लेखक: रे ओर्टलंड

पालकांसाठी सर्वात अधिक वापरले जात असलेले नीतिसूत्रामधले वचन म्हणजे “मुलाने ज्या मार्गात चालावे त्यात त्याला लाव म्हणजे तो वृद्ध झाल्यावरही त्यापासून वळून जाणार नाही” (नीति. २२:६). हे महान सत्य आहे. पण नीतिसूत्रांचे पुस्तक पालकांना आणखी बरेच काही सांगते. नीतिसूत्रामध्ये अनेक खोल विचार मांडले आहेत जे आपल्या कुटुंबांना दु:खापासून वाचवतील आणि आनंद देतील. मुलाने कोणत्या मार्गाने जावे हे ती स्पष्ट दाखवतात.
देवाने जेव्हा जग निर्माण केले तेव्हा त्याला जो आनंद झाला तेथे आपल्याला नीति. ८ घेऊन जाते. येथे लेखक आपल्याला उत्पत्ती १:३१ कडे नेतो – “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” या वचनाकडे काळजीपूर्वक पाहा आणि मग नीति. ८:२२-३१ देव जो निर्माता याच्या आनंदाच्या दृष्टीने लिहिते. येथे ज्ञान हे जणू व्यक्ती होऊन विश्व घडवताना देवाचा जोडीदार म्हणून लिहिते.
“…तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे; त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.”
आता ही नीति. ८ मधली वचने पालकांना कशी मदत करतात? सर्व निर्मितीमध्ये जे उघड रहस्य आहे ते आपल्या कानाशी कुजबुजते. देवाचे आनंददायी ज्ञान मानवी जीवनाच्या व कौटुंबिक जीवनाच्या दररोजच्या साध्या वास्तवामध्ये दिसून येते. आपले मानसशास्त्र, नातेसंबंध, लैंगिकता, पैशाचे व्यवहार, अशा अनेक गोष्टींमध्ये देवाचे ज्ञानच त्याच्या गौरवासाठी अक्षरश: कार्य करते.
म्हणूनच पालक या नात्याने आपण देवाने निर्माण केलेल्या या चांगल्या जगात चालत असताना आपले प्राथमिक कार्य म्हणजे आपल्या मुलांना या प्रकाशाची जाणीव आणि होकारात्मक अपेक्षा देणे.
घर: मानवाने आनंदात राहण्याचे ठिकाण
देवाने आपल्याला जसे बनवले ते सत्य ख्रिस्ती पालक आंनदाने मान्य करतात. देवाने आपल्याला देवदूत न बनवता मानव बनवले यात त्याला दु:ख नाही. जेव्हा त्याने आपल्याला बनवले तेव्हा त्याने आनंद केला. अर्थातच आदामाच्या पतनाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. होय आपण पापी आहोत. पण कौटुंबिक जीवनात पाप नाही. – एकत्र बैठे खेळ खेळताना, फिरायला जाताना, घरची कामे करताना, झोपताना, काही तयार करताना. पतनाच्या या बाजूलाही “देवाने देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे” (१ तीम. ४:४). पालक नीतिसूत्रांतून सूचना मिळवून सत्यामध्ये आनंद घेतात आणि आपला आनंद ते मुलांना देतात. पालक या नात्याने देवाच्या वचनात दिलेले धोके सांगणे हेही आपले कर्तव्य नाही का? उदा.
“मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरला तर त्याची वस्त्रे जळणार नाहीत काय? कोणी निखार्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? जो कोणी आपल्या शेजार्याच्या स्त्रीशी गमन करतो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही” (नीति. ६:२७-२९).
पण हा धोका देवाने दिलेल्या लैंगिकतेविरुद्ध नाही. हा धोका देवाने दिलेल्या देणगीचे मूर्खपणाने उल्लंघन करण्याविरुद्ध आहे. काही पालकांना आपली मुले पाप करतील याची इतकी भीती वाटते की ते त्यांचे घर सावधानतेने व्यापून टाकतात. ते मुलांना अशी कल्पना देतात की आपण निर्मित असल्याने देवाला कधीही मान्य होणार नाहीत. असे पालक प्रामाणिकपणे मुलांवर प्रेम करतात पण त्यांच्या कोत्या मानसिकतेने देवाच्या जीवनाला पुष्टी देणाऱ्या चांगुलतेला बाधा आणतात. यामुळे पुढे नकळतपणे त्यांच्या मुलांना ढोंगी बनण्यास प्रवृत्त करतात.
पण नीति. ८:२२-३१ चा दृष्टिकोन किती वेगळा आहे! देवाने आपली सदसद्विवेकबुद्धी मुक्त केल्याने मिळणारा आनंद पुढील उदाहरणात दिसून येईल. चार्ल्स स्पर्जन त्यांच्या अमेरिकेच्या भेटीत थिओडर क्युलर या पाळकांना भेटले. संपूर्ण दिवस अथक परिश्रम व गहन चर्चा केल्यानंतर देवाचे हे दोन महान पुरुष एका गावात सुट्टीला गेले. शाळा सुटल्यावर जशी मुले हुंदडतात तशा उत्साहाने ते गावाच्या रानमाळातून फिरू लागले – हसत, गप्पा मारत! डॉ. क्युलरनी एक गोष्ट सांगितली आणि स्पर्जन मोठमोठ्याने हसू लागले. मग ते अचानक डॉ. क्युलरकडे वळले आणि म्हणाले, “थिओडोर, चला, आपण गुडघे टेकून हास्याबद्दल देवाची स्तुती करू या” आणि तेथे त्या हिरवळीच्या गालिच्यावर झाडाखाली जगातील या दोन महान पुरुषांनी गुडघे टेकले आणि त्यांच्या प्रिय देवाने त्यांना हास्याची आनंदी देणगी दिल्याबद्दल त्याचे उपकार मानले.
तुमच्या मुलांनी तुम्हाला या हास्याच्या आनंदी देणगीबद्दल उपकार मानल्याचे कधी ऐकले आहे का? जर नसेल तर का नाही? खिन्न घरामध्ये देवाचे ज्ञान कोठे आहे? येशूवरील विश्वासाने तुम्ही देवाने तुम्हाला जसे निर्माण केले आहे ते स्वीकारले आहे का – एक मानव, सामाजिक व्यक्ती, खाणारी, काम करणारी, मुलांचे संगोपन करणारी व्यक्ती म्हणून? जर नाही तर देवाच्या वचनाला अधीन होऊन आता तुम्ही ते करू शकता. आता सुरुवात करून तुम्ही तुमच्या घरामध्ये आनंद आणू शकता.
घर: देवाचा चांगुलपणा अनुभवण्याचे ठिकाण
मी वाढत असताना देवाने मला ज्ञानाने भरलेले असे घर दिले. उदा. जेव्हा माझे वडील घरी येत तेव्हा संध्याकाळ झालेली असे. ते नेहमी याच गोष्टी करत. प्रथम ते माझ्या आईकडे जात व तिला जवळ घेत. मग ते माझ्याकडे वळत आणि म्हणत, “चल आता कुस्ती करू या.” मग आम्ही दिवाणखाण्यात जात असू, कुस्ती करत असू, गुदगुल्या करत असू आणि खूप हसत खेळत असू. माझ्या वडिलांचा जीवनासाठी नीति. ८चा दृष्टिकोन होता. त्याच्या सौंदर्याचा मी कधीच प्रतिकार करू शकलो नाही.
जेव्हा मी व माझ्या पत्नीने पालक म्हणून आमच्या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आम्ही स्वत:ला एक प्रश्न विचारला तो असा: अंतिम सत्य काय आहे? आणि यावर विचार करताना मोशेची प्रार्थना आम्हाला आठवली “कृपा करून मला तुझे गौरव दाखव.” आणि देव म्हणाला, “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन” (निर्गम ३३:१८-१९). मग आम्ही विचार केला; “बरंय तर, अंतिम सत्य म्हणजे देवाचा वैभवी चांगुलपणा”!
मग आम्ही आमचे घर तयार करू लागलो – आमच्या मुलांना देवाचा वैभवी चांगुलपणा देणारा एक छोटा अनुभव. आमचे घर मुलांना देवावर प्रीती करण्यास सुलभ व्हावे अशी आमची इच्छा होती. आम्ही आमच्या घराची अशी रचना केली की तो एक होकारार्थी, मानवी, देवाच्या वास्तव्याचा अनुभव असावा. त्यामध्ये सौम्यता, प्रामाणिकपणा, प्रार्थना, बायबलमधल्या गोष्टी, गमती जमती, पोषक अन्न, चांगली पुस्तके, इत्यादींचा समावेश होता. ह्या घर बनवणाऱ्या स्पष्ट मूलभूत गोष्टी आहेत जेथे मुलांना देवाच्या चांगुलपणाची जाणीव होते.
घर: आपला उच्च आनंद गाठण्याचे ठिकाण
मूर्खतेने मुभा देणारे पालकत्व अशी एखादी गोष्ट आहे का? नक्कीच. आपल्यातील काहींचा कणा जरा कणखर असण्याची गरज असते ज्यामुळे आपण मुलांना “नाही” म्हणू शकू. आणि जेव्हा ते उलट उत्तर देतात की “पण चर्चमधल्या इतर घरांत हे चालते की” मग आम्ही म्हणतो, “पण आपण ती दुसरी घरे नाहीत. आपण ओर्टलंड आहोत आणि आपण ते करत नाहीत.”
पण मूर्खतेने बंधन घालणारे पालकत्व अशीही गोष्ट आहे. आणि आपल्यातले काही जे देवाशी प्रामाणिक असतात, गंभीर वृत्तीचे व सदसद्विवेकबुद्धीशी प्रामाणिक असतात त्या आपली अशी बायबलला धरून नसलेली कोती वृत्ती असू शकते.
पण त्यामुळे आपण मुलांमध्ये जे करू इच्छितो त्याविरुध्द निर्माण केले जाते. जेव्हा ते मोठे होऊन स्वत:साठी विचार करू लागतील, आणि देवाच्या निर्मितीचा अनुभव घेण्यास सुरुवात करतील तेव्हा ते विचार करतील, जरा थांब, आईबाबांनी मला या गोष्टींपासून दूर राहायला सांगितले होते. पण यात तर काही चूक नाही. मग त्यांनी मला चुकीचे मार्गदर्शन कसे केले?
सुज्ञ पालक देवाच्या वैभवी चांगुलपणामध्ये आनंद करतात जो सर्व निर्मितीमध्ये प्रकट होतो. हे करत असताना तो आपल्याला धोक्याच्या सूचनाही देतो. पण ह्यामध्ये एखाद्या गोष्टीचा मथळा आणि दुसरा परिच्छेद यामध्ये जितका फरक असतो त्याप्रमाणे आहे. त्यातला क्रम आणि दिलेला भर यामध्ये आपण गल्लत करू नये. तुमच्या मुलांना देवाच्या जगामध्ये निरोगी परिचय हवा. इतकेच नाही तर देव हा गौरवाला पात्र आहे आणि तुमची मुले या महान दात्याच्या असंख्य चांगल्या गोष्टींमध्ये इथे आणि नंतर आनंद घेत राहतील यावर भर द्यावा.
पापाविरुद्ध संरक्षण मिळावे यापेक्षा तुमच्या मुलांना आणखी काही हवे आहे. त्यांना देवाकडे जाण्याची प्रेरणा मिळायला हवी. त्यांना नीति. ८ मध्ये दिलेली हमी, त्याचे जीवनभर मिळणारे आनंददायी ज्ञान आत्मविश्वासाने सांगा.
ते तुमच्या घरातील मुल्यांद्वारे सिध्द करा की देव चांगला आहे. त्यांना तुमचा विश्वास दिसू द्या आणि मग देवाच्या गौरवाला प्रतिकार करणे त्यांना कठीण जाईल.
Social