जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुम्हाला निर्माण केल्याचा देवाला पस्तावा होतो का?

जॉन पायपर

चॅड चा प्रश्न

पास्टर जॉन, मी नुकतेच उत्पत्ती ६:६ वाचले. तेथे लिहिले आहे “म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.” मला सतावणारा प्रश्न आहे मला निर्माण केल्याचा देवाला पस्तावा होतो का? मला ठाऊक आहे की आपण सर्व पापी आहोत आणि अनंतकाळच्या शिक्षेला पात्र आहोत. आणि आपण स्वर्गात आपल्या सत्कृत्यांनी नव्हे तर येशूच्या वधस्तंभांवरील कार्याद्वारेच जाऊ शकतो. तरीही देवाला आनंद देण्याची माझी इच्छा आहे आणि माझ्याबद्दल त्याला पस्तावा होत नाही अशी माझी आशा आहे. यावर कृपया प्रकाश टाकाल का?

उत्तर
चॅड, तुझ्या प्रश्नामध्ये  खोल समस्या आहे. म्हणून याचे थेट उत्तर देण्यापेक्षा मी काही सत्ये तुझ्यापुढे ठेवतो. त्यावर मनन कर आणि त्यामुळे तुझे विचार बदलतील अशी आशा आहे.

त्याला आनंद देणारे लोक

तू मनन करावे असे पहिले सत्य म्हणजे देवाने त्याची मुले व्हावी म्हणून काही लोकांची काळापूर्वीच निवड केली. (त्यामध्ये तुझाही समावेश आहे) यासाठी की अनंतकाळ पवित्रतेत ते त्याचा आनंद घेतील या सौंदर्याचा अनुभव त्याने घ्यावा.

दुसरे सत्य म्हणजे तू देवाला निराश करणार की राग आणणार  हे देव पाहत बसत नाही. तर तो आपल्या सर्वसामर्थ्याने तुझ्यामध्ये व सर्व मंडळीमध्ये कार्य करतो. कसे तर आपण त्याला आनंद द्यावा म्हणून आपल्याला पवित्रतेत सुंदर करीत राहून.

ह्या दोन्ही गोष्टींवर मी भर देतो कारण त्यांचा विचार तुझ्या प्रश्नात नाही. देवाने तुला का निर्माण केले आणि त्याचे मूल होण्यासाठी तुला का निवडले याची पकड तू अजून घेतलेली नाहीस. आणि देवाच्या पवित्रीकरणाचा विचार तू आत्मसात केलेला दिसत नाही.

तुझा देवाबद्दलचा दृष्टिकोन असा दिसतो की – आता मी चूक करीत असेन. तुझ्या विचारातली चूक म्हणजे तू स्वतंत्र आहेस व तू तुझ्यावर राज्य करतोस आणि देव निष्क्रियतेने तुला पाहत आहे आणि जे काही तू स्वत:चे करणार आहेस त्यामळे एकतर त्याला राग येईल, निराश होईल, पस्तावा करेल किंवा आनंद होईल आणि हे सर्व तू कोणत्या मार्गाने जातोस त्याच्यावर अवलंबून आहे. हे वास्तवाचे विकृत चित्र आहे, बायबल असे शिकवत नाही.

देव तुझ्यासाठी गातो व आनंद करतो

आता पहिले सत्य : पहिले सत्य म्हणजे देवाने त्याची मुले व्हावी म्हणून काही लोकांची काळापूर्वीच निवड केली.  यासाठी की अनंतकाळ पवित्रतेत  ते त्याचा आनंद घेतील या सौंदर्याचा अनुभव देवाने घ्यावा.

 स्तुती करण्यासाठी पूर्वीच नेमले

इफिस १:५,६ पासून सुरुवात करू या. “ त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.  ‘त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी’ म्हणून हे झाले” (इफिसकरांस पत्र १:६).

देवाची इच्छा आहे की त्याचे स्वत:चे कुटुंब असावे – अशी मुले की ती  त्याच्यासाठी जगतील.
आता हे सत्य नीट रुजू दे. तुम्हाला आणि मला म्हणजे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने युगापूर्वीच त्याची प्रिय मुले म्हणून  नेमले. यासाठी की त्याच्या कृपेचा आनंद आपण घ्यावा. तर त्याची मुले त्याला कशासाठी हवी आहेत? त्यांनी त्याची कृपा मिळवावी आणि त्याची स्तुती करून या कृपेचा आनंद घ्यावा. आपल्याला घेण्यामध्ये  आनंद मिळतो, त्याला देण्यामध्ये गौरव मिळतो. 

हे आपल्याला इफिस २: ५,७ कडे नेते. “जेव्हा आपण आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होतो तेव्हा त्याने ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले… ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या आमच्यावरील ममतेच्याद्वारे येणार्‍या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी.”

त्याने आपल्याला अगाऊच नेमले, निर्माण केले, विश्वासात आणले यासाठी की त्याने या युगामध्ये आपल्यावर दया करून कृपेचा वर्षाव करावा. याचा परिणाम आपण त्याच्या कृपेची स्तुती करत आनंद घ्यावा आणि आपण जो आनंद घेतो त्यामध्ये त्याला आनंद होतो. हाच विचार देव यिर्मया ३२: ४०-४१ मध्ये मांडतो.  “ मी त्यांच्याशी सर्वकाळचा करार करीन; तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही; मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते माझ्यापासून माघार घेणार नाहीत.”  तो आपल्यापासून फिरत नाही व आपल्याला त्याच्यापासून फिरू देत नाही. “मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.”

आनंदाने उल्हासित

देवाला प्रेम करण्यासाठी, आनंद करण्यासाठी लोक हवे आहेत. ते त्याच्यापासून कधी फिरणार नाहीत याची दक्षता तो घेईल. तो त्यांच्यापासून कधी फिरणार नाही. तो त्यांचे सर्वदा चांगलेच करील. आणि हे सर्व तो संपूर्ण ह्रदयाने आणि जिवाने करील. सफन्या ३:१७ म्हणते, “परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.”

देव तुम्हाला शुद्ध करतो आणि सुंदर करतो

आता मननासाठी हा दुसरा मुद्दा. देव बाजूला उभा राहून तू त्याला निराश करतो चिडीला आणतोस की काय हे पाहत बसत नाही. तर तो सर्वशक्तीने तुझ्यामध्ये व सर्व मंडळीमध्ये कार्य करतो. ते म्हणजे तुम्हाला पवित्रतेत सुंदर करावे म्हणजे तुम्ही त्याला आनंद देण्यास पात्र बनाल.

त्याच्यासाठी पवित्र

हा मुद्दा मला यहेज्केल ३६: २६-२८ मध्ये दिसतो.  “मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल, आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल.”

देव निष्क्रिय बसून तुम्ही सगळे बिघडवता की काय हे पाहत नाही म्हणजे त्याला  मान्यता अथवा निराशा, राग, पस्तावा असा प्रतिसाद देता येईल. तो इब्री १३:२०-२१  मध्ये काय म्हणतो?

“आता ज्या शांतीचा देव… आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.” त्याला युगानुयुग गौरव कारण त्याच्या दृष्टीने जे योग्य ते काम तो आपल्यामध्ये करतो. तो आपल्यामध्ये त्याची इच्छा करण्याचे काम करतो. “आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली”  (इफिस २:१०). तो त्याच्या आनंदासाठी आपल्याला सुंदर करीत आहे.

परत पाप करू नये म्हणून वाचवले

आता हे अद्भुत सत्य ऐका. “ ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी” (इफिस ५:२५-२७).

यासाठीच येशू मरण पावला – जसे आपण देवामध्ये आनंद घेत राहतो तसे आपण पवित्रपणात आनंद  घ्यावा म्हणून. देवाला त्याचे कुटुंब हवे आहे.  एक वधू – त्याच्या पुत्राकरता, आणि त्याच्यासाठी एक कुटुंब. तो तिला स्वत:च्या आनंदाकरिता सुंदर बनवत राहतो तसेच आपण पवित्रतेत त्याच्यामध्ये आनंद घ्यावा म्हणून. त्यासाठी त्याने आपल्याला निवडले. त्याने आपल्याला निर्माण केले, आपल्याला बोलावले. त्याने आपल्याला विश्वास दिला, आपल्याला दत्तक घेतले. तो आपल्यामध्ये कार्य करत आहे. ह्या  भव्य  कुटुंबाचा  सर्वात महान आनंद देव होईपर्यंत तो त्याला राखील व आपल्यामध्ये आनंद करील.

चॅड, या सत्यावर मनन कर. जर तू ती कवटाळलीस व त्यामध्ये आनंद केलास तर सर्व काही बदलेल.

Previous Article

डॅा. ॲलेक्झांडर डफ

Next Article

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

You might be interested in …

मी ख्रिस्ताच्या पूर्णपणे स्वाधीन आहे का?

जॉन पायपर मरियाचा प्रश्न – पास्टर जॉन मी ख्रिस्ताच्या  पूर्णपणे स्वाधीन आहे का नाही  हे मला कसे समजेल? उत्तर – या प्रश्नाचे उत्तर देताना मरिया जे ध्येय व्यक्त करते तेथून सुरुवात करू या, ते म्हणजे […]

ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का? लेखक: ए डब्ल्यू पिंक

 ए डब्ल्यू पिंक यांनी दिलेला सुवार्ता संदेश   ख्रिस्त तुमचा “तारणारा” आहे का? हा प्रश्न आम्ही विचारत नाही. पण तो खरोखर तुमचा प्रभू आहे का? जर तुमचा तो प्रभू नसेल तर तो तुमचा “तारणारा” नक्कीच नाही. […]

ख्रिस्ताचं मन : फिलिपै २:५ (।)

 “ असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो.” फिलिपै २:५ वर्षातून एकदा येणाऱ्या दु:खसहनाच्या सणात वधस्तंभाच्या आठवणींची शांत सावली पडलेली असून मन:शुद्धी व मन:शांती प्राप्त करण्याची जणू वर्षातून एकदा देव ही विशेष संधी […]