजना होती की त्याचा पुत्र अशा प्रकारे दुःख सहन करेल. प्रेषितांची कृत्ये ४:२७, २८: “कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले; ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे.”

तर, हेरोद, पिलात, खिळे आणि भाला चालवणारे परराष्ट्रीय सैनिक आणि वधस्तंभावर खिळवून ठेवणारा जमाव – त्यांनी त्या शेवटच्या तासांमध्ये येशूबरोबर जे काही केले ती सर्व देवाची योजना होती. तसे घडणार हे आधीच ठरलेले होते. ते अचानक निवडले गेले नाही. आरामदायी जीवन आणि ८५ वर्षांच्या मृत्यूचा पर्याय योजनेत नव्हता. ते घडू शकले नसण्याचे ते पहिले कारण आहे.

२. पूर्ण झालेली शास्त्रवचने

दुसरे, या दुःखांची भविष्यवाणी देवाच्या वचनात करण्यात आली होती. जुन्या करारातील शास्त्रवचने मोडता येणार नाहीत. शुभवर्तमानांमध्ये, ख्रिस्ताच्या शेवटच्या दुःखांच्या तपशीलात “शास्त्र पूर्ण व्हावेत म्हणून” असे वारंवार म्हटले आहे (मत्तय २६:५६; लूक २२:३७, २४:२६; योहान १३:१८; १९:३६). उदाहरणार्थ, “आपल्या पापांसाठी त्याला भोसकण्यात आले” (यशया ५३:५). भोसकण्यात आले. कर्करोग नाही, म्हातारपण नाही, हृदयविकार नाही. आपल्या पापांसाठी त्याला भोसकण्यात आले.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ख्रिस्ताचे भयानक सार्वजनिक लज्जा आणि दुःख एवढेच नव्हे तर  त्याच्या कपड्यांचे काय होईल याचे तपशील जुन्या करारात  लिहिले गेले होते.  ती लिखाणे मोडता येणार नव्हती, त्यामुळेच त्याचे दुःख टाळता येणार नव्हते.

३. योग्य दु:खसहन

तिसरे (आणि हे प्रकरणाच्या गाभ्याला स्पर्श करते), इब्री लोकांस २:१०: “कारण ज्याच्यासाठी सर्वकाही आहे, व ज्याच्या द्वारे सर्वकाही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दु:खसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते.” [उचित हा शब्द अधोरेखित करा.]

हे खूप गहन आहे आणि त्यावर खूप अभ्यास आणि तासनतास मनन करायला हवे. ख्रिस्ताच्या दुःखांद्वारे आपले तारण साध्य करण्याचा देवाचा शाश्वत निर्णय अनियंत्रित किंवा लहरी किंवा अर्थहीन नाही, तर देव सर्व गोष्टींबद्दल विचार करतो त्याप्रमाणे ते एका खोल योग्यतेमुळे, उचित, अनुरूप आहे. ते योग्य आहे; शेवटी, तुम्ही म्हणू शकता, ते सुंदर आहे. म्हणजेच ते देवाच्या इतर सर्व कृती आणि योजनांशी परिपूर्ण सुसंगत आहे. ते योग्य का आहे याचा शोध घेण्यात आपण सर्व आयुष्य घालवू शकतो, परंतु इब्री लोकांस २:१० हे वचन ख्रिस्ताच्या दुःखांवर एका मोठ्या ध्वजासारखे फडकू द्या. आपले तारण या मार्गाने साध्य व्हावे आणि दुसऱ्या मार्गाने नाही, हे देवाच्या मनात होते –  ते योग्य, चांगले, उचित, सुंदर होते.

४. बलिदानाचा कोकरा

चौथा, येशूचा मृत्यू हा जुन्या करारातील कोकऱ्याच्या बलिदानांसारखेच देवाने एक जाणूनबुजून केलेले बलिदान होते. पौल म्हणतो की  “”वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त” (१ करिंथ. ५:७). म्हणून जुन्या कराराप्रमाणे, कळपात मेंढ्याला म्हातारा होऊन रोगराईने मरण्याची परवानगी देणे हे बलिदान नव्हते. बलिदानाचा तो मार्ग नव्हता. तुम्ही मेंढी घेतली आणि तुम्ही तुमच्या हृदयाने आणि हेतूने तिला स्वाधीन केले.

तर, एखाद्या दुर्गम गावात ख्रिस्त म्हातारा होऊन मरणे हे देवाचे बलिदान नव्हते. देवाच्या मौल्यवान कोकऱ्याचा गळा कापला गेला. प्रकटीकरणात कोकऱ्याचे काय झाले आणि त्याने आपले तारण कसे साध्य केले यासाठी वध हा शब्द वापरला आहे. बलिदानात एक हेतू होता. येशूला बलिदान म्हणून वधण्यात आले. इब्री लोकांस १०:१२: ” परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे.”

५. त्याच्या रक्ताने

पाचवे, नवीन करारात वारंवार, ख्रिस्ताने त्याच्या रक्ताद्वारे त्याचे तारण कार्य पूर्ण केले असे म्हटले आहे. उदाहरणार्थ, रोम. ५:९: “तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे.” “रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही”  (इब्री लोकांस ९:२२). मला वाटते की ख्रिस्ताच्या बलिदानाच्या मृत्यूचे महत्त्व सांगण्याचा हा आणखी एक मार्ग आहे.

६. वधस्तंभावरचे मरण

आणि शेवटी सहावे कारण. फिलिप्पै. २ मध्ये देवाच्या बरोबरीच्या सर्वोच्च बिंदूपासून मृत्यूच्या सर्वात खालच्या बिंदूपर्यंत गेलेल्या येशूच्या अपमानाचे वर्णन केले आहे – आणि पुढे तो जोडतो, “तेही वधस्तंभावरचे मरण”  (फिलिप्पै. २:८). सर्वोच्च ते सर्वात खालच्या बिंदूपर्यंतचा मार्ग. यामुळे देवाने याचे प्रतिफल म्हणून येशूला उच्च  करणारा – केवळ पुनरुत्थानाद्वारे नवीन जीवनाकडेच नाही तर- सर्व राष्ट्रांच्या प्रभू म्हणून प्रभूंच्या प्रभू म्हणून गौरवाकडे नेण्याचा हा मार्ग होता..

“तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले”

( फिली.२:६-८). आणि हे शब्द फालतू शब्द नाहीत, कारण आपली मुक्तता मिळवण्यासाठी तो सर्वात खालचा बिंदू असायलाच पाहिजे होता. वधस्तंभावरचा मृत्यू – सर्वात घृणास्पद, लज्जास्पद, वेदनादायक हत्येचे  हत्यार.

“ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे” (फिलिप्पै. २:९-११).

देवाच्या मनात, त्याच्या पुत्राच्या गौरवासाठी एक मार्ग होता, आणि हा मार्ग क्रूसावर चढवून केलेला एक वेदनादायक, अपमानजनक मृत्यू होता. दुःखाची खोली, त्याने सहन केलेला वधस्तंभाचा अपमान, हा सर्वात खालचा टप्पा होता. जो त्याला देवाकडून तारणहार म्हणून सर्वोच्च प्रभुत्वाचे पद मिळवून देण्यासाठी गाठायचा होता.

प्रभू होण्यास योग्य

कदाचित शेवटचा उतारा हा आहे की कोकऱ्याच्या वधामुळे येशू जगातील सर्व लोकांचा योग्य राज्यकर्ता बनला – प्रकटीकरण ५:९-१०: “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; [दुसऱ्या शब्दांत, “इतिहास उलगडण्याचा प्रभू होण्यास तूच योग्य आहेस.”] कारण तू वधला गेला होतास [वयाच्या ८५ व्या वर्षी एका दुर्गम गावात मरण पावला नाही.] आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.”

म्हणून किमान त्या सहा कारणांमुळे, आपण असे म्हणू शकतो की येशू ख्रिस्ताचे गौरव होण्यासाठी आणि आपल्या तारणाची प्राप्ती करण्यासाठी त्याने ज्या प्रकारचे दुःख सहन केले त्या प्रकारचे दुःख खरोखरच आवश्यक होते, आणि आपण त्या दुःखांना आणि आपल्या तारणाला आदर  म्हणून कोकऱ्याचे, वधलेल्या कोकऱ्याचे गाणे सदैव गाऊ.

Previous Article

भरकटले जाण्याविरुद्ध युद्ध पुकारणे

Next Article

त्याला दगा दिला जाणारच होता

You might be interested in …

विश्वासाला आव्हाने?

 सॅमी विल्यम्स धडा ३ रा                                        ईयोब १:६-१२                                                जुना करार ही ख्रिस्ताची सावली आहे तर नवा करार आपल्याला ख्रिस्त उघडपणे दाखवतो. कळसाचे अंतिम दु:ख सहन करणारी पवित्र व्यक्ती ख्रिस्त आहे. ईयोब हा दु:ख सहन […]

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

लेखक : जेराड मेलीन्जर काही वर्षांपूर्वी माझे आजी व आजोबा अजूनही आमच्याबरोबर होते तेव्हा आम्ही एका पिकनिकला गेलो. आजी पहिल्यासारखी राहिली नव्हती. विस्मरण हळूहळू कायमचे झालेले होते. ते इतके वाढले की तिला माझे किंवा घरच्या […]

ख्रिस्ती व्यक्तीसारखी योजना करा

स्कॉट हबर्ड जे योजना करतात ते देवासारखी कृती करतात. ज्या निर्मात्याने हे विश्व सहा दिवसाच्या आराखड्यानुसार बनवले त्याच्यासारखे आपण काही प्रमाणात दिसू लागतो. “मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले”  ( २ राजे १९:२५) […]