गेरीट डॉसन
स्कॉटलंडचा एक तरुण किनाऱ्यावर असलेले आपले घर सोडून समुद्रावरच्या सफरीला गेला. कुटुंबातील लोकांना काहीही न सागता तो अचानक निघाला. सफरीच्या त्याच्या ओढीने आपल्या आईवडिलांना आपले अचानक जाणे कसे वाटेल याचा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही.
हिवाळ्यातल्या एका थंडगार रात्री त्याचे जहाज उत्तरेकडील भयानक थंड आणि गोठवणाऱ्या वाऱ्याबरोबर पुढे जात होते. त्या वादळाने जहाजाला धोकादायक रीतीने एका खडकाळी किनाऱ्यावर आणले. सकाळी अंधुक सूर्य उगवला होता. जहाज गावाच्या इतक्या जवळ होते की त्या तरुण खलाशाला टेकडीजवळील घरांच्या खिडक्यातून शेगडीतून निघणाऱ्या जाळाच्या ठिणग्या दिसत होत्या. अचानक त्या तरुणाला आपले घर ओळखता आले! मग त्याला आठवले की तो ख्रिसमसचा दिवस होता. त्याचे आईवडील शेकोटीजवळ बसले असतील व अचानक गेलेल्या आपल्या मुलाबद्दल बोलत असतील . सणावर या घटनेचे सावट पडले असेल. लहानपणच्या आपल्या घराच्या जवळ येत असताना आपण एक “दुष्ट मूर्ख “ आहोत याची जाणीव त्याला झाली.
ही कविता रोबर्ट लुई स्टीव्हनसन यांची आहे व या कवितेचा शेवट ते असा करतात:
त्या अंधारात आणि थंडीत मी एकच विचार करत होतो
की मी घराजवळ जात होतो आणि माझे पालक वृद्ध होत होते.
घराची ओढ
वर्षातला हा एकच वेळ असा असतो की जो आपल्यात घराच्या उबेची आठवण करून देतो. ख्रिस्तजन्मदिन ही आशा प्रज्वलित करतो. आपल्या प्रिय जनांच्या सोबत आपण आनंदाने एकत्र बसलेले असतो – आपल्या मनात कितीही टीका असली तरी. सर्व निराशा, वादविवाद, एकटेपण यातून जात असताना आपल्या मनात जुन्या आठवणी घर करून असतात आणि त्याने आपल्याला आपलेपणाची जाणीव व सुरक्षितता वाटते. या आठवणी आपण आनंदाच्या म्हणून साठवून ठेवतो. दर वर्षी असे क्षण गोळा करण्याची आपण आशा करतो.
बागेमधून बाहेर घालवून दिल्यापासून मानवजातीला घराच्या ओढीने ग्रासून टाकले आहे. आपण घर सोडतो ते घर मिळण्यासाठी. पण ते नेहमी आपल्याकडून निसटून जाते. आपण घरी परतलो तरी ते पूर्वीसारखे कधीच नसते. आपली नवी नाती आपल्याला जुन्याची ओढ लावून जातात. जेव्हा भटकणारा कोणी अखेरीस घरी परततो तेव्हा त्याला घाव बसतो की; नाही, हे ते नाही. या आठवणीत जतन केलेल्या जागेपेक्षा पुढच्या किनाऱ्यावर एक चांगले घर आहे. आपण त्याची स्वप्ने पाहू शकतो. पण तिथे कसे जायचे हे आपल्याला ठाऊक नाही.
या ख्रिस्तजन्मदिनी मला सुचवायला आवडेल की या आपल्या इच्छेमुळे आपल्याला गव्हाणीकडे ओढून आणले जाईल. कारण तेथेच आपले खरे घर आले यासाठी की आपल्या सर्वांना तिथे एकत्र जमवावे. तो जो आपल्या ह्रदयाचा मायदेश आहे त्याने आपल्या एकाकी बंदिवासामध्ये, पडलेल्या, नाश झालेल्या देशात वास्तव्य घेतले. देवाचा पुत्र आपल्याला घेऊन जाण्यासाठी आला यासाठी आपल्याला त्याच्या पित्याबरोबर व पवित्र आत्म्याबरोबर पुन्हा सहवास मिळावा.
सोनेरी धागा पकडा
अगदी बालक आणि तरुण मुलगा असतानाही येशू, जे लोक देव आणि त्याच्या गौरवाला जाणून घेण्याची उत्कंठा करत होते त्यांच्यापर्यंत तत्परतेने पोचला. मग ते जवळच्या शेतातले मेंढपाळ असोत किंवा दूर देशातले मागी असोत. ज्यांना विश्वासाचे डोळे होते त्यांच्यासाठी त्या बाळंत्याने गुंडाळलेल्या बाळाला पाहून प्रवास संपला होता. त्या पहिल्या भक्तांसाठी देहधारण करण्यामध्ये देवाच्या पुत्राने खरे मानवत्व स्वत:चे म्हणून घेतले होते (इब्री २:११).
हे बाळ म्हणजे जो त्र्येक देव त्याने आपल्याशिवाय नसणे हे नाकारले. येशू आपल्यावर किती महान प्रीती करतो हे पाहून आपण त्याला ओळखावे , त्याच्याशी नाते स्थापावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी अशी त्याची इच्छा आहे. मरीयेने कवटाळलेल्या येशूला पाहून आपण आश्चर्य करावे की, देवाचा पुत्राने स्वत:ला आपल्याशी किती जोडून घेतले. जे विश्वासाने त्याच्याशी जोडले जातात त्या आपल्याला गोळा करून पित्याला सादर करावे यासाठी तो आला. यामुळे त्याच्या पहिल्या येण्यापासून हा देवाचा पुत्र “पुष्कळ पुत्रांना गौरवात” आणत आहे (इब्री २:१०).
ख्रिस्तामध्ये आता आपण घराची चव घेऊ शकतो जरी आपण सध्या त्याच्या पूर्ण येण्याची वाट पाहत आहोत.
देहधारणाच्या आश्चर्यकारक घटनेशी निगडित असे एक अभिवचन आहे जे देवाने प्रारंभापासून त्याच्या लोकांना दिले. आपल्याला एदेन बागेतून घालवून देण्यापूर्वीच त्र्येक देवाने आपल्याला घरी परत कसे आणायचे याची योजना केली होती. या खंबीर प्रीतीच्या अभिवचनचा करार उत्पत्ती ते प्रगटीकरणातून आपण पाहतो. “मी तुमच्यामध्ये वावरेन; मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल” (लेवी २६:१२). हाच सोनेरी धागा अनेक परिच्छेदातून गेलेला आपण पाहू शकतो (उत्पत्ती ७:७; निर्गम ६:७; यिर्मया ३१:३३-३४; यहेज्केल ३७:२७; २ करिंथ ६:१६; इब्री ८:१०; प्रकटी. २१:३) . अगदी जवळीकतेने आणि सुटकेच्या मार्गाने आपला त्र्येक देव सिद्ध करतो की तो आपले घर तयार करत आहे आणि अखेरीस आपण थेट त्याच्या बरोबर राहू. तेथे दु:ख व उसासे नाहीत तर फक्त त्याच्याशी सहभागिता – तीही अनंतकाळ.
आपल्या अंत:करणाच्या घरात
कित्येक शतकानंतर जेव्हा “काळाची पूर्णता झाली” (गलती ४:४) तेव्हा देवाने आपल्या ह्या हाकेला येशूच्या येण्यामध्ये उत्तर दिले. देवाच्या पुत्राला आपल्याबरोबर असण्याची इतकी इच्छा होती की त्याने रक्त मांसाचा देह घेऊन आपल्यामध्ये वस्ती केली (योहान १:१४). जेव्हा जेव्हा या बातमीवर विश्वास ठेवला जातो तेव्हा पवित्र आत्मा त्या अंत:करणात देवाच्या घरी असण्याची ही हाक घालतो (गलती ४:६). त्याच्या पूर्ण येण्याची अपेक्षा करत असतानाच आपल्याला त्याच्या सान्निध्याची चव घ्यायला मिळते. जसे काही हा त्र्येक देव आपल्याला म्हणतो, “ मी तुझा देव आहे आणि तू माझे मूल आहेस. तू आता कोठेही असलास आणि कशातून ही जात असलास तरी तू माझ्याकडे घरी येशीलच. कारण अखेरीस मी सर्व काही नवे करतो.”
हा येशू जो आपल्यामध्ये आला तो वाढून पुरुष झाला आणि त्याला “पाप्यांचा मित्र” म्हणत. ते म्हणणारे त्याचा अपमान करण्यासाठी म्हणत, पण आपल्याला समजते की आपल्या उद्धारकासाठी ते मोलवान शीर्षक आहे. मानवता स्वीकारून येशू आपला भाऊ झाला. तरीही तो असा मित्र आहे की “तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो” ( नीति १८:२४). तो आपले ह्रदय आहे. खरा घर तयार करणारा आहे. या सणाच्या वेळी हे बालक, हा आमच्या बरोबरचा देव याचे आमच्यावर इतके प्रेम आहे की त्याचे घर त्याने आपल्यापर्यंत आणले आहे याची आठवण आपण करू या. मग आपली गाणी अधिक अर्थपूर्ण रीतीने आपण गाऊ शकू. त्याची उपासना करताना आपण त्याच्यावर अधिक प्रेम करू शकू. त्याच्या जन्माच्या सर्व गोष्टी आपण वाचू शकू. त्याचे घर तयार करण्याचे सर्व सोनेरी धागे आपण शोधून वाचू. आणि भारावून जाऊन त्याचे वचन रोज आणि रोज पाळण्याचे पारितोषिक आपण त्याला वाहून टाकू. अशा लोकांना येशूने अभिवचन दिले आहे. “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू” (योहान १४:२३).
ही घरी जाण्याची ओढ आपल्या या जगातील सर्व दिवस त्याला हाक मारायला लावील. पण ही हाक आपल्याला कोठे घेऊन जाणार हे समजल्यावर आपण त्याच्यापासून दूर जाणार नाही. कारण आपल्याला ठाऊक आहे की आपल्याला एक मित्र आहे. आपला भाऊ येशू, ज्याने आपल्या घरी जाण्याचे तिकीट सुरक्षित केले आहे. त्याचा आत्मा आता आपल्यामधून गातो. घरी जाण्याचे हे गीत आपल्याला इतर प्रवाशांशी जोडते आणि त्यांच्याबरोबर आपली गाढ सहभागिता होते जी आपण पूर्वी कधीही अनुभवलेली नसते.
“पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे!” आपले इथले घर मोडले गेले आहे आणि आपल्यासाठी पुन्हा बाग उघडली गेली आहे.
Social