जुलाई 25, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमचे भटकणारे अंत:करण उपकारस्तुतीने भरून टाका जॉन ब्लूम

वासनेपेक्षा समर्थ काय हे ठाऊक आहे? उपकारस्तुती.

हे स्पष्ट करण्यापूर्वी मला त्याचे उदाहरण देऊ द्या. जेव्हा पोटीफराच्या बायकोने योसेफाला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या कृतीला तो का बळी पडला नाही? तो स्पष्ट करतो, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू” (उत्पत्ती ३९:८-९)?

योसेफाने पोटीफराची त्याच्यावरची लक्षणीय मर्जी ही देवापासूनची देणगी समजली. कृतज्ञतेने योसेफाचे मन इतके भरून गेले होते की तेथे पोटीफरच्या बायकोशी अकृतज्ञतेने लैंगिक पाप करण्यास जागाच नव्हती.

इतके तृप्त की स्वैराचाराला जागाच नाही

आता तुमच्या स्वत:च्या अनुभवाकडे पहा. जेव्हा तुमचे अंत:करण जेव्हा देवाच्या स्तुतीने भरलेले असेल तेव्हा तुम्ही वासनांच्या अधीन झालेले नव्हता. कारण वासना हा एक प्रकारचा लोभ आहे. “आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस” (निर्गम २०:७). आणि लोभ हा सर्व प्रकारे कृतज्ञतेचा अभाव आहे. तुमच्याजवळ जी गोष्ट नसते पण तुम्हाला हवी असते त्यासाठीची ती इच्छा असते. ती इच्छा देवाने तुम्हाला अजून पुरवलेली नसते किंवा तुम्हाला त्याची मना केलेली असते (याकोब ४:२).

म्हणून वासना ही कृतज्ञतेचा अभाव असल्याने ती कृतज्ञतेशी विसंगत आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी एकाच ठिकाणी असू शकत नाहीत. हे किंवा ते. आणि उपकारस्तुती ही वासनेपेक्षा समर्थ आहे. वासना ही समर्थ वाटू शकते व उपकारस्तुती सौम्य वाटू शकते. पण जेव्हा उपकारस्तुतीचे खऱ्या रीतीने अस्तित्व असते तेव्हा तिची वासनेशी बरोबरी होऊच शकत नाही.

उपकारस्तुती हा केवळ एक सुंदर ख्रिस्ती स्वभावगुण नाही. ते पापावर विजय मिळवणारे सामर्थ्य आहे. कृतज्ञता ही आपल्या जिवाचे निरोगीपण दाखवतेच पण आपल्या जिवाच्या आनंदासाठी झगडणारी ती महान शक्ती आहे. याचा अर्थ आपण जाणीवपूर्वक उपकारस्तुती करण्याची निरोगी व आनंदी सवय लावून घ्यायला हवी.

उपकारस्तुती आपल्यासबंधी काय सांगते?

आपण  किती उपकारस्तुती करणारे आहोत हे आपल्या आत्म्याचे आरोग्य दाखवते. जेव्हा आत्म्याने भरलेले लोक कसे दिसतात याचे पौल वर्णन करतो तेव्हा तो हर्षाच्या उन्मादाचे अनुभव किंवा अद्भुत देणग्या याचा निर्देश करत  नाही तर तो उपकारस्मरण याकडे बोट दाखवतो.
“द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा; स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा;आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा” (इफिस ५:१८-२०).

जेव्हा पौल शांती व देवाच्या वचनाने चालवलेल्या लोकांचे वर्णन करतो तेव्हा तो संघर्षाचा अभाव किंवा आपल्या ईश्वरज्ञानाच्या पातळीची उच्चता दाखवत नाही तर तो उपकारस्तुतीकडे बोट दाखवतो.

“ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणांत राज्य करो; तिच्याकरता तुम्हांला एकशरीर असे पाचारण्यात आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा”(कलसै ३:१५-१६).

जेव्हा आपले देवाच्या इच्छेमध्ये चालणे म्हणजे काय याचे वर्णन पौल करतो तेव्हा आपण आपल्या आकांक्षा व सामर्थ्य यांना अनुरूप आपल्या भूमिका कशा पार पाडतो हे तो दाखवत नाही तर तो उपकारस्तुतीकडे बोट दाखवतो. “सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे” (१ थेस्स ५:१८).

आपल्याला जर लैंगिक किंवा इतर अशुद्ध पापापासून स्वातंत्र्य मिळाले आहे तर हे दाखवताना तो मोहाचा अभाव दाखवत नाही तर तो उपकारस्तुतीकडे बोट दाखवतो. “परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो” (इफिस ५:३-४).

आपले आत्मे किती निरोगी आहेत हे जर जाणून घ्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्या कृतज्ञतेची पातळी पहा.

कृतज्ञता आपले कसे संरक्षण करते?

आपल्या कृतज्ञतेकडे आपण आपले लक्ष ठेवायला हवे आपल्या आध्यात्मिक स्वास्थ्यासाठीच नाही तर आध्यात्मिक संरक्षणासाठी. कृतज्ञता ही प्रचंड (आणि मार्मिकपणे) समर्थ असते.

कृतज्ञता म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे ते आपण पात्र नसताना देवाने त्याच्या दयेने दिलेली देणगी आहे हे पाहण्याचा अनुभव. ते नम्रतेचे फळ आहे. ते मूलत:च निस्वार्थी असते. आपल्याला स्वत:बद्दल कधीच कृतज्ञ वाटत नाही तर आपल्याला जी  व्यक्ती आपल्याशी आपल्या पात्रतेपेक्षा अधिक चांगले वागते तिच्याबद्दल. पोटीफरच मुख्य कारभारी असल्याने त्याच्यावर सर्व सोपून दिले गेल्यावर योसेफाला असेच वाटले.

लैंगिक वासनेसारखी पापे ही गर्वाचे फळ आहेत. ती मूलत:च स्वार्थी असतात. आपल्या आत्मपूजेच्याच्या हेतूंसाठी दुसऱ्यांचा फायदा उठवणे. आपल्या घरातील इब्री सेवकाकडे पाहून पोटीफराच्या बायकोला तसेच वाटले.

गर्व हा बाहेरून नम्रतेपेक्षा जास्त समर्थ वाटतो. पण वास्तविक रीतीने तो नाही. तो तसा नाहीच. नम्रता ही गर्वापेक्षा इतकी समर्थ आहे की जसा स्वर्ग नरकापेक्षा समर्थ आहे. जसा वधस्तंभ हा रोमी साम्राज्यापेक्षा समर्थ होता. जसे पुनरुत्थान व जीवन हे कबरेपेक्षा समर्थ आहे. त्याच प्रकारे कृतज्ञ असणे हे वासनेपेक्षा समर्थ आहे आणि सेवा करणे हे फायदा उठवण्यापेक्षा समर्थ आहे.

आपल्यामध्ये उपकार मानण्याची वृत्ती जितकी अधिक असेल तितके आपण पापाला कमी बळी पडू. म्हणून बायबल उपकारस्तुती करण्याबद्दल सतत सांगत असते. जे उपकारस्तुती करतात त्यांची दृष्टी देवावर असते (इब्री १२:२). आपल्याला या क्षणी किती कृपा मिळत आहे याची बरीच जाणीव त्यांना असते (२ करिंथ ९:८). आपली सर्व पापे त्याने झाकावी आणि आपल्या दु:खद भूतकाळाचे चांगल्यामध्ये रूपांतर करावे म्हणून ते त्याच्यावर विश्वास ठेवतात (रोम ८:२८) आणि उद्या आणि अनंतकाळापर्यंत आपल्या गरजांसाठी ते त्याच्याकडेच पाहतात (फिली ४:१९). जे लोक सर्व स्थितीत देवामध्ये समाधानी होण्याचे शिकले आहेत (फिली ४:११) ते फारच कमी प्रकारे मोहांना बळी पडतात –  विशेषत: लोभाच्या मोहाला.

उपकार माना

म्हणून पापाशी मुकाबला करताना एकमेकांना मदत करण्याचे मुख्य धोरण म्हणजे उपकार मानण्याची सवय लावणे. आपल्या छोट्या गटांमधून आपण एकमेकांना उपकार मानण्यास उत्तेजन द्यायला हवे (कलसै ३:१५). बंधनाच्या दोषी भावनेतून नव्हे पण आनंदी सुखी होण्याच्या खुल्या इच्छेतून. उपकार मानणारे लोक हे आध्यात्मिक रीतीने निरोगी व सुरक्षित असतातच पण बहुतेक वेळा खूप आनंदी असतात.

उपकारस्तुती करण्याची सवय लावणे सोपे नाही. आपल्या सर्वांना यासाठी मदतीची गरज आहे, पण देवाची स्तुती असो, मदत उपलब्ध आहे. पण तशी काही कृतज्ञतेची खाण नाही किंवा उपकारस्तुतीच्या ध्येयासाठी चार सोप्या पायऱ्या नाहीत. ते कोणतीही सवय लावण्याइतकेच कठीण आहे. आपण आपल्या अंत:करणाच्या डोळ्यांना – सर्व स्थितीत – देवाची कृपा पाहण्याचे प्रशिक्षण देतो. असे पाहण्याची सवय लागली पाहिजे. आणि रोज रोज करण्यानेच सवयी लागतात. आणि जसे दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्षे होतात तसे आपण त्यामध्ये अधिक तरबेज होत जातो. काही कालानंतर ते आपला भाग बनून जातात.

पण हे परिश्रम योग्य आहेत. देवाने आपल्याला दिलेल्या क्षमतांमध्ये उपकारस्मरण करणारे – कृतज्ञ असणे हा सर्वात समर्थ अनुभव आहे. वासना किंवा पापी गर्वाच्या बंधनापेक्षा तो खूपच समर्थ आहे. जितका तो तुमच्यामध्ये वाढत जाईल तितके तुम्हाला  आध्यात्मिक आरोग्य लाभेल आणि तितका पापाचा तुमच्यावरचा पगडा कमी होईल.

 

 

 

 

Previous Article

त्याने एकाकरता सर्वस्व विकले डेविड मॅथिस

Next Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

You might be interested in …

नव्या वर्षासाठी आठ प्रश्न

डॉन व्हिटनी देवाशी अगदी विश्वासू असलेल्या लोकांनाही  थांबून आपल्या जीवनाची दिशा काय आहे याचा आढावा घ्यावा लागतो. खरं तर न थाबता, एका व्यस्त आठवड्यातून दुसऱ्या आठवड्यात जाणे आणि आपण कुठे चाललोत याचा विचार न करणे […]

एक प्रसिध्द आणि विसरलेली प्रीती

मार्शल सीगल पौलाच्या पत्रामध्ये दखल घेण्यासारख्या एका सुंदर विवाहाकडे बऱ्याच जणांचे लक्षही जात नाही. ह्या विवाहाने पौलाचे ह्रदय काबीज केले असावे. तो लिहितो, “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या […]

आपण ख्रिस्तजयंतीच्या भावनांसाठी धडपडतो

मॅट चँडलर पुन्हा एकदा या ख्रिस्तजन्मदिनी युद्ध सुरू होणार. नाताळ सुखाचा जावो म्हणायचे की मेरी ख्रिसमस? पण खर्‍या विश्वासीयांसाठी खरे आव्हान यापेक्षा अगदी पूर्ण निराळे असते. ती लढाई आपल्या हृदयासाठी, आपल्या आनंदासाठी आणि आपल्या भक्तीसाठी […]