अक्टूबर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

विचलित, विकृत, फसवेगिरी

जॉन ब्लूम

पापाच्या मोहाला प्रतिकार करायचा झाला तर साचेबंद असे कोणतेही एक धोरण नाही. मोह हे अनेक प्रकारे, अनेक वेळा येतात आणि त्यावर विजय मिळवायला बायबल आपल्याला अनेक धोरणे देते.

पण ह्या सर्व मोहांमध्ये एक मूलभूत सारखेपणा आहे  जो सैतानाच्या फसवेगिरीत असतोच. हा सारखेपणा लक्षात घेतल्यास प्रतिकारासाठी कोणतेही धोरण आपण वापरले तरी लढण्यासाठी आपल्याला मदत होईल.

मोहांना जोडणारा हा विषय पाहण्यासाठी आपण इतिहासातील सर्वात लक्षणीय उदाहरण पडताळून पाहू या- येशूची परीक्षा. हा देखावा सैतानाच्या  केंद्रभूत धोरणाचे स्पष्टीकरण करतो.  येशूने त्याचे विचार कसे लख्ख ठेवले आणि आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो.


मोहाची रचना

मत्तय, मार्क आणि लूक येशूच्या सेवेआधी सैतानाने त्याची परीक्षा घेतल्याचा वृत्तांत देतात पण मत्तय त्याबद्दल सविस्तर सांगतो. येशूच्या तीन विशिष्ट परीक्षा आणि त्याचा प्रत्येक परीक्षेला प्रतिसाद याचे तो वर्णन करतो (मत्तय ४:१-११). बायबल पंडितांनी निर्देश केला आहे की या परीक्षेमध्ये ऐतिहासिक आणि ईश्वरविज्ञानाच्या दृष्टिकोनातून बरेच काही घडले आहे. पण मी त्या मुद्यांना येथे स्पर्श करणार नाही. माझे उद्दिष्ट एवढेच आहे की सैतानाच्या परीक्षेमध्ये असलेली समाईक दिशा ओळखून काढणे.

सैतानाबरोबर संवाद

याची सुरुवात अशी झाली; चाळीस दिवस उपास केल्यावर येशूच्या शारीरिक क्षीणतेचा व भुकेचा सैतान फायदा घेतो.

सैतान:  “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर”  (वचन ३).

येशू: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.” (वचन ४; अनुवाद ८:३ चा संदर्भ देत)


नंतर मंदिराच्या कंगोऱ्यावरून सैतान येशूच्या शास्त्रलेखांतील अभिवचनावर  असलेल्या विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.

 सैतान:  “तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील,’ आणि ‘तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’ (वचन ६; स्तोत्र ९१:११,१२ चा संदर्भ देत)

येशू : “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’ (वचन ७, संदर्भ अनुवाद ६:१६)


शेवटी पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले, (वचन ८) येशूच्या वचनदत्त उच्चपदाचा  सैतान फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.

सैतान : त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन” (वचन ९).

येशू : “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’ (वचन १०, अनुवाद ६:१६ चा संदर्भ देत)


तीन आवश्यक घटक

लक्षात घ्या की या तीन परीक्षांमध्ये तीन समाईक घटक आहेत.

पहिले, प्रत्येक मोहामध्ये सैतानाने येशूचे लक्ष संकुचित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येशू प्रत्येक मोहाकडे विकृत संदर्भात पाहू शकणार होता  आणि त्यामुळे त्याचा अनुभव निराळ्या स्वरूपात घेणार होता.


दुसरे, प्रत्येक मोह स्पष्ट आणि सूचित अशा बक्षिसांचे वचन देतो. सैतान जे बोलला  तेव्हा  मला जे दिसले ते मी

साध्या शब्दांत मांडतो:

भाकर: येशू , जर तू अद्भुत रीतीने भाकर निर्माण केली तर तुझ्या भुकेची वेदना शमली जाईल आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे तुझा देवत्वाचा दावा बळकट होईल.
उडी मार: जर या धाडसी अभिवचनाचे सत्य तू खाली असलेल्या सर्वांसमोर करून दाखवले तर तर तू देवाच्या वचनाची विश्वसनीयता आणि  देवाचा पुत्र असल्याचा तुझा दावा यांचे गौरव करशील.

माझ्या पाया पडून नमन कर: जर तू मला नमन केले मी हमी देतो की प्रत्येक गुडघा तुझ्यापुढे टेकेल आणि प्रत्येक जिव्हा तुला प्रभू म्हणेल; कारण ते माझ्या सामर्थ्याखाली आहे.


तिसरे , प्रत्येक मोहाचा प्रस्ताव हा एक धमकी सुचवतो. पुन्हा मला जे दिसते ते मी मांडतो.

भाकर: जर तू अद्भुत रीतीने भाकरी करण्यास तयार नाहीस तर ते असे दाखवत नाही का की तुला ते करता येत नाही? आणि तू मोशे नाहीस, संदेष्टयाहून कमी आहेस आणि देवाचा पुत्र तर नाहीसच. तू फक्त एक स्वत: संभ्रम झालेला मशीहा आहेस – आणि फसव्यांचे काय घडते ते तुला ठाऊक आहे.

उडी मार: जर ह्या अभिवचनाचे सत्य तू दाखवले नाही तर ते सिद्ध करेल की तुझा त्याच्यावर विश्वास नाही. तू देवाचा पुत्र नाहीस तू त्या ढोंगी रब्बी सारखा आहेस. शिक्षण, शिक्षण, शिक्षण – पण देवाचे वचन  सत्य आहे हे सिद्ध करण्याचा धोका तू घेणार नाहीस. – आणि ढोंग्यांचे काय होते ते तुला माहीत आहे.

माझ्या पाया पडून नमन कर: ज्या सत्यावर तू आहेस तो अत्यंत धोक्याचा आहे; त्याचा नाश ठरलेला आहे. जर तू माझ्या पाया पडला नाहीस तर तू मरशील. आणि मी पाहीन की ते अगदी भयानक असेल.

सैतानाचे मुख्य धोरण

येशूच्या परीक्षेचे विश्लेषण आपल्याला सैतानाचे येशूबरोबरचे विशिष्ट धोरणच दाखवत नाही तर प्रत्येक मोहामध्ये तो वापरत असलेले  मुख्य धोरण  दाखवते.

सैतान काय करायला पाहत होता? जे त्याने आदाम, हव्वाबरोबर केले  आणि आपल्याबरोबर करतो तेच त्याने येशूबरोबर करण्याचा प्रयत्न केला : सत्यापासून येशूची दृष्टी विचलित करणे. यामुळे येशूची सत्याबद्दलची दृष्टी विकृत करणे आणि मग येशूला खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास फसवणे.


हे परिचयाचे वाटते की नाही ते पाहा. जेव्हा येशू अगदी कमकुवत होता तेव्हा सैतान येतो – आपण मानव जेव्हा शारीरिक, भावनिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत असतो तेव्हा सहज विचलित होऊ शकतो. तुम्ही सशक्त आणि ताजेतवाने असल्यापेक्षा जेव्हा कमकुवत असता तेव्हा तणावाला कसे निराळे तोंड देता याचा विचार करा.

त्यानंतर तो येशूसमोर असा प्रस्ताव मांडतो की तो सत्याचे  विपरीत स्वरूप करतो. खोटे वास्तव सादर करताना सैतानाने त्यात अनेक सत्ये गुंफली होती. आपली भूक भागवली जाणे ही येशूची इच्छा पाप होते का? नाही. येशूने आपले पुत्रत्व दाखवून अद्भुत रीतीने भाकर करणे पाप होते का? नाही. हे तर त्याने नंतर पाच हजारांना भोजन देऊन केलेच (मत्तय १४:१३-२१). शास्त्रलेखाच्या एका विशिष्ट अभिवचनावर विश्वास ठेवणे येशूसाठी पाप होते का? नाही.

आपल्याला सर्वात उंच केले जावे, प्रत्येक गुडघा आपल्यापुढे टेकावा आणि प्रत्येक जिव्हा प्रभू म्हणून कबूल करेल अशी इच्छा करणे येशूसाठी पाप होते का? नाही.  (फिली. २: ९-११ वाचा)

हे सर्व योग्य संदर्भात चांगले आणि नैतिक होते.  सैतानाचा प्रस्ताव दुष्ट झाला तो त्याच्या विकृत संदर्भामुळे. आणि येशूला ह्याला प्रतिकार करायला ठाम निर्णय घ्यावा लागला.


येशूचा प्रतिकार

त्याने प्रतिकार केलाच पण कसा? पहिले म्हणजे  त्याने सैतानाच्या कुयुक्त्यांविरुद्ध देवाची शस्त्रसामग्री कुशलतेने वापरली (इफिस ६:११). येशूच्या प्रतिसादात आपण त्याला विश्वासाची ढाल उचलताना आणि आत्म्याची तलवार -म्हणजे देवाचे वचन वापरताना पाहतो (इफिस ६:१६-१७).
दुसरे स्पष्टीकरण म्हणजे ”येशूला सैतानाचे विचार ठाऊक होते” आणि त्यामुळे सैतानाचे त्याच्यावर वर्चस्व होऊ शकले नाही (२ करिंथ २:११). येशू हा मोहाच्या दुष्ट प्रकारांशी परिचित होता: ते म्हणजे लक्ष विचलित करणे, सत्य विकृत करणे आणि फसवणे. यामुळे तो दक्ष होता. त्याला हे अपेक्षित होते. आणि जेव्हा मोह त्याच्यावर आले तेव्हा ते आकर्षक, जीवनदायी दाखवले जाईल हे त्याला अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात “ त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात”  (नीति.१४:१२).

सैतानाने येशूला दुसरीच गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला . पण येशूला खरी गोष्ट माहीत होती जी शास्त्रलेख प्रकट करत होते. तो पतनाचा शाप नष्ट करायला आला होता आणि हा शाप  फक्त पिता जे करतो ते करूनच नष्ट होणार होता (योहान ५:१९).


तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये आहा ते लक्षात ठेवा

येशूच्या परीक्षेतून महत्त्वाचे लागूकरण मला दाखवायला हवे. तुम्ही ज्या गोष्टीत आहात ती लक्षात ठेवा. आपण सर्व मोहाला त्या क्षणी जे आपल्याला सत्य वाटते त्यानुसार प्रतिसाद देतो. जर आपण आपले लक्ष विचलित होऊ दिले आणि खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपली फसवणूक करून घेतली  तर आपण आपल्या वासनेने ओढले जातो व भुलवले जातो तेव्हा मोहात पडतो. वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्‍व झाल्यावर मरणास उपजवते (याकोब १:१४-१५). 

मोहाच्या अनेक प्रकारांवर विजय मिळवण्यासाठी अनेक धोरणे आहेत. पण  त्या सर्वांमध्ये आपल्यावर सैतानाचे  वर्चस्व होऊ नये म्हणून आवश्यक गोष्ट म्हणजे आपण सैतानाच्या योजनांसंबंधी अजाण असू नये. तो आपले लक्ष विचलित करतो, सत्य विकृत करतो, आणि आपल्याला फसवतो. देव आपल्याला म्हणतो, येशूसारखे सावध असा, जागे राहा; कारण  तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो (१ पेत्र ५:८). म्हणजे येशूसारखे आपण मोह कसा असेल हे ओळखून घेऊ आणि आपण कोणत्या गोष्टीत आहोत हे प्रथम समजून घेऊन सैतानाला प्रतिकार करू.

Previous Article

तुम्हाला चांगला मृत्यू  हवा आहे का?

Next Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

You might be interested in …

तुम्हाला निर्माण केल्याचा देवाला पस्तावा होतो का?

जॉन पायपर चॅड चा प्रश्न पास्टर जॉन, मी नुकतेच उत्पत्ती ६:६ वाचले. तेथे लिहिले आहे “म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.” मला सतावणारा प्रश्न आहे मला निर्माण केल्याचा […]

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

क्रिस विल्यम्स लेखांक ३(ऑक्टोबर २०१७ मध्ये व्हिटेनबर्ग येथे  ५०० व्या धर्मजागृतीच्या स्मृतीदिनाच्या परिषदेत हा निबंध सादर केला गेला.) प्रस्तावना देवाच्या सामर्थ्यशाली वचनाचा पुन्हा शोध घेतल्यामुळे धर्मजागृती होऊ शकते व होऊ शकेल. मध्ययुगीन काळाच्या गडद अंधारात […]