दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

हजार छोट्या परीक्षा

स्कॉट हबर्ड

जेव्हा मी कामावरून परतलो आणि किचनमध्ये गेलो तेव्हा मला जाणवले की मी एकटा नव्हतो. क्षणभर मी घुटमळलो, मग मला सावरून मी लाईट उघडले. आणि ते तिथे होते, सर्व दिशांनी माझ्याकडे पाहात. भांडी. सिंकमध्ये कप वाट पाहत होते काही अजूनही दुधाने अर्धे भरलेले. किचनचे टेबलावर पडलेले प्लेट्सचे ढीग – बटर आणि सॉसने खरकटलेले. माझ्या रुममेटच्या खाटेखाली एक बाऊल एकटाच जमिनीवर पडलेला, एक महिन्याच्या कैदेच्या खुणा दाखवत.

पटकन जेवण करून संध्याकाळी वाचत पडण्याच्या आशेने मी आलो होतो पण आता ती मावळून गेली. माझ्या रस्त्यात अडथळे होते. माझी बॅग बाजूला टाकून देऊन मी साबण घेतला. भांडी घासताना मी माझ्या खोलीतली खुर्ची आणि वाट पाहत असलेले पुस्तक याची स्वप्ने पाहत होतो. माझ्या आठ रुममेटविरुध्द मी एक मूक वाद घातला. मी उसासे सोडले, पुटपुटत राहिलो, मनात उगाळत बसलो.
आणि काही काळासाठी मी मुख्य मुद्दाच पूर्णपणे गमावला होता.

आमच्या नाना परीक्षा

जर प्रेषित याकोब मी जेव्हा लाईट लावले तेव्हा माझ्यासोबत किचनमध्ये असता तर त्याने माझ्याकडे वळून म्हटले असते. “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो” (याकोब १: २-३).
आपल्यापैकी अनेक जण परीक्षा याचा सबंध आपत्ती-उत्पाताची संकटे याच्याशी लावतात, जी तुम्हाला खांदे धरून पकडतात आणि जोरजोरात हलवतात. पण याकोब या संकटांचे वर्णन कसे करतो ते पाहा. प्रथम तो त्यांना ‘नाना प्रकारच्या परीक्षा’ असे म्हणतो. आपण वर्षभर चालणाऱ्या तसेच पाच मिनिटांच्या परीक्षांना तोंड देतो. आपल्याला रडवणाऱ्या परीक्षा आणि आपले डोळे फिरवणाऱ्या समस्या. आपल्या पायांना लाथ घालून पाडणाऱ्या परीक्षा आणि आपले पाउल तुडवून जाणाऱ्या समस्या,  आपण मोठ्या परीक्षांना आणि छोट्या परीक्षांना तोंड देतो- नाना प्रकारच्या परीक्षा.
दुसरी गोष्ट म्हणजे याकोबाच्या मनात असलेल्या परीक्षांची परिणती “तुमच्या विश्वासाची परीक्षा” होण्यामध्ये होते. कॅन्सरचे निदान तुमच्या विश्वासाची परीक्षा करते.  उधळे मूल तुमच्या विश्वासाची परीक्षा करते. अविश्वासू जोडीदार तुमच्या विश्वासाची परीक्षा करतो. ट्रॅफिक जाम तुमच्या विश्वासाची परीक्षा करतो. तुमच्या नाना प्रकारच्या परीक्षेतील प्रत्येक परीक्षा  मोठ्याने किंवा कुजबुजत विचारते, “या क्षणी तुम्ही देवावर विश्वास ठेवणार का, की तुमच्या स्वत:च्या मार्गाने जाणार?”
परीक्षा हा शब्द फक्त आपत्ती व संकटे यासाठी वापरला जातो असे नसून तो छोट्या दररोजच्या त्रासांसाठीही वापरला जातो, जे तुमच्या विश्वासावर बोट रोवतात.

शेवटपर्यंत धावा

याकोबाची आज्ञा छोट्या परीक्षांबाबतच्या आपल्या साध्या कल्पनेला तोंड देण्यास लावते. आपण थांबून बायबलनुसार तर्क काढला नाही तर सर्दी, ट्रॅफिक जाम हे आपल्याला निव्वळ निराशा वाटतील. असले तापदायक प्रसंग ख्रिस्तासारखे होण्याच्या भव्य रचनेत नक्कीच बसणार नाहीत, खरे की नाही?

कल्पना करा की मॅरॅथॉन धावण्यासाठी तुम्ही सराव करत आहात. तुम्ही तुमच्यासाठी एक वैयक्तिक प्रशिक्षक लावलेला आहे. त्याला तुमच्या सर्व मर्यादा व या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लागणारी पातळी माहीत आहे. तो तुम्हाला सकाळी चार वाजता धावण्यासाठी उठवतो. तो तुम्हाला उठाबशा काढायला, व्यायाम करायला व धावायला लावतो. तो तुमच्या हातातली प्रत्येक मिठाई काढून घेतो. आणि जरी तुमचे दुखरे स्नायू तुम्हाला कधीच आवडत नसतील तरी तुमच्या प्रशिक्षणाच्या प्रत्येक टप्प्याला तुम्ही आठवण कराल की: माझा प्रशिक्षक काय करत आहे हे त्याला माहीत आहे. ही वेदना माझ्यामध्ये सहनशक्ती निर्माण करत आहे.

आता खऱ्या तुमच्याकडे पुन्हा वळू या. तुम्हाला जरी धावपटूसारखे वाटत नसले तरी तुमच्यापुढे  एक शर्यत आहे (इब्री १२:१). तुम्हाला इच्छांना नकार द्यायचा आहे, मोहांपासून दूर पळायचे आहे आणि त्या सैतानाला विरोध करायचा आहे. तुम्हाला लोकांवर प्रेम करायचे आहे, बोलण्यासाठी कृपा हवी आहे आणि साध्य करण्यासाठी काम आहे. जर ही शर्यत तुम्ही शेवटापर्यंत धावणार असाल तर तुम्हाला टिकाव धरण्याची गरज आहे. तुम्हाला अशा खंबीरतेची गरज आहे की तुमचे पाय काही दशके पुढे जात राहतील. तर देव तुम्हाला असे खंबीर कसे करील? दर दिवशी तुम्हाला डझनभर गैरसोयींतून नेऊन.

तुम्ही डॉक्टरच्या ऑफिसमध्ये तुमच्या भेटीची वेळ संपून तास झाला तरी खंबीरतेने थांबण्यास तो तुम्हाला धीर देईल. जेव्हा एखादा कठीण प्रकारचा मित्र तुमच्या झोपेच्या वेळी आताच बोलायची गरज आहे असे म्हणतो तेव्हा तो तुम्हाला प्रीतीने खंबीर करील. तुम्ही घरी जाण्याच्या अर्ध्या रस्त्यावर असताना धो धो पाऊस पडू लागतो तेव्हा तो तुम्हाला आनंदाने खंबीर करील. आणि जोपर्यंत या खंबीरपणाचा परिणाम, “तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त” (याकोब १:४) होईल तोपर्यंत तो थांबणार नाही.

ज्या छोट्या परीक्षांना आज तुम्ही तोंड देता त्या काही निव्वळ अपेक्षाभंग किंवा वैताग नाही. ते येशूसारखे अधिक होण्यासाठी तुमच्या पित्यापासून आलेले आमंत्रण आहे. तुमच्या विश्वासाला लागणारा हा व्यायाम, अचूक व योग्य आकारात व प्रमाणात दिला गेला आहे. गौरवासाठी  तुम्ही लायक बनावे यासाठी तो देवाचा मार्ग आहे.

सर्व दु:ख माना

म्हणून जेव्हा नाना प्रकारे आपली परीक्षा होते तेव्हा आपण दोहोपैकी एक मार्ग घेऊ शकतो. याकोब म्हणतो त्याप्रमाणे आपण “या सर्वात आनंद मानू शकतो” किंवा आपण हे सर्व दु:ख  मानू शकतो.

एका हाताला आपण हे सर्व दु:ख मानू शकतो. आपण सोयीस्करपणे स्वत:ची कीव करू शकतो व मूकपणे आपल्या परिस्थितीविरुद्ध संताप करू शकतो. किंवा आपल्या दुर्दशेची कहाणी आणखी एका कानावर टाकू शकतो.
हा मार्ग प्रथम समाधान देणारा वाटेल. आपला राग काही क्षण आपण शमवू शकू. पण हा मार्ग आपल्याला बदलून टाकेल. प्रत्येक परीक्षा आपला एक टवका काढील व आपल्याला कुरकुर करणाऱ्या असमाधानी प्रतिमेचा आकार देईल. आपण कुरकुर करण्यास अधिकाधिक प्रवृत्त होऊ. संकट आणि दु:ख आपले मन दुखावेल जसे काही सुलभ जीवन जगण्याच्या आपल्या हक्कावर ते अतिक्रमण करत आहे. आणि जेव्हा मोठ्या परीक्षा येतील तेव्हा त्या आपल्याला पाण्यावरच्या लकडीसारखे हिंदकळत  ठेवतील.

सर्व आनंद माना 

दुसऱ्या हाताला आपण हे सर्व आनंद मानू शकतो. आपल्याला चीड आणणाऱ्या जाणीवा आपण पकडू शकतो. देव आपल्या क्षुल्लक परीक्षेत कार्यरत आहे अशी आठवण करून आपल्या निराशेचे आपण प्रार्थनेत रूपांतर करू शकतो.

हा मार्ग प्रथम वेदनामय वाटेल. प्रथम आपल्या डोक्यातील काही मोठे आवाज आपण मूक करायला हवेत. पण हा मार्ग आपल्याला बदलूनही टाकील. प्रत्येक परीक्षा आपला टवका काढील, आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेचा आकार देत. जेव्हा आपल्याला व्यत्यय येईल तेव्हा दयाळू, दोष लावला असताना शांत, आपल्याविषयी गैरसमज झाला असताना सहनशील, प्रत्येक क्षण कृतज्ञतेने स्वीकार करण्यास आपण उद्युक्त होऊ. आपल्या लढ्यामध्ये संकटे व दु:खे यांना आपण पवित्रतेसाठी असलेले मित्र म्हणून स्वीकारू. आणि जेव्हा मोठ्या परीक्षा येतील तेव्हा त्या आपल्याला हादरवून टाकतील पण आपल्या ठिकऱ्या पाडणार नाहीत.

आणि नाना प्रकारच्या आपल्या परीक्षांमध्ये वाटेवर आनंद करत आपण शेवट गाठू.

Previous Article

नव्या वर्षासाठी आठ प्रश्न

Next Article

आशीर्वादित म्हणजे काय?

You might be interested in …

मानव होणारा राजा     जॉन मॅकआर्थर

  येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापूर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरीया व योसेफ हे बाळ घेऊन दुसऱ्या देशात […]

तुमच्या मुलांना तुम्ही कोणत्या झाडाबद्दल सांगणार? लेखक : पॉल ट्रीप

उजेडण्यापूर्वी जेव्हा आम्ही अंधारात बसायचो तेव्हाचे ते क्षण माझ्या कुटुंबाला खूप आवडायचे. दरवर्षी माझी मुले माझ्यामागे लागायची की आपण ते कधी करणार?  एकमेकांमध्ये ती चर्चा करायची की ते किती मोठे असणार आहे? मग आम्ही मुलांना […]

पवित्रतेची सुरुवात येशूच्या जवळीकतेमधून होते

स्कॉट हबर्ड पापाशी झगडा करताना, विश्वासासाठी युद्ध करतांना कधीकधी मला वाटते की पवित्रतेचा पाठलाग काही समीकरणानी  मिळाला असता तर! [क्ष मिनिटांचे बायबल वाचन] + [य मिनिटांची प्रार्थना] x [ आठवड्यातले झ तास] = पवित्रपणा आणि […]