नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

लेखांक ३: माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ

(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा )

हे आमच्या स्वर्गातील पित्या,तुझे नाव पवित्र मानले जावो,तुझे राज्य येवो,जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहीतुझ्या इच्छेप्रमाणे होवो! “(मत्तय ६: ९ व १० )

माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या आयुष्यात एक मोठी आणि कायमस्वरूपी पोकळी निर्माण झाली आहे,जी कधीही भरून जाणे शक्य नाही!  कोणीही व काहीही ही पोकळी कधीही भरून काढू शकत नाही ! माझ्यापेक्षा सर्व बाबतीत श्रेष्ठ असलेली माझी अर्धांगिनी मला अचानकपणे, अनपेक्षितपणे व या बाबतीत मला पूर्ण कल्पना येण्याआगोदरच माझ्या आयुष्यातून निघून गेली! रीटाचा वियोग हा माझ्यासाठी केवळ एक शारीरिक, भावनात्मक आणि सामाजिक आघातच नाही तर एक महान आध्यात्मिक नुकसान आहे! मी कधीही कल्पना केली नव्हती की तिचा वियोग माझ्या आयुष्यावर एवढी मोठी छापउठवेल ! मी असे  कधीही अपेक्षित केले नव्हते की  माझ्या पत्नीशिवाय मला माझे जीवन व्यतीत करावे लागणार आहे! पण अचानक हे एक वास्तव झाले!

शा काही गोष्टी घडतात की त्या घडू नये अशी आमची इच्छा असते पण त्या स्वीकारणे आम्हाला भागपडते.काही गोष्टी आम्हाला येत नसतात पण त्या आम्हाला शिकाव्या लागतात आणि काहीं व्यकतींशिवाय आम्ही जगू शकत नाही, पण त्यांना जाऊ व्दावे लागते!”[1]

जरी मला हे माहीत होते की माझी प्रिय पत्नी खरोखर हे जग सोडून गेली आहे तरीही माझ्यासाठी हा फार प्रचंड व तीव्र असा धक्का होता. माझे  मन हे स्वीकारण्यास  तयारच  नव्हते की खरोखरच असे काही माझ्या आयुष्यात घडले आहे– की रीटा माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे–की यापुढे ती माझ्याबरोबर संवाद करू शकणार नाही–की माझ्या आयुष्यातील तिचा भाग हा संपलेला आहे –की  मी तिच्याकडे जाऊ शकेन परंतु ती माझ्याकडे या पृथ्वीवर परत येणार नाही!

” …..मी त्याच्याकडे जाईन, पण तो  माझ्याकडे परत येणार नाही ” ( शमुवेल 12: 23).

अशा प्रखर दु: खाच्या  तीव्र वेदना व्यक्त करणेही मला फार अवघड होते!  मी सतत रडत होतो आणि अश्रूंच्या धारा न थांबत माझ्या डोळ्यांमधून माझ्या गालावर वाहत होत्या!

माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत ;तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?” (स्तोत्र ५६: ८)

पण या अश्रूंनी माझ्या अंत: करणाला बरे करण्यास मोठ्या प्रमाणात मदत केली! जेव्हा जेव्हामागे वळूनमीरीटाच्या  माझ्या आयुष्यामधून झालेल्यावियोगासंबंधी विचार करू लागतो त्या त्या वेळेस मी तिची प्रशंसा केल्याशिवाय राहू शकत नाही. माझ्या स्वत:च्या, आमच्या मुलांच्या तसेच इतर अनेक लोकांच्या आयुष्यात माझी प्रिय पत्नी ही ‘एक अनुकरण करावे’ असे उत्तम उदाहरण होते. तिने शौर्याने आणि ख्रिस्तावरील तिच्या विश्वासांत  कर्करोगाबरोबरच्या तिच्या शेवटच्या लढाईचा सामना केला!

माझ्या मनात सतत विचार येत होते : ‘आता मी कशासाठी जिवंत आहे’?’आता माझ्या आयुष्यात काय खरोखर महत्वाचे आहे’? ‘आता माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे’? प्रिय रीटाचे निधन हे माझ्या जीवनामध्ये फक्त ‘एक घटना’ असे असे होऊन राहाणार आहे का देवाच्या बागेत उपयुक्त होण्यासाठी माझे जीवन बदलणारी संधी असे होणार आहे’? तसेच पास्टर ख्रिस यांनी अंत्यसंस्कार समयी आव्हान केले त्याप्रमाणे माझ्या मनात विचार येत होते की ‘माझ्या अंत्यसंस्कारासमयी लोक माझ्याबद्दल काय बोलतील’? ‘मी माझ्या पावलांचे काय ठसे उमटवणार’?’ माझ्या मनात उठलेल्या या सर्व प्रश्न आणि शंका यांच्याशी लढत असताना आणि माझ्या दु:खातून वर उभारण्याचा प्रयत्न करत असताना, देवाच्या वचनाच्या सत्यतेकडे व त्याचा’चांगुलपणा,दया आणि कृपा’ याकडे लक्ष केंद्रित करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे माझ्यासाठी एक मोठे आव्हान बनले आहे.

जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल” (मत्तय ५:४)

जरी या पूर्वी मी माझ्या वडीलांचा, आईचा, धाकट्या भावाचा आणि काही इतर नातेवाईक आणि मित्रांचा वियोग, त्यांच्या देवाघरी जाण्यामुळे अनुभवला होता तरी मृत्यूसंबंधीची निश्चितता आतांपर्यंत इतक्या प्रखरतेने मला कधीहीं जाणवली नव्हती ! कदाचित मी त्यावेळस जास्त तरुण होतो किंवा कामामध्ये जास्त गर्क होतो, परंतु आता रीटाच्या देवाघरी जाण्याच्या वियोगामुळे मला एक मोठ्ठा धक्का बसला होता आणि त्यामुळे माझ्या मनात उदासीनता, गोंधळ, खिन्नता, दोषीपणा आणि निराशाच्या भावनांनी घर केले. माझ्या मनात अत्यंत प्रखरपणे माझ्या स्वत:च्या शोकाची आणि तसेच रीटा जिवंत असताना तिच्याजवळ माझे प्रेम, माझ्या भावना आणि माझ्या संवेदना व्यक्त करणे जास्त महत्वाचे असूनही त्या वेळेस तसे न केल्यामुळे हरवलेल्या अनेक संधींची आठवणी येऊन मला  माझ्या स्वतच्या नालायकपणची व कुजकेपणाची जाणीव फार प्रखरपणे झाली की आता या सर्वांचा काय उपयोग! (ज्या वेळेस रीटा जिवंत होती त्यावेळेस तर हे प्रेम व भावना मी ठीक व्यक्त केल्या नाहीत, ज्या त्या वेळी रीटासाठी खरोखर महत्वाच्या होत्या व आता त्यांचा काय उपयोग? मला मिळालेल्या अनेक संधी मी वाया घालविल्या!) जसजसा मी या अनेक परस्परविरोधी बाबींसंबंधी विचार करत होतो तसतसे ही वस्तुस्थिती माझ्यासाठी हे एक मोठे आध्यात्मिक आव्हान झाले (व अजूनही आहे)! माझ्या अनेक मित्रांनी मला ज्ञानाच्या वचनांव्दारे व प्रोत्साहनांच्या शब्दांव्दारे माझे सांत्वन केले आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्यामध्ये माझा विश्वास ‘अधिकबळकट’ करण्यात मदत केली.

जसजसेमी देवाजवळ माझे मन व माझ्या हृदयाच्या वेदना ओतल्या,तसतसेत्याच्या कृपेने माझ्या शोकात प्रवेश केला. माझ्या शोकाव्दारे मला माझ्या स्वत:च्या जीवनातील अपयशांकडे आणि माझ्या अनेकचुकांकडे पाहण्यास मदत केलीआणि माझ्या चुकीच्या कृत्यांची मला जाणीव करून दिली. मी ज्या वेळेस माझ्या या फार मोठ्या‘गमावलेल्या व्यक्तीसंबंधी आणि तसेच माझ्या अशा तीव्र दुःखाच्या, भीतीच्या व अनिश्चिततेच्या भावनांबरोबर लढत होतो, त्या वेळेसमाझी प्रबळ इच्छा होती की मी देवाकडून यासंबंधी स्वत: ऐकावे! आणि खरोखर, देवाच्या वचनांव्दारे देवावरील आणि त्याच्या ‘सर्व अभिवचनांनवरील’ माझा विश्वास’वाढण्यातआणि अधिक बळकट होण्यात देवाने माझी मदत केली व अजूनही करीत आहे. कारण देव हा  जे काही करतो त्या सर्व बाबतीत तो सत्य आहे, म्हणून मी त्याच्यावर व त्याच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवू शकतो!

ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे, त्याने देव सत्य आहे, ह्या गोष्टींवर शिक्कामोर्तब केले आहे” (योहान ३:३३)१: (अ) ज्या परीक्षा आणि दु:खांतून मी / आम्ही जातो त्या अपरिहार्य आहेत म्हणजेच त्याबाबतीत मी माझी कोणतीही इच्छा चालू देऊ शकत नाही!

स्त्री पासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायव क्लेशभरित असतो” (ईयोब १४:१)

(ब) आणि या परीक्षा / दु:खे ही माझ्या/ आमच्या इच्छेवर अवलंबून नसतात. म्हणून माझी / आमची ही परीक्षा होत असते. आपण सर्वजण नेहमीच कोठल्यातरी परीक्षा / दु:खांतून जात असतो!

माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना”(याकोब १: २)

“……तरी आता (तुम्ही) थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्र्या परीक्षांमुळे दु: ख सोसले ह्यासाठी की  नाशवंत सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावे……आणि त्या विश्वासाचे पर्यवसन जे आपल्या जिवांचे तारण ते उपभोगतउपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासीत व्हावे (पहिले पेत्र १ ६(ब), ७ आणि ९)

(क)  आम्हांला मर्यादा, समस्या, आजार, उणीवा असताना देखील देव माझी / आपली परीक्षा घेत असतो आणि देव मला / आम्हाला या बाबतीत काहीही स्पष्टीकरण न देता असे करू शकतो.यामुळे मी / आम्ही आमच्या जीवनांमध्ये ख्रिस्ताच्या ‘प्रतिरुपाचे’ व्हावे व ‘ख्रिस्ताची प्रतिमा’ आमच्या जीवनांमध्ये दिसून यावी व  आम्ही  त्याच्या ‘परिवाराचे’ एक घटक व्हावे असा त्याचा अंतिम उद्देश आहे!

परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगाऊच नेमून ठेवले ” (रोम ८:२९)

तुम्हाला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो – आणि धीराला आपले कार्य  पूर्ण करू द्या. यासाठी कीतुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी”

(याकोब १:३ ,४ ).

(ड)  माझ्या / आपल्या जीवनात कोणतीही बाब ही अपघाताने घडत नाही; काहीही केवळ योगायोगाने होत नाही. जे काही घडते त्याला देवाने  परवानगी दिलेली असते. कारण त्यामागे देवाचा सार्वभौम उद्देश असतो! आणि देव आमच्या सर्व परीक्षांमध्ये आणि तसेच आमच्या सर्व दु: खांमध्ये आमच्याबरोबर असतो.तसेच देव मला / आम्हाला आमच्या सहनशक्ती पलीकडे त्रास भोगू देणार नाही. कारण त्याने स्वत: ही ‘मर्यादा’ निश्चित केली आहे! आणि देवाने माझा त्याग केलेला नाही तर तो मला / आम्हाला  त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहन देत असतो !

 “तू जलातून चालशील तेव्हा, मी तुझ्याबरोबर असेन; द्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाहीत” (य़शया ४३: २).

 “परमेश्वर माझे सामर्थ व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतपूर्वक भाव ठेवला .. “(स्तोत्र २८: ७ अ) .

                                                                                         क्रमश:

Previous Article

“मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो”

Next Article

संपादकीय

You might be interested in …

तुमच्या मुलांना तुम्ही कोणत्या झाडाबद्दल सांगणार? लेखक : पॉल ट्रीप

उजेडण्यापूर्वी जेव्हा आम्ही अंधारात बसायचो तेव्हाचे ते क्षण माझ्या कुटुंबाला खूप आवडायचे. दरवर्षी माझी मुले माझ्यामागे लागायची की आपण ते कधी करणार?  एकमेकांमध्ये ती चर्चा करायची की ते किती मोठे असणार आहे? मग आम्ही मुलांना […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ (१७२६ ते १७९७)

संकलन – क्रॉसी उर्टेकर  लेखांक ४  कार्यपद्धती –  येशूने वापरलेल्या पद्धतीप्रमाणे श्वार्टझ् दोघादोघांना जोडीने सुवार्ताकार्याच्या कामगिरीवर पाठवत असे. त्या ठिकाणी सभा भरवून उपदेश केल्यावर ते सल्लामसलत करीत. तेथे त्यांचे आदराने स्वागत होऊन त्यांनी आपल्या गावी […]