दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

विसाव्या वर्षी तुमचे जीवन कसे उद्ध्वस्त कराल?

जोनाथन पोकलाडा

आपले जीवन उद्ध्वस्त करण्याच्या योजना कोणीच करत नसते. अपयश हे आपले ध्येय कोणीच बनवत नाही किंवा नव्या वर्षासाठी तसा निर्णय घेत नाहीत वा पंचवार्षिक योजना बनवत नाहीत. लहान मुले आपण दारुडे होणार असे स्वप्न रंगवत नाहीत, विद्यार्थी शाळेला जाऊन दिवाळखोर कसे बनावे हे शिकत नाही. वर आणि वधू वेदीसमोर जाऊन आपला विवाह अपयशी होण्याची अपेक्षा करत नाहीत.

पण जीवने उद्ध्वस्त होतात – बऱ्याच वेळा. आणि ती होतात याचे कारण आपण केलेल्या निवडी. आपल्यावर अधिक परिणाम करू शकणाऱ्या निवडी बहुतेक आपल्या तरुणपणी केल्या जातात. त्यावेळी आपण निवडी करायला प्रौढ असतो पण तरीही  नाशकारक प्रभाव करू शकणारे ते निर्णय करण्यास आपण तसे लहानच असतो. दुसऱ्या शब्दांत हे निर्णय तरुण प्रौढांचे असतात.

अशा चुका करण्याचे आपण कसे टाळू शकतो? शलमोन राजाद्वारे देवाने दिलेले शहाणपण वाचायला सुरुवात करून.  शलमोन राजाला नंतरच्या जीवनात  मोठमोठी आव्हाने आली कारण त्याने स्वत:चेच सल्ले नाकरले. तरी तो पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वात सुज्ञ मनुष्य होता आणि देवाने त्याच्या नीतिसूत्रांच्या पुस्तकात सर्वोत्तम असे सल्ला मार्गदर्शन दिले आहे.

तुम्ही विशीचे असताना तुमचे जीवन उद्ध्वस्त करू शकतील अशा सात गोष्टी खाली दिलेल्या आहेत – त्या शलमोन राजाने दिलेल्या मार्गदर्शनाच्या विरुद्ध आहेत. त्याऐवजी तुम्ही काय करावे त्यासंबंधीचा निर्णयही पुढे दिला आहे.

१. तुम्हाला जे हवे ते करा.

माझ्या विशीमध्ये ह्या सर्वात मोठ्या लबाडीवर मी विश्वास ठेवला. मला वाटले की मला जे हवे ते मी करू शकतो व ते चालवून घेऊ शकतो/ दडवू शकतो. मी तरुण आहे आणि मी कुणाला दुखवत नाहीये. पण आता मी याउलट शिकलो आहे.

एक दिवस तुम्ही जे होणार आहात ते होण्याच्या प्रक्रियेत सध्या तुम्ही आहात. तुम्ही एक उत्तम जोडीदार, पालक, कर्मचारी आणि मित्र होण्यासाठी स्वत:ला तयार करत आहात. आता जे काही तुम्ही करत आहात ते तुम्हाला त्या मार्गापर्यंत नेईल.

“भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो” (नीती १४:१५).

निर्णय: तुम्ही काय करावे असे देवाला वाटते तेच करा.

२. तुमच्या कमाईहून अधिक जीवन जगा.

मी अशा शहरात राहतो की जेथे हवे तेवढे कर्ज उपलब्ध होते. पण जरी तुमच्या खिशाला परवडेल त्यापेक्षा तुम्ही अधिक पैसे उडवता तरी तुम्हाला ते भरावेच लागतात व परत त्यावरचे व्याजही. आता “चांगले जीवन” जगून तुम्ही खातरजमा करता की पुढे तुम्हाला कर्ज फेडत राहण्याचे वाईट जीवन जगावे लागणार आहे. आणि कित्येक दशके आर्थिक समस्यांच्या काळजीला तोंड द्यावे लागणार आहे. आज अनेक लोक कित्येक वर्षांपूर्वी घेतलेल्या अनुभवासाठी आता भरत आहेत, त्यांना मिळालेली “तत्काळची तृप्ती” सरून केव्हाच विसरून गेली आहे.

“धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो” (नीती २२:७).

निर्णय: तुमच्या कमाईपेक्षा कमी पैसे खर्च करा.

३. व्यसनाची पूर्ती करा.

मद्य, पैसा, ड्रग्ज, अश्लील फिती, शॉपिंग किंवा दुसरे इतर आकर्षण यापैकी कसल्या तरी प्रकारचे व्यसन बहुतेक लोकांना असते. ही व्यसने मृत्यू ओढवतात: प्रत्यक्ष मृत्यू किंवा नातेसबंधांचा मृत्यू, स्वातंत्र्याचा मृत्यू, आनंदाचा मृत्यू. व्यसने कशी लागतात? तुम्ही त्यांना पोसता. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पोसता तेव्हा ती वाढू लागते. व्यसनाला जितके अधिक पोसाल तितके ते बळकट होऊ लागते व ते थांबवणे अधिक आणि अधिक कठीण बनत जाते. सुज्ञ गोष्ट म्हणजे ते आताच थांबवणे, नंतर नाही.  प्रत्येक “ही शेवटचीच वेळ” ते अधिक कठीण करत जाते.

“सरळांची नीतिमत्ता त्यांना सोडवील, पण जे कपटाने वागतात ते आपल्या दुष्कृतीनेच बद्ध होतील” (नीती ११:६).

निर्णय: तुमची व्यसने उपाशी मारा.

४. मूर्खांची सोबत धरा.

सत्य: खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या लोकांची सोबत करता त्यांच्यासारखे तुम्ही होत राहता. असे म्हटले आहे की ज्या पाच लोकांबरोबर तुम्ही जास्त वेळ घालवता त्यांची सरासरी तुम्ही आहात. ते जे करतात ते तुम्ही करता (कारण तुम्ही ते एकमेकांबरोबर करता). तुम्ही त्यांच्या कल्पना व विश्वास कवटाळता आणि त्यांची भाषा व हावभाव तुम्ही शिकता.

यामुळे जर तुम्ही मूर्खाची संगत धरली तर तुम्ही मूर्खच होणार. पण जर तुम्ही जे येशूच्या मागे जाण्यास व आपल्या जीवनाने काही बदल घडवण्यास समर्पित आहेत अशा सुज्ञ लोकांची संगत धरली तर तुम्ही सुज्ञ व्हाल.

“सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो” (नीती १३:२०).

निर्णय: सुज्ञ लोकांबरोबर चाला.

५. हे जीवन केवळ माझ्यासंबंधीच आहे असे समजा.

या जगात जिवंत असलेल्या सुमारे ८०० कोटी लोकांपैकी तुम्ही एक आहात. आणि जरी तुम्ही विशेष आहातच तरी तुमच्याइतकेच जगातील इतर ८०० कोटी लोकही आहेत. तसेच जे कोट्यावधी लोक पूर्वी येऊन गेले आणि आता मृत आहेत आणि विसरले गेले आहेत तेही तितकेच विशेष आहेत. तुम्ही काही ह्या रंगमंचावर प्रमुख नट नाहीत. तुमचे चित्र काढले जात आहे जे फारच थोडके लोक ते पाहू शकतात आणि पडदा बदलला की ते विसरले जाईल. जे लोक स्वत:च्या जगात स्वत:ला फार मोठे समजतात ते कार्य करण्यास समर्थ नसतात. अन् जेव्हा ते हे जग सोडून जातात तेव्हा त्यांचे जगही दिसेनासे होते; त्यांनी काहीही खोलवर प्रभाव पडलेला नसतो. जर तुम्हाला महत्त्वाचे होऊन खोलवर प्रभाव पडायला हवा असेल तर देवासाठी जगा आणि तुमच्या जीवनाद्वारे इतरांची सेवा करा. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे येशू. त्याने आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावून स्वेच्छेने आपली सेवा केली. जगात आतापर्यंत जगलेल्या सर्वात समर्थ व्यक्तीने आपले सामर्थ्य सेवा करण्यासाठी वापरले (मार्क १०:४५; फिली. २:५-८). स्वत:च्या मृत्यूद्वारे त्याने आपली पापापासून सुटका केली आणि आपल्याला आपल्या जीवनाद्वारे इतरांची सेवा करायला जे सामर्थ्य लागते ते देऊ केले.

“गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय” (नीती १६:१८).

निर्णय: तुमच्या जीवनाद्वारे इतरांची सेवा करा.

६. ताबडतोब तृप्ती मिळण्यासाठी जगा

खरं तर मोलाच्या कोणत्याच  गोष्टी  ताबडतोब मिळत नसतात. ऑलिम्पिकचे धावपटू बनण्यास (किंवा केवळ सुदृढ शरीर कमावण्यासही), पदवी प्राप्त करण्यास, किवा एक चांगला नवरा किवा बायको होण्यास  वेळ आणि शिस्त लागते. आणि तुम्हाला मनापसून  हव्या असणाऱ्या लांब पल्ल्याच्या कित्येक गोष्टी जर तुम्ही क्षणभरच्या गोष्टीत गुंतून पडलात तर त्या तुम्हाला मार्गाबाहेर टाकतील. तुम्हाला सुंदर वैवाहिक जीवन हवे की एक विस्मयकारक रात्र? तुम्हाला ३६ वर्षांनंतर निवृत्त व्हायचे की ३६ महिने महागडी बाईक चालवायची? या प्रत्येक उदाहरणात दुसरी गोष्ट निवडल्यास पहिली गोष्ट मिळणे जवळजवळ अशक्य होते.

“सुज्ञांच्या घरात मोलवान वस्तू व तेल ह्यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवतो” (नीती २१:२०).

निर्णय: देवाच्या दृष्टीने जे उत्तम तेच निवडा.

७. कोणालाही जबाबदार राहणे टाळा.

आपल्या सर्वांची चुका करण्याकडे प्रवृत्ती असते किवा आपल्या स्वत:च्या अपयशाकडे कानाडोळा करणे किंवा आपण स्वत:ला बदलू शकतो अशी खात्री असते – जरी आपल्या जीवनात पूर्वी असे घडलेले नसते. म्हणूनच देवाने आपल्याला इतरांसोबत समाजामध्ये जगण्यासाठी निर्माण केले आहे. यामुळे आपण एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो, आपल्याला न दिसणाऱ्या चुका दाखवू शकतो आणि गरजेच्या वेळी मदत करू शकतो.

तुम्ही समाजाकडे जबाबदार राहण्यासाठी धावत जाता की त्याच्यापासून दूर पळता? लोक कोणाकडे जबाबदार होणे टाळतात कारण त्यांना चूक दाखवलेली आवडत नाही. याचा अर्थ त्यामुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत राहिले तरी त्यांना चालेल. जर तुम्हाला खरंच बदलायचे असेल, आणि देवाला रोजन् रोज प्रथम स्थान द्यायचे असेल  तर पहिली पायरी म्हणून एक गोष्ट प्रथम करा : ख्रिस्त केंद्रित समाज शोधा.

“ज्याला ज्ञान प्रिय, त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय” (नीती १२:१).

निर्णय: ही कोणतीच गोष्ट एकटे करू नका.

उद्या तुम्ही कोण होणार

लोक आपले जीवन उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेत नाहीत. आपल्याला एक मोठी नोकरी मिळावी किंवा उद्योगपती व्हावे अशी आशा आपण करतो. आपण एक महान आई, वडील, पती, किवा पत्नी व्हावे अशी आपली आशा असते. येशूसह आपण विश्वासूपणे चालणार अशी आशा आपण करतो. पण सर्व विश्वासू चालणे प्रथम एक विश्वासू पाउल टाकून सुरू होते. महान प्रौढ लोक हे विश्वासू तरुणांमधूनच निर्माण होतात.

तुम्ही कोणीतरी बनत आहात आणि आज जे निर्णय तुम्ही घेणार आणि पाळणार ते तुम्ही उद्या कोण बनणार याचा आकार घेतील. तुम्ही मोठे झाल्यावर कोण व्हावे असे तुम्हाला वाटते? तुम्हाला समजणार नाही इतक्या पटकन तुम्ही तशी व्यक्ती घडले जाला. आज तुम्ही काय करणार आहात?

Previous Article

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

Next Article

जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना

You might be interested in …

क्षमा करणे हे आध्यात्मिक युद्ध आहे

मार्शल सीगल आपल्या जीवनात गोंधळ आणि दु:ख होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या जिवाच्या शत्रूची किंमत आपण कमी करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यातील काहीजण सैतानाचा व त्याच्या हस्तकांचा विचारही करत नाही आणि केलाच तर त्यांचे […]

अपयशाला तोंड देतानालेखिका

 वनिथा रेंडल अपयशावर मी खूप विचार केला, विशेषकरून पुनरुत्थानानंतरच्या काही आठवड्यात. येशू जेव्हा वधस्तंभाकडे धैर्याने व सामर्थ्याने सामोरा गेला तेव्हा त्याच्या भोवतालची माणसे लज्जा आणि खेदाने व्यापून विरघळल्यासारखी झाली होती. जेव्हा मी माझ्या जीवनाकडे पाहते […]

रात्री उच्च स्वराने गा लेखक: स्कॉट हबर्ड

ख्रिस्ती लोक हे अशा प्रकारचे लोक असतात की ते मध्यरात्री गाणी गातात. जेव्हा पौल व सीला यांना मारहाण करून, रक्तबंबाळ करून, बेड्या घालून तुरुंगात डांबले होते तेव्हा तुरुंगातील इतर कैद्यांनी त्या कोठडीत त्यांना गाणी गाताना […]