जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

शिमोनाने वधस्तंभ उचलण्यामागचा अर्थ

जॉन पायपर

प्रश्न

पास्टर जॉन, या आठवड्यात मी वधस्तंभाचा वृतांत वाचत होतो. त्यातील एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले. लूक २३:२६ मध्ये आपण वाचतो, “पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले.”  देव सार्वभौम आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळे हा काही अपघात किंवा गोष्टीतला एक साधा तपशील घातलेला नाही. शिमोनाने येशूचा वधस्तंभ उचलण्याचा अर्थ काय? आपण येथे काय पाहावे अशी देवाची इच्छा आहे?

उत्तर

प्रख्यात शिमोन कुरेनेकर

कधीकधी लेखक सत्य वृत्तांत देत असताना हा भाग का दिला आहे याबद्दल स्पष्ट संकेत आणि निर्देशक देतात. आणि त्यातून आपण काय शिकायला हवे हे दाखवतात. या शास्त्रभागात तसे काही स्पष्ट दिसत नाही. याचे एक कारण असू शकते की, पहिल्या मंडळीमध्ये शिमोन कुरेनेकर ही एक प्रसिद्ध व्यक्ती झाली होती. त्याचे नाव घेताच लोक म्हणत असतील, “ह्या मनुष्याने वधस्तंभ उचलून नेला.”

असे असण्याचे कारण मार्क १५:२१ मध्ये शिमोनाला “आलेक्सांद्र व रूफ ह्यांचा बाप” असे म्हटले आहे. म्हणजे ते कोण आहेत हे वाचकांना ठाऊक आहे अशी मार्काची अपेक्षा होती. मग लोक म्हणू शकत होते की येथे शिमोनाचा अप्रत्यक्ष उल्ल्लेक्ष आहे. सर्वांनाच तो ठाऊक होता.

पाच प्रस्ताव

पण मला वाटते की हा वृत्तांत देताना लुकाच्या मनात  याहून काही अधिक असावे. मला काही प्रस्ताव मांडू द्या. आणि ते प्रस्ताव आहेत. ह्याबद्दल मी खात्रीपूर्वक हे असेच आहे असे सांगू शकत नाही.

१. एका परदेशीयाकडून सेवा

शिमोन हा कुरेने गावचा होते. हे उत्तर आफ्रिकेतील आजच्या लिबियामधील एक शहर आहे. तो यहूदी होता की नाही हे आपल्याला ठाऊक नाही कारण शिमोन हे नाव यहूदी व ग्रीक दोन्ही गटात प्रचलित होते.

तो यरुशलेमेला भेट देत होता की तिथला रहिवासी होता हे आपल्याला ठाऊक नाही. पण आपल्याला हे ठाऊक आहे की तो परदेशातला असल्याचे शुभवर्तमानामध्ये नमूद केले आहे. तो आफ्रिकन आहे. लूक म्हणत असावा, “येशूच्या शेवटच्या तासामध्ये एका परदेशी – आफ्रिकन- व्यक्तीने त्याची सेवा केली.”

२. तुझा वधस्तंभ उचल.

शिमोनाने येशूचा वधस्तंभ उचलला हे लूक नमूद करतो. येथे आपण लूक ९:२३ ची आठवण करावी अशी लुकाची इच्छा आहे काय? “ त्याने सर्वांना म्हटले, जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.”  दुसर्‍या शब्दात लूक असे दाखवत आहे का की, शिष्य असण्याचे हे चित्र आहे?

३. अचानक दु:खसहन

कदाचित लूक ही घटना शिष्यत्वाचा एक दाखला म्हणून निर्देश करत असावा. शिमोनाला अपेक्षा नसताना अचानक हे कठीण काम करण्यासाठी निवडले गेले. हे असे दाखवते की आपला वधस्तंभ उचलण्याचा क्षण आपण निवडू शकत नाही. शिमोन ही एक ऐतिहासिक व्यक्ती आहे आणि एका खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक क्षणी तो तिथे हजर होता.

आपण आपल्या दु:खसहनाची वेळ निवडू शकत नाही. ते आपल्यावर अचानक, भीतीदायक रीतीने, जडपणाने, दु:खद रीतीने केव्हाही येते. येथे असे लिहिले आहे की “तो शेतावरून येत होता.” ही नोंद सांगते की हे सर्व अचानक घडून आले.

यातून आपण धडा शिकतो की शेतातून येताना – जीवनातील कोणत्याही क्षणाला येशूच्या सेवेमध्ये आपल्याला दु:खद रीतीने ओढून घेतले जाईल त्यासाठी आपली तयारी असावी. ते कधी होणार याची आपल्याला कल्पना नसणार.

४. वधस्तंभांवर जाण्यास जिवंत राखले.

बहुतेक जण समजून घेतील की कोणाला तरी येशूचा वधस्तंभ उचलायला लावणे म्हणजे येशूची सहन करण्याची परिसीमा झाली होती. पुढचा पल्ला स्वत: पार करण्याची त्याला ताकदच राहिली नव्हती. पण आपल्या लगेच लक्षात येणार नाही की शिमोनाला मदत करायला लावणे ही कृती दयाळूपणाची होती, क्रूरतेची होती की केवळ त्याचा उपयोग करून घेण्याची होती. माझ्या म्हणण्याचा आशय असा:

जर येशूला त्याचा वधस्तंभ उचलता येत नव्हता तर कोणीतरी ते करायला हवे होते. कारण या सैनिकांना आदेश दिला होता की “त्याला वधस्तंभी खिळा.” आणि जर त्यांनी त्याला रस्त्यावर असेच मरू दिले असते तर कोणीतरी त्यासाठी जबाबदार धरले गेले असते. त्यामुळे कदाचित ही उपयोग करून घेण्याची बाब होऊ शकते की, “ या माणसाला कसेतरी उभे करून वधस्तंभावर खिळायलाच हवे.” किंवा एखाद्या रोमी सैनिकाला दया आल्यानेही हे केले गेले असेल.

मॅथ्यू हेन्री हे भाष्यकार सुचवतात की, कदाचित त्यांनी पाहिले असावे की, त्या ओझ्याखाली येशू मरण्याची शक्यता आहे आणि ते इतके रक्तपिपासू असल्याने किंवा पिलाताच्या शिक्षेची त्यांना भीती वाटत असल्याने उरलेल्या छळासाठी त्याला जगता यावे याची खात्री ते करत असावेत. दुसर्‍या शब्दात हे दयाळूपणाच्या अगदी विरोधात होते. “त्याच्या हातात आणि पायात खिळे घुसवलेच पाहिजेत. या माणसाला या वधस्तंभाच्या भाराखाली मरू देता कामा नये.”

५. स्वर्गीय मदत

आता हा पाचवा फक्त माझा प्रस्ताव. लूक आपल्याला सांगतो की गेथशेमाने बागेत येशू व्याकूळ झाला होता आणि तो प्रार्थना करत असताना देवदुताने त्याला मदत केली. “तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला” (लूक २२: ४३). इब्री ५:७ म्हणते, “आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली.” त्याच्या सद्भक्तीमुळे त्याचे ऐकले गेले. त्याच्या देवभीरूपणामुळे. आता यामुळे आपल्याला काय समजते? येशूला मरणापासून वाचवण्यात आले म्हणजे तेथे तो मरणार होता असा अर्थ नाही तर मरणाच्या – विश्वासाचा विध्वंस करणाऱ्या – सामर्थ्यापासून त्याला वाचवले गेले.

आपल्याला मरणापासून वाचवावे म्हणून तो प्रार्थना करत नव्हता. पण ह्या भयानळ छळ आणि मरण यामुळे आपल्या तारणाच्या कार्यापासून आणि आज्ञापालनापासून आपण तसूभरही हलू नये अशी तो प्रार्थना करत होता.

त्यामुळे कदाचित शिमोनाने पुढे येऊन क्रूस उचलण्यास येशूला मदत करणे हे गेथशेमाने येथे देवदुताने मदत केल्यासारखेच नव्हते का? आणि आता वधस्तंभाच्या रस्त्यावर मदत मिळाल्यावर येशू आपले जीवितकार्य पूर्ण करणार होता.

आपण काय पाहिले

  • शिमोन ही एक खरीखुरी ऐतिहासिक व्यक्ती आहे व एका खर्‍या ऐतिहासिक वेळी तो तेथे होता.
  • तो एक परदेशी -आफ्रिकन- होता. त्याने येशूच्या अखेरच्या तासामध्ये त्याला मदत केली.
  • लूक ९ नुसार आपला वधस्तंभ घेऊन येशूच्या मागे जाणे हे आपल्या शिष्यत्वाचे सुंदर चित्र आहे.
  • येशूसाठी दु:ख सहन करण्याचे पाचारण नेहमी अचानक, केव्हाही येते आणि त्यासाठी भारी किंमत द्यावी लागते
  • शिमोनाच्या मदतीने येशूला तात्पुरती सुटका दिली गेली तरी त्याला त्यामुळे क्रुसापर्यंत जाण्यास टिकवून धरले. आपल्यासाठी येशूने वधस्तंभावर जाण्याचा अनुभव सहन केला. 
  • गेथशेमाने येथे येशूने आपल्या स्वर्गीय पित्याकडे आक्रोश केला आणि त्याला मदत दिली गेली. त्याला मदत दिली गेली यासाठी आपल्या आज्ञापालनात त्याने डगमगू नये. देवाने त्याची प्रार्थना ऐकली. हे येशूच्या जीवनातले अत्यंत कठीण तास होते.

यावर आपण मनन करत असताना प्रीतीने व कृतज्ञतेने आपली हृदये स्तुतीने भरून जाऊ देत.

Previous Article

ईयोबाच्या संदेशाचा आढावा

Next Article

माझ्या पापाने तेथे त्याला धरून ठेवले

You might be interested in …

समाधानकारक सांत्वनदाते कसे व्हाल?

जॉन ब्लूम जे दु:खात असतात ते दु:खद गोष्टी बोलत असतात. भारी दु:ख – मग ते मानसिक असो व शारीरिक, तो कधीच समतोल साधू शकणारा अनुभव नसतो. तो सर्व जीवनावर वर्चस्व करणारा अनुभव असतो. असे दु:ख […]

जेव्हा प्रीती हे युद्ध असते

ग्रेग मोर्स जीवनातील सर्वात जिवलग मित्र आता तुमच्यासमोर शत्रू म्हणून उभा आहे (असं तुम्हाला वाटतंय). शस्त्रं उगारलेली आहेत. तप्त शब्दांची फेकाफेक होते. युद्धाची सुरवात होते. तुम्ही ठोसा मारा किंवा झेला, तुम्हाला इजा होतेच. एका दुष्ट […]

स्वर्गाची उत्कट इच्छा

(लेखांक १०) अखेरचा  (देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला सामोरे जाणारी जीवनकथा ) (viii) आम्हाला ‘स्वर्गासाठी योग्य’ असे ‘नवीन शरीर’ प्राप्त होईल! हे एकदम आमच्या पृथ्वीवरील शरीरासारखेच असेल (ज्यामुळे आम्ही एकमेकांना […]