दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा ३३. १ योहान ५:२०,२१ स्टीफन विल्यम्स

                                                              स्वत:स मूर्तीपासून दूर राखा

पुस्तकाचा समारोप करताना आपण काय ओळखायचे व कसे ओळखायचे याविषयी योहान तिसरे विधान करत आहे. देवाला ओळखण्यामागचा हेतू हा आहे की आपण दुसऱ्या कशाचीही आराधना करू नये.

शास्त्राभ्यास

आपण काय, का  व कसे ओळखावे

आपल्याला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे; आणि जो सत्य आहे त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिली आहे; जो सत्य त्यामध्ये म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यामध्ये आपण आहो. हाच खरा देव; हे सार्वकालिक जीवन आहे (१ योहान ५:२०).

येशू मानवी देहधारी होऊन आलेला देव आहे. योहान म्हणत आहे की त्याने आपल्याला देवाची ओळख करून दिली आहे (योहान १:१८ वाचा).
• “ओळख करून देण्याचे” काम पवित्र आत्मा देवाच्या वचनातील साक्षीद्वारे ख्रिस्ताला प्रकट करण्याने करतो.
(१ योहान २:२०; १ योहान ४:२).
• त्याच्या येण्याचा व आपल्याला ज्ञान करून देण्याचा हेतू काय आहे?
पहिला हेतू, जो सत्य आहे, त्याचे ज्ञान व्हावे:
۰ “सत्य” या शब्दाला प्रतिशब्द आहेत, “खरे, प्रामाणिक.” देव खरा आहे, आणि आपण सत्य देवाला ओळखू शकतो; कारण त्याला येशूने पवित्र आत्म्याद्वारे प्रगट केले. (योहान ६:३२; १५:१; सत्यासाठी वापरलेले प्रतिशब्द लक्षात घ्या.)
۰ वचन २० मध्ये आरंभी “माहीत आहे” हा शब्द “वास्तवाचे ज्ञान होणे” अशा अर्थाने वापरला आहे. पुढे हीच कल्पना “अनुभवाने ज्ञान होणे” या अर्थाने वापरली आहे.
۰ आपल्याला हे सत्य माहीत आहे की ख्रिस्त आला आणि अनुभवामध्ये खऱ्या देवाला ओळखण्याचे ज्ञान दिले.
दुसरी गोष्ट “त्याच्यामध्ये आपण असणे.”
۰ अनुभवाचे नातेसंबंध इतर कोणत्याही मानवी नातेसंबंधांपेक्षा अधिक काही असतात.
۰ वचन १९ शी तुलना – जग “त्या दुष्टाच्या सामर्थ्याच्या अधीन आहे” म्हणजे जगात जे आहेत, ते सैतानी सत्तेच्या क्षेत्रात आहेत. आपण देवाच्या आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रात आहोत.
۰ देवाचा पुत्र येशू याने देव प्रगट केल्यामुळे आपले केवळ त्याच्याशी नातेसंबंध प्रस्थापित झाले एवढेच नाही तर त्याच्याशी सहभागिताही सुरू झाली. तुम्ही पुत्राशिवाय पित्याला ओळखू शकत नाही. जर तुम्ही पुत्राला ओळखले तर तुम्हाला पिता ठाऊक आहे आणि तुम्ही “त्याच्यामध्ये” आहात.
۰आणि “पित्यामध्ये असणे” म्हणजे “पुत्रामध्ये असणे” (योहान १४:६-९).
तिसरी गोष्ट, सार्वकालिक जीवन असणे.
۰ जो सत्य आहे त्याच्याशी जे सहभागी असतात, त्यांना त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन मिळते (योहान १७:३).

एक अखेरचे लागूकरण

मुलांनो , तुम्ही स्वत:स मूर्तीपासून दूर राखा (५:२१).
जर पुष्कळ देव असतील तर त्या प्रत्येकाचे स्वतंत्र क्षेत्र असणार, जसा राजा आपले राज्य चालवतो तसे. प्रत्येकावर निष्ठा ठेवणारे असणार. पण जर एकच खरा देव असेल तर सारे चित्रच पालटते .
प्रीती, आराधना, विश्वास ही फक्त त्यालाच दिले जाणार.
बाकीचे जे  काही  ते मूर्तिपूजा असणार आणि त्याने तो खिन्नच होईल. (अनुवाद ६:४, ५ – त्यामुळे सर्वांनी त्या एकाचीच उपासना करायला हवी.)
• राखा यासाठी शब्द आहे, “संरक्षण करा, सांभाळा.” योहान हळुवारपणे कडक इशारा देत आहे. त्याच्या  मनात कोणत्या मूर्त्या आहेत याविषयी तो विस्ताराने बोलत नाही.
• विचार हा आहे: ज्या सर्वांना देवाने आपली मुले केले आहे, ते त्या खऱ्या देवाला जाणतात, ओळखतात व   त्याच्याशी सहभागी आहेत.
• देवाच्या लोकांना कोणतीही प्रत्यक्ष मूर्तीची मूर्तिपूजा असो किंवा बौद्धिक मूर्तिपूजा असो; ती सत्य भ्रष्ट करणारी आहे.
जर आपण देवाची मुले आहोत तर प्रकाश असणाऱ्या देवाशी पाप विसंगत आहे.
जर आपण देवाचे बीज आहोत तर प्रीती असलेल्या देवाशी द्वेष विसंगत आहे.
जर आपण देवाचे लोक आहोत तर जो देव खरा आहे, त्याच्याशी मूर्तिपूजा विसंगत आहे.
• आपल्याला कोणते भाग आवडतात आणि कोणते आवडत नाहीत याविषयीच्या निवडी आपण करू शकत नाही. म्हणजे आपण कोणावर प्रीती करतो, कोणत्या पापाला आपण मुभा देतो, कोणत्या सत्यावर आपण  विश्वास ठेवतो याविषयीची पसंती आपण निवडू शकत नाही.

चर्चा व मननासाठी प्रश्न

काही लोक प्रत्यक्ष मूर्तीची पूजा करतात. प्रतिमा, चित्रे, आणि व्यक्ती देव नसताना देव म्हणून निर्माण केले जातात. काही लोक येशूचीही प्रतिमा बनवतात. ही खोटी उपासना असून ती स्वीकारण्यास योग्य नसल्याने प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने बंदच केली पाहिजे. पण दुसऱ्या आणखी कोणत्या मूर्त्या आहेत? (१ करिंथ १०:१३- १४; कलसै ३:५).
• तुम्ही कोणत्या मूर्तींची उपासना करता? पुढील यादी वाचा. आणि तुमच्या वैयक्तिक जीवनातील बनावट देव शोधून काढा. यापैकी काही तुमच्याविषयी खरे आहे का? देवाने तुम्हाला तुमची मूर्ती त्याच्यासमोर सादर करण्यास साह्य करावे म्हणून प्रार्थनेत काही वेळ घालवा.

जीवनाला तेव्हाच केवळ अर्थ आहे / मला तेव्हाच किंमत आहे, जर…

▫         “माझा इतरांवर प्रभाव व सत्ता असेल” (अधिकाराची मूर्तिपूजा).
         “मला — चे प्रेम व मानसन्मान मिळेल” (मान्यताप्राप्तीची मूर्तिपूजा). 
         “मला या प्रकारच्या सुखाचा अनुभव मिळेल, माझे विशिष्ट दर्जाचे जीवन असेल.” (ऐषारामाची मूर्तिपूजा).
         “माझ्या जीवनाच्या — क्षेत्रात माझे वर्चस्व असेल” (नियंत्रणाची मूर्तिपूजा).
         “लोक माझ्यावर अवलंबून असतील; त्यांना माझी गरज असेल” (मदतीची मूर्तिपूजा). 
         “कोणीतरी मला संरक्षण देऊन माझे रक्षण करत असेल” (अवलंबून राहण्याची मूर्तिपूजा).
         “कोणाची तरी काळजी घेण्याचे कर्तव्य किंवा जबाबदारी घेण्यापासून मी पूर्णपणे मुक्त असेन.” (स्वतंत्रतेची मूर्तिपूजा).
         “मी खूप फलदायी असून खूप काही करून घेऊ शकेन” (कामाची मूर्तीपूजा).
         “माझ्या यशप्राप्तीसाठी मी ओळखला जाईल आणि मी माझ्या कामाची श्रेष्ठता वाढतच राहील” (कार्यसिद्धीची मूर्तिपूजा).
▫         “मला विशिष्ट स्तरावरची संपत्ती, आर्थिक स्वातंत्र्य, आणि उत्कृष्ट पद असेल” (भौतिकतेची मूर्तिपूजा). 
         “मी माझ्या धार्मिक नीतितत्त्वांशी बद्ध असून त्यातील सर्व कार्ये यशस्वीपणे पूर्ण करीन” (धार्मिकतेची मूर्तिपूजा).
         “ही व्यक्ती माझ्या जीवनात असून तेथे ती सुखी असेल आणि / किंवा माझ्यासोबत आनंदित असेल (व्यक्तीची मूर्तिपूजा).
         ” मी संघटित धर्मापासून पूर्णपणे स्वतंत्र असून स्वयंकृत नीतिमूल्यांचे जीवन जगत आहे”  (निधर्मीपणाची मूर्तिपूजा).
         “माझा वंश व संस्कृती वडिलोपार्जित आहे व ती उच्च समजली जाते” (वर्ण / संस्कृतीची मूर्तिपूजा). 
         “विशिष्ट समाजगट, किंवा व्यावसायिक गट, किंवा इतर गटात मला सहज घेतात” (आंतरर्वर्तुळाची मूर्तिपूजा).
         “माझी मुले किंवा माझे पालक माझ्याविषयी आनंदी आहेत” (कुटुंबाची मूर्तिपूजा).
         “श्री. व सौ. खरे माझ्या प्रेमात पडले आहेत” (नातेसंबंधांची मूर्तिपूजा). 
         “एखाद्या समस्येत मी दुखावलो गेलो तरच मला प्रीती करण्यास पात्र असल्यासारखे किंवा अपराधाशी सामना केल्यासारखे वाटते                        (दु:खसहनाची मूर्तिपूजा).
         “माझे राजकीय किंवा सामाजिक कारण सत्तेच्या प्रभावात प्रगती करण्यास व वर जाण्यास मसमर्थ करते” (विचारसरणीची मूर्तिपूजा).
         “मला एक विशिष्ट शरीरयष्टी आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण रूप आहे” (रूपाची मूर्तिपूजा).

 

Previous Article

देवाची प्रीती लेखक : जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

Next Article

ख्रिस्तजयंती एकाच दिवसासाठी पुरेशी नाही लेखक : अॅन्द्रीयस कोसनबर्गर

You might be interested in …

जवळजवळ तारलेला

ग्रेग मॉर्स न्यायाच्या दिवशी त्याचा न्याय ही सर्वात दु:खद गोष्ट असेल. नरकामधला हा सर्वात दयनीय प्राणी असेल. जो नेहमीच जवळ येत होता पण कधी पार झालाच नाही. आपल्यातले कोणी या गटातले नसावे अशी माझी इच्छा […]

देव तुम्हाला क्षमता देईल जॉन ब्लूम

बायबलमध्ये देवाने समाधान, उत्तेजन, मार्गदर्शन आणि खात्री देणारे मोलवान खडे काही ठिकाणांमध्ये विखरले आहेत.  मला  अपेक्षा नसताना मी माझी वैयक्तिक भक्ती करत असताना अगदी किचकट अशा निर्गमच्या काही जागी मला ते दिसले. पूर्ण खुलासा: एकांतसमयी […]

स्वर्गाची उत्कट इच्छा

  “माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे माझी निराशा होणार नाही कारण नेहमीप्रमाणे पूर्ण धैर्याने आताही माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराच्या व्दारे महिमा होईल याची मला खात्री आहे. कारण माझ्यासाठी जगणे  म्हणजे ख्रिस्त आणि […]