दिसम्बर 30, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

 संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक ५

(सूचना- अभ्यास करताना दिलेले संदर्भ बायबलमधून वाचून समजून घ्या.)

 स्वर्ग

आपण नरकाची माहिती पाहिली. आता स्वर्गाविषयी पाहू. स्वर्ग किवा आकाश हा शब्द बायबलमध्ये सुमारे ६०० वेळा आला आहे. तो तीन स्थळांसाठी वापरला आहे.

(१) पहिला स्वर्ग म्हणजे अंतराळ, पृथ्वीवरील वातावरण. उत्पत्ती ७:११-१२ मध्ये जे आपण वाचतो, तोच हा भाग. “आकाशाची द्वारे उघडली… पृथ्वीवर पावसाने झोड उठवली.’ जलचक्राची प्रक्रिया येथे  चालते. “देव मेघांनी आकाश आच्छादतो. तो भूमिकरता पर्जन्य तयार करतो” (स्तोत्र १४७:८). त्याद्वारे  पृथ्वीला पर्जन्य व फलदायक ऋतू देऊन उत्तमोत्तम गोष्टींचा पुरवठा करतो व आपल्याला अन्नाने व हर्षाने मन भरून तृप्त करतो  (प्रे.कृ.१४:१७).

(२) दुसरा स्वर्ग म्हणजे आकाशमंडळ किवा ग्रहतार्‍यांचे नभोमंडळ. येथे ग्रह, तारे, सूर्य, चंद्र यांच्या सूर्यमालिकांचे स्थान आहे (उत्पत्ती १:१४-१७). त्यामुळे पृथ्वीवर दिवस, रात्र, आठवडे, महिने, वर्ष हे कालमान, आणि मोसम व ऋतूंची चिन्हे समजतात. त्यातून देवाचे गौरव प्रगट होते. त्याचे सुरेख वर्णन आपण स्तोत्र १९:१-४ मध्ये वाचतो. इस्राएलांच्या समर्पित व सहनशील  देवाची ते साक्ष देतात. महासंकटाच्या काळात ते मोलाची भूमिका बजावणार आहेत (मत्तय २४:२९; प्रकटी ६:१२-१७). आपल्या कंपनांनी , हेलकाव्यांनी, पडण्याने अविश्वासीयांवर देवाचा क्रोध दर्शवला जात असल्याचे ते जगाला दाखवून देतील.

(३) तिसरा स्वर्ग – वरील दोन स्वर्गांच्या वरचे हे स्थान आहे. तेथे देव, देवदूत, मृत संताचे वास्तव्य आहे. देव त्याच्या या घरातून त्याच्या संपूर्ण विश्वाच्या राज्यावर नियंत्रण ठेवतो व सूत्रे चालवतो.  त्याची उपस्थिती सर्वत्र पसरते. देवपिता स्वर्गाच्या केंद्रस्थानी आहे. पण हेच त्याचे अंतिम स्थान नव्हे. कारण येशूच्या पृथ्वीवरील हजार वर्षांच्या राज्यानंतर येथूनच नवे आकाश व नवी पृथ्वी या भूतलावर उतरणार आहे व त्यात ते कायमचे राहणार आहेत. तेथे भूक, तहान, शाप ताप, आजार, दुखणी, रडणे, शोक नसणार. केवळ आनंदीआनंद असणार (प्रगटी २१:१०). या कबुलीनेच आपण प्रभूची प्रार्थना सुरू करतो (मत्तय ६:९,१०). येथे देवदूत सतत पवित्र, पवित्र म्हणत त्याची आराधना करत असतात. पुनरुत्थित ख्रिस्त येथे पित्याच्या उजव्या हाताशी सिंहासनावर आसनस्थ आहे. देवाचे सिंहासन स्वर्गात आहे व येशू आपल्यासाठी तेथे याजकाचे मध्यस्थीचे काम करत आहे. येथे आपल्या जीवनाच्या नोंदींची पुस्तके आहेत. विश्वासी जनांना तारणानंतर स्वर्गीय नागरिकत्व प्राप्त होते (फिलिपै ३:२०, लूक १०: २०;  इब्री १२:२३-२४). त्यांचे प्रतिफलही स्वर्गात आहे (मत्तय ५:१२). येथवर आपण वैयक्तिक पातळीवर शेवटच्या काळाचा संपूर्ण आढावा घेतला. आता वैश्विक पातळीवर शेवटच्या काळी काय होणार त्याचा तपशीलवार अभ्यास करू.            


II – विश्वाचा भावी काळ 

या अभ्यासात आपण देवाचे राज्य, हजार वर्षांचे राज्य, इस्राएल राष्ट्र व मंडळी, पुनरुत्थानाचा क्रम, भावी न्याय, करार अशा मुद्द्यांवर अभ्यास करणार आहोत          

(अ) देवाचे राज्य – बायबल मधील जुन्या व नव्या करारातील सर्व विषयांचा मध्यवर्ती विषय आहे – देवाचे राज्य. त्याचा कळस समजणासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या. कारण अनेक अर्थांनी केलेला त्याचा वापर अभ्यासताना तुमचा गोंधळ उडणार नाही. योग्य संदर्भ लक्षात येईल.

१. काही वचने त्या राज्याचे अस्तित्व सतत असत आल्याचे दर्शवतात (स्तोत्र १०:१६; १४५:११-१३). तरी त्या राज्याला निश्चित आरंभ असल्याचेही दर्शवतात.

२. ते राज्य संपूर्ण विश्व व्यापून आहे ( स्तोत्र १०३:१९). तरी भूतलावर त्याची स्थानिक सत्ताही आहे ( यशया २४: २३).

३. काही वेळा थेट देवाची सत्ता असल्याचे वर्णन आहे (स्तोत्र २२:२८; ५९:१३);  तर काही वेळा मध्यस्थाद्वारे सत्ता चालत असल्याचे वर्णन आहे (स्तोत्र २:२-४; दानी ४:१७, २५).

४. काही ठिकाणी देवाचे राज्य पूर्ण भावी कालचे दाखवले आहे (जखर्‍या १४:९ मत्तय ६:१०); तर काही ठिकाणी ते सध्या अस्तित्वात असल्याचे दाखवले आहे (स्तोत्र २९:१०; दानी. ४:३).

५. एकीकडे त्याची राजवट सार्वभौम, विनाअट करारानुसार दाखवली आहे (दानी ४: ३४-३५); तर दुसरीकडे ते देव व मानवामधील करारानुसार आहे असे म्हटले आहे (स्तोत्र ८९:२७-२९).

६. देवाचे राज्य सार्वकालिक आहे (दानी ४:३); तर त्याच्या राज्याच्या काही भागाचा तो अंत करणार आहे (होशेय १:४).

७. देवाचे राज्य खाण्यापिण्यात नाही (रोम १४:१७), ते रक्तमासाने प्राप्त होणार नाही (१ करिंथ १५:५०). तरीही ते ते प्रत्यक्षात असणार आहे (स्तोत्र २:४-६; ८९:२७-२९). 

८. ते राज्य यहुद्यांत होते  (लूक१७:२१) तरी येशू शिष्यांना सांगतो की ते राज्य येवो अशी प्रार्थना  करा.

९. पौलाने देवराज्याची घोषणा केली (प्रे. कृ २८:३१).

१०.  राज्याचे पुत्र नरकात टाकले जातील असे म्हटले आहे (मत्तय ८:१२); तर नीतिमान राज्याचे वतन पावतील असेही म्हटले आहे (१ करिंथ ६:९-१०).

११. सैतानाच्या हाती तात्पुरती या जगाची राजसत्ता आहे (लूक ४:९); तरी पृथ्वीवरील सर्व काही देवाचे आहे. (स्तोत्र २४:१).

१२. राज्य इस्राएलांसाठी आहे (२ शमु. ७:११-१३); तरी ख्रिस्ताने ते राष्ट्रांनाही दिले आहे (मत्तय २१:४३).

पुढच्या भागात देवाच्या राज्याची सविस्तर माहिती पाहू या.    

                                                          प्रश्नावली

 प्रश्न १ ला – पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.                                                              

१. पहिला स्वर्ग म्हणजे कोणता भाग? त्याचे स्वरूप काय?                                                            
२. दुसरा स्वर्ग म्हणजे कोणता भाग? त्याचे स्वरूप काय? भावी काली त्याची भूमिका काय असेल?            
३. तिसरा स्वर्ग म्हणजे कोणता भाग? त्याचे स्वरूप काय?                                                 
४. देवाचे राज्य केव्हापासून सुरू आहे?                                                         
५. सैतानाच्या हाती जगाची सत्ता केव्हा आली? (उत्पत्ती 3)   

 प्रश्न २रा – मत्तय २५:३१-४६ वचने वाचून कंसात दिलेली वर्णने अ- विश्वासी आणि  ब- अविश्वासी अशा योग्य गटात लिहा.

(डावीकडले; देवासोबत असणारे, दया दाखवणारे, शेरडे, अति कनिष्ठांसाठी काहीच न करणारे; देवासमोरून हाकललेले; मेंढरे; शिक्षा भोगणारे, शापग्रस्त; सैतानाबरोबर; देवाबरोबर वतन भोगणारे; आशीर्वादित, सार्वकालिक राज्यात; सार्वकालिक अग्नीत)            

              (अ) विश्वासी                                                                       (ब) अविश्वासी

 प्रश्न ३ रा कंसातील संदर्भ खाली दिलेल्या वर्णनापुढे लिहा.

 (रोम १४:१७; कलसै १:१३; २ तीम २:१२; १ थेस्स २:१२; १ पेत्र ४:१८; १:१०-११)                                                                      

१. (भाकितात) जो काळ सुचवला होता त्याविषयी (संदेष्टे शोध करीत होते.————-                              २. धीराने सोसले तर देवाबरोबर राज्य करू, ————-                                                     
३. संदेष्ट्यांनी तारणाविषयी बारकाईने शोध केला ————                                                         
४. पवित्र आत्म्याद्वारे आनंदात देवाचे राज्य ———–                                                          
५.  ख्रिस्ताच्या आत्म्याने ख्रिस्ताची दु:खे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या.———–         
६. आपल्याला पाचारण करणार्‍या देवाला शोभेसे आपण चालावे.————–                                 
७. आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढले. ———-                                                              

 

Previous Article

आशीर्वाद शाप बनू शकतात

Next Article

तुमच्या मुलांना तुम्ही कोणत्या झाडाबद्दल सांगणार?

You might be interested in …

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर   अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण २२ एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे […]

ख्रिस्तासाठी थोडे दिवस कष्ट करताना

ग्रेग मोर्स येशूच्या मागे जाणे सोपे आहे की कठीण? एका बेघर (आणि प्यालेल्या) माणसाने माझ्या पत्नीला काही वर्षांपूर्वी प्रश्न केला. खरं तर त्याला स्वत:शिवाय इतर कुणाचेही उत्तर ऐकण्यात स्वारस्य नव्हते. त्याने स्वत:च आपला प्रश्न लगेच […]

उत्तर न मिळालेल्या प्रत्येक प्रार्थनेसाठी ग्रेग मोर्स

माझ्या धाकट्या भावाला बरे कर अशी प्रार्थना मी रोज देवाकडे केली. ऑटीझम च्या बंधनातून माझ्या भावाची सुटका व्हावी म्हणून याकोबासारखा मी देवाशी झगडलो. माझे गुडघे सुजले होते, माझी पाठ दुखू लागली. प्रार्थना करता करताच मी […]