जनवरी 15, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

कमकुवतपणाशी युध्द थांबवा स्कॉट हबर्ड

 

त्यावेळी मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी जसा काही एक युद्धभूमीवरचा सैनिक होतो.

तुम्ही मला शोधले असते तर मी वाचनालयातच सापडलो असतो. पुस्तकात डोके खुपसून बसलेला. माझी बोटे भराभर ओळींवरून फिरत होती. साहित्य आणि भूगर्भशास्त्राची पाठ्यपुस्तके इतक्या तत्परतेने व मग्न होऊन वाचणारा कोणी कधी पाहिला नसावा आणि कदाचित इतके थोडके आत्मसात करणाराही.

मार्ग कंटाळवाणा झाला होता. वाचण्याची सामान्य क्षमता असलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत मी जलद वाचण्याच्या कलेत प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. अखेरीस हे हाताळणे मला अशक्य झाले आणि पुन्हा मी सावकाश वाचणे सुरू केले.
आता त्या दिवसांकडे मागे वळून पाहताना मला मी एका महायुद्धामध्ये चकमकीत लढणारा एक शिपाई वाटलो – मी बराच काळ करीत असलेल्या या युद्धासारखेच आपल्यातील अनेक जण सर्व आयुष्यभर अशा युद्धांना लढा देत असतात. आपल्या कमकुवतपणाशीच युद्ध करत आपण अनेक दिवस बहुधा समरभूमीवरच घालवत असतो.

कमकुवतपणाशी युध्द

कमकुवतपणा हा शब्द मी या अर्थाने वापरत आहे की आपल्यातील असे भाग की आपल्याला जे करायला हवे ते करण्यापासून किंवा जे आपण व्हायला हवे ते होण्यापासून आपल्याला दूर ठेवतात. कमकुवतपणा हे पाप नाही तर तो नैतिक रित्या तटस्थ असतो. देवाची कृपा जेव्हा आपले नवीकरण करते तेव्हा हे गुण सहसा बदलत नसतात (बदलण्याची गरज नसते).  उदा. आपल्याला जितके हवे तितके आपण बुध्दिमान नसतो, धावपटू नसतो, सुंदर नसतो, संगीतप्रवीण नसतो, लोकांसमोर छाप टाकणारे नसतो, हजरजबाबी नसतो, नेतृत्वामध्ये कुशल नसतो, जलद वाचू शकत नसतो, लेखनशैलीत कमी पडतो. जरी यातील काही उणीवा शिस्तीच्या सरावाने पार करता येतात तरी काही खडकाप्रमाणे निश्चल असतात. आपण आपले खांदे वापरून ते जोराने ढकलू, ताण देऊन ते पुढे जावे म्हणून चालना देऊ पण काही काळाने आपल्याला कळते की हा खडक कुठेच सरकत नाही. हा कमकुवतपणा आपलाच भाग आहे.

अशा गोष्टींशी आपला झगडा समजता येण्यासारखा आहे. त्यातील काही आपल्याला ओशाळवाण्या करतात – अशा गोष्टी की शाळेत आपल्याला सगळेजण हसायचे. त्यातील सर्वांत वाईट ह्या पडक्या पुलासारख्या असतात – जो मार्ग तुम्हाला घ्यायला हवा असतो त्यापर्यंत तुम्ही कधीच जाऊ शकत नाही. यामुळे देवाने दिलेल्या या काट्याबद्दल प्रौढी मिरवण्याऐवजी (२ करिंथ १२:९-१०) आपल्यातील कित्येक जण आपला पैसा, शक्ती, वेळ तो काढून टाकण्याच्या प्रयत्नात दवडतात.

पण ख्रिस्ती जनांनी आपल्याला न जिंकता येणारे युध्द लढण्याची गरज नाही. जगातले बरेच लोक कमकुवतपणाला प्रतिसाद देताना लढण्यासाठी आणखी कुमक जमा करत असतील. तरी ख्रिस्ती लोकांनी आठवण ठेवावी की काही कमकुवतपणाला लढा द्यायचा नसतो तर त्याचे स्वागत करायचे असते.

भयप्रद आणि अद्भुत रीतीने दुर्बल

देवाने त्याच्या चांगल्या निर्मितीमध्ये व तरतुदीनुसार आपल्याला या जगात या कमकुवतपणासह पाठवले आहे. “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? (निर्गम ४:११). आपले तोंड, कान व डोळे यांसबंधी जे खरे आहे तेच आपल्या इतर भागांसाठी खरे आहे. जेव्हा देवाने आपल्या आईच्या उदरात आपली घटना केली तेव्हा ह्या उणीवा देवाच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. आपण भयप्रद आणि अद्भुत रीतीने दुर्बल आहोत (स्तोत्र १३९:१३-१४).

नवा जन्म आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडवत असला तरी आपल्या जन्माच्या वेळी जो कमकुवतपणा आपल्याला मिळाला आहे तो तो पुसून टाकत नाही.  देवाचा उद्धरलेला समाज हे वैभवी विषमतेचे राज्य आहे. जेथे एकाच्या उणीवेची कमतरता दुसऱ्याच्या सामर्थ्याने भरून काढली जाते (रोम १२: ३-५). देवाने आपल्या कोणाला हात, तर कोणाला पाय, तर कोणाला डोळे, तर कोणाला तोंड बनवले आहे – आणि तो तोंडाला चालू देत नाही आणि डोळ्याला बोलण्याची धडपड करू देत नाही (१ करिंथ १२:१४). मंडळीतले काही लोक संदेश देऊ शकतात तर इतर माईक दिसताच थरथर कापू लागतात. काही जण उत्कृष्ट व्यवस्थापन करतात तर काहींना आपल्या मुलांचे जन्मदिवस धड आठवत नाहीत.

जेव्हा ह्या ना त्या कारणाने आपले सर्व प्रयत्न वाया गेल्यानंतरही जेव्हा देवाने दिलेला कमकुवतपणा आपण उलथून टाकण्याचा प्रयत्न आपण करत राहतो – तेव्हा आपल्यात विश्वास कमी असतोच पण त्याहून  असमाधान अधिक असते. आणि असमाधानाने कोणाचे कधी भले झालेले नाही. जर आपण तेच प्रयत्न पुढे चालू ठेवले तर आपण त्यात अनेक वर्षे देवाने आपल्याला जे घडवले नाही ते बनण्यात दवडण्याची भीती आहे.

समझोता घडवा

यामध्ये पुढे जाण्याचा एकच मार्ग आहे: लढा सोडून द्या. पांढरा ध्वज उंच करा. तह करा. कमकुवतपणाशी समझोता घडवा.

आपल्यातील अनेकांनी आपल्या कमकुवतपणावर मात करण्यात कित्येक महिने किंवा वर्षे दवडली आहेत आणि आता आपण त्यांना कवटाळायचे? आणि त्यांच्याबद्दल आनंद मानायचा? (२ करिंथ १२:१०). कारण जेव्हा असे आपण करतो तेव्हा आपल्याला दिसते की आपली उन्नती होण्याबाबत देवाने कधीच सीमा घालून दिली नाही.

आपल्याला समजेल की आपण आपल्यासाठी उभारलेली खोटी प्रमाणे टाकून दिल्याने आपल्याला खूप मोठा सुटकारा मिळतो. आपल्यापैकी काहींनी ही असली दगडांची ओझी कित्येक वर्षे आपल्या पाठीवर वाहिली आहेत. आणि ती रस्त्यावर बाजूला ठेवून किती सुटका मिळते! नुकत्याच झालेल्या मातेला अनुभवी मातेइतके कार्यक्षम होण्याची गरज नाही. प्रथमपुत्राने आपल्या आईवडिलांच्या व्यावसाईक कामना पूर्ण करीत जगण्याची गरज नसते.जो मनुष्य मंडळीत सेवक (डीकन) आहे त्याने पाळक होण्याची गरज नाही. हायस्कूलमधील मुलीने कॉलेज सुंदरी होण्याची स्वप्ने पाहण्याची गरज नाही.

पेत्राने योहानासारखे आणि योहानाने पेत्रासारखे बनण्याचे थांबवण्यात किती सुटका आहे, कारण दोघेही येशूचे बोलणे ऐकतात की,  “तुला त्याचे काय? तू माझ्यामागे ये.” (योहान २१:२२). याचे किंवा त्याचे सामर्थ्य प्राप्त करणे यात आपला गौरव नाही. तर अंत:करणापासून खऱ्या धार्मिकतेच्या पाठीमागे लागून आपण ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखे होणे यात आहे. -आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आणि कमकुवतपणानिशी आपण तसे बनू शकतो.

त्याला आनंद देण्यास जगा

जेव्हा आपण इतर लोकांची दाने आपली करू पाहण्याचे थांबवतो तेव्हा देवाने आपल्याला दिलेली दाने आपण कवटाळू शकतो (१ करिंथ १२:४-७). ज्या पायाने हात होण्याचे बनण्यास थांबवले आहेत तो चागले चालू शकणार आहे. ज्या डोळ्याने बोलण्याचा प्रयत्न करण्याचे थांबवले आहे तो आता पाहण्याची क्षमता तीक्ष्ण करू शकतो.

अर्थातच आता आपण ह्या समस्येचे मर्म काय याकडे येतो. कारण आपल्या कमकुवतपणाशी आपले युध्द बहुधा आपले सामर्थ्य कमी लेखण्यामुळे सुरू होते. आपल्या सामर्थ्याची किंमत फारशी नाही असा आपला अंदाज असतो. कदाचित ते नित्याचे, दिसत नसणारे असेल आणि त्याचे कौतुक केले जात नसेल. आपण साऊंड सिस्टीमकडे बसलेले असू आणि स्टेजवर नाही, आपण शिकवण्याऐवजी सभागृह साफ करत असू. सभा चालवण्याऐवजी  आपण जमाखर्चाचा हिशेब करत असू. अशा प्रकारच्या दानांकडे लोकांचे सहसा लक्ष जात नाही – ते गेल्यावर समजते.

पण समाधान हे  दानापेक्षा व कौशल्यापेक्षा दुसरे दान/कौशल्य मिळून येत नसते. तर प्रत्येक दान कृतज्ञतेने स्वीकारून, आपल्या कुटुंबाची कामे विश्वासूपणे करून आणि प्रभूने ही क्षुल्लक सेवा स्वीकारून त्याच्या गौरवासाठी तिचे रूपांतर केले आहे हे समजून घेण्यात मिळते (१ पेत्र ४:१०-११). आपली बलस्थाने कितीही मोठी असोत तरी त्यांमध्ये व आपल्या कमकुवतपणामध्ये ख्रिस्ताला सर्वस्व मानण्यामध्ये समाधान येते (२ करिंथ. १२:९-१०).

माझ्या देवा मला शिकव

जॉर्ज हर्बर्ट या कवीची प्रार्थना आपणही करू या.

सर्व गोष्टीमध्ये तुला पाहण्यास
आणि कोठेही जे काही मी करेन
ते तुझ्यासाठी करण्यास
माझ्या देवा आणि राजा मला शिकव.

जे ह्रदयापासून अशी प्रार्थना करतात आणि त्यांची दाने /कौशल्ये देवाच्या सामर्थ्याने वापरतात ते लवकरच असे शब्द ऐकतील की “शाब्बास.” मग त्यांचे तालांत दहा असोत, पाच असोत किंवा केवळ एक असो (मत्तय २५:२१). आणि त्यांना आतमध्ये खोल जाणीव होईल की त्याला मिळणाऱ्या आनंदाची तुलना जगाच्या न संपणाऱ्या टाळ्यांचा कडकडाटाशी होऊ शकणार नाही.

 

 

 

 

 

Previous Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

Next Article

जर देवाने मला मुलगी दिली तर ग्रेग मोर्स

You might be interested in …

आत्म्याचे फळ -विश्वासूपणा

क्रिस विल्यम्स   “दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण विश्वासू मनुष्य कोणास मिळतो? जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.” निती २०:६-७ हे फळ नीति. ३१ सारखे आहे. जसे  सुद्न्य स्त्री मिळणे […]

वधस्तंभ – देवाची वेदी

 डॉनल्ड मॅकलोईड प्रत्येक विश्वासी व्यक्तीचा प्रायश्चित्तासबंधीचा काही तरी सिद्धांत असतो. अखेर विश्वास हा वधस्तंभावर गेलेल्या तारणाऱ्यावर भरवसा आहे आणि ह्यासबंधी काही समजले नाही तर विश्वास हा अशक्य आहे. विश्वासाला पहिल्यापासून माहीत असते की वधस्तंभावर कोणी […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक ७ शेवटचा काळ देवाचे राज्य यावर विचार करताना त्याचा उद्देश काय आहे, ते युगारंभापासून कसे सुरू आहे, ते दृश्य स्वरूपात कसे आहे, अदृश्य स्वरूपात कसे आहे, जुन्या करारात त्याची वाटचाल […]