दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

दु:खसहनाची हमी, कृपेची हमी

स्टीफन विल्यम्स

Beautiful Beam of light and the clouds

“आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.

त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन” (१ पेत्र ५:१०-११)

देव आपल्या प्रत्येकाच्या जीवनात परीक्षेमध्ये कार्य करत असतो. आणि तुम्ही त्याचे असल्यामुळे त्याला आपल्या जीवनात कार्य पूर्ण करू द्यायला हवे. फक्त परीक्षेतच देवाला खोल रीतीने जाणून घेण्याचा अनुभव येतो. तुमच्या विश्वासाची वाढ होण्यासाठी परीक्षेची गरज आहे.

वरील वचनांमध्ये विश्वासीयांसाठी दोन हमी दिल्या आहेत:
– दु:खसहनाची हमी.
– देवाच्या वैयक्तिक कृपेची हमी.
पण देवाच्या कृपेचा हा खोल अनुभव दु:खसहन करण्यापूर्वी नाही तर ‘दु:ख सोसल्यावर’ येतो हे लक्षात घ्या.

I. दु:खसहनाची हमी

देवाची दया आपल्याकडून दु:खसहनाची अपेक्षा करते

अ) तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर (व. १०)

१. मुगुट मिळण्यापूर्वी वधस्तंभ यायलाच हवा. येथे आपण पाहतो की गौरव मिळणार आहे, मुगुट मिळणार आहे.

      २. मुगुटापर्यंत नेणारा मार्ग दु:खसहनाचा आहे.‘तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर.’
         प्रियांनो, येथे दुसरा मार्ग नाही.

जसे अभ्यास केल्याशिवाय तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. शिस्तपूर्ण रीतीने डायट केल्याशिवाय वजन कमी होत नाही. कोणतेही वाद्य सरावाशिवाय तुम्ही वाजवू शकत नाही. तसेच हे आहे.

  • सहज रीतीने गहनता गाठता येत नाही. वाढ सोपी नसते.
  • दु:ख सोसल्याशिवाय देवाच्या खोल प्रीतीचा अनुभव तुम्हाला येऊ शकत नाही.

कित्येक ख्रिस्ती लोकांनी दु:खसहन करण्याची क्षमता गमावली आहे. त्रासापासून सुटका मिळावी आणि आपली समृद्धी व्हावी एवढीच आपली इच्छा असते. आणि सहन करण्याद्वारे जो कृपेचा खोल अनुभव असतो तो आपल्याला ओलांडून जातो.

“कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे” (फिली. १:२९)


ब)
ख्रिस्ती दु:खसहन हे तात्पुरते असते.

“तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर”

  • तेव्हा दु:खसहन हे निश्चित आहे पण ते कायमचे वास्तव नाही. “ज्या जगात  ख्रिस्ती लोकांना दु:खसहन करावे लागते ते देवाने निर्मिले तसे  जग नाही. वैभवी देशामध्ये देव सर्व काही सुरळीत करील. दु:खाचे मूळच तो नष्ट करील.” (जोब्ज)
  • पेत्र पुढे जाऊन म्हणतो की हे थोडा वेळ आहे. जर हे जीवनभरचे दु:ख “तात्कालिक व हलके” आहे असे पौल म्हणतो (२ करिंथ ४:१६-१७) तर सर्वच दु:ख अल्पकाळचे आहे.
  • सोसल्यावर – म्हणजे जीवन संपल्यावर जेव्हा मी त्याला पाहीन तेव्हा का? हो, तसे हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी खरे आहे. आणि ज्यांना दु:ख जीवनभर आहे त्यांच्यासाठी तर विशेषकरून. पण त्यासोबत  ते जीवनातल्या प्रत्येक दु:खसहनासाठी ही खरे आहे.

४. देवाची अनंतकालिक कृपा दाखवण्यासाठी तो दु:ख या तात्पुरत्या साधनाचा उपयोग करतो. हे सुद्धा सरून
    जाईल आणि कृपेमध्ये नष्ट होईल.

        ह्या महान वैद्याच्या हाताचा अनुभव घेण्यास तुम्ही तयार आहात काय? आणि मग तुम्ही दु:खाला 
        कवटाळण्यास तयार आहात का?

II. कृपेची हमी (वचन १०, ११)

देवाच्या कृपेच्या चार हमी.

अ. त्याचे शीलच कृपा आहे.

हा कृपेचा देव आहे.

  • आपल्या उत्तेजनासाठी पहिली हमी ही देवाच्या चांगल्या शीलामध्ये आहे.
  • कृपेचा देव असे म्हणणे ही एक बाब. पण पेत्राचे वर्णन हे व्यापक आहे.

      सर्व कृपेचा देव. विश्वामध्ये काही चांगले आहे का? त्याचा उगम देव आहे.

  • प्रत्येक आशीर्वाद देवाकडून येतो. फसू नका. अशी कोणतीच चांगली आणि परिपूर्ण गोष्ट नाही जी देवाकडून येत नाही.
  • त्याच्यासारखा कोण देव आहे? (मीखा ७:१८-१९). त्याच्याशिवाय  खोल कृपा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. लक्षात ठेवा की तुम्ही दु:ख सोसल्यावर कृपेच्या देवाचा अनुभव घेणार. ही कृपा न संपणारी आहे (योहान १:१४-१६).

ब. त्याचे पाचारण वैभवी आहे.

“आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले” (व. १०)

  • सर्व कृपेचा जो देव त्याने तुम्हाला पाचारण केले आहे. येथे अनंतकालिक वास्तवाबद्दल बोलून पेत्र त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहे. जेव्हा माझ्यावर आलेल्या परीक्षा, माझे सर्व जगिक स्वास्थ्य हिरावून घेण्याची धमकी देतात तेव्हा मला आत्मविश्वास का हवा?
  • कारण आत्मविश्वास जे अनंतकलिक आहे त्याच्यातूनच येतो. देव फक्त चांगला आणि कृपेचा उगमच नाही पण त्याने आपले चांगुलपण त्याच्या लोकांवर स्थिर केले आहे. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचा निर्धार झाला आहे की त्याने निवडलेले हे लोक असतील आणि त्यांच्यावर आपल्या कृपेचा वर्षाव तो करणार आहे.
  • त्याच्या कृपेचा वर्षाव करण्याचे त्याचे ध्येय काय आहे? अनंतकालिक गौरव. याचा अर्थ त्याने आपल्याला त्याच्या स्वर्गीय राज्याचे भागीदार होण्यास बोलावले आहे. हे वतन कधीही खराब होणार नाही किंवा कोमेजून जाणार नाही.
  • या हमीमध्ये असणारे उत्तेजन असे आहे: तुमच्या परीक्षा ह्या सरून जाणाऱ्या आहेत.  दु:ख अल्पकाल टिकणारे आहे असे तो म्हणतो. पण तुम्ही कोण आहात? ख्रिस्ताद्वारे क्षमा पावलेले व  तारण झालेले देवाचे मूल. तुम्हाला त्याच्या अनंतकालिक गौरवामध्ये त्याने बोलावले आहे. तुम्ही कोमेजून जाणार नाहीत. तुमच्या परीक्षा जातील. तुम्ही देवाच्या कृपेसाठी निवडलेले आहात. देवाचा तुमच्यासाठी हेतू दु:ख नसून कृपा आहे.

III त्याची काळजी वैयक्तिक आहे.

“कृपेचा देव …. स्वतः तुम्हांला पूर्ण करील, स्थिर करील, बळकट करील आणि स्थापित करील.” (पं.र.भाषांतर)

  • स्तोत्रकर्ता म्हणतो, “पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो” (स्तोत्र १३०:६). ही इतकी उत्कट इच्छा का? येथे काय हमी आहे? खुद्द देवाची वैयक्तिक काळजी!
  • पेत्र जेव्हा असे म्हणतो तेव्हा त्याच्या जीवनात आलेला वैयक्तिक आणि मोलवान अनुभव तो सांगत आहे. येशूला नाकारल्यानंतर तो येशूकडे गेला नाही तर खुद्द येशू त्याच्याकडे आला आणि त्याला स्थिर केले. हीच हमी आपल्याला सुद्धा आहे. योहान १४:१६,१७;  मत्तय २८:२० वाचा.
  • तो काय करतो? आपल्यावरची  त्याची कृपा येथे चार प्रकारे सांगितली आहे.

तो पूर्ण करील. (इंग्रजीमध्ये restore). याचा अर्थ फाटलेले दुरुस्त करणे. उदा. मासे धरायचे जाळे. तो तुम्हाला योग्य करील, पूर्ण करील.

स्थिर करील. यामागे स्टील जसे आगीद्वारे कठीण केले जाते याची कल्पना आहे. तो तुम्हाला भक्कमपणे उभे करील.

बळकट करील. तुम्हाला सामर्थ्य देईल. तुम्ही सेवा करू शकाल. दुसऱ्या शब्दांत परीक्षा तुम्हाला पराजित करणार नाही. देव तिचा उपयोग तुम्हाला बळकट करण्यासाठी आणि सेवेत स्थिर करण्यासाठी करील.

स्थापित करील. खडकावर बांधलेल्या घराप्रमाणे, एका भक्कम पायावर स्थिर, आधार असलेले, वादळासाठी सज्ज असे करील.


IV त्याचे राज्य युगानुयुगाचे आहे

त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. (व.११)

हे पत्र लिहिताना रोमी साम्राज्य हे सर्वश्रेष्ठ साम्राज्य होते. आणि  त्यावेळी ते आपल्या सामर्थ्यानिशी मंडळीच्या विरोधात होते.  आणि अशा वेळी जर ख्रिस्तामध्ये त्यांना आशा नसती तर रोमने मंडळीचा नाश केला असता. हे वचन त्यांना आणि आपल्याला आत्मविश्वास व धैर्यासाठी खात्री देते. देव सर्व काही आपल्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे. आणि ज्या सर्वांचा तो प्रभू आहे त्यांच्यावर त्याचे नियंत्रण आहे. हे सामर्थ्य, राज्य देवाचे आहे. व ते कायमचे होते आहे व असणार.
तुमच्या दु:खसहनावर त्याचे प्रभुत्व आहे. ते संपून जाईल. तो स्वत: तुमच्याकडे येईल.

Previous Article

आणखी एक नवे वर्ष दरवाजा ठोकत आहे

Next Article

आत्म्याचे फळ – सहनशीलता

You might be interested in …

अजून अधिक साध्य करता आले असते अशी इच्छा तुम्ही करता का?

वनिथा रिस्नर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सुरुवात महान अभिवचनाद्वारे झाली. एका देवदुताने केलेली घोषणा. देवाकडून झालेले पाचारण. एक भरभराटीचे सेवाकार्य. तरीही त्याच्या जीवनाचा शेवट होताना कोणाला त्याची काहीच कल्पना नव्हती – एका तुरुगांच्या कोठडीत एकाकीपणात.जेव्हा देव […]

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा जॉन ब्लूम

देव मानवी ज्ञानाच्या एवढा विरोधात का आहे? हे ऐका: “मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” (१ करिंथ १:१९) हे लढणारे शब्द आहेत. आणि प्रेषित पौलाद्वारे आणखी पुढे जाऊन तो म्हणतो: “कारण […]