जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुझा हात तोडून टाकून दे

जॉन ब्लूम

देवाच्या पवित्रतेची जाणीव गमावणे हे आध्यात्मिक दृष्टीने धोक्याच्या ठिकाणी असल्याचा इशारा आहे.

बाहेरून सर्व काही व्यवस्थित  दिसत असेल: आपली कुटुंबे चांगली असतील. आपल्या सेवा फोफावत असतील. आपल्याला प्रतिष्ठा  मिळत असेल आणि आपली आध्यात्मिक दाने आपण सामर्थ्याने वापरत असू. पण आतमध्ये आपण भटकत असू शकतो.

बाहेरील घटना आपल्या आध्यात्मिक आरोग्याचे खरे दर्शक नसतात. आपल्या आध्यात्मिक स्थितीशी संबंध नसलेल्या कारणांमुळे आपल्या कुटुंबामध्ये अथवा सेवेमध्ये आपण झगडतो आणि त्या बाबी बिघडल्या जातात. इतिहासामध्येही अशा स्त्री पुरुषांची उदाहरणे आहेत की त्यांनी आपली आध्यात्मिक दाने काही काळ मोठ्या सामर्थ्याने वापरली – परंतु त्याच वेळी ते घोर पापात गुंतलेले होते. त्याशिवाय आध्यात्मिकतेला उतरती कळा लागल्याचे बाह्यगोष्टी सहसा सुचवत नाहीत. जेव्हा ही उतरती कळा दिसू लागते तेव्हा ती बऱ्याच गंभीरतेला पोचलेली असते.

कशाकडे लक्ष द्यायचे

आपण लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे देवाच्या पवित्रतेची जाणीव.

मी येथे आपले देवाच्या पवित्रतेचे ज्ञान याच्याबद्दल बोलत नाही. आपल्याला उतरती कळा लागली असतानाही आपण याबद्दल खात्री देऊ शकतो व शिकवूही शकतो. जेव्हा आपल्याला देवाचे खरेखुरे भय असते तेव्हाच आपल्यासाठी देवाच्या पवित्रतेचा सिद्धांत खरा होतो. आणि ह्याचा एक स्पष्ट पुरावा म्हणजे पापाची भीती वाटणे. देवाच्या पवित्रतेच्या जाणीवेच्या कमतरतेमुळे पापाच्या पापीपणाच्या जाणिवेची कमतरता उत्पन्न केली जाते. जेव्हा देवाची भीती नसते तेव्हा पापाची भीती नसते.

पूर्ण भयानक सत्य

मत्तय १८व्या अध्यायाचे वाचन आपल्याला विचार करायला लावते. पापाच्या अत्यंत भेसूर परिणामाबद्दल येशू अत्यंत गंभीर होतो. आणि तो असे म्हणतो: “अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार! अडखळणे तर अवश्य होणार; परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार! तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळवत असेल तर तो तोडून फेकून दे; दोन हात किंवा दोन पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे ह्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे; दोन डोळे असून अग्निनरकात पडावे ह्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे (१८:७-९).

आठव्या वचनातील  सार्वकालिक अग्नी हे शब्द पाहा. सर्व मंडळीच्या इतिहासभर काही लोकांनी खात्री दिली आहे की कोणत्यातरी प्रकारे अखेरचे वैश्विक तारण सर्वांसाठी साधले जाईल किंवा जे हरवलेले आहेत त्यांचा संपूर्ण जळून नाश होईल. पण मंडळीच्या संपूर्ण इतिहासात प्रसिद्ध आणि विश्वसनीय ईश्वरविज्ञानतज्ञ यांनी खात्रीपूर्वक सांगितले आहे की तसेच  येशू आणि त्याचे शिष्य यांनीही नरकाविषयी असे शिकवले की नरक ही अनंतकालिक, जागरूक अवस्थेतील शिक्षा आहे. हे शब्द एक भयंकर सत्य आहेत.

रूपक आहे परंतु अतिशयोक्ती नव्हे

मी ‘अत्यंत भेसूर’ आणि  ‘भयंकर’ असे शब्द वापरले ते अत्यंत काळजीपूर्वक व हेतुपूर्वक वापरले आहेत. नरकाचे, अनंतकालिक मरण आणि पापाचे वेतन यांचे वर्णन करण्यासाठी हेच शब्द समर्पक आहेत. कोणालाच याचा अनुभव घ्यायला नकोय. आणि पापाचा दास असलेला व पुत्राने स्वतंत्र न केलेला प्रत्येक जण ह्याचा  प्रत्यक्ष अनुभव घेईल (योहान ८:३६).

म्हणूनच येशू हात कापून टाकून देण्याचे, डोळा उपटून टाकण्याचे रूपक येथे वापरतो. कमालीच्या सुटकेसाठी कमालीच्या धोक्याची सूचना. होय. तोडून टाकण्याची कल्पना हे रूपक आहे पण ती अतिशयोक्ती नाही. हे रूपक आहे हे आपल्याला समजते कारण अक्षरश: हात किंवा डोळा गमावून पापाच्या मूळ कारणापर्यंत पोचता येत नाही. पण अडखळण करणाऱ्या बाबी आपल्या जीवनातून मुळापासून आणि वेदनामय रीतीने तोडून टाकणे हाच या कपटी, फसव्या पापाच्या जाळ्यापासून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे.

आपली एखादी सवय, नाते, करिअर, काही वैयक्तिक सामर्थ्य वा आपल्याला अडखळण करणारी कोणतीही बाब आपण कापून टाकण्याची गरज आहे.  कारण त्या गोष्टी ठेवून आपला जीव गमावण्यापेक्षा जीवनात प्रवेश करणे चांगले आहे (लूक ९:२५).

प्रत्येक हात कापून टाका

जेव्हा आपण देवाच्या पवित्रतेची जाणीव गमावतो तेव्हा येशूने मत्तय १८ मध्ये दिलेली ही धोक्याची सूचना आपण सहजतेने घेतो. आपण म्हणतो की अशी सूचना दुसऱ्या कोणासाठी आहे. ती आपल्याला लागू आहे असा विचार गंभीरतेने आपण करीत नाही. शिवाय जगिक गोष्टींत गुंतून पडले आहेत असे इतर भाऊबहिणी पापासंबंधी बधीर असतात असा विचार आपण गंभीरपणे करत नाही.

आपण ख्रिस्ती परंपरेनुसार असलेल्या विश्वासाला धरून आहोत, आपले बाहेरचे जीवन व फलदायी काम दाखवून देते की आपण योग्य मार्गावर आहोत यामध्ये आपण कदाचित समाधान मानू. पण जर आपल्या गुप्त जीवनात आपण पाप चालवून घेत असू, तसेच त्याच्याशी संबंधित असलेली प्रार्थना आपण करत नसू, हरवलेल्या जिवांसाठी आपल्याला तातडीच्या गरजेची जाणीव नसेल तर ह्या सर्व गोष्टी सूचित करतात करतात की काहीतरी चुकले आहे. जर आपल्या खाजगी जीवनात देवाला पवित्र म्हणून आपण आदराने त्याची भीती बाळगत नाही तर आपण नाशाच्या मार्गावर आहोत जो आपला विध्वंस करील (मत्तय ७:१३). पापाचा उपभोग घेण्याची सवय हेच दाखवून देते की देव आपल्यावर राज्य करत नाही.

या प्राणघातक संसर्गासाठी येशू उपाय देत आहे: तुला अडखळण करणारा प्रत्येक हात कापून टाक. आणि हे तो खरेच सांगत आहे. “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका” (इब्री ४:७). कदाचित आपण अशा मार्गावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला असेल किंवा बराच काळ त्यामध्ये चालत असू. आपण देवाला विनवणी करायला हवी की तू काहीही कर पण माझ्या अंत:करणात प्रभूची भीती पुन्हा निर्माण कर.

जीवन निवडून घे

ख्रिस्ती व्यक्तीसाठी प्रभूची भीती ही प्रभूच्या आनंदाशी स्पर्धा करत नाही. त्याऐवजी ती प्रभूमधील आनंदाचा उगम आहे. यशयाने येशूसबंधी याचे भविष्य केले होते: “परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल” (यशया ११:३). येशूला पित्याची भीती बाळगण्यामध्ये आनंद होता, आणि आपणही ह्या आनंदाचा उपभोग घ्यावा अशी देवाची इच्छा आहे. कारण “परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते” (नीती १४:२७). आणि  “परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्‍यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील” (स्तोत्र २५:१४). “परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय” (नीती ९:१०). याउलट देवाची भीती गमावणे ही मूर्खपणाची सुरुवात आहे. प्रभूच्या भीतीचे पारितोषिक आहे अनंतकालिक जीवन (योहान ३:१६) आणि आनंदाची परिपूर्ती (स्तोत्र १६:११). भीती गमावण्याच्या मूर्खतेचे परितोषिक पूर्ण भयंकर आहे.

जेव्हा आपली प्रभूबद्दलची निरोगी भीती मावळत आहे असे तुमच्या लक्षात आले तर ती लगेच कृती करण्याची वेळ आहे. पश्चात्ताप करू या आणि प्रत्येक मूर्ख हात कापून टाकू या आणि अनुवाद ३०:१९ मध्ये म्हटल्यानुसार जीवन निवडून घेऊ या.

Previous Article

देवाने आपले मुख का बनवले

Next Article

बंडखोरीविषयी मुलांना ताकीद देणे

You might be interested in …

तुमची दाने तुम्ही पुरून ठेवली आहेत का?

जॉन ब्लूम तुम्हाला कृपादाने देण्यात आली आहेत. ती कोणती आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? ती किती अमोल आहेत ह्याची कल्पना तुम्हाला आहे का? त्याची योग्य गुंतवणूक करण्यासाठी देवाने ती तुम्हाला दिली आहेत. आणि त्यांचे […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

 संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १ बायबलमध्ये इतिहासाचे चार भाग असून त्यातील तीन भाग बायबलच्या कथानकात इतिहासाने अनुभवले आहेत. निर्मिती, पतन आणि तारण. चौथा पुनरुध्दाराचा भाग अजून पूर्ण व्हायचा आहे. त्यात अधर्माचा पराजय व देवाचे […]

आपल्या जीवनकाळात येशू पुन्हा येईल का? लेखक: स्टीफन विटमर

येशूच्या काळापासून लोक दावा करत आहेत की अखेरच्या दिवसातील घटना त्यांच्या स्वत:च्या दिवसातच होणार. १९व्या शतकात विल्यम मिलर नावाच्या एका बायबल पंडिताने येशू मार्च २१, १८४४ या दिवशी येणार असा दावा केला. तसे काही घडले […]