नवम्बर 14, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमचा देव तुमच्या समस्येपेक्षा मोठा आहे स्कॉट हबर्ड

देवाची अभिवचने आपल्या जीवनात अनेकदा त्यांचे सामर्थ्य गमावतात कारण खुद्द देवच आमच्या डोळ्यांपुढे लहान झालेला असतो.

आपण देवाची डझनभर अभिवचने पाठ म्हणू शकू. पण आपल्या अंत:करणात देव हा आता सैन्यांना जिंकणारा  आणि समुद्र दुभागणारा राजा राहिलेला नसतो. आता तो आपल्या मेंढरांना शोधणारा  व आपल्या काठीने सावरणारा मेंढपाळ राहिलेला नसतो. आता तो पाण्याच्या लाटांवर चालणारा व मेलेल्याला कबरेतून उठवणारा प्रभू राहिलेला नसतो. हळूहळू आपण देवाचे सामर्थ्य, देवाची सुज्ञता, देवाचा कनवाळूपणा विसरून गेलो आहोत.

जेव्हा देवाची अभिवचने आपली भीती शमवण्यास, आपल्या दु:खात आपले सांत्वन करण्यास व आपल्याला आज्ञापालन करण्यास चालना देण्यास दुर्बल वाटतात तेव्हा ही अभिवचने पुनःपुन्हा फक्त ऐकण्यापेक्षा अधिक काही तरी करायला हवे. आपण जो देव ही अभिवचने देतो त्याच्याकडे पाहण्याची गरज आहे.

गाडलेली अभिवचने

यशया ४० मध्ये संदेष्टा भग्न झालेल्या इस्राएल लोकांच्या गटाशी बोलत आहे. जे राष्ट्र एकेकाळी आकाशातील  ताऱ्यासारखे चमकत होते ते आता बंदिवासात झाकोळून गेले होते.

जेव्हा इस्राएल लोक बाबिलोनमधून वळून  पाहत होते तेव्हा देवाची वचने गाडली गेली आहेत असे त्यांना भासत होते. ते परदेशात गुलाम असताना देव त्यांना कसे अनंतकालिक राज्य देऊ शकणार होता (२ शुमुवेल ७:१३)? आता त्यांच्यावरच शाप ओढवलेला असताना देव त्यांना जगासाठी आशीर्वाद कसे बनवणार होता  (उत्पत्ती १२:३)? इस्राएल बाबिलोनच्या टाचेखाली असताना देव त्यांच्यातून सापाला ठेचणारा राजा कसा उभा करील (उत्पत्ती ३:१५)?

आपल्या बिघडलेल्या परिस्थितीतून जेव्हा आपण देवाची अभिवचने आठवतो तेव्हा आपणही असेच प्रश्न विचारू शकतो. एकटे जीवन जगण्याच्या नकोशा भविष्यातून आपण विचारू शकतो, “देव माझी कशी तृप्ती करणार?” आपल्या उध्वस्त अपयशाकडे पाहून आपण विचारू शकतो, “देव मला कशी क्षमा करील?” आपल्या हानीच्या खड्डयाकडे पाहून आपण विचारू शकतो, “देव माझे समाधान कसे करील?”

अशा क्षणी देवाने इस्राएल लोकांसाठी जे केले तेच त्याने आपल्यासाठी करण्याची गरज आहे. त्याने आपल्या सोबत येऊन त्याच्या अभिवचनांची आठवण ठेऊन म्हणायला हवे, “तुमचा देव पाहा” (यशया४०:९).

तुमचा देव पाहा

आपल्याला अभिवचन देणारा हा देव कोण आहे? हा सामर्थ्याचा प्रभू आहे ज्याने आपल्या शब्दाने हे जग निर्माण केले. तो सुज्ञतेचा प्रभू आहे जो रानातून मार्ग काढतो. तो कनवाळू देव आहे जो आपल्या मुलांना उचलून घरी नेतो. आणि तो तुमच्या सर्व समस्यांपेक्षा खूप मोठा आहे.

सामर्थ्याचा देव

“पाहा, प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील” (यशया ४०:१०).

हा सामर्थ्याचा  देव पाहा ज्याने आपल्या शब्दाने हे जग निर्माण केले.

जो देव त्याची अभिवचने आपल्याला देतो त्याच देवाने म्हटले, “प्रकाश होवो” आणि अंधकार दूर सरला (उत्पत्ती १:३). जेव्हा तो बोलतो तेव्हा तारे चकाकतात आणि ग्रह त्यांच्या कक्षेत बंदिस्त होतात, नद्या वाहू लागतात आणि सागर पृथ्वीचा तळ भरून टाकतात. खोल दऱ्या बनतात आणि उत्तुंग पर्वत आकाशाशी स्पर्धा करू लागतात. जगातील सर्व गवत सुकून जाईल आणि सर्व डोंगरावरची फुले कोमेजून जातील पण ज्या देवाने त्यांना निर्माण केले आहे त्याचे वचन कायम टिकेल आणि राहील (यशया ४०:८).

तुमची संकटे अनावर सागराप्रमाणे आहेत का? देव त्यांना आपल्या चुळक्याने मोजतो (यशया ४०:१२). तुमची दु:खे गगनासारखी उत्तुंग आहेत का? देव ती सुतारासारखी आपल्या वितीने मोजतो (४०:१२). तुमची ओझी पर्वतासारखी जड आहेत का? देव त्यांना उचलून आपपल्या तराजूत तोलतो (४०:१२). तुमच्या समस्या अवाढव्य असतील पण तुमचा देव सामर्थवान आहे. सूर्य तळपावयाचा थांबेल पण त्याचे वचन धुळीला मिळणार नाही- मग आपल्या समस्या कितीही अवाढव्य असोत.

सुज्ञतेचा देव

“परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे” (४०:१३)?

रानातून मार्ग काढणारा हा सुज्ञतेचा देव पाहा.

इस्राएल लोकांना वाटले की यरूशलेमाच्या भिंती कोसळल्या आणि त्यासोबत त्यांच्या राष्ट्राचे भवितव्य धुळीला मिळाले आणि आता खुद्द देवही त्यांना यातून पुन्हा उठवू शकणार नाही. “हे याकोबा, असे का म्हणतोस, हे इस्राएला, असे का बोलतोस की, ‘माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टिआड झाला आहे’ ” (४०:२७)? पण इस्राएलच्या बंदिवासाने देव काही चकित झाला नव्हता किंवा त्याने त्यांना आपल्या दृष्टीआड केले नव्हते. “तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर… त्याची बुद्धी अगम्य आहे” (४०:२८). जेव्हा इस्राएल बंदिवासाच्या रानात हरवले होते आणि घरी परतण्याचा मार्ग त्यांना कोठेच दिसत नव्हता तेव्हा देवाने रानातून राजमार्ग सिध्द केला (४०:३).

कोणत्याच समस्येची  गुंतागुंत सोडवणे देवाला कठीण नाही. कोणताच मार्ग इतका वेडावाकडा नाही की देव तो सरळ करू शकत नाही. कोणतेच ह्रदय इतके भग्न नाही की जे तो पुन्हा पूर्ववत करू शकत नाही. तुमची संकटे मती गुंग करणारी असतील पण तुमचा देव सुद्न्य आहे. आणि जसे तुम्ही त्याची आशा धरून राहता तेव्हा तो तुमच्या जवळ येऊन तुम्हाला उठवून गरुडाचे पंख देईल (४०:३१).

कनवाळू देव

“मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल” (४०:११).

हा कनवाळू देव पाहा जो आपल्या मुलांना घरी उचलून नेतो.

आपली भव्यता / ऐश्वर्य यशया ४० मध्ये देव गर्जना करून  दाखवत असताना तो इस्राएलांशी आईसारखा सौम्यतेने व शांततेने बोलत आहे: “सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो” (४०:१). आपल्या लोकांचा छळ व्हावा व इतस्तत: हेलकावले जावे अशी देवाची इच्छा नाही. आपल्याला तो सांत्वन करणारा देव आहे हे समजावे अशी त्याची इच्छा आहे (२ करिंथ १:३). जर देवाचे सामर्थ्य तो त्याची अभिवचने पूर्ण करायला समर्थ आहे असे दाखवते, आणि त्याची सुज्ञता आपली परिस्थिती काही अपवाद नाही अशी जर आपल्याला खात्री देत असेल तर त्याचा कनवाळूपणा आपल्याला खात्री देतो की त्याला त्याचे सामर्थ्य व सुज्ञता आपल्यासारख्या कमकुवत लोकांसाठी वापरण्यात खूप आनंद आहे. तो असा मेंढपाळ आहे की त्याच्या एका हरवलेल्या मेंढराला शोधण्यासाठी तो आपली नव्याणव मेंढरे मागे सोडतो. आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो वाकून त्याला उचलतो आपल्या कवेत घेतो आणि त्याला घरी आणतो (४०:११).

तुमची संकटे वेदनामय असतील पण तुमचा देव कनवाळू आहे. तुमची सर्व भीती व दुर्बलता त्याच्यासमोर ठेवा आणि त्याला मागा की त्याने तुम्हाला त्याच्या प्रीतीने शांत करावे.

प्रत्येक खोरे भरून जाईल

यशयाने इस्राएल लोकांना तुमचा देव पाहा असे सांगितल्यानंतर सातशे वर्षांनी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने संदेष्ट्याचे  हेच शब्द उचलले आणि यार्देनेच्या अरण्यात घोषणा केली  (लूक ३:५-६; यशया ४०:४-५). मग योहान त्या टेकड्या व खोऱ्यातून चालणाऱ्या मानवासारखा पुढे झाला आणि त्याने अरण्यातून येशूसाठी पुढे मार्ग काढला. येशू हा समर्थ पुरुष होता. त्याने नरकाचे सैन्य बंदिस्त केले आणि स्वर्गाचे राज्य आणले. तो सुद्न्य पुरुष होता जो देवाचे शब्द बोलला आणि शास्त्री लोकांची तोंडे बंद केली. तो कनवाळू पुरुष होता ज्याने रोग्यांना बरे केले केले व देवाच्या कृपेची घोषणा केली.

मग तो आपल्या मोठ्यात मोठ्या समस्यांच्या खाली गेला आणि त्यांना त्याला (येशूला) मारण्यास, दलदलीत तुडवण्यास, गाडण्यास त्याने परवानगी दिली. फक्त यामुळेच आपला शाप तो कबरेकडे नेऊ शकला, तो जमिनीत खोल बुडवू शकला आणि मग नाश करू न शकणाऱ्या जीवनाच्या सामर्थ्याने तो पुन्हा उठला. आता देवाचे प्रत्येक अभिवचन आपल्याला ख्रिस्ताद्वारेच मिळते (२ करिंथ १:२०). हातावर व्रण असलेला देव!

तुमची समस्या कदाचित खूप मोठी असेल, कदाचित तुम्हाला ठाऊक आहे त्यापेक्षा मोठी असेल. पण तुमचा देव महान आहे, तुम्हाला दिलेली त्याची अभिवचने ही भक्कम आणि खात्रीची आहेत. म्हणून तुमच्या समस्येतून वर पाहा. देवाचा समर्थ, सुद्न्य आणि कनवाळू आवाज ऐका. आणि त्याला मागा की मला तुला पाहायला मदत कर.

 

 

Previous Article

लैंगिक पापाशी लढण्याचे चार मार्ग सॅम अॅलबेरी

Next Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

You might be interested in …

नातेसंबंधातील बहुतेक संघर्ष कसे सोडवावेत

लेखक:  जॉन ब्लूम   आपल्यामधला आनंद हिरावून घेणाऱ्या, भावनांवर हक्क दाखवणाऱ्या, मन विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागेल नातेसंबंधातील संघर्षांचा. नातेसंबंधातील संघर्षाइतका गोंधळ घालणारे व नाश घडवणारे दुसरे काही नसते. आणि यातले कितीतरी आपण टाळू […]

एका बळीचा विजय    

कॅमरॉन ब्युटेल (संदर्भ दिलेली वचने कृपया बायबलमधून वाचावीत.) जेव्हा माहिती करून घेण्याचा  उगम फक्त कल्पना  असेल तर चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे ते समर्थ शस्त्र ठरते. मी लहान असताना येशू हा बलवान गुंडापुढे असलेला एक कमकुवत […]