संकलन – क्रॉसी उर्टेकर
लेखांक १५
प्रभूचा दिवस
देवाच्या भावी प्रकटीकरणाचे ज्ञान होण्यासाठी ‘प्रभूचा’ दिवस हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. जुन्या करारातील या शब्दाच्या वापराच्या आधारावरच नव्या करारात हा शब्द वापरला आहे. देवाच्या क्रोधात घडणार्या भावी घटनांच्या ऐतिहासिक संदर्भात बरेच काही बोलताना जुन्या करारातील संदेष्ट्यांनी हा शब्द १९ वेळा वापरल्याचे अभ्यासात आढळते. महासंकट काळातील न्यायाचा कळस सांगताना व पृथ्वीवर येणार्या नवीन न्यायाविषयी बोलताना त्याचा वापर केलेला आढळतो. नव्या करारात प्रभूचा दिवस हा मूळ शब्द व शिवाय ‘समाचाराचा दिवस,’ ‘क्रोधाचा दिवस’, ‘सूड घेण्याचा दिवस’, ‘सर्वसमर्थ देवाचा मोठा दिवस’ असे पर्यायी शब्दही वापरलेले दिसतात. मानवाचे पतन झाल्यापासून मानवजात निर्माणकर्त्या देवाविरुद्ध बंड करत आली आहे. पण एक काळ असा येणार आहे की देव या संपूर्ण पृथ्वीचा न्याय करून त्याचे राज्य स्थापणार आहे. प्रभूच्या त्या दिवसाला ‘मानवाचा दिवस’ म्हटले असून तो देवाच्या क्रोधाला वाट मोकळी करून देईल. मानवाचा तो अखेरचा दिवस पाप्याने देवाविरुद्ध केलेल्या बंडासंबंधातील दैवी क्रोधाचा असेल. जुन्या करारातील ही भाकिते त्यांच्या लगतच्या ऐतिहासिक घटनांनाही लागू पडणारी होती व भावी काळातील घटनांनाही लागू पडणारी होती हे लक्षात ठेवा. उदा. योएल १ मधील टोळांची पीडा इस्राएलावर त्या काळी येणार्या ऐतिहासिक दिवसाविषयी होती. तर २ व ३ अध्याय शेवटच्या काळातील भावी काळासंदर्भातील आहेत. त्या घटनांनी तो भावी दिवस थेट देवाच्या हस्ते येऊन व्यक्त होणार आहे. यहेज्केल ३०:३; २ पेत्र ३ :१० प्रभूच्या दिवसाचे पृथ्वीवर दोन समय पूर्ण व्हायचे आहेत.
अ- महासंकट काळातील न्यायाचा कळस. प्रकटी अध्याय १६-१८
ब- एक हजार वर्षांच्या राज्यानंतर पृथ्वी भस्म होऊन लयास जाणार. २ पेत्र३:१०-१३; प्रकटी २० :७-२१:१.
सारांशाने महत्वाचे मुद्दे
१- प्रभूच्या दिवसात फक्त न्यायाचा समावेश आहे. न्यायासोबत आशीर्वाद नाहीत.
२ – देवाच्या योजनेनुसार प्रभूचा दिवस दोन वेळा येणार.
३- प्रभूचा दिवस संपूर्ण महासंकट काळात चालू नसणार. तो महासंकट काळाच्या अखेरीस येईल.
४- प्रभूचा दिवस एक हजार वर्षभरच्या देवाच्या राज्यात चालू नसणार. तो एक हजार वर्षांच्या अंती पुन्हा येईल. ५- प्रभूचा दिवस महासंकट काळापूर्वी येणार नसून त्या काळातील सर्व घटना प्रभूच्या दिवसासाठी वाट मोकळी
करणार्या आहेत.
६- प्रभूचा दिवस हजार वर्षांच्या राज्याला आधी पुष्टी देणार.
येशूचे द्वितीयागमन
अजून येशूचे द्वितीयागमनाचे भाकीत पूर्ण व्हायचे आहे. द्वितीयागमन ही परिभाषा वाचनात विरळच वापरली असली तरी ती शिकवण वचनात रुजलेली दिसते. मत्तय २५:३१; योहान १४:३; प्रे.कृ १:११. नवा करार त्याच्या द्वितीयागमनाची आवश्यकता जाहीर करतो. इब्री ९:२८ मध्ये ‘दुसरे’ हा शब्द आला आहे. ‘ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वत:वर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला.आणि जे त्याची वाट पहातात त्यांना पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसर्यांदा दिसेल.’ येशूचे द्वितीयागमन वर्तमानातील मानवी साम्राज्यांचा व इस्राएलांच्या ७० व्या सप्तकाचा अंत करील. म्हणजेच सैतानप्रेरित ख्रिस्तविरोधी जागतिक राजवटीचा अंत करील. त्याचे द्वितीयागमन हे ख्रिस्ताच्या या भूतलावतील एक हजार वर्षांच्या राज्याचा आरंभबिंदू होय. सध्याच्या अधर्माच्या युगाचे नीतिमत्तेच्या युगात स्थित्यंतर होण्यास तो महत्वाचा बिन्दू असेल.
जुन्या करारात मशीहाची दोन आगमने भिन्न काळात स्पष्ट दिलेली नाहीत. क्लेश सहन करणारा सेवक व राज्य करणारा राजा अशी दोन वर्णने करणारी भाकिते येशूविषयी दिली आहेत. पण त्या दोन भूमिका दोन भिन्न काळात होण्याविषयी भाष्य केलेले नाही. पण या दोन्हींमधील अंतर स्तोत्र ११०:१,२ मध्ये दिले आहे. येशूच्या दोन आगमनांमध्ये अंतर आहे याची त्याच्या शिष्यांनाही अपेक्षा नव्हती. होऊन गेलेल्या घटनांमुळे आपल्याला इतिहास अधिक स्पष्ट होतो. आपण देवाच्या राज्याविषयीची वचने अधिक समजून घेऊ शकतो. अजून येशूचे आगमन व्हायचे आहे हे आपल्याला स्पष्ट होते. जखर्या १४ द्वितीयागमनाविषयी बोलतो. ‘यरुशलेमाचा वेढा त्याच्या द्वितीयागमनास कारण होईल’ वचने ३-४; हे त्याच्या पहिल्या आगमनसमयी पूर्ण झाले नाही. म्हणजेच हे भाकीत द्वितीयागमनाला लागू आहे. जैतून डोंगरावरून येशूचे स्वर्गारोहण झाले. आता द्वितीयागमन त्याच डोंगरावर होईल. या द्वितीयागमनाविषयी येशूने मत्तय अध्याय १३,२४,२५ मध्ये व लूक २१ मध्ये प्रवचन केले आहे. शिष्यांनी येशूला या काळाची चिन्हे विचारली. येशूने अनेक घटनांचे तपशील त्यांना दिले. त्यापुढील २९-३० वचनांमध्ये लगेच तो म्हणतो, ‘त्या काळाच्या संकट काळानंतर पृथ्वीवरील वंश व सर्व जातीचे लोक मनुष्याच्या पुत्राला आकाशातील मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.’ आणि २५:३१ मध्ये तो म्हणतो, ‘जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल तेव्हा त्याजबरोबर सर्व देवदूतही येतील. तेव्हा तो आपल्या गौरवी राजासनावर बसेल.’ तर लूक २१:२७ मध्ये म्हटले आहे, ‘मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल.’ येशूने आपल्या चौकशीच्या वेळी पिलाताला स्पष्ट सांगितले की ‘ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल’ मत्तय २६:६४. येशूच्या स्वर्गारोहणाच्या वृत्तांतात अशीच नोंद आपण वाचतो. शुभ्र वस्त्रे परिधान केलेले पुरुष आकाशाकडे पाहात राहाणार्या शिष्यांना म्हणतात, ‘आकाशाकडे का पाहात उभे राहिला आहात? हा जो येशू तुम्हापासून वर घेतला गेला आहे, तोच; तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल.’ पुनरुत्थानानंतर स्वर्गारोहणापर्यंत ४० दिवस हाच येशू गौरवी शरीराने शिष्यांमध्ये वावरला होता. प्रे. कृ ३:१८-२१ मध्ये भाकितांप्रमाणे येशूचे पहिले आगमन झाले असून दुसरे आगमन होणार आहे असे सांगून पेत्र पश्चात्ताप करण्याचे आव्हान करतो. जुन्या करारातील संदेष्ट्यांच्या वचनांशी तो या घटनांची सांगड घालतो व जुन्या कराराच्या संदर्भांचे नव्या करारास लागूकरण करीत स्पष्टीकरण करतो.
येशूचे द्वितीयागमन दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात तो मंडळीचे लोकांतरण करून तिला घेऊन जायला अंतराळात येईल. यासाठी की त्यानंतर सुरू होणार्या महासंकटाच्या काळातील क्लेशांपासून तिचे संरक्षण करावे व त्या काळात ती त्याच्या समवेत असावी. दुसर्यात टप्प्यात तो प्रत्यक्ष पृथ्वीवर एक हजार वर्षांचे राज्य करायला येईल.
एक हजार वर्षांचे राज्य
सध्याच्या युगानंतर व व सनातन युगाच्या आधी येशू या पृथ्वीवर एक हजार वर्षे राज्य करील. महान संकटाचा काळ व दानिएलातील ७० वे सप्तक संपताच येशूचा द्वितीयागमनाचा दुसरा टप्पा घडून हे राज्य सुरू होईल. हा शेवटचा आदाम देवपित्याच्या वतीने आपल्या कायद्याने यशस्वी राज्य करील. उत्पत्ती १:२६-२८. दाविदाच्या घराण्यातून आलेला हा मशीहा, दाविदाच्या सिंहासनावर बसून संपूर्ण पृथ्वीवर राज्य करील. लूक १:३२-३३; जखर्या १४:९. महासंकट काळातील त्याला विरोध करणार्यांचा पराभव होईल. प्रकटी १९:२०-२१. सैतानाला बांधले जाईल. प्रकटी २०:१-३. जुन्या कराराचे संत व महान संकट काळातील रक्तसाक्षी पुनरुत्थित होऊन ख्रिस्ताबरोबर राज्य करतील. दानी.१२:२; प्रकटी २०:४. त्या युगातील ख्रिस्ताशी विश्वासू राहिलेल्या जगातील मंडळीसही ख्रिस्ताच्या राज्यात प्रवेश मिळेल. एक हजार वर्षांचा काळ हा ‘निर्मितीचे नवीकरण, भरभराट, नीतिमत्ता, शांती व पृथ्वीवरील ऐक्याचा असेल’ मत्तय १९:२८; यशया २:२-४,११; ६५:१७-२५. सर्व करारांमधील इस्राएल राष्ट्र व इतर राष्ट्रांविषयीची सर्व भाकिते पूर्ण होतील.
इस्राएलांचे तारण होऊन त्यांचा पुनरुद्धार होईल. येशूच्या अधिपत्याखाली इस्राएल यरुशलेमातून राज्य करीत नेतृत्वाची भूमिका बजावतील व राष्ट्रांची सेवा करतील. सर्व राष्ट्रांमधील जे लोक देवाचे होतील, ते सर्व इस्राएलांप्रमाणे प्रत्यक्ष आशीर्वाद भोगतील. यशया १९:१६-२५; २७:६. शेवटचा आदाम आपले काम पूर्ण करील. मग येशू हे राज्य पित्याला सोपवून देईल. मग पित्याचे सार्वकालिक राज्य सुरू होईल. १ करिंथ १५:२४-२८. ज्या पृथ्वीवर येशू आपल्या स्वकीयांकडूनही धिक्कारला गेला तेथे त्याने जोपासलेले, दृश्य, त्याची ओळख असलेले राज्य येणे आवश्यक आहे. मानवापुढे तो बांधलेल्या, वधस्तंभावरील अवस्थेत शेवटी होता. आता तो राजा म्हणून जगाने ओळखलाच पाहिजे. शिवाय सैतानाने पवित्र जनांच्या केलेल्या छ्ळाचा बदला घेण्याचा तो काळ असेल. स्तोत्र २:९; प्रकटी ६:९-११; २०:४. तरीही हे दीर्घायुष्य लाभलेले राज्य यशया ६५:२०, परिपूर्ण नसेल कारण पृथ्वीवर जिवंत असलेल्यांमधील त्या काळात त्यांच्यापासून जन्म झालेले, अनुवंशिक पापामुळे त्यांच्या संतांनातील काही लोक पापाला उद्युक्त होऊन शिक्षापात्र ठरतील. जखर्या १४:१६-१९. ते आपण पुढे अभ्यासूच.
प्रश्नावली
प्रश्न १ ला –पुढील प्रश्नांची विवेचनाच्या आधारे उत्तरे द्या.
१- ‘प्रभूचा दिवस’ हा शब्द का महत्त्वाचा आहे? त्याला इतर पर्यायी शब्द कोणते?
२- पतनापासून मानव काय करीत आहे? पण एक काळ कसा येणार?
३- मानवाचा दिवस कशाला म्हटले आहे? तो काय करील?
४ – जुन्या करारातील भाकिते कोणते काळ दर्शवतात?
५- प्रभूच्या दिवसाचे कोणते दोन काळ पूर्ण व्हायचे आहेत?
६- प्रभूच्या दिवसाचे महत्त्वाचे सहा मुद्दे सांगा.
७ – येशूचे द्वितीयागमन योहान १४:३ नुसार का गरजेचे आहे?
८- येशूच्या दोन आगमनांच्या भूमिका सांगा.
९- त्या दोन आगमनांमध्ये अंतर असल्याचे स्तोत्र ११० : १-२ ही वचने कसे स्पष्ट करतात?
१०- जखर्या १४:३-४ मधील कोणते भाकीत अजून पूर्ण झालेले नाही?
११- मत्तय व लूकमधील कोणत्या अध्यायात द्वितीयागमनाची शिकवण दिली आहे?
१२- द्वितीयागमनातही दोन टप्पे आहेत, ते कोणते?
१३- प्रे.कृ ३:१८-२१मध्ये पेत्र का व कशासाठी आव्हान करतो?
१४- शेवटचा आदाम कोण?
१५- पृथ्वीवर येशू कोठून न्याय करील?
१६- जुन्या कराराचे संत केव्हा उठतील व काय करतील?
१७ – १००० वर्षाचा काळ कसा असेल ?
१८ – सर्व करारामधील उरलेली भाकिते केव्हा पूर्ण होतील?
१९ – इस्राएल राष्ट्र येशूच्या अधिपत्याखाली काय करील व काय होईल?
प्रश्न २ रा- विवेचनाच्या आधारे कंसातील शब्दांचा वापर करून रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
( ७०व्या; नीतिमत्त्वाच्या; महासंकटकाळातील न्यायाचा; अधर्माच्या; पापासंबंधात; येशूचे द्वितीयगमन; सैतानप्रेरित , महासंकटकाळात; पृथ्वी भस्म होऊन; मानवाचा दिवस; जुन्या करारातील भाकिते, पापे, एकदाच; मानवी; आशीर्वाद; स्थित्यंतर; देवाच्या हस्ते; तारणासाठी; आरंभबिंदू )
१- भावी दिवस थेट —- येऊन व्यक्त होणार आहे.
२- प्रभूचा दिवस —– व —— चालू नसणार.
३- प्रभूच्या दिवसात न्यायासोबत—— नाहीत.
४- ——— प्रभूच्या दिवसाला वाट करून देतील.
५- ख्रिस्त पुष्कळांची — स्वत:वर घेण्यासाठी —– अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना—— नव्हे तर —– दुसर्यांदा दिसेल.
६- ——- तेव्हाच्या व भावी काळालाही लागू आहेत.
७- प्रभूच्या दिवसाचे दोन समय व्हायचे आहेत :
अ – —–कळस,
ब- १००० वर्षांच्या राज्यानंतर ——— लयास जाणार.
८- —— हे १००० वर्षांचा ——- होय. ते —– साम्राज्याचा व इस्राएलांच्या —– सप्तकाचा अंत करील. म्हणजेच ——- ख्रिस्ताविरोधी राजवटीचा अंत करील.
९- सध्याच्या ——- युगाचे ——- युगात——– होण्याचा ख्रिस्ताचे द्वितीयागमन हा महत्त्वाचा बिंदू होय.
प्रश्न ३ रा – पुढील १००० वर्षांच्या राज्याच्या घटनांना १-१० घटनाक्रम द्या.
अ- दानीएलातील ७०वे सप्तक संपेल. —–
ब- येशू पित्याच्या हाती राज्य सोपून देईल. —– .
क- सैतानाला बांधून आगाधकूपात टाकले जाईल. —
ड- द्वितीयागमनाचा १ ला टप्पा: मंडळीचे लोकांतरण होईल. —
ई- १००० वर्षांच्या राज्यात कोणी जावे हे ठरवण्यास शेरडांपासून मेंढरे वेगळे करण्याचा न्याय होईल. —
फ- ७ वर्षांचा महान संकटाचा काळ सुरू होईल. —–
प- हजार वर्षांच्या अंती सैतानाला मोकळे करून तो व त्याचे लोक अग्निसरोवरात —–
भ-जुन्या करारातील संत व महासंकट काळातील रक्तसाक्षी पुनरुत्थित होतील. —–
म- इस्राएलांचे तारण होऊन ते यरुशलेमातून राज्य करतील. —
स-महासंकटातील विरोधकांचा पराभव होईल. —
प्रश्न ४ था- कंसातील वचने वाचून खालील विधाने पूर्ण करा.
( यहेज्केल ३०:३; २पेत्र ३:१०-१३; योहान १४:३; प्रेकृ १:११; लुक १:३२-३३; २१:१६-१७; स्तोत्र ११०:१-२; मत्तय २६:६४; )
१. —येतो तसा — दिवस येईल,त्या दिवशी — मोठा — करीत नाहीसे होईल,
२. तुम्ही —— च्या —-ला—–च्या—–असलेले व —- च्या —- वर —-होऊन येताना पहाल.
३. हा जो ——- तुम्हापासून वर—- घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे —- जाताना पाहिले, —— येईल.
४. मी तुझे —— तुझे ——- करीपर्यंत तू माझ्या ——– बैस.
५. त्याला —- चा— म्हणतील. प्रभू देव त्याला त्याचा ——- ह्याचे ——=देईल. तो —— च्या—– वर ——– राज्य करील. त्याच्या —- चा —– होणार नाही.
६. मी जाऊन तुम्हासाठी —– तयार केली म्हणजे—– येऊन तुम्हास आपल्या —-घेईन.
७. ——- तप्त होऊन लयास जातील. आणि —- व तिच्यावरील सर्व गोष्टी—— येतील.
८. दिवस—- आला आहे. ——– दिवस येऊन ठेपला आहे. तो —- दिवस आहे. तो —-चा —- आहे.
९. तुमच्यातील कित्येकास —- मारतील. तरी तुमच्या ——- एका ——- ही —— होणार नाही.
१०. सर्व अशी —– जाणारी आहेत, म्हणून —– व —– राहून —– चा—— येण्याची —– पाहात व तो
दिवस—–यावा म्हणून —- राहावे.
Social