नवम्बर 23, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

चिडचिड? विसरून जा

स्कॉट स्मिथ


देवाने आपल्यासाठी येशूमध्ये  भरभरून केलेल्या, अढळ, न संपणाऱ्या प्रीतीची आठवण जितकी मी अधिक करतो तितके मी इतरांवर चिडण्याचे विसरून जातो.

दुर्दैवाने चिडचिड करावी असे मी स्वत:ला सांगतो. पण जिथे मी कमकुवत आहे तेथे देव त्याच्या कृपेने मी काय विसरायला हवे याची मला आठवण करून देतो.

कोणत्याही दिवशी, तासाला, क्षणाला आपले वैचारिक जीवन हे आपल्या ह्रदयाची प्रतिक्रिया काय आहे हे दाखवून देते (जे आपल्या शब्दातून व कृतीद्वारे बाहेर पडते). या विस्कळीत जगात, भग्न झालेल्या लोकांमध्ये, एक भग्न ह्रदयी व्यक्ती म्हणून जगत असताना अशी चिथावणी टाळणे हे अशक्य असते.
आपण टाळतो ती गोष्ट म्हणजे देवभिरू प्रतिसाद. “मूर्खाची तळमळ तत्काळ कळते” (नीती १२:१६). “मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो” (उपदेशक ७:९).

राग हा मूर्खाच्या ह्रदयात घर करून असतो. पवित्र आत्म्याने  हे वाक्य मला पाप दाखवून देण्यासाठी वापरले. त्यावेळी मी ज्या पद्धतीने पाहुणचारासाठी चादर अंथरत होतो, बिछाना तयार करत होतो, ते माझ्या विचाराला खाद्य पुरवत होते की येणारे पाहुणे स्वागत करण्यास इष्ट नाहीत.

चिडचिड करण्याविरुद्ध शस्त्रे

मी काही मोठ्याने ओरडत नाही, हातपाय आपटत नाही, भडकत नाही. पण मी सहज वाहवत जाऊ शकतो. कशामध्ये तर थंड दडपशाहीत, इजा करण्यात, आनंदावर पाणी ओतणे अशा वृत्तींमध्ये.
या वृत्तीचा उगम शोधला तर तो नक्कीच सुवार्ता विसरण्याकडे लावला जातो. मला असे म्हणायचे की जीवनाच्या कोणत्याही वेळी (क्षणी) मी एकतर सुवार्तेची आठवण करत तिच्या परिणामांमध्ये मुरत असतो किंवा सुवार्ता विसरून माझे विचार सर्व प्रकारच्या मूर्खतेला व पापाला अपहरण करू देतो.

करिंथकरांना लिहिताना पौलाने ही प्रक्रिया युध्दाची भाषा वापरून वर्णन केली आहे:
“कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो” (२ करिंथ १०: ४-५).

एकमेकांच्या आनंदासाठी प्रयत्न करीत राहणे (२ करिंथ १:२४) हे एकमेकांच्या भावना व विचार यांच्यासाठी लढा देणे आहे हे नक्कीच.
२ करिंथ १०:४-५  हा परिच्छेद माझ्या दररोजच्या वृत्तींशी, विशेषतः चिडचिड व तिची कुरूप भावंडे (रागाला आणणे, रुसून बसणे, स्वत:ची कीव करणे, नाखुशी इ.). यांना  कसा लावावा हे मी शकलो ते असे:
या परिच्छेदातील तीन घटक लक्षात घ्या. तटबंदीचे नाव ओळखा, तर्कवितर्क पाडून टाका, विचार अंकित करा.

तटबंदीचे नाव ओळखा

जर वाईट वृत्ती ह्या केवळ “छे” “बापरे” एवढेच क्षण असते तर बरे झाले असते; पण त्या तटबंदी आहेत. सत्य हे आहे की वाईट वृत्ती हे दाखवून देतात की कोणाला किंवा कशाला तरी तुमच्या ह्रदयावर देवाच्या गौरवापेक्षा आणि कृपेपेक्षा जास्त सामर्थ्य आहे. ह्याला कोणी म्हटले आहे की स्वत:च्या पूजेचे प्रदर्शन.

कोणत्या गोष्टी मला चिडीला आणतात? पौलाने गलतीकरांना जो प्रश्न विचारला तोच माझी ४६ वर्षे जोडीदारीण असलेली पत्नी मला कशी विचारते. “तुमचा आनंद कोठे गेला?” (गलती ४:१५). ही यादी फार सन्मान्य नाही म्हणून येथे नितळता हवी आणि स्वत:ला दुखवून घ्यायला तयार असले पाहिजे.

इंटरनेटचे चक्र फिरतच राहते व मला चिडवते, “अजून इथेच थांब.”
माझ्या रोजच्या मार्गावरील रस्तेदुरुस्ती मुळे माझा दिनक्रम वेळेवर पार पडू शकत नाही.
फ्रीजमधले टमाटे ऐन वेळी संपलेले असतात,
बाहेर जेवायला गेले तर मोठमोठ्याने दंगा करून बोलणारे लोक,
स्कूटरचे चाक पंक्चर होते,
पासवर्ड आठवत नाही,
नावे ठेवणारे अनेक जण,
चुकीने वस्तू जागच्या जागी न ठेवल्याने होणारा गोंधळ.

तुम्हाला डिवचणाऱ्या  गोष्टींची यादी काय आहे ? त्यावर नेमके बोट ठेवल्यास तुमच्या फायद्याचे होईल.

तर्कवितर्क पाडून टाका

तर ह्या भग्न जगातील  साध्या रोजच्या जीवनातील गोष्टी इतकी मोठ्या प्रमाणात चिडचिड कशी निर्माण करू शकतात? त्या वेळी मी कशाची आठवण करत होतो? माझा काय विश्वास होता? आपल्या परिच्छेदात पाहा, पौल म्हणतो काही मते, तर्कवितर्क बाहेर काढून नष्ट करायला हवीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे नाही किंवा त्यांना कुरवाळत बसायचे नाही.

ह्या सन्दर्भामध्ये पौल करिंथ येथील मंडळीत शिरलेल्या खोट्या शिक्षकांबद्दल बोलत आहे. पण जे विचार सुवार्तेला धरून नाहीत ते सर्व याच निवाड्याखाली येतात. मी असा विचार करत होतो की माझे जीवन विना-अडथळ्याचे, शांतपणाचे, व्यवस्थितपणे जगण्यासाठी मी हक्क मिळवला आहे. जर लोकांनी आपापले काम केले आणि जरा जबाबदारीने वागले तर माझे जीवन जगणे मला सोपे जाईल. जेव्हा मी माझ्या योजना, निवडी करतो तेव्हा  पतनाचे परिणाम मी लक्षात घेत नाही.
याचा अर्थ मी एक आध्यात्मिक अनाथ व्यक्ती; सार्वभौम स्वर्गीय बापाशिवाय जगतोय.
तुमची अशी व्यावहारिक यादी काय आहे? ती नक्की नाव देऊन स्पष्ट लिहिली तर तुम्हाला मदत होईल.

विचारांना/कल्पनांना अंकित करा

जेव्हा मी चिडखोर होतो तेव्हा मी काय विसरतो किंवा विश्वास ठेवण्याचे नाकारतो? ह्या परिच्छेदामध्ये आपल्या विचारांनी येशूची आज्ञा कशी पाळावी याबद्दल पौल ज्या मुख्य गोष्टीवर भर देत  आहे ती पाहा – ती म्हणजे आपले वैचारिक जीवन येशूने काबीज करून जिंकावे.

आपण जोपर्यंत येशूची आठवण करतो तोपर्यंत आपण चिडचिड करण्याचे विसरून जाऊ. आपल्याला मुख्य पाचारण आहे ते येशूची “आठवण” करण्याचे, त्याच्याशी पुन्हा जोडले जाऊन तसेच जोडलेले राहण्याचे. जे आपण येशूशी एक झालेलो आहोत त्या आपण त्याच्या सहभागितेत राहायला हवे.

याला माझे आध्यात्मिक बाबा जॅक मिलर म्हणायचे ही तुमच्या ह्रदयाला सुवार्ता सांगत राहण्याची शिस्त आहे. याचा अर्थ येशू ही व्यक्ती व तिचे कार्य याबद्दल चित्त केंद्रित करणे व आकर्षित होत राहणे.
हे भौतिक विरुद्ध वैचारिक नाही. तर सर्व गोष्टींच्यावर येशू – निर्माता आणि संरक्षक, देवाचा कोकरा, प्रभूंचा प्रभू, नगराचा दिवा. हे सकारात्मक विचाराचे सामर्थ्य नव्हे. तर त्याच्यावर लक्ष केंद्रित केल्याने मिळणारा आनंद आहे – जो विश्वासाचा उत्पादक व  पूर्ण करणारा येशू त्याला पाहत राहून त्याची रुची घेत राहणे. हे वेदना नाकारणे नाही तर प्रभूमध्ये खूप आनंद  सुख घेणे आहे. ते वादळाची गैरहजेरी नाही तर वादळामध्ये येशूची उपस्थिती आहे. हे स्थितप्रज्ञ राहण्याचा निर्णय नाही तर कृतज्ञतेची भक्ती आहे. सुवार्ता ही आपल्याला कमी मानवी किंवा सुपरमॅन बनवत नाही तर पूर्णपणे मानव बनवते.

आपले अंतिम ध्येय कमी चिडखोर बनणे नसून येशूसारखे अधिक बनावे हे आहे. हे चांगले बनण्याचे अभिवचन नाही तर ताबडतोब पश्चात्ताप करण्यासाठी समर्पण आहे. जितके आपण येशूची अधिक आठवण करू तितके आपले पश्चात्ताप कमी होणार नाहीत तर अधिक पटकन आणि अधिक आनंदाचे  होतील.

जेव्हा तुम्हाला चिडण्याचा मोह येतो तेव्हा येशूबद्दल तुम्ही काय आठवण करावी?
पुन्हा एकदा वरील सत्यांची मनात उजळणी करा म्हणजे तुम्हाला मदत होईल.
जर तुम्ही माझ्यासारखे या  पापमय चिडखोरपणाशी झगडत असाल  तर या मतांच्या – तर्कवितर्कच्या  मूर्ती फोडून टाका आणि येशूविषयीचे विचार पुन्हा कब्जात घ्या. तुम्ही काय विसरावे अशी देवाची इच्छा आहे हे त्याला विचारा आणि मग तुम्ही काय आठवावे हे त्याने दाखवावे म्हणून त्याला विनंती करा.

Previous Article

पालकांचा आदर आणि सन्मान

Next Article

क्षमा करणे हे आध्यात्मिक युद्ध आहे

You might be interested in …

फार जोराने धावण्यापासून सावध राहा

जॉनी एरिक्सन टाडा जेव्हा मी ३० वर्षांची होते तेव्हा माझ्या जॉनी ह्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभली होती. जॉनी हा चित्रपट राष्ट्रभर गाजत होता आणि मी कॅलिफोर्निया येथे जॉनी अॅंड फ्रेंड्स ही संस्था स्थापण्यास स्थलांतर केले. […]

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का? लेखक : ट्रेवीस मायर्स

गेल्या वर्षी मला एक हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये रसग्रंथीचा कॅन्सरच्या गाठींमध्ये बदल होतो. तसे अनेक प्रकारचे लिम्फोमा आहेत, या प्रकारचा कॅन्सर अमेरिकेत प्रौढ लोकांना होणाऱ्या लिम्फोमात सातव्या क्रमांकावर आहे. […]

प्रभू काहीही कर पण मला शिस्त लाव

जॉन ब्लूम .  जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखी माझी बुद्धी असे, आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत ( १ करिंथ १३:११). याचा अर्थ; […]