Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 21, 2020 in जीवन प्रकाश

प्रभू चांगला शेवट करण्यासाठी माझी तयारी कर                    जॉन ब्लूम

प्रभू चांगला शेवट करण्यासाठी माझी तयारी कर जॉन ब्लूम

“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो; जन्मसमय व मृत्युसमय; रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो…शोधण्याचा समय व गमावण्याचा समय असतो” (उपदेशक ३:१-२,६)

जेव्हा एक नवीन बाळ जन्माला येते, नवे पीक रोपले जाते, नवा प्रकल्प उघडला जातो, पदवी, करीयर, मैत्री, निर्णय, विवाह, घर घेतले जाते तेव्हा एक ताजी उमेद आणि अपेक्षा आपल्याला वाटते. नव्या मोसमात प्रवेश करताना भविष्याच्या खात्रीची आशा आपल्याला वाटत असते. सुरुवात करण्यासाठी आपण आपण खूप स्वप्ने पाहतो, योजना करतो, शक्ती खर्च करतो, आणि बहुधा पैसा गुंतवतो. चांगली सुरुवात करण्यासाठी मदत व्हावी म्हणून एवढी पुस्तके लिहिली जातात, व्हिडीओ केले जातात व मार्गदर्शन का केले जाते हे स्पष्टच आहे.

पण आपण चांगला शेवट कसा करावा हे शिकवण्यासाठी तशी मदत आपल्याला उपलब्ध नाही. बहुतेक त्यासाठी  मागणी फार कमी असावी. शेवट करण्यासाठी योजना करण्याची कल्पना आपल्याला भावत नाही कारण शेवट म्हणजे निरोप घेणे. प्रकरण बंद करण्याने आपल्याला बहुधा निराश, दु:खी किंवा गोंधळलेले वाटते यासाठी की आपण कोण आहोत किंवा असे पुढे जाण्यात आपला हेतू काय अशा भावनांनी आपण भरून जातो.

सुरवाती अधिक चांगल्या असतात का?

पण मोसमाचा शेवट हा सुरवातीपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा ती खरे काय झाली होती हे आपल्याला स्पष्ट दिसू शकते आणि हे अनंतकाळच्या दृष्टीतून फार महत्त्वाचे आहे. जेव्हा पिकाची कापणी होते तेव्हा त्या हंगामात आणि शेतीद्वारे नक्की काय उपजवले आहे हे आपल्याला कळते. जेव्हा आपल्या जीवनाचा मोसम संपतो तेव्हा काही अंशी तरी आपली स्वप्ने, योजना, कष्ट आणि गुंतवणूक यांचे खरे फळ आपण पाहू शकतो.

म्हणूनच बायबल म्हणते, “एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा” (उपदेशक ७:८). सुरवातीला जेव्हा आपण पुढे पाहत असतो तेव्हा होऊ शकणाऱ्या भविष्याचे चित्र आपण रेखाटू शकतो, खरे चित्र नाही. आणि आपली दूरदृष्टी ही नेहमी बऱ्या आणि वाईट उद्दिष्टांनी भरलेली पोतडी असते. प्रीती आणि स्वार्थी महत्त्वाकांक्षा, येशूची सेवा आणि आपली आपल्यासाठी सेवा. पण जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा हे निरनिराळे पैलू – आपल्यामध्ये वसणारे पाप आणि आत्म्याद्वारे भरलेला चांगुलपणा, आपले सामर्थ्य व कमकुवतपणा, ह्या युगामध्ये असलेली व्यर्थता हे अनेक पैलू  (रोम ८:२०-२१) आणि इतर गोष्टी – यांनी आपल्यावर किती परिणाम केला आहे हे आपल्याला स्पष्ट दिसू लागते.

दुसऱ्या शब्दात शेवट हे सुरवातीपेक्षा जास्त सत्यमय असतात. संध्याकाळी केलेला दिवसाचा आढावा हा सकाळच्या कॉफीनंतरच्या चांगल्या आशावादी धोरणापेक्षा अधिक सत्य सांगतो.

तर मोठ्या आशेने केलेल्या संभाव्य आशावादापेक्षा शांतपणे केलेला वास्तवतेचा आढावा अधिक चांगला का असतो?

* कारण सुज्ञतेला आपले घर कल्पनेच्या वाळूवर बांधायला नको असते तर सत्याच्या खंबीर खडकावर बांधायला
हवे असते.

* कारण अखेरीस सुरवातीपेक्षा अधिक रीतीने आपण येथे उभारू शकणाऱ्या कशाहीपेक्षा  आपली अधिक चांगल्या
टिकाऊ आशेची गरज पाहू शकतो (इब्री १३:१४).

* कारण शेवट हा सुरवातीपेक्षा आपल्या मूर्त्या उघड करतो – ज्या गोष्टींमध्ये आपण खोटी आशा उभारली आणि
ज्यामध्ये आपण आपली स्वत:ची चूक ओळख लागू केली.

शेवट हा बहुधा सुरवातीपेक्षा चांगला असतो कारण तो आपली एकच आशा म्हणून देवाकडे अधिक प्रभावी रित्या  पाहण्यास निर्देश करतो.

गमावण्याच्या समयासाठी मदतनीस  

प्रत्येक शोधण्याचा समयासाठी एक  गमावण्याचा समय असतो (उपदेशक ३:६). आपल्या ख्रिस्ती शिष्यत्वामध्ये चांगला शेवट कसा करावा, किंवा चांगल्या रीतीने एखादी गोष्ट सोडून कशी द्यावी  हा अगदी दुर्लक्षित विषय आहे. अशा अवघड पाण्यातून कसे तरून जावे यासबंधी मार्गदर्शन व शिक्षण फार थोडे दिले जाते. कदाचित यामुळेच ख्रिस्ती पुढारी नेतृत्वातून बाहेर पडताना झगडतात किंवा मंडळ्या नेतृत्वात बदल झाला तर झगडतात. आणि ख्रिस्ती लोक सर्वसाधारणपणे  जीवनातील व सेवेतील निरनिराळ्या मोसमाच्या अखेरीस गोंधळून जातात किंवा विचलित होतात.

पण देव आपल्याला मदत करील. एका प्रकारे तो आपल्याला “गमावण्याच्या वेळेसाठी” तयार करील आणि इतरांनाही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रार्थना करायला मदत करील. अशा मोसमातून बाहेर पडताना तो येशूचा गौरव मोठ्या प्रकारे करील.

गमावण्याचा वेळ आणि त्यासाठी माझा आवडता आदर्श आहे बाप्तिस्मा करणारा योहान. त्याच्या पाचारणाच्या शेवटच्या काळात ही अरण्यातली वाणी (योहान १:२३), दुसरा एलिया (मत्तय ११:१३-१४) स्त्रीपासून जन्मलेल्यांमध्ये श्रेष्ठ (मत्तय ११:११), जो धूमकेतूसारखा इस्राएलमध्ये चमकला असा योहान. जेव्हा त्या झगझगीत प्रभातताऱ्यापुढे त्याच्या सेवेला ग्रहण लागलेले पाहिले तेव्हा त्याने म्हटले, “त्याची वृद्धी व्हावी व माझा र्‍हास व्हावा हे अवश्य आहे” (योहान ३: २९-३०).

योहानाने म्हटलेले हे शब्द आणि इतरत्र तो जे बोलला ते त्याला इतके महान बनवणारे त्याचे ह्रदय दाखवून देते. त्याला समजले की त्याचे जीवन कशासबंधी होते: येशू!  जितके त्याचे जीवन आरंभी येशूसंबंधी दाखवते त्याहूनही अधिक त्याचा शेवट दाखवतो.

तसेच आपल्या जीवनातील प्रत्येक मोसमाचा शेवट ही ह्यासबंधीच आहे : येशूची वृद्धी आणि आपला ऱ्हास.

प्रभू काहीही कर

ज्या कोणत्याही भूमिकेत आपण प्रवेश करतो त्यातून बाहेर पडण्याचा देवाकडून नेमलेला वेळ आहे. काही शेवट गोड वाटतात आणि स्पष्ट दिसतात. काही कडू आणि गोंधळलेले वाटतात. त्यामुळे सुरुवात करण्यापेक्षा शेवट करताना निराळ्या प्रकारच्या सुज्ञतेची गरज असते. अशा संकमणाच्या वेळी देवाच्या सार्वभौमत्वावर, सुज्ञतेवर आणि चांगुलपणावर विश्वास ठेवण्यासाठी देवाच्या आत्म्याद्वारे दिलेली नम्रता व सामर्थ्य यांची गरज आहे.

अशा क्षणांसाठी आपण आपली तयारी करायला हवी त्यापेक्षा चांगले म्हणजे देवाने आपली तयारी करायला हवी. म्हणजे अशा प्रत्येक वेळी आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानासमवेत म्हणू शकू “त्याची वृद्धी व्हावी व माझा र्‍हास व्हावा हे अवश्य आहे.”

“प्रभू काहीही कर पण तुझ्या सर्वाधिकारासाठी माझी प्रीती वाढव आणि तुझ्या सुज्ञ हेतूंवरचा माझा विश्वास वाढव. जेव्हा तू माझ्यासाठी काही काळ नेमून दिलेल्या कामाच्या मोसमातून बाहेर पाउल टाकण्याची वेळ येईल तेव्हा माझ्या वैयक्तिक प्रभावाचा ऱ्हास मी आनंदयुक्त विश्वासाने स्वीकारावा म्हणून मला मदत कर.”