नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्ताला समर्पण करण्याची मला भीती वाटते

जॉन पायपर

बिलीचा प्रश्न

पास्टर जॉन

“ मला ख्रिस्ताला संपूर्ण समर्पण करण्याची भीती वाटते.  “होय प्रभू, त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे” असं म्हणण्याच धाडस मला होत नाही. याचं कारण मला भीती वाटते की देव मला करायला नको अशी गोष्ट करण्यास भाग पाडेल. अशा माझ्या आध्यात्मिक स्थितीमध्ये काय चुकत आहे? ख्रिस्ताला अखेरीस समर्पण करण्याचा काही मार्ग आहे का? काही आध्यात्मिक अडथळ्यांकडे मी दुर्लक्ष करत आहे का? की मी केवळ मूर्खपणा करत आहे? की मी कठीण ह्रदयाचा आहे?

उत्तर

बिली, तुझी आध्यात्मिक स्थिती दाखवणारे अनेक आध्यात्मिक मार्ग आहेत त्यातला एकच मी सांगणार आहे. तो गंभीर आहे पण त्यातून सुटका मिळू शकते. म्हणून मी ह्या स्थितीचे स्पष्टीकरण करतो.

प्रत्येक वळणावर फसवणूक

तुझं हे  चुकले आहे की देवाबद्दल, त्याला  समर्पित  असण्याचा  अनुभव  आणि ख्रिस्ताला पूर्णपणे वाहून घेण्याचे जीवन म्हणजे काय यासंबंधी  तू फसला आहेस. “मी तुझा आहे, माझ्या पापापासून मला पूर्ण सुटका हवी आहे, आणि तुला गौरव देताना मला फलदायी व्हायचे आहे, म्हणून त्यासाठी तुला जे हवे ते कर अगदी माझे जीवनही घे” असे म्हणणे म्हणजे काय यात तू फसला आहेस. तुला भीती वाटते की असे म्हणण्याचे परिणाम तुला नको आहेत. तुझी भीती ही फसवणुकीवर आधारित आहे.

यामध्ये तू एकटा नाहीस. मी फक्त तुझ्याकडेच निर्देश करत नाही तर अशा इतर कोट्यावधी लोकांकडे सुद्धा. अशा रीतीने मानवी ह्रदय आणि सैतान एकत्रितपणे सर्वात  महान पवित्रता, ख्रिस्ताचे सर्वात महान गौरव, आणि सर्वात महान आनंद यापासून लोकांना दूर ठेवतात.

यशया १७: ९ म्हणते,  “हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?”     जेव्हा देव म्हणतो ह्रदय कपटी आहे तेव्हा तो आपल्याला आठवण करून देतो की ह्रदय हे पापाचे आसन आहे आणि पापाला केवळ फसवणुकीनेच सामर्थ्य आहे. पाप फक्त असेच कार्य करते. इब्री ३:१३ म्हणते, “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये.”  बिली, तू कठीणपणाचा उल्लेख केलास. अशाच रीतीने पाप कार्य करते.

दुसऱ्या प्रकारे असे म्हणता येईल की आपल्या पापी वासना ( इच्छा) आपली फसवणूक करतात. पौल म्हणतो,  “तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे” (इफिस ४:२२). तुम्हाला वासना (इच्छा)  आहेत – काहीतरी टाकून देण्यासाठी आणि काहीतरी कवटाळण्यासाठी – आणि त्या तुमची फसवणूक करतात.

ह्या फसवणुकीत आणखी भर म्हणजे बाहेरचे जगसुद्धा आपली फसवणूक करते. मत्तय १३:२२ आपल्याला   द्रव्याच्या मोहाचा धोका दाखवते. हा मोह  वचन गुदमरून टाकतो  आणि निष्फळ करतो. आणि मग असे लोकही आहेत जे आपल्याला फसवतात. “कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात” (रोम ६:१८). आणि मग या सर्वांमध्ये सैतानाचे फसवण्याचे सामर्थ्य घाला. त्याच्याबद्दल म्हटले आहे,  “सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान”  (प्रकटी १२:९).

बिली हे सर्व तुझ्याविरुद्ध आहेत. आणि तुझ्या  समर्पणाची भीती तपासून पहिली तर मी म्हणेन या फसवणुकीचे  सामर्थ्ये तुझ्या ख्रिस्तातील नव्या मनुष्याशी युद्ध करत आहे आणि ते तुझ्याशी लबाड बोलत आहेत. तुला फसवत आहेत. तू त्यांना तशी मुभा दिली आहेस आणि ती मागे घेण्याची गरज आहे. आणि ती तुला देवाच्या वचनाच्या व आत्म्याच्या सामर्थ्याने परत घेण्यासाठी मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

नाश करणारा खोटेपणा

तर कोणत्या फसवणुकीत तू अडकला आहेस? आणि या फसवणुकीच्या विरुद्ध असलेले सत्य कोणते? येशूने म्हटले,   “तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील” (योहान ८:३२). ह्या वचनाचा पापाशी संदर्भ आहे. सत्य तुला पापाच्या व फसवणुकीच्या बंधनातून मुक्त करील. तुला सत्य समजेल आणि लबाडीच्या  फसवणुकीच्या  बंधनातून तुझी सुटका होईल.

आणि ती फसवणूक अशी आहे : तुझा असा विश्वास आहे की जर  तू प्रामाणिकपणे म्हटलेस की, होय प्रभू मी काहीही करायला तयार आहे  तर देव तुला अशी गोष्ट करायला लावेल की जी  तुला मुळीच करायला नको.

आता सत्य असे आहे: जर तू प्रामाणिकपणे म्हटलेस की, “मी काहीही करायला तयार आहे आणि देवा, मला पवित्र करण्यासाठी आणि तुला गौरव देऊन फलद्रूप होण्यासाठी तू जे हवे ते कर.” तर देव तुला असे ह्रदय  देईल की जे तू करावे म्हणून त्याने पाचारण केले ते करण्याची इच्छा तुला होईल.

आता सध्या तुझ्या फसवणुकीत तू हे पाहू व भावू शकत नाही. तुला एवढेच दिसते की देवाचे पाचारण हे तुझ्या सध्याच्या इच्छांच्या विरुद्ध आहे.  हाच फसवणुकीचा अर्थ आहे. बहुतेक लोक आपल्या बंधनात अडकलेले आहेत. अशा इच्छांना पौल  कपटाच्या वासना  म्हणतो (इफिस ४:२२). या वासना तुझ्याशी खोटे बोलत आहेत. त्या सांगतात की समर्पण म्हणजे केवळ दु:ख व हाल. आणि ह्या लबाडीवर तू विश्वास ठेवत आहेस.

रोमहर्षक सत्य

आता सत्य हे आहे : “स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो” (मत्तय १३:४४). आता सर्वस्व विकणे हे जरी वेडेपणाचे दिसते आणि बिली, तुला जे करायला नको तेच हे आहे. आणि जेव्हा तुम्ही फसवले जाता तेव्हा ते मूर्खपणाचे  दिसते . परंतु येशूने म्हटले, जेव्हा देवाचे राज्य तुमच्या जीवनात सामर्थ्याने येते तेव्हा तुम्हाला जे दिसते ते इतके भव्य, सुंदर, किंमती असते की सर्व विकणे हे आनंदाचे होते.

पण फसवणुकीच्या बाजूला ते अत्यंत जड व भयानक दिसते. एका बाजूला फसवणूक आहे. हा कोण येशू आहे ज्याच्यासाठी मी माझे सर्वस्व विकावे?  आणि मग अकस्मात देवाचे राज्य येते आणि तुम्हाला मुक्त करते. आणि तुम्ही उद्गारता, “आता मला माझे इतर जे काही आहे ते पण द्यायला हवे. त्याची संपत्ती मला असणे ही जगातील सर्वात आनंदाची गोष्ट आहे. ही संपत्ती मिळवण्यासाठी सर्व संपत्ती विकणे म्हणजे काहीच त्याग नाही.” विकणे हे खेदाचे आहे या फसवणुकीपासून, राज्याचे सत्य आणि सौंदर्य यांनी तुम्हाला मुक्त केले आहे.

तर बिली, एका बाजूला सत्य आहे दुसऱ्या बाजूला लबाडी आहे. जर तू देवाला सर्वस्व अर्पण केले, पवित्र होण्यासाठी, त्याला गौरव देण्यासाठी आणि फलदायी जीवन जगण्यासाठी त्याला आनंद देणारे ते सर्व केले तर तू हताश होशील ही लबाडी आहे. सध्या तू ज्याच्यावर विश्वास ठेवतो ती जगातील पहिल्या क्रमांकाची लबाडी आहे. आणि सत्य हे आहे की पवित्र होण्यासाठी, त्याला गौरव देण्यासाठी आणि फलदायी जीवन जगण्यासाठी त्याला आनंद देणारे ते सर्व केले तर तो तुला अनंतकालिक संपत्ती देईल: येशू ख्रिस्त आणि त्याच्यामध्ये देव जे सर्व काही तुझ्यासाठी आहे त्याची संपत्ती या जगातल्या कशाहीपेक्षा जास्त आनंद देणारी आहे. आणि तो तुला असे ह्रदय देईल की ही संपत्ती तू लाभ असा मानशील – जरी त्याच्यासाठी तुला तुझे जीवन गमवावे लागले तरी.

Previous Article

 लोकांतरण व द्वितीयागमन १ व २ थेस्सलनी

Next Article

प्रभातसमयीचा हल्ला

You might be interested in …

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर                             अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण १६ भग्न शरीरे  (मार्क ५:७-८; १०: ३३-३४) ‘तुम्ही कधी शत्रूला ताब्यात घेतले आहे का?’ — ते कां कूं करत आहेत असे दिसले. मी […]

उधळ्या पुत्रांच्या पालकांसाठी सात उत्तेजने

जॉन पायपर प्रश्न पास्टर जॉन, वीस वर्षांच्या एका उधळ्या पुत्राची मी आई आहे. लूक १५ हा अध्याय मी पुन्हा पुन्हा वाचते. मी त्याचा खूप अभ्यास केला आहे. जर तुम्ही  अशा उधळ्या पुत्राच्या/ कन्येच्या  पालकांशी बोलला […]