जनवरी 7, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

वचनांचे पाठांतर जीवनाला वास्तवता आणते

जॉन ब्लूम

अनेक ख्रिस्ती लोकांसाठी शास्त्रवचनांचे पाठांतर म्हणजे वचनांची केवळ घोकंपट्टी करणे आहे. यामागे त्यांचे अपयश (अनेकदा प्रयत्न करून  वाया गेलेले प्रयत्न) , किंवा व्यर्थता (आता ते कसे सर्व विसरून गेले आहेत) , किंवा भीती (लोकांसमोर पाठ म्हणणे)  हे सर्व येते. जर वचनाचे पाठांतर म्हणजे अपयश, व्यर्थता किंवा भीती असेल तर  कुणाला करावेसे वाटणार ते पाठांतर?

पण असा त्याचा अर्थ नाही. घोकंपट्टीपेक्षा त्यात खूप काही आहे. बायबलच्या वचनांच्या पठणाच्या मागे असलेले मोठे चित्र समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. मग ते ख्रिस्ती जीवनाकरिता इतके आवश्यक का आहे हे आपल्याला कळेल. देव पुन्हा पुन्हा आपल्याला ‘आठवण करा’ अशी आज्ञा का देतो?

ह्याचे स्पष्टीकरण मी असे करीन:

वचनाचे पठण म्हणजे  देवाचा श्वास फुंकलेले सत्य (२ तीम. ३:१६), आपल्या स्मरणात जमा करून ठेवणे. त्यामुळे  देवाने दिलेली तुमची कल्पनाशक्ती त्यातून घेऊ शकेल व देवाने निर्माण केलेले सत्य समजून त्यावर तुम्ही अचूकपणे उभारणी करू शकाल. त्यामुळे तुम्ही  “सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागाल, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्याल  आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी होईल” (कलसै१:१०)

तुमची अद्भुत स्मरणशक्ती

तुमची स्मरणशक्ती अद्भुत आहे. जे तुम्ही मनात म्हणत असाल “माझी तर नाही,” कारण तुमची स्मरणशक्ती कमी असेल तर तुम्हाला त्याची  जरा जास्तच जाणीव असेल . आणि तुम्ही ज्यांची स्मरणशक्ती तीव्र आहे त्यांच्याशी स्वत:ची तुलना करत असाल. पण त्यामुळे देवाने तुम्हाला दिलेल्या या अद्भुत देणगीबद्दल अंध असू नका. स्मृतीचे एक काम म्हणजे  माहिती साठवून ती तुमच्या जागरूक मनात पुढे आणणे. पण यापेक्षा ती अजून बरेच काही करते.

तुमची स्मृती हे एक अफाट वाचनालय आहे. येथे तुम्ही जन्मापासून माहिती गोळा करत असता, तुमच्या कवटीमध्ये असलेल्या त्या तीन पौंडाच्या गोळ्यात. ते कसे हे अजूनही मज्जाशास्त्र उलगडू पाहत असलेले कोडे आहे. ही माहिती स्पर्श, दृष्टी, आवाज, वास,  कार्यकारणभाव, विधाने, गोष्टी, स्वप्ने, तसेच खरे, आभासी, अपेक्षित अनुभव ज्यामुळे आनंद, दु:ख. सुख, राग, दहशत, इच्छा, भीती ई. द्वारे तुम्ही साठवली आहे.

आणि ती तुमच्या मनाच्या वाचनालयातून तुम्ही सतत, रोज, कळत, नकळत माहिती बाहेर काढत असता व ती जे काही तुम्ही करता त्यासाठी वापरता.

आणि ही स्मृती तुमच्या जाणिवांच्या सर्व स्तरांवर काम करत तुम्हाला कल्पना करण्यास वाव देते ही तर कमाल आहे.

तुम्हाला सर्व का समजते

आपल्या कल्पनेद्वारे – येथे मी मनात काल्पनिक विश्व निर्माण करण्यासंबंधी बोलत नाही. तर आपल्या मनात साठवलेल्या अफाट माहितीतून घेऊन वास्तवाचा एक नमुना तयार करून त्याच्या अर्थाद्वारे त्याचे परिणाम काढणे याबद्दल मी बोलत आहे. याद्वारे ज्या गोष्टी खऱ्या आहेत पण आपण पाहू शकत नाही त्यांची संकल्पना करायला आपल्याला वाव मिळतो. ज्या आपल्याला “दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावण्यापासून (२ करिंथ ४:१८), डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नाही तर विश्वासाने चालण्यासाठी (२ करिंथ ५:७) पाचारण आहे त्यांच्यासाठी हे फार  महत्त्वाचे आहे. आणि ह्यासाठी आपल्या क्षमतेला समर्थ करणारी बाब म्हणजे आपली स्मृती.

आपली स्मृती आपल्या कल्पनेला माहिती पुरवते आणि वास्तव काय आहे हे पारखून योग्य पडताळे काढण्यास मदत करते. आपल्या स्मृतीमध्ये काही निरर्थक आहे अशी कल्पनाही आपण करू शकत नाही.

यामुळेच बायबलच्या वचनांचे पाठांतर इतके महत्त्वाचे आहे.

‘तुम्ही आठवण ठेवा’

पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या लेखकांनी आठवणीला दिलेले महत्त्व तुम्ही कधी पाहिलेत? देव त्याच्या वचनाची आठवण करायला आपल्याला पुन्हा पुन्हा आज्ञा देतो. उदा. (निर्गम १५:४०; स्तोत्र १०३:१७,१८; यशया ४८: ८-११; लूक २२:१९; २ तीम २:८).

आठवण करणे म्हणजे आपण पूर्वी शिकलेले, जे आपल्या स्मृतीमध्ये आहे ते आपल्या मनापुढे आणणे. अशा प्रकारची आठवण आपल्याला विलापगीत ३:२१-२३ मध्ये दिसते. येथे लेखक भयंकर निराशेतून आणि छळातून जात होता. “हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.”

सत्य हे आहे की लेखकाने आठवणीतून बाहेर काढले आणि महान गरजेमध्ये त्या आठवणीने त्याला टिकवून ठेवले. हे तो गरज येण्यापूर्वी शिकला होता. आणि ते आता तो त्या क्षणी अगदी खोल रीतीने शिकत होता.

वचनाची आठवण म्हणजे: आपण शिकलेली बायबलमधील सत्ये मनात आणणे आणि मनात ठेवणे. यासाठी की वेळ जातो तसा त्याचा समज व आकलन आपल्या मनामध्ये खोल रुजते व वाढू लागते व त्यामुळे आपल्या आचरणाला आकार मिळू लागतो.

मननाचा दास

यामुळेच बायबल घोकंपट्टी बद्दल विशेष बोलत नाही तर मनन करण्याबद्दल खूप काही बोलते. कारण मननाद्वारे आपण शिकतो आणि आपल्या लक्षात राहते. बायबलवर मनन (अवलोकन, चिंतन, खोल विचार) हे केव्हा घडते? हे जेव्हा आपण देवप्रेरित सत्य त्याने दिलेल्या आपल्या स्मृतीमध्ये आपल्याला समजावे म्हणून साठवतो व समजून घेत राहतो तेव्हा. ही प्रक्रिया आपल्याला स्तोत्र ११९:९७-९९ या वचनातून दिसते. “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्‍यांपेक्षा अधिक सुज्ञ करतात; कारण त्या सदोदित माझ्याजवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे. कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो.

येथे आणि इतर वचनातून मननाची क्रिया ते पुन्हा पुन्हा करण्याने पूर्ण होते. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की पुनरावृत्तीनेच आपल्या दीर्घ स्मृतीमध्ये आपण माहिती साठवून ठेऊ शकतो. आणि यामुळेच पठण हे मोलवान आहे. – – ते मननाचा दास आहे.

हा माझा अनुभव आहे. काही इतर सरावही मला वचनांचे मनन करण्यास मदत करतात. एक पद्धत मला परिणामकारक वाटली ती म्हणजे तोच तोच भाग कित्येक दिवस पुन्हा पुन्हा वाचत राहणे. यामुळे तो भाग माझ्या दीर्घ स्मृतीमध्ये साठवला गेलाच तर त्यामुळे मला चिंतन करायला संधी दिली.
यामुळे मला त्या भागाचे खोल आणि मोलवान ज्ञान मिळाले. तसेच त्याचा संबंध बायबलच्या इतर भागाशी तसेच जगाशी कसा लागतो हे समजले. हा खूपच मोठा फायदा मला मिळाला. जरी मी पाठ केलेले बरेच भाग मला आता नीट आठवत नाहीत, तरी त्यावर मनन केल्यामुळे त्याचा अर्थ आणि लागूकरण यांनी माझ्या आकलनामध्ये घर केले आहे. आणि जेव्हा जेव्हा मला गरज असते तेव्हा मला त्यांची आठवण करून दिली जाते.

ध्येय मनात ठेवा

जर वचनांचे पाठांतर तुम्हाला नकोसे वाटत असेल तर ते वचनाचे  पठण करणे असे समजू नका.  तर असा विचार करा:

याचा अर्थ देवाचा श्वास फुंकलेले सत्य (२ तीम. ३:१६) आपल्या स्मरणात जमा करून ठेवणे. त्यामुळे  देवाने दिलेली तुमची  कल्पना त्यातून घेऊ शकेल व देवाने निर्माण केलेले  सत्य समजून त्यावर तुम्ही अचूकपणे उभारणी करू शकाल.

ही देवाची देणगी आहे, कृपादान आहे की देवाच्या वचनावर तुम्ही मनन करू शकता आणि वास्तव जीवनात आणू शकता.

माझे पाठांतर कमकुवत असल्याने मला वाटायचे की वचनांचे पाठांतर माझ्यासाठी नाही. पण आता मी ते करावे – विशेषत: मोठे परिच्छेद – असा आग्रह धरतो. हे तुम्ही खरंच करू शकता. मननाच्या ह्या गुणकारी दासाचा उपयोग केल्याने तुम्ही कधीच पस्तावणार नाही. कारण अचूक माहिती ही सत्याचे काळजीपूर्वक मनन केल्याने मिळते. आणि अचूक आकलनाचा परिणाम त्याचे जीवनात योग्य लागूकरण केल्याने मिळतो. आणि जेव्हा आपण अशा ज्ञानाने जीवन जगतो तेव्हा बायबल त्याला शहाणपण म्हणते (स्तोत्र ११:१०).

वचनाच्या पाठांतराचे हेच ध्येय आहे.

Previous Article

मी असले कृत्य करणार नाही

Next Article

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का?

You might be interested in …

आणखी एक नवे वर्ष दरवाजा ठोकत आहे

मार्शल सीगल ख्रिस्तजन्माच्या आनंदाचे इतक्या पटकन नव्या वर्षाच्या चिंतेत रूपांतर का होते? बहुधा याचे कारण असेल की ख्रिस्तजन्माचा जो आनंद वाटत होता तो ख्रिस्तामध्ये खोलवर रुजलेला नव्हता. ज्या वेळी आपण बक्षिसे वेष्टणात गुंडाळत होतो तेव्हा […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक ८ बायबलमधील करारांचा तपशीलवार अभ्यास देवाने केलेले करार त्याच्या राज्याच्या योजनेची उकलून सांगणारी साधने आहेत. करार म्हणजे दोन पक्षांनी अटी व नियमांनी मान्य केलेला, मोडता न येणारा जाहीरनामा असतो. पण […]

 स्तोत्र १३३ – उपासना (॥)

वर्षातून तीन वेळा देवाने नेमून दिलेल्या सणांसाठी सीयोन डोंगरावरील यरुशलेमातील मंदिरात जाहीर उपासनेसाठी एकत्र जमून डोंगर चढून जाताना उपासक जी स्तोत्रं आळीपाळीनं म्हणत चढण चढत असत; त्या १२० ते १३३ या पंधरा आरोहण स्तोत्रांच्या विषयांची […]