प्रीती म्हणजे सुवार्ता
मोठमोठ्या गोष्टीची केलेली नक्कल आपण नेहमीच स्वीकारतो. मोनालिसाच्या बऱ्याच प्रती अस्तित्त्वात आहेत. पण सर्वात महान नक्कल सुद्धा मूळ प्रतीची केवळ सावली वाटते. आपण ती नक्कल केलेली प्रत स्वीकारतो कारण आपल्याला माहीत आहे की खरी प्रत आपल्या हाती लागू शकणार नाही. म्हणून आपल्या हाती आलेली प्रत नेहमीच मूळ प्रतीची सावलीच असेल.
प्रीतीसबंधी काय? जगात प्रीती अस्तित्वात आहे का? जसे महान गोष्टीच्या नकला केल्या जातात तसे या जगातील प्रीती खऱ्या प्रीतीची पोकळ सावली आहे. पण योहान येथे अद्भुत शक्यता दाखवत आहे ती अशी – जर तुम्हाला येशूची ओळख असेल तर नकली प्रेम जगण्याची गरज नाही. देवाची प्रीती तुम्ही स्वीकारून इतरांना देऊ शकता.
शास्त्राभ्यास
प्रीती अस्तित्वात आहे कारण देव अस्तित्वात आहे (व. ७-८)
प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी देवावर प्रीती करतो
तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही;
कारण देव प्रीती आहे (१ योहान ४:७).
योहान प्रीतीवर खोल मननाच्या विषयाकडे वळत आहे. प्रथम त्याने म्हटले की ख्रिस्ताच्या विजयाच्या नवीन युगाचे प्रीती हे लक्षण आहे (२:७-११). आणि मग प्रीती करणे हा देवाच्या जीवनाचा पुरावा आहे असे म्हणतो (३:११-१८). आता तो मूलभूत बोलतो – प्रीती हा दैवी स्वभावाचा व आपल्यासाठी केलेल्या कृतीचा पाया आहे. प्रीती हे शुभवर्तमान आहे.
•शास्त्रभाग पुन्हा वाचा. प्रथम एक आज्ञा दिली आहे.
कोणाला दिली आहे? विश्वासी जनांना दिली आहे. पण योहान या आज्ञेचा प्रारंभ शब्द खेळीने करत आहे – “प्रियजनहो आपण एकमेकांवर प्रीती करावी.” पाहिलेत? त्याचा श्रोतेवर्ग केवळ विश्वासी जनांचा नाही; तर तो त्या विश्वासी जनांना आठवण करून देत आहे की ते “प्रियजन” आहेत. “तुमच्यावर प्राती केली आहे म्हणून तुम्ही प्रीती करा”
पण योहान आपला मुद्दा पुढे चालू ठेवतो. का प्रीती करा? कारण प्रीती देवापासून आहे. तो कोणत्या प्रकारची प्रीती यावर बोलत नाही – “देवाची प्रीती” आणि “मानवी प्रीती.” प्रीती अस्तित्वात राहू शकते कारण तिचा उगम जेथून आहे तो देव अस्तित्त्वात आहे. आपण त्यावरून काही निष्कर्ष लगेच काढू शकतो:
۰तुम्हाला त्या उगमातून ती प्रीती प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही खरी प्रीती करूच शकत नाही. इतर प्रीतीला काहीही म्हणा ती बनावटच असणार.
۰प्रीतीचा उगम इतरत्र कोठेही सापडणार नाही. याचा अर्थ मानवी नातेसंबंध, सगेसोबती, लैंगिक संबंध अगर कोणतीही जगिक गोष्ट खरी प्रीती देऊ शकत नाही.
• दुसरी गोष्ट योहान त्या प्रीतीच्या गुणविशेषासंबंधी बोलतो. खरी प्रीती अशी दिसते: जो कोणी प्रीती करतो तो देवापासून (देवाच्या बीजाने) जन्मलेला आहे आणि तो देवाला ओळखतो(देवाशी सहभागिता).
जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही.
देवाचा स्वभावच प्रीती करण्याचा आहे. याउलट काहीही असणे शक्यच नाही (प्रीती देव आहे). गुण म्हणून प्रीती ही देवाच्या मूळ स्वभावात आहे. जसे तुम्ही सूर्यप्रकाशात उभे राहिला तर तुम्ही स्पष्ट दिसणार तसे जर तुम्ही देवाशी जोडले गेलात तर तुम्ही प्रीती दर्शवाल.
देव प्रीती करतो म्हणून प्रीती ओळखता येते (व. ९)
देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली आहे (४:९).
“देव प्रीती आहे” असे म्हणणे किंवा “देवाने प्रीती केली आहे” असे म्हणणे यात महत्त्वाचा फरक आहे. जे काही आतापर्यंत म्हटले ते “देव प्रीती आहे” व त्यावरून आपल्याला कळते की प्रीती म्हटलेले काहीतरी अस्तित्वात आहे. पण ते नेमके काय आहे ते कधीच समजू शकणार नाही फक्त ते अद्भुत वाटेल एवढेच.
•९ व्या वचनात खरी प्रीती आपण दोन प्रकारे समजू शकतो.
पहिली गोष्ट, प्रीती ही एका व्यक्तीमध्ये, फक्त ख्रिस्तातच दिसत
सुवार्तेचा इतिहास योहान एका वाक्यात सारांशाने देतो – सुवार्ता काय आहे? ” ती देवाची प्रीती देहधारी होणे आहे.”
९ वे वचन आपण असे मांडू शकतो: “जेव्हा ख्रिस्त आला, तेव्हा देवाची प्रीती प्रकट झाली. “प्रीतीच्या उत्पादकाने प्रीतीचे हे पुस्तक लिहिले. त्याची भाषा त्याच्या पुत्राची, येशू ख्रिस्ताची आहे.
देव आपल्याला मूलभूत गोष्टीचा अक्षय साठा देतो, यासाठी की आपण तो वाटून टाकावा – आपल्याला त्याची नकली प्रत करण्याची किंवा बनावट प्रत करण्याची गरज नाही.
१ योहान ३:१५ – “यावरून आपल्याला देवाची प्रीती कळते.”
दुसरी गोष्ट, केवळ ख्रिस्ताद्वारे आपण प्रीती करू शकतो
देवाने आपल्या पुत्राला या जगात पाठवण्याचे कारण, आपण त्याच्या द्वारे जीवन जगावे. प्रीती हे जीवनाचे लक्षण आहे. मृत व्यक्ती प्रीती करू शकत नाही. मृत व्यक्ती ख्रिस्तामध्ये झालेले प्रीतीचे झालेले प्रगटीकरण पाहूही शकत नाही. देवाखेरीज आपली प्रीती स्वकेंद्रित असते. कारण आपण पापात मृत आहोत (इफिस२:१).
आपण स्वार्थीपणे आपल्या फायद्यासाठी प्रीती करतो.
आपण गर्वाने आपल्या गौरवासाठी प्रीती करतो.
आपण पापी उद्देशाने स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन प्रीती करतो.
•येशू केवळ “प्रीती देहधारी व्हावी” म्हणून आला एवढेच नाही तर “आपण त्याच्या द्वारे जिवंत राहावे” म्हणूनही आला. यासाठी की मृतपण व बंधनांपासून आपण मुक्त व्हावे म्हणजे आपण खरोखर जिवंत राहू व म्हणून प्रीती करू.
• यातून देवाशिवाय आपल्याला प्रीती करणे अशक्य का आहे याची दोन कारणे थोडक्यात मांडलेली दिसतात – पहिले हे की तुम्हाला देवाची ओळख झाल्याशिवाय देवाच्या प्रीतीची ओळख होऊ शकत नाही. दुसरे, तुम्हाला जीवन प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही प्रीती कृतीत आणू शकत नाही, आणि जीवन तर केवळ देवाचा पुत्र येशू ख्रिस्तच देऊ शकतो
देव प्रीती स्पष्ट करतो म्हणून प्रीती शक्य होते
प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली
आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले (४:१०).
तुम्ही रस्त्यावर जर सर्वेक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की बहुतेक लोक भावना, भावनात्मक जिव्हाळा, त्या ओढीवरील निष्ठा अशी प्रीतीची व्याख्या करतात. पण आपल्याला जिवंत केल्यामुळे आपण ती प्रीती पाहू शकतो. देव कृतीने आपल्यावरील प्रीतीची व्याख्या देतो.
•प्रीतीच्या कृतीला प्रीतीच्या जिव्हाळ्याची जोड असली तरी, नुसता जिव्हाळा पोकळ असतो.
•देव प्रीतीची व्याख्या काय करतो? प्रीतीचा जो विषय (व्यक्ती) त्यावर प्रीती करण्यात आनंद शोधणे. वचन १० चे निरीक्षण करा.
विनाअट प्रीती – आपण जेव्हा प्रीती केली नाही तेव्हा त्याने आमच्यावर प्रीती केली. कोणत्याच सबबी न देता, एकतर्फी प्रीती केली.
त्यागाची प्रीती – त्याने आपल्या पुत्राला पाठवले. त्याने टोकन दिले नाही. तर त्याने त्याला अत्यंत मोलवान, प्रिय असलेला आपला पुत्र आपल्यासाठी दिला. त्याने सर्वोत्तम गोष्ट आपल्याला दिली.
संतोषवणारी प्रीती – आपल्या पापांच्या “प्रायश्चित्तासाठी” बदलीच्या मरणासाठी त्याने आपल्या पुत्राला पाठवले. आपण त्याच्यावर प्रीती केली नाही. आपण आपल्या पापांवर प्रीती करत होतो. त्याने आपल्यावर प्रीती केली आणि आपली पापे आपल्या बदली त्याच्या पुत्रावर लादून झाकून टाकली. ख्रिस्ताने देवाचा न्याय संतुष्ट केला. यासाठी की आपण देवाशी जडलेल्या नातेसंबंधाचे जीवन जगू शकावे.
यामधून त्याला काय मिळते? आनंद (इब्री १२). आपल्याला समाधानात मिळणारा आनंद.
प्रीती अत्यावश्यक आहे कारण देव तशी अपेक्षा करतो (व. ११)
प्रियांनो देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे (४:११).
येथे या आज्ञेचे संपूर्ण चित्रण केले आहे. आपल्याला केवळ देव प्रीती करण्याची आज्ञा देत नाही तर प्रीती करण्यास सामर्थ्यही पुरवतो. आणि मग ख्रिस्तामध्ये त्या प्रीतीचे खरेपण दाखवतो.
• वचन ११मधील आज्ञा अशी आहे – ज्या प्रकारे देव आपल्यावर प्रीती करतो त्याच प्रकारे आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. कशी?
▫ विनाअट प्रीती – आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही तरी सबब न सांगता प्रीती करायची.
▫ त्यागाची प्रीती – टोकन न देता आपली मौल्यवान गोष्ट परस्परांसाठी देणे.
▫ संतुष्ट करणारी प्रीती – समोरच्या व्यक्तीला खरोखर आशीर्वाद मिळण्यात आपला आनंद असणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे.
चर्चा व मननासाठी प्रश्न
जर ही वचने खरी असतील तर काही लोक स्वभावत:च इतरांपेक्षा अधिक प्रेमळ असतात असे आपण म्हणू शकतो का? आपल्या ठायी प्रीती नसल्याची आपण सबब सांगू शकतो का? ज्या लोकांच्या घरी प्रीती दर्शवली गेली नाही अशी पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेल्या लोकांचे काय? हा शास्त्रभाग कसा लागू होतो?
• अशा विशिष्ट लोकांचा विचार करा की ज्यांना तुम्ही प्रीती दर्शवण्याची गरज आहे कारण देवाने तुम्हाला त्याची प्रीती दर्शवली आहे. त्याच्याप्रमाणे या व्यक्तींवर प्रीती करायला देवाने तुम्हाला कृपा व सामर्थ्य पुरवावे म्हणून प्रार्थना करा.
Social