नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जे विश्वासू ते सध्या मूर्ख दिसतील

जॉन ब्लूम

देवाची सुज्ञता ही बहुतेक मागे अवलोकन करतानाच पूर्णपणे दिसते. जेव्हा मानवाची सुज्ञता एक टूम म्हणून दिसेनाशी होते तेव्हा देवाच्या सत्याचा पर्वत स्थिर राहतो. काळ हा मानवाचे ज्ञान उघड करतो पण तो देवाचे ज्ञान आणि ज्यांनी ते विश्वासूपणे जगाला घोषित केले –  ते शाबीत करतो.

जर तुम्हाला जगापुढे मंडळी कशी दिसते याचे चांगले चित्र हवे असेल तर येशू  पिलातासमोर आहे असा विचार करा. त्या सकाळी तुम्ही त्या राज्यपालाच्या मुख्य कचेरीत बघे म्हणून आहात असे माना आणि त्या दोघांमधील संभाषणाचे साक्षी आहात. कोण कमकुवत वाटते आणि कोण समर्थ? कोणाचे बोलणे मूर्ख वाटले आणि कुणाचे समंजसपणाचे वाटले? जे सर्व यात गोवले होते त्यांच्यासाठी चांगली निष्पत्ती आणण्याचा कोण प्रयत्न करत होते?

पिलात आणि येशू

 “तू यहूद्यांचा राजा आहेस काय”  (योहान १८:३३)?

 “माझे राज्य ह्या जगाचे नाही” (योहान १८:३६).

तू थट्टा करतोस की काय? पिलाताने उद्वेगाने आपले डोळे चोळले असतील.

पंतय पिलातासाठी त्याच्यासमोर उभा असलेला हा माणूस एक मोठी गैरसोय होता. त्या रोमी राज्यपालाच्या त्या दिवसाच्या वेळापत्रकात सन्हेद्रीनला अडचण वाटणाऱ्या, धर्मक्रांती करणाऱ्या  रब्बीचा खटला चालवणे हा मुद्दा नव्हताच.  आणि तेही अगदी सकाळीच! सन्हेद्रीनच्या सभेची इच्छा होती की त्याने ह्या माणसाला राष्ट्रविरोधी म्हणून जाहीर करावे. आजच. वल्हांडणापूर्वी. पिलाताला हा तणाव नकोसा झाला. त्याचा धीर ताणण्याची परिसीमा झाली होती.

या वादग्रस्त येशूबद्दल त्याने पूर्वी ऐकले होते पण त्याची फिकीर करण्याची गरज त्याला भासली नव्हती. त्याच्या माहितीनुसार तो फक्त एक गूढ असा यहूदी शिक्षक होता. काहींचा दावा होता की त्याला आश्चर्यकारक सामर्थ्य आहे. पण येशूने सम्राटाचा निषेध केला किंवा रोमविरुद्ध बंडाळी करण्यास चिथावल्याचे एकही वृत्त आले नव्हते.

सोपा मार्ग

त्रास निर्माण करणाऱ्या एका यहूद्याचा, गरज लागली तर निकाल लावण्याने पिलाताला काही रुखरुख लागणार नव्हती. पण या परिस्थितीने त्याला एक अस्वस्थ भावना दिली.  वल्हांडणासाठी आलेल्या लोकांनी यरुशलेम भरून गेले होते. – हा राजकीय काटा काढण्याचा वेळ नव्हता. जर येशूने बंडाला प्रोत्साहन दिले नव्हते तर त्याच्या वधाने ते घडू शकत होते. तो सामान्य लोकांचा आवडता होता आणि धर्मवेडे यहूदी कोणतीही संधी साधायला तयार होते.

तरीही येशू स्वत:चे समर्थन करत नव्हता. त्याला राजकीय जाण नव्हती की काय? ‘तू यहुद्यांचा राजा आहेस काय?” असा प्रश्न विचारून पिलाताने त्याला वधाच्या सुटकेची संधीच दिली होती. केवळ एक दोन स्पष्ट नकार एवढेच करून येशू रोमच्या यातनामय गळातून सुटू शकत होता. सन्हेद्रीनने स्वत:च्या समस्या सोडवायच्या होत्या आणि राज्यपाल आपल्या दैनिक कामासाठी मोकळे झाले असते.

पण येशूच्या  “माझे राज्य ह्या जगाचे नाही” या उत्तराने अनावश्यक परिस्थिती अजूनच बिकट झाली. “अरे माणसा, तुला जर मरायचे नसेल तर राज्याचा उल्लेख का करतोस? आणि तेही रोमी राज्यपालाला?” आता पिलाताला आणखी प्रश्न विचारणे भागच होते.

भ्रमात कोण होते?

“तर तू राजा आहेस काय?” पिलाताने विचारले. (योहान १८:३७)

पिलाताने एक उपरोधिक कटाक्ष फेकला. अगदी त्याला वाटले तसाच होता तो. एक गूढ यहूदी, वर आकाशात मस्तक उंचावलेला. भ्रमिष्ट? नक्कीच. पण रोम किंवा इतर कोणाला दहशत देणारा? नक्कीच नाही. येशू हा सत्याचा राजा होता आणि जे त्याची वाणी ऐकतील तेच फक्त त्याची प्रजा होऊ शकत होते. पिलाताला समजत होते की ह्याला  कधीच बंड म्हणता येत नाही. शिवाय येशूच्या सेवकांना जगिक युद्ध करायचे नव्हतेच (योहान १८:३६). हा धार्मिक वेडेपणा होता. देशद्रोह नव्हता. येशूला ठार मारण्याची गरज नव्हती.

मग पिलाताला एक कल्पना सुचली. या गदारोळातून बाहेर पडण्याचा एक मार्ग होता. येशूला सोडण्याचा मार्ग – ज्यामुळे रोम दयाळू दिसेल, सन्हेद्रीन आपली इज्जत राखेल आणि यहूदी समुदायाचे समाधान होईल: वल्हांडणाच्या कैद्याची मुक्तता! आपली ही कल्पना यहूदी लोकांपुढे मांडण्यास जसे तो उठला तसे त्याने सत्याच्या राजाला उपहासाने विचारले, “सत्य काय आहे” (योहान १८:३८)?

जग आणि मंडळी

त्या सकाळी आपल्या कचेरीत बसला असताना पिलाताकडे रोमी सरकारने बहाल केलेला सर्व अधिकार होता. येशूकडे काहीच नव्हते असे दिसत होते. तो तेथे तुच्छ आणि धिकारलेला  (यशया ५३:३) असा उभा होता.

वरवर पाहता पिलाताचे शब्द अगदी रास्त वाटत होते. येशूचे शब्द भ्रमात टाकणारे व विचित्र वाटत होते. पिलात एक राजकीय समझोत्याचा मार्ग हाताळत होता असे दिसत होते. यामुळे अन्यायी वध रोखला जाणार होता. हा निर्णय यहूदी समुदायाला अस्वस्थ करणारा होता पण त्यांना परकेपणाची भावना देणारा नव्हता आणि यरुशलेमेत नागरी शांतता राखणार होता. येशू वधस्तंभी जाण्याचे टाळण्यासाठी काहीही करत नव्हता हे स्पष्ट दिसत होते.

तरीही आता आपण मागे दृष्टिक्षेप टाकला तर सांगू शकतो की येशू हा समर्थ होता आणि पिलात हा कमकुवत होता. पिलाताला  वरून अधिकार देण्यात आला होता (योहान १९:११). आपल्याला दिसते की येशू हा सुज्ञ होता आणि पिलात हा मूर्ख होता.  या राज्यपालाला येशूचे शब्द निर्बुद्धपणाचे वाटले कारण त्याला एक सामान्य मनुष्य समजून तो ते ऐकत होता. आणि पिलाताला नव्हे तर येशूला माहीत होते की या सर्वामध्ये चांगले काय निष्पन्न होणार आहे: पिलात हा फक्त शहराच्या शांतीचा मार्ग शोधत होता पण कोट्यावधी लोकांच्या शांतीसाठी येशू जे करत होता त्याची त्याला कल्पनाही नव्हती.

जगामध्ये मंडळीचे हे स्थान आहे. जरी देव काही लोक ‘योसेफ’ व ‘दानिएल’ म्हणून राज्यातील प्रभावी ठिकाणी ठेवील तरी मंडळी जगावर सत्ता गाजवणार नाही. ती कमकुवत ठिकाणी उभी राहून जगातील अधिकाऱ्यांना सत्य सांगत राहील, ज्यांना ते भ्रामक असे वाटेल. आणि ती आपले ध्येय नेटाने पुढे नेत राहील ज्याबद्दल लोकांचा गैरसमज होईल व ते त्याचा चुकीचा अर्थ लावतील. पण वास्तवात तिचे स्थान हे समर्थ असणार कारण “देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे” (१ करिंथ १:२५).

तुम्ही माझे साक्षी व्हाल

येशूने सरकारी अधिकाऱ्यांना साक्ष दिली तसेच पौलाने त्याच्या अधिकाऱ्यांना साक्ष दिली तेव्हा त्याला सांगितले गेले की,  “पौला, तू वेडा आहेस” (प्रेषित २६:२४). येशू आपल्याला सांगत आहे “तुम्ही माझे साक्षी व्हाल” (प्रेषित १:८). आपल्यापैकी काहींना त्याच्यासाठी अक्षरश: सरकारी अधिकाऱ्यांपुढे उभे राहावे लागेल (मार्क १३:९).

पण आपल्याला सरकारी अधिकारीच काय पण गवळी, शेजारी, नातलग, कोणापुढेही उभे राहण्यास त्याने सांगितले तरी त्यांना आपले सांगणे विचित्र वाटेल. आपल्याला वाटेल त्यांना हे मूर्खपणाचे वाटत आहे. आणि आपले स्थान कमकुवत आहे असे भासेल. त्यावेळी आपण येशू पिलातासमोर असतानाची आठवण करायला हवी. अशा विचित्र किंवा अगदी मरणासारख्या गंभीर क्षणी जे दिसते आणि ऐकले जाते ते महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हे आहे की सत्याला विश्वासू राहणे. अखेरीस त्या क्षणी आणि त्या ठिकाणी देव प्रत्यक्ष जे करत आहे तेच महत्त्वाचे आहे आणि ते बहुधा आपल्याला नंतर दृष्टिक्षेप टाकल्यावर दिसते.

Previous Article

उगम शोधताना

Next Article

एक वेदनामय आणि सुंदर दफन – अंधारात देवाचे आज्ञापालन

You might be interested in …

२०२० मध्ये कुठे चालता याकडे लक्ष द्या स्कॉट हबर्ड

ख्रिस्ती जीवन हे जोराने धावण्याची छोटी शर्यत नाही. तो दहा कोटी पावलांचा प्रवास आहे. पापाच्या ओझ्यापासून दूर होत येशूच्या मागे जीवनाच्या मार्गात जात असताना  दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्षे आपण एका पावलापुढे दुसरे पाउल टाकत असतो. […]

 ख्रिस्तजन्माचा सण: यशया ५३:२

“ तो त्यांजपुढे रोप्यासारखा, रुक्ष भूमितील अंकुरासारखा वाढला”  (यशया ५३:२). जगाच्या आणीबाणीच्या जागतिक परिस्थितीसाठी, देवाच्या चुकलेल्या मंडळीसाठी देवाच्या अद्वितीय वचनात, बायबलमध्ये अगदी अनुरूप असा प्रभूच्या दु:खाचा, अपमानाचा, गरीबीचा, निरोप सर्वत्र पेरलेला आहे. वरील प्रतीक यशयाच्या […]

धडा ६.    १ योहान १:१०-२:२.     खरी शांती स्टीफन विल्यम्स

  तुम्ही कधी कोणाविषयी कटुता बाळगली आहे का? कटुतेला पूर्ण विराम देण्याचा अतिशय परिणामकारक तुमचा अनुभव कोणता? कटुता मिटली नाही, तर दोन मार्ग राहातात. ▫         ज्या व्यक्तीने अन्याय  केला आहे, तीच स्वत: तो मिटवण्यासाठी काहीतरी […]