जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

दररोजच्या निर्णयांमध्ये देव कसे चालवतो?

जॉन पायपर


माझ्या दररोजच्या निर्णयांमध्ये देवाच्या मार्गदर्शनाला मी कसे अनुसरावे? तो माझा मेंढपाळ आहे हे मला ठाऊक आहे. तो मला चालवतो. पण मी त्याच्या मागेच जातोय हे मला कसे समजते?

ह्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वांनीच द्यायला हवे. त्यावेळी मी एक नुकतेच पाळकपण स्वीकारलेला तरुण होतो. आणि तेव्हा माझ्या आवडत्या स्तोत्रातून मी उपदेश केला. ते होते स्तोत्र २३. “ परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो (स्तोत्र २३:१-३).

या स्तोत्राच्या ओळी जेव्हा मी प्रथमच पाहिल्या तेव्हा मी २२ वर्षांचा होतो. पण पाहणे हे पाहणेच असते. वचन ३ म्हणते, “ तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.” मी सेमिनरीमध्ये जाऊपर्यंत “आपल्या नावासाठी” हे वाक्य पाहिलेच नव्हते. होय मी ते पाहिले होते, ते शब्द वाचले होते, पण बायबलमधली विधाने तुम्ही शंभर वेळा वाचली असली तरी त्याच्या खर्‍या अर्थाने ती तुमच्यावर आघात करत नाहीत.

पाहण्याकरता माझे डोळे उघड

मिसेस ब्रोमग्रेन हिच्या सर्जरीपूर्वी मी तिला भेटायला गेलो होतो. तिच्या डोळ्याचे ऑपरेशन होते व तिच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती. मी तिला स्तोत्र ११९ मधील १७ व १८ वे वचन वाचून दाखवले. “आपल्या दासाला औदार्य दाखव, म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन. तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील”

आणि मी म्हटले, दोन चांगले डोळे असण्याची  सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे बायबल वाचता येते हीच नाही का? पण त्याहून सत्य गोष्ट म्हणजे देवाने आपल्याला आणखी दोन डोळे दिले आहेत. प्रेषित पौल त्याला अंत:करणाचे डोळे म्हणतो आणि ते उघडले जावे अशी इफिस १ मध्ये तो प्रार्थना करतो. मला वाटते स्तोत्र ११९ मध्ये तेच म्हटले आहे. “तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील”

तर स्तोत्र २३ मधील ते विधान इतके अद्भुत असे मी पहिले नव्हते. तुम्हाला कल्पना नसेल इतका मी त्यासाठी बहिरा होतो. पण ते तिथे होते. “तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो”  मी लहान मुलगा असल्यापासून देव मला योग्य गोष्टी करायला भाग पाडत असेल हा विचारच मला कधी शिवला नव्हता. मी शंभर वेळा वाचले होते तरी त्याचा स्पर्शही मला झाला नव्हता. तेव्हा आपण “तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो” या विधानाकडे पाहू या आणि देव हे कसे करतो ते त्याला विचारू या.

देव आपल्या मार्गावर कसा प्रकाश टाकतो?

अर्थातच हे मेंढपाळाचे चित्र आहे की तो आपल्या मेंढरांना चालवत आहे. पण जेव्हा मेंढरे आणि मेंढपाळ या  रूपकाच्या बाहेर आपण आपल्या अनुभवामध्ये जातो आणि विचारतो “देव आपल्याला नीतीमार्गाने कसे चालवतो” तेव्हा हे पाहण्यासाठी आपण बायबलमध्येच उत्तर शोधायला हवे.

आता रस्त्याला फाटा फुटला आहे आणि अशा वेळी देव माझ्यापुढे गेला आहे असे त्याचे प्रकटीकरण मी कधीच अनुभवले नाही. त्यांना रानात  जसा अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ दिसला तसा मला कधी दिसला नाही. हा माझा अनुभव नाही. देव माझ्याशी बोलत आहे असा त्याचा आवाजही मी कधी ऐकलेला नाही. आता तो आपल्याला वेगळ्या रीतीने चालवतो. मला वाटते स्तोत्र ११९:१०५ मध्ये दावीदाकडून आपल्याला एक खूण दिसते.  “तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.”  आणि त्याच स्तोत्राचे ९ वे वचन म्हणते, “तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.”

म्हणून देव आपल्याला नीतीमार्गामध्ये  कसे चालवतो याचे एक उत्तर आहे: ह्या नीतिमत्त्वाच्या अनेक मार्गांबद्दल त्याने आपल्याला पुष्कळ प्रकटीकरण दिले आहे. नीतिमत्तेचे मार्ग कोणते ह्याचे वर्णन तो करतो आणि त्यामध्ये चाला असे सांगतो, म्हणजे आपण ते वाचावे आणि त्याप्रमाणे वागावे. दाविदाने हे नक्कीच केले कारण तो वचनावर दिवसन् रात्र मनन करत होता.

खुद्द बायबल आपल्याला मार्गामध्ये ठेवणार नाही 

आता हे उत्तर फक्त अर्धवट झाले… खुद्द बायबल आपल्याला मार्गामध्ये ठेवणार नाही. बायबल हे कितीही अद्भुत असले आणि त्याच्याशिवाय आपण पूर्णपणे हरवून जाऊ तरीही ते दोन बाबींमध्ये आपला पाठपुरावा करणार नाही.

पहिली गोष्ट म्हणजे जीवनामध्ये आपण अनेक निर्णय घेतो आणि ते बायबलमध्ये दिलेले नसतात – दररोजचे शेकडो छोटे निर्णय आणि काही मोठे निर्णय जर आपण बायबलमध्ये शोधले तर त्यासाठी वाक्ये आपल्याला आढळणार नाहीत. तुम्हाला किती मुले असावीत, तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत पाठवावे, कोणते काम करावे, एक न दोन शेकडो गोष्टी आपल्याला रोज ठरवाव्या लागतात. आणि त्यांना आपण एका चौकटीत बसवून असे म्हणू शकत नाही की “हा ख्रिस्ती असण्याचा भाग नाही, मी हे निर्णय मला हवे तसे घेईन. ख्रिस्तीत्व ही वेगळी बाबा आहे.” हे सर्व निर्णय देवाशी सबंधित आहेत. पण बायबल तर या प्रत्येक निर्णयासाठी स्पष्ट काही सांगत नाही. म्हणून या निर्णयासंबंधी जर आपल्याला नीतिच्या मार्गात चालायचे असेल तर आणखी काही सांगण्याची गरज आहे.

दुसरे कारण : नीतीचा मार्ग म्हणजे योग्य गोष्ट योग्य मनोवृत्तीने करणे. ही फक्त शारीरिक कृती नव्हे. यामध्ये तुमच्या पत्नीसाठी योग्य मनोवृत्ती असणे सुद्धा येते. पण फक्त पाने उलटून शब्द वाचण्याने वृत्ती बदलत नसते.

तुम्ही बायबलमध्ये वाचावेसे वाटते ते शंभर वेळा वाचू शकता आणि तरीही कदाचित तुमची वृत्ती अगदी तशीच असू शकते. त्यासाठी आणखी कशाची तरी गरज आहे. म्हणून दावीद म्हणतो, “ तो मला नीतिमार्गांनी चालवतो.”   आणि पौलाने म्हटले “ जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत” (रोम. ८:१४). आपल्याकडे बाहेरून फक्त बायबलच्या वचनाचे प्रकटीकरण मिळण्याची गरज नाही तर आपल्याला आतून पवित्र आत्म्याने रूपांतर करण्याची गरज आहे. देवाचे वचन आणि पवित्र आत्मा यांच्या एकत्रित मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे.

ख्रिस्ताच्या मनामध्ये नवीकरण

पौलाने रोम १२:२ मध्ये म्हटलेले शब्द सर्वांच्या परिचयाचे आहेत. “ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.”   का? म्हणजे “तुम्ही देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्यावे.” दुसऱ्या शब्दात तुमच्या आतमध्ये काहीतरी घडायला हवे. काही वृत्ती बदलायला हव्यात, भावना बदलायला हव्यात नाहीतर तुमच्या निर्णयाला जर पर्याय असतील तर त्यातील कोणती देवाची इच्छा आहे हे तुम्हाला कळणार नाही.

म्हणूनच तुमच्या नव्या मनात बायबल माहिती पुरवते आणि पवित्र आत्मा ते वचन  घेऊन आपल्या विचारांना आकार देऊ लागतो, भावनांना साचा देतो. यामुळे तुम्ही तोंड देत असलेल्या निर्णयासाठी बायबलमध्ये जरी स्पष्ट आज्ञा नसली तुम्ही सर्व पर्याय ख्रिस्ताच्या मनाने तोलू लागता. पौल म्हणतो, “आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.” आणि जेव्हा तुम्ही निर्णय घेता तेव्हा मागे पाहिल्यावर तुम्ही असे म्हणत नाही की, “वा! काय हुशार होतो मी!” तर तुम्ही म्हणाल, “माझ्या जीवनासाठी तत्त्वे शिकवणाऱ्या तुझ्या वचनाबद्दल मी तुझे उपकार मानतो आणि तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल मी तुझे आभार मानतो कारण त्याने माझ्या भावनांना आकार दिला आणि मला योग्य प्राधान्ये दाखवली की मी हा निर्णय घेऊ शकलो.” आणि देवाने आपल्याला चालवल्याचे  सर्व श्रेय देवालाच जाते. यामुळे मी रात्रंदिवस देवाच्या वचनावर मनन करतो आणि पवित्र आत्म्याने माझ्यामध्ये कार्य करावे म्हणून सतत प्रार्थना करतो

Previous Article

अजून अधिक साध्य करता आले असते अशी इच्छा तुम्ही करता का?

Next Article

आशीर्वाद शाप बनू शकतात

You might be interested in …

देवाच्या हाताखाली नम्र व्हा सॅमी विल्यम्स

“तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो” (१ पेत्र ५:५-७). संकटे, परीक्षा येतात तेव्हा  ख्रिस्ती व्यक्तीला आश्चर्य वाटण्याचे कारण […]

पवित्र शास्त्राचं कार्य

लेखांक ६ वा                              थोडी उजळणी करू. तारणाच्या योजनेत तारणाचे मूळ केंद्रस्थान कुटुंब. तारणाचं साधन म्हणजे कुटुंबातील उपासना. त्या उपासनेचा जीव म्हणजे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्राचं शिक्षण उपासनेमध्ये प्राप्त होतं. त्या शिक्षणात कायम टिकायचं असतं. […]

जे विश्वासू ते सध्या मूर्ख दिसतील

जॉन ब्लूम देवाची सुज्ञता ही बहुतेक मागे अवलोकन करतानाच पूर्णपणे दिसते. जेव्हा मानवाची सुज्ञता एक टूम म्हणून दिसेनाशी होते तेव्हा देवाच्या सत्याचा पर्वत स्थिर राहतो. काळ हा मानवाचे ज्ञान उघड करतो पण तो देवाचे ज्ञान […]