दिसम्बर 26, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जर आपण प्रीती केली नाही तर आपण टिकणार नाही

जॉन ब्लूम

“वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक” (रोम. १२:२१).

जेव्हा पौलाने हे शब्द रोम मधील एका छोट्या मंडळीला लिहिले तेव्हा तो एका साधुसंताचा सल्ला देत नव्हता. किंवा त्यांना प्रेरणा देऊन त्यांनी गाठावे म्हणून एक मोठे विधान करत नव्हता. हे शब्द आध्यात्मिक युद्धाच्या खोऱ्यातून रक्ताने आणि अश्रूंनी  डागाळलेले असे आले होते. पौल या मंडळीतील मोलवान संतांना या दुष्ट जगात कसे जिवंत राहावे हे सांगत होता. कारण मंडळीने जर बऱ्याने वाईटाला जिंकले नाही तर ती जगू शकणार नाही.

हे मी माझ्या वैयक्तिक दु:खामुळे लिहीत आहे. गेल्या काही वर्षात मी पाहिले की ज्या चर्चेसवर मी मनापासून प्रेम करत होतो त्यांच्यामध्ये दुफळ्या माजल्या व फुटीही पडल्या. आणि त्यांच्यामध्ये काही सैंधातिक मतभेद किंवा अनैतिकता होती असेही नाही तर एकमेकांविरुद्धचे साधे गुन्हे. दीर्घकाळचे मित्र एकमेकांवरचा विश्वास गमावल्याने आता एकमेकांशी सहभागिता ठेवीनात. काही गट इतरांपेक्षा जास्त जबाबदार असतात. पण ह्रदयद्रावक परिणाम असा की एकेकाळी उत्साहपूर्ण असणारे भक्तिगट फुटले गेले  आहेत. काही वेळा उरलेल्या लोकांना त्या ढिगाऱ्यातून काहीतरी बांधायची खटपट करायला एकटे टाकून.

आणि सर्वात दु:खाची बाब मला वाटते ती ही की, येशूने म्हटले “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात” (योहान १३:३५). अशा ह्या फुटी येशूच्या प्रीतीबद्दल काय सांगतात?  त्याच्या शिष्यांबद्दल काय सांगतात?

अशा फुटी घडायला नको होत्या. पण त्या एक नमवणारे सत्य सांगतात: जर आपण एकमेकांवर बऱ्याने वाईटाला जिंकणारी प्रीती केली नाही तर आपल्यावर दुष्ट मात करील. पौलाने रोम १२ मध्ये एकमेकांवर जोमदार कृपेने कशी प्रीती करावी ह्याबद्दल दिलेल्या सूचना मंडळ्यांना टिकून राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

जगातील सर्वात शक्तिमान सामर्थ्य

ख्रिस्ती या नात्याने आपल्याला ठाऊक आहे की प्रीती हा सर्व भावनांचा राजा आहे आणि सर्व गुणांची राणी आहे. ती स्वत:च एक गट आहे. प्रत्येक धार्मिक भावना व गुण हा देवाचा स्वभाव असला तरी प्रीती ही देवाच्या  पवित्र गाभ्याचे केंद्र आहे. असे म्हटले आहे : “देव प्रीती आहे” (१ योहान ४:८,१६).

शास्त्रलेखांतून प्रीतीचे अतुलनीय सामर्थ्य आपल्याला माहीत आहे. ते सर्व नियम आणि संदेष्टे यापलीकडे जाते (मत्तय २२:३७-४०). आणि मानवी इतिहासातील सर्वात शक्तिशाली कृतीच्या केंद्रस्थानी प्रीतीच होती: येशूचे वधस्तंभावरचे मरण. प्रीतीमुळे पित्याने आपला एकुलता एक पुत्र दिला (योहान ३:१६). आणि प्रीतीमुळे पुत्राने देवाच्या गौरवासाठी आपल्या मित्रांकरिता आपला प्राण दिला (योहान १५:१३; १७:४).

आणि आपल्याला माहीत आहे की या अत्युच्च प्रीतीने हरवलेल्या लोकांचा केवळ उद्धार करण्यापेक्षा अधिक काही केले. ती कधी झाली नाही अशी सर्वात सामर्थ्यवान आध्यात्मिक युद्धाची कृती होती. कारण त्याद्वारेच येशूने द्वेषाने भरलेल्या या जगावर विजय मिळवला (योहान १६:३३). आणि सैतान व त्याच्या दुष्ट राज्याच्या अंतिम नाशाला चालना दिली (१ योहान ३:८).

यामुळे देवाला प्रीतीमुळेच गौरव आणि आनंद दिला जातो. नैतिकतेत सुंदर, अत्यंत अर्थपूर्ण, आणि मानवामध्ये आनंद निर्माण करणारे प्रीतीसारखे दुसरे काहीही नाही. आणि अंधाराच्या सत्येचा अपमान करणारे, तिच्यासाठी  हिंसक आणि नाशकारी प्रीतीशिवाय दुसरे काहीही नाही.

हे आपल्याला ठाऊक आहे

येशूने म्हटल्याप्रमाणे, “जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात” (योहान १३:१७). फक्त माहीत असणे पुरे नाही. कारण प्रीतीचा सर्व आशीर्वाद प्रीती करण्यात आहे. जर आपण प्रीतीपासून पुढे जात  नाही तर आपण काहीच नाही आणि आपल्याला काही फायदा नाही (१ करिंथ १३:१-३). पण इतकेच नाही तर आपण आपल्या मंडळ्यांमध्ये मोठी हानी करू शकतो.

जोमदार कृपेने प्रीती करा

अशी हानी पौलाने प्रत्यक्ष पाहिली होती. त्याने त्यासाठी दु:ख केले होते. यामुळे रोमकरांस पत्रात दिलेल्या या सूचनांमध्ये एक तातडी आहे – आज हे वाचत असताना त्याच  तातडीने आपल्या मंडळ्या भरून जाव्या अशी पवित्र आत्म्याची इच्छा आहे. पौलाद्वारे पवित्र आत्माची इच्छा आहे की आपण एकमेकांवर जोमदार कृपेने प्रीती करावी.

याला मी “जोमदार कृपा” असे दोन कारणांनी म्हणतो. पहिले म्हणजे आपण एकमेकांवर प्रीती आपल्या लायकीनुसार करायची नाही तर येशूने जशी प्रीती केली तशी प्रीती करायची आहे. – एका धक्कादायक कृपामय प्रीतीने (योहान १५:१२). ती जोमदार कृपा आहे याचे दुसरे कारण म्हणजे ती आग्रह करणारी, चिकाटीची, स्वार्थाला मारून टाकणारी, जिंकणारी प्रीती आहे. अशा प्रकारची प्रीती ही दुसर्‍या जगाची आहे, या पृथ्वीवर ती स्वर्गाची चव देते.

ती कशी दिसते

आपली एकमेकांवरची प्रीती कशी वाटावी व दिसावी याबद्दल पौल काय सांगतो ते ऐका.

“प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा; बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना” (रोम १२:९-१०).

लवकरच आपल्याला समजून येते की अशी प्रीती करण्यास कशाची गरज आहे. कारण आपण सर्वच त्यात अडखळतो “कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो” (याकोब ३:२). याचा अर्थ आपण पुन्हा पुन्हा एकमेकांचा अपराध करतो. खऱ्या अंत:करणाने प्रीती करायला चिकाटीचा दयाळूपणा लागतो.


“तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना” (रोम १२:१०).
येथला  “आपल्यापेक्षा” हा शब्द पाहा. समजून घ्या की अशा मंडळीची संस्कृती एका निरोगी नम्रतेने दिसून येते की ती इतरांना स्वत:पेक्षा अधिक महत्त्वाचे मानते. आणि त्याद्वारे स्वार्थी आकांक्षा आणि फसवेपणा हा पापाचा रोग काबूत ठेवला जातो (फिली.२:३).

आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा” (रोम १२:१५).
आपल्यामधल्या वसणाऱ्या पापाच्या प्रभावामुळे ह्या आज्ञेचे पालन करणे किती मोठे आव्हान आहे हे आपल्याला समजते. पण जर कोणाकडून अशी प्रीती आपल्याला मिळत असेल तर ते किती आशीर्वादाचे आहे हेही आपल्याला समजते.

“स्वत:ला शहाणे समजू नका” (रोम १२:१६).
जितके गंभीरतेने हे आपण घेऊ तितके काळजीपूर्वक आपण दुसऱ्यांचे ऐकू व त्यांना प्रतिसाद देऊ. केवळ यामुळेच आपल्या परस्परसंबंधातले कितीतरी झगडे टाळले जातील. पण आपण शहाणे आहोत व आपल्याला मार्गदर्शनाची गरज नाही या आपल्याला बांधून ठेवणाऱ्या कल्पनेला मरणे फार कठीण जाते.

“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा” (रोम १२:१७).
यामागे सूचित केले जाते की आपण पापीपणाने एकमेकांना इजा करणार आहोत. आणि आपणा सर्वांना माहीत आहे की त्याची परतफेड पापाने न करण्यासाठी आपल्याला खंबीर आत्मनियंत्रणाची गरज आहे.
–  यामागे प्रीती हे जाणीवपूर्वक करावे अशी अपेक्षा करते.

“शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा” (रोम १२:१८).
साधेल तर म्हणजे कोठपर्यंत ? ह्याचे उत्तर कठीण आहे. पण जर आपल्याला  प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा (कलसै ३:१३) हे समजले तर याचा अर्थ आपल्याला वाटते त्यापेक्षा बरेच पुढे.

बऱ्याने वाईटाला जिंक

हा अध्याय पौल १२:२१ ने संपवतो. “वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक.”

हे प्रत्येक मंडळीसाठी हे उच्च पाचारण आहे. आणि हे कठीण आहे हे नक्कीच. कारण “जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे” (मत्तय ७:१४). आपण आपला स्वनाकार करून आपला वधस्तंभ घेऊन आपल्या प्रभूला अनुसरावे अशी अपेक्षा ते करते (मत्तय १६:२४).

जर आपण बऱ्याने वाईटाला जिंकले नाही तर परिणाम गंभीर आहेत. जर येशूने आपल्यावर केली तशी प्रीती जर आपण एकमेकांवर केली नाही तर आपण जास्त काळ एकत्र टिकणार नाही. सैतानाच्या शक्तीला हे माहीत आहे. आणि आपले जळते बाण ते धोरणाने सोडत असतात. यामुळेच अनेक मंडळ्यांचा अंत अंतर्गत भांडणामुळे होतो, बाहेरून होणाऱ्या छळामुळे नाही. यामुळेच एकेकाळी दृढ असणाऱ्या मंडळ्यांची शकले पडतात.

असे होण्याची गरज नाही. आपल्या मंडळीचे अस्तित्व आपण तिचे सभासद येशूपासून आलेल्या जोमदार कृपेने आपण एकमेकांवर प्रीती करतो की नाही यावर अवलंबून आहे. या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण फक्त माहीत असणे पुरेसे नाही. जर आपण तसे करतो तरच आपण आशीर्वादित होतो.

Previous Article

तुम्ही कोठेही असा ख्रिस्त तुमचा होऊ शकतो

Next Article

तुम्ही सुखी असल्याचे ढोंग करीत आहात का?

You might be interested in …

ख्रिस्ती लोक कोणत्या गोष्टी करू शकत नाहीत?

लेखक: टीम चॅलीस आमचे संभाषण चालले असताना एकजण म्हणाला, “ख्रिस्ती जन द्वेष बाळगू शकतच नाहीत.” याला पर्याय नाही. हा दुर्गुण आपण चालवून घेऊ शकतच नाही .पण ख्रिस्ती लोक करू न शकणारी ही एकच गोष्ट नाही. […]

फ्रान्सिस झेवियर

इ.स. १५०६ ते १५५२ प्रकरण ६  आधुनिक काळात स्थापन झालेल्या मिशनांपूर्वी आलेल्या मिशनरींपैकी ज्यांची छाप भारतातील ख्रिस्ती जगतावर पडली अशा दोन व्यक्तींची नावे घेतली जातात. प्रेषित थोमा आणि सोळाव्या शतकातील फ्रान्सिस झेवियर, थोमाला ‘भारताचा प्रेषित’ […]

या ख्रिस्तजन्मदिनी तुमच्या मुलांना पुढील पाच गोष्टी शिकवा

ख्रिस्टीना फॉक्स मम्मी, ह्या ख्रिसमसला मी घराचे डेकोरेशन करणार.” सणाचा वेळ आता परत आलाय. दुकाने लाल आणि हिरव्या रंगांनी सजवलेली आहेत. रस्ते, फेसबुक, इमेल जाहिरातींनी भरून गेलेली दिसतात. मुलांच्या डोळ्यांसमोर मात्र सुंदर वेष्टणात गुंडाळलेले बॉक्सेस […]