Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on जनवरी 22, 2019 in जीवन प्रकाश

फार जोराने धावण्यापासून सावध राहा                           जॉनी एरिक्सन टाडा

फार जोराने धावण्यापासून सावध राहा जॉनी एरिक्सन टाडा

जेव्हा मी ३० वर्षांची होते तेव्हा माझ्या जॉनी ह्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभली होती. जॉनी हा चित्रपट राष्ट्रभर गाजत होता आणि मी कॅलीफोर्निया येथे जॉनी अॅंड फ्रेंड्स ही संस्था स्थापण्यास स्थलांतर केले.

काही लक्षात येतंय? छोटाश्या जॉनीवर केवढा भार – असं नाही का का वाटंत तुम्हाला?

१९७९ मध्ये जेव्हा मी मेरिलॅंडच्या आमच्या फार्ममधून कॅलीफोर्निया येथे गेले तेव्हा मला मला आश्चर्याचा धक्का बसला. या मोठ्या शहरी राहणीसाठी माझी काहीच तयारी नव्हती. पुस्तके, चित्रपट यांचे नाविन्य केव्हाच संपून गेले.  मी एक एकमजली घर विकत घेतले व आणि अपंगापर्यंत ख्रिस्ताची प्रीती घेऊन जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक छोटेसे ऑफिस भाड्याने घेतले. बरं तर प्रभू, मी आता कॅलीफोर्नियात आहे आणि काम करायला तयार आहे. नॉन प्रॉफिट संस्थेचे व्यवस्थापन, घर चालवणे, सेवाकार्याची उभारणी करणे यासंबंधी मला खूप शिकावे लागले. आणि माझ्या दोन्ही हातापायांना झालेला पक्षघात विसरू नका. तीस वर्षे वय? माझं डोकं कुठं होतं?

पक्षघात असतानाही जोराने धावणे

माझ्यापेक्षा सुद्न्य, अधिक देवाभीरू अशा लोकांसमवेत मी वेळ घालवला. विशेष गरजा असलेल्यांच्या ख्रिस्ती कार्यक्रमात मी स्वत:ला बुडवून घेतले. अपंगाच्या सेवेसाठी नवे नमुने शिकत होते. लवकरच अनेक तज्न्य आणि मी देशभर दौरे करू लागलो. ज्या मंडळ्यांची विशेष गरजा असलेल्या कुटुंबांमध्ये कार्य करण्याची इच्छा होती त्यांच्यासाठी परिषदा भरवू लागलो. मी आता भरधाव पळत होते.

आणि कदाचित या तीस वर्षीय मला मी हे सांगितले असते – तू फार जोराने धावत आहेस. सेवेचे दबाव आणि वैयक्तिक, आध्यात्मिक शिस्त यांचा मी समतोल राखायला हवा हे मला समजत होते. पण मागे वळून पाहताना मला दिसते की देवाने मला ज्या सेवेसाठी पाचारण केले होते त्यामध्ये मी खूपच कार्यशीलतेने व्यस्त होते आणि ज्या देवाने मला पाचारण केले त्याच्यामध्ये फारशी व्यस्त नव्हते.

म्हणून ३० वर्षीय जॉनीला मी म्हटलं असतं,

“अपंग लोकांपर्यंत पोचण्यास तुला कधी वाटणार नाही तितकी  देवाला जास्त कळकळ आहे आणि ते तो जॉनी आणि सहाय्यक यांना धरून किंवा त्यांच्याशिवाय करू शकतो. म्हणून वेग कमी कर आणि येशूवर अधिक प्रीती कर. आणि ही प्रीती पवित्र होण्याचा पाठपुरावा करून सिध्द कर.”

ह्या तिशीच्या मुलीने खांदे उडवून म्हटले असते, “पहा तू सत्तरीला पोचली आहेस. माझे आणि देवाचे संबंध खरंच चांगले आहेत.” मी त्या हेकेखोर तरुणीचे खांदे हलवले असते आणि तेच तिला पुन्हा सांगितले असते. ख्रिस्ती नेतृत्वाचे नम्र करणारे वजन कसे पेलावे याची तिला काय कल्पना होती? नैसर्गिक नेते हे सहाजिकच त्यांच्या कलाकौशल्यावर अवलंबून राहतात. आणि त्यामुळे ते पापाची फसवेगिरी पाहू शकत नाही.

ती मी होते.

लाडक्या पापांची लपवणूक

जर मी माझ्या पवित्रीकरणात मला प्रत्यक्ष गोवून घेतले असते – तर माझ्या जीवनातील पापाला घालवून देण्यासाठी माझ्या जीवनात पवित्र आत्म्याशी अधिक सहकार्य केले असते. “धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे” (तीत २:१२).

मी छोट्या अपराधांना चोरण्यात कुशल झाले होते. त्यांना सौम्य करून दाखवत, सन्मान्य वाटण्याजोगे करीत. उदा. जॉनी मिशल, बीटल्स ह्यांची मी चाहती होते. जेव्हा माझा अपघात झाला व मान मोडली तेव्हा त्यांचे अल्बम माझ्या संग्रहात प्रामुख्याने होते. “ब्लॅक बर्ड “ हे गाणे मला खिन्नतेतून वर काढायला मी लावायचे आणि सर्वात अधिक म्हणजे देवाविरुद्धचा माझ्या कटूपणासाठीही. मी दवाखान्यातून बाहेर आल्यावर देवाच्या आत्म्याने माझी चूक दाखवून दिली. हे अल्बम्स माझ्या आध्यात्मिक आरोग्यासाठी पोषक नव्हते.

कॅलीफोर्नियाला गेल्यानंतर आठवड्याच्या व्यस्त कार्यक्रमानंतर मी पुन्हा जॉनी मिशेलच्या गाण्यांकडे जायची. त्यांचे विचार डोक्यात घोळत ठेवणे काही फायद्याचे नव्हते.

छोट्या पापांशी झगडा

तुम्ही विचाराल अशा छोट्या पापांशी कशाला झगडायचं? कारण मी स्वत:ला फसवत होते. मी विचार करत होते की या पूर्ण पक्षघाताच्या जीवनात मी त्याच्यावर विश्वास ठेवावा याचीच तो दखल घेतो. होय त्याच्या कृपेमुळे मी माझ्या पक्षघातामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवू शकत होते आणि इतर अपंग लोकांना त्याच्याबद्दल सांगू शकत होते. इतक्या सन्मान्य महत्त्वाकांक्षा असताना तो या क्षुल्लक उल्लंघनाकडे नक्कीच कानाडोळा करील.

बोलताना चुकून एखाद्या शब्दाने केलेली चहाडी, आत्मा बंद कर असे सांगत असतानाही टीव्ही पाहत राहणे, मागील यशाच्या आठवणी उगाळत राहणे. इष्कबाज शब्दफेक, सत्याशी इवलीशी प्रतारणा, माझे महत्त्व असल्याच्या कल्पनांना गोंजारणे, प्रार्थनेची कमतरता. आत्मा माझी छाननी करीत असताना त्यापासून बचाव करण्यासाठी दिवास्वप्न पाहत राहणे आणि अधून मधून काही जगिक आवडी.

मी म्हटले असते, “हे तरुणी, जॉनी, ह्या गोष्टींना आपली नखे तुझ्या हृदयात घुसवू देऊ नको. ज्या गोष्टींनी येशूला वधस्तंभावर खिळले त्याच गोष्टींना बिलगून बसू नकोस. याचे परिणाम फार अफाट आहेत. किंमत खूप मोठी आहे. देवाने तुझ्यावर प्रभाव होण्यासाठी जे क्षेत्र दिले आहे ते धोक्यात आणू नकोस. आणि तुझे अनंतकालिक वतन नष्ट करू नकोस!” मी त्या माझ्या लहान जुळ्याला बजावून सांगितले असते, “हे छोटे गुन्हे सफेद करण्याचे तुझे क्षुद्र प्रयत्न देवाला किळसवाणे आहेत. बंद कर हे सगळे!”

देवभीरूतेतून जगा, तुमच्या कलाकुशलातून नव्हे

सुदैवाने ८५ सालच्या दरम्यान मला माझ्या आत्म्यामध्ये अस्वस्थ वाटू लागले. मी अंतरंगात पाहिले आणि माझ्यामध्ये देवभीरूतेचे सामर्थ्य नव्हते हे मी सांगू शकत होते. माझ्या आशा आता पूर्वीसारख्या प्रकाशमान नव्हत्या आणि पापाची जाणीव बोथट झाली होती. मग मी जे सी राईल यांचे ‘होलीनेस’ हे पुस्तक वाचले.

आपण हे सहज विसरतो की पापाचा मोह हा स्वत:च्या खऱ्या स्वरूपात कधीच समोर येत नसतो. जेव्हा आपल्याला मोह येतो तेव्हा पाप कधीच म्हणताना आपण ऐकत नाही की “मी तुझा घातक शत्रू आहे…मला तुझे जीवन नष्ट करायचंय” असे काही ते कार्य करत नाही. त्याऐवजी ते यहूदासारखे चुंबन देण्यास येते. पाप हे सुरवातीस निरुपद्रवी वाटते – जसा दावीद आळसटून गच्चीवर फिरत असताना एका स्त्रीचे स्नानगृह त्याने पाहिले. दुष्टपणाला आपण गोंडस नावे देऊ, पण देवाच्या दृष्टीने असलेला त्याचा गुन्हेगारीचा स्वभाव व गुण आपण बदलू शकत नाही.

त्या वर्षी मी पवित्र आत्म्याला विनवले की, माझाच मार्ग चालण्याच्या इच्छेमधले पाप मला दाखव – मी माझ्या पतीलाही याबद्दल मला आठवण देण्यास सांगितले. माझा गुन्हा कितीही छोटा असला तरी मला प्रभूला म्हणता यायला  हवे होते की, “मला सर्व अधर्मापासून शुद्ध कर” (१ योहान १:९). आणि मी कधीच मागे पाहिले नाही.

नुकतेच घर साफ करताना माझ्या मैत्रिणीला दिवाणखान्याच्या फडताळात एक धुराळ्याने माखलेला अल्बमचा ढीग मिळाला. “अगं याची किंमत बरीच होईल की” ती उद्गारली. कोणाला तरी देऊन टाक असे मी तिला म्हणणार होते. पण विचार केला नाही, ते कचऱ्यात फेकून दे. एखाद्या तीस वर्षीय तरुणीच्या जिवाला त्याची सवय लागण्यापेक्षा हे बरे!

आमच्या जीवनासाठी यापेक्षा खूपच चांगली गाणी आहेत. धीर देणारी, स्वर्गीय गीते जी आपल्याला सामर्थ्यावर सामर्थ्य, विश्वासावर विश्वास आणि कृपेवर कृपा पुरवतात. अशी गाणी आपल्याला आठवण करून देतात की येशू हा कल्पनेपलीकडे हर्ष देणारा आहे आणि तो कोणत्याही मित्रापेक्षा फार मोलाचा आहे मग तुम्ही तिशीचे असा किंवा सत्तरीचे.