नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जर देवाने मला मुलगी दिली तर ग्रेग मोर्स

“ ते तिचं नाव काय ठेवणार असावेत बरं?” माझी पत्नी म्हणाली.

“मला काही कल्पना नाही बुवा, पण जर आपल्याला मुलगी झाली तर मी तिचं नाव प्रथम एलिझाबेथ (अलीशिबा), यायेल किंवा अबिगेल ठेवायचा विचार करीन.

माझ्या आईमुळं एलिझाबेथ. ती तिच्या आईसाठी एक देवभीरू मुलगी होती. नीती ३१ ची प्रत्यक्ष प्रतिमा आणि तिची मुलेही उठून तिला धन्य म्हणतात (नीती ३१:२८). एकटी असूनही तिने खूप परिश्रम केले, कल्पनेपेक्षा अधिक त्याग केला आणि माझ्या दृष्टीने जग तिला योग्य नव्हते. जेव्हा मायवारी मी तिच्यासाठी कविता लिहायला घेतली तेव्हा तिला आपला विश्वास सोपवलेल्या तीमथ्यच्या आईचे – युनिकेचे नाव दिले होते (२ तीम. १:५). यायेल हे नाव शास्तेच्या पुस्तकात आढळते. तिने बाराकापासून पळालेल्या दुष्ट राजा सिसरा याला घरात घेतले, त्याला दूध प्यायला दिले आणि त्याच्यावर पांघरूण घातले. मग एक हातोडा आणि मेख घेऊन त्याच्या कानात ठोकली (शास्ते ४:१७-२१). ती काही सैनिक नव्हती तरी जे करायला हवे ते तिच्याबद्दलच्या भविष्यानुसार तिने केले (शास्ते ४:९).

माझ्या पत्नीच्या नावावरून अबिगेल. माझ्या पत्नीचा श्वास म्हणजे सुवार्ता. ती इतर स्त्रियांसारखीच सशक्त आणि कष्टाळू आहे आणि प्रभूच्या गोष्टीत बेधडक आहे. तिची मंडळीसाठी असेली प्रीती आणि धैर्य मला नेहमीच आव्हान देते. बायबल म्हणते की अबिगेल ही “बुद्धिमान व रूपवती होती”(१ शमुवेल २५:३).

या यादीत आणखी भर घालायची तर माझी बहीण हॅना (हन्ना) – बुद्धिमान, विनोदी, ख्रिस्ताचा सुगंध फैलावणारी – आणि माझी आवडती बहीण.

देवभीरू स्त्रियांचा वारसा

नीतिसूत्रे ३१ माहीत असलेली कोणतीच व्यक्ती बायबलमधील स्त्रिया निष्क्रिय आहेत असे म्हणणार नाही.
“तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो” (नीती. ३१:३१).
त्या पुरुषांपेक्षा कमी किमतीच्या आहेत असे म्हणून ते त्यांची पातळी कमी करणार नाहीत, कारण “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली” (उत्पत्ती १:२७).

स्त्री ही दुर्बल असते असे कोणी म्हणू शकणार नाही. “ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते; ती आपले बाहू नेटाने कामाला लावते… बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्‍चिंत राहते” (नीती. ३१;१७ ,२५).

ती कष्टाळू किवा व्यवसायिक नसते असे कोणी म्हणू शकत नाही. “शेताची चौकशी करून ते ती विकत घेते; ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा मळा लावते” (नीती ३१:१६).

तिला कृपेचा कमी वारसा मिळाला आहे असे कोणी म्हणू शकत नाही.  “पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही” (१ पेत्र ३:७).

पुरुषाला स्त्रीची गरज नाही असे कोणी म्हणू शकत नाही. मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन” (उत्पत्ती २:१८). तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही (१ करिंथ ११:११).

ज्यांनी एस्तेर, रहाब , दबोरा आणि मरीया यांच्याविषयी ज्यांनी वाचले आहे ते त्या स्त्रियांनी देवाच्या इतिहासात पराक्रमाची कृत्ये केली आहेत हे नाकारू शकणार नाहीत. आणि देवाच्या उद्धाराच्या इतिहासात स्त्रियांनी महत्त्वाची व मुख्य भूमिका केली आहे हे कोणी नाकारणार नाही (मत्तय १:१-१६).

सारासारख्या ज्या स्त्रियांना धैर्य व देवाविषयी खात्री होती त्यांची आपण प्रशंसा करायला हवी. त्यांच्यामध्ये असा आत्मा होता की देवाचा आत्मा त्याला “अविनाशी शोभा” असे म्हणतो (१ पेत्र ३:४). शिप्रा व पुवा या स्त्रियांनी राजाच्या आज्ञेचे भय न बाळगता इस्राएली बालकांचे रक्षण केले. हन्नेने आपले जिवलग मूल देवाच्या सेवेसाठी अर्पण केले; दबोरेने इस्राएलाचा शास्ता म्हणून सेवा केली व बाराकाला व त्याच्या सैन्याला प्रेरणा दिली. एस्तेरने देवाच्या लोकांना वाचवण्यासाठी स्वत:चे जीवन धोक्यात टाकले. प्रीस्का हिने आपल्या पती सोबत पौल व अपोल्लोसारख्या थोर सेवकांना मदत केली. दावीद राजाची पणजी रूथ ही नामीला धरून राहिली आणि तिच्या देवावर तिने भरवसा टाकला. मेरी मग्दालीन ही येशूची एक  प्रमुख अनुयायी होती. आणि येशूची आई मरीया ही नम्र व आज्ञाशील स्त्री होती.

आपल्या इतिहासातील तसेच आपल्या घरातील आणि मंडळीतील देवाची भीती बाळगणाऱ्या ह्या स्त्रियांची आपण प्रशंसा करायला हवी. अधिक पुत्रांनी व पतींनी उभे राहून त्यांना म्हणायला हवे की, “तू धन्य आहेस.”

बदलता न येणारी प्रतिमा

देवाच्या हेतू व योजनेनुसार स्त्री असण्याची जी बाजू आहे ती आपण उचलून धरायला हवी – विशेषत: सध्या त्यावर हल्ले चढवले जात आहेत.

जगातील कित्येक पुरुष स्त्रियांनी मॉडेलसारखे  दिसावे, अधिक अंगप्रदर्शन करावे, अधिक मर्यादा ओलांडव्यात म्हणून त्यांच्यावर दबाव आणतात. जगातील काही स्त्रिया आपल्या मुलींना भुरळ घालतात की घराच्या निगराणीत वेळ घालवणे हे तुमच्या करिअरमध्ये अडखळण असते, मातृपद हे नंतर करण्याची बाब आहे, आणि पतीच्या अधीन असणे हे निश्चितच चालवून घेऊ नका. ह्या जगाचा आत्मा त्यांना सौम्यपणा सोडून आक्रमक होण्यास, सुसंकृतपणा सोडून देण्यास मोह घालतो. नवीन जीवाला जीवन देण्याच्या त्यांच्या अद्भुत क्षमतेला आता ओझे समजून तिची हेटाळणी केली जाते. वेडीवाकडी वळणे घेत देवाने निर्मिलेल्या रचनेला प्रश्न केले जातात व दु:खद रीतीने तिच्याविरुद्ध बंड केले जात आहे.

पण देवानुसार असलेल्या स्त्रीत्वाला सोडून देता कामा नये. ते ख्रिस्ताशी असलेल्या एकीवर आधारित आहे. त्याला देवाच्या आत्म्याने सामर्थ्य दिले आहे आणि ते आपली धाव येशूकडे पाहत धावत आहे (इब्री १२:१,२). स्त्री सुद्धा

तिच्या तारणाऱ्याकडे पाहत त्याचे वचन शोधून देवाने तिला कोण व्हावे म्हणून निर्माण केले हे शिकते. देवाला जगात प्रकट करताना तिची प्रतिमा, तिचे व्यक्तित्व याचा कशाशीही बदल करता येणार नाही.

आपल्याला मिळालेल्या समानता व  भिन्नता हे देवाशी संबंधित आहे (उत्पत्ती १:२७). शुभवर्तमान हे विवाह व मंडळी यांसारख्या निरनिराळ्या नात्यांतून पुन्हापुन्हा पुढे केले जाते. (उत्पत्ती ५:२२-२३). आपल्या सांस्कृतिक प्राधान्यानुसार आपल्याला निराळ्या भूमिका आहेत असे नाही. देवाने आपल्याला भयजनक आश्चर्यकारक रीतीने भिन्न केले आहे. देवासमोर समान (गलती३:२८ ), पण त्याला जगासमोर सादर करताना परस्परांना पूरक. देवाने आपल्याला सर्व प्रकारे अगदी समान निर्माण केले असते, पण आश्चर्य आहे की त्याने केले नाही. त्याची सुज्ञता आपण मान्य करायला हवी तिची आपण स्तुती करायला हवी व ती इतरांसमोर सादर करायला हवी.

नावाचा वारसा

ख्रिस्ती स्त्रियांनी देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने उद्योगशील, निर्भीड, धैर्यवान व्हावे का? निश्चितच. देवभीरू स्त्री तिच्या आत्म्याच्या बाबतीतही उदासीन नसते – तिनेही देवाची शस्त्रसामग्री धारण करून देहाविरुध्द लढा द्यायला हवा   (इफिस ६:१०-२०). ती सुद्धा आत्मे जिंकेल आणि त्यांना येशूचे शिष्य बनण्यास शिकवेल. तिलाही देवाचे पाचारण आहे व ते पूर्ण करायचे आहे. तिलाही ख्रिस्ताकरिता धोका पत्करावा लागेल. ती सुद्धा देवाच्या वचनाचे अन्न नियमित घेते , जगासाठी प्रार्थना करते, अडथळे पार करते आणि ख्रिस्ताचे स्वरूप पाहत असताना त्याच्यासारखी होत राहते (२ करिंथ ३:१८). आणि जेव्हा ती प्रौढ होते तेव्हा ती तरुण स्त्रियांना जे चांगले ते शिकवते त्यामुळे “ देवाच्या वचनाची निंदा होणार नाही” (तीत२:३-५). प्रौढ पुरुष आणि स्त्रिया यांचे पाचारण भिन्न असले तरी मानवता व ख्रिस्ती गुण हे दोघांचेही सारखेच असतात. आपल्यातील भिन्नतेबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करत नाही तर त्यांच्यामध्ये आपले वैभव आहे.

जर देवाने मला व माझ्या पत्नीला एक मुलगी दिली तर ती देवाची स्त्री म्हणून वाढत जावी अशी मी प्रार्थना करतो. धाडसी, विश्वासू, आणि देवाच्या वचनानुसार असलेली स्त्री.  जिचे नाव तिला दिले जाईल तिच्यासारखीच.

 

 

 

Previous Article

कमकुवतपणाशी युध्द थांबवा स्कॉट हबर्ड

Next Article

त्याने एकाकरता सर्वस्व विकले डेविड मॅथिस

You might be interested in …

चांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल? कोल डाईक

लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी काय बोलतात याबद्दल तुम्ही कधी  विचार करता का? कधी कधी तुम्ही जवळ असताना लोक आपसात कुजबुज करतात तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. आणि वाटते: मी काहीतरी केले की काय? आपले मन […]

ख्रिस्ती समाधान- एक दुर्मिळ रत्न

लेखक: सुझन कुटार वेबस्टर डिक्शनरीत असमाधान याचा अर्थ एखाद्याच्या जीवनाबद्दल किंवा परिस्थितीबद्दल असमाधानी वृत्ती असणे, असा दिला आहे. अरेरे! आपल्यातले कितीतरी ख्रिस्ती जन आणि जर मी पूर्णपणे प्रामाणिक असेल तर मी ही ह्या अपायकारक पापाला […]

 देवाच्या प्रीतीचा अनुभव जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

“माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान अगर भविष्य अशा गोष्टी, बले, आकाश, पातळ किंवा कोणतीही सृष्टवस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची जी आपल्यावरील प्रीती आहे, तिच्यापासून वेगळे करण्यास समर्थ होणार नाही” […]