दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अविश्वासाला एकट्याने तोंड देऊ नका

जॉन ब्लूम

आपल्या सर्वांनाच विश्वासासाठी आणि अविश्वासाविरुद्ध युद्ध करण्यासाठी इतर विश्वासू ख्रिस्ती जनांची गरज आहे -आणि आपल्यांतील बहुतेकांना हे माहीत असते. समस्या ही  आहे की, जेव्हा सत्यावर सर्वाधिक भरवसा ठेवण्याची गरज असते तेव्हाच त्याचा स्पष्टपणा गमावला जातो. ज्याची आपल्याला अधिक गरज असते तेच आपण बहुधा टाळतो.

पापी इच्छा, अवास्तव भीती,  हताश  व काळजी निर्माण करायला लावणाऱ्या शंका,  आणि निराशेचे सावट अशा सर्व गोष्टींना आपला वास्तवाचा दृष्टिकोन विकृत करण्याचे मोठे सामर्थ्य असते. पण जेव्हा आपण त्यांचा अनुभव घेत असतो तेव्हा त्या आपल्याला अगदी खऱ्या दिसतात. पापाची अभिवचने फार मोहक वाटतात. भीती आणि शंकेच्या दहशती भयानक वाटू शकतात. आणि निराश होण्याचा मोह टाळण्यास कठीण वाटतो. अशा प्रकारच्या स्थितींमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला विश्वास ठेवता येईल अशा सुज्ञ बहीण भावंडाची गरज असते जे आपल्याला खरे काय आणि खरे काय नाही हे सांगू शकतील.


पण जेव्हा आपण अशा स्थितीत असतो तेव्हाच आपल्याला आपल्यामध्ये काय चालले आहे हे कोणाला दिसू नये असे वाटते. आपल्याला माहीत आहे की शास्त्रलेख सांगतो, “जोपर्यंत ‘आज’ म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये” (इब्री ३:१३). पण जेव्हा यासाठीची आपली गरज नितांत असते तेव्हा ती घेण्यासाठी आपल्यामधून  पराकाष्ठेचा  आंतरिक प्रतिकार होत आहे असा अनुभव आपल्याला येतो.

म्हणून आपण दुसरे एक सत्य धरून ठेवायला हवे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस”
( नीति ३:५). हे आपण स्वत: एकटे करू शकत नाही. त्याला सामाजिक मोजमाप आहे. आपण एकटेच संघर्ष करत असताना  आपल्या विश्वासू बंधू भगिनींनी आपल्याला प्रभूवर विश्वास ठेवण्यास मदत करण्याची जरुरी आहे.

आतून प्रतिकार

आपल्याला खरंच हवी असलेली गरज घेण्यासाठी इतका प्रतिकार का जाणवतो? त्यासाठी  तीन मुख्य घटक कारणीभूत आहेत.
गर्व – उदा. जे सत्य आहे त्याबद्दलचा माझा दृष्टिकोन अधिक विश्वसनीय आहे अशी माझी खात्री आहे.
लज्जा – उदा. माझी दुष्टता अथवा कमकुवतपणा कुणी पाहू नये असं मला वाटतं.

भीती- उदा. त्यामुळे कदाचित तू माझा धिक्कार करशील किंवा त्यामुळे तुझा माझ्यावर ताबा राहील.
जेव्हा जेव्हा गर्वाचे पाप हजर असते तेव्हा त्याचा मार्ग नाशाकडे असतो (नीति १६:१८). पण लज्जा आणि भीती ह्यामध्ये  मिश्र भावना असतात. आपल्यामधल्या कमकुवत किंवा पापी वृत्ती व त्यासोबतच  पूर्वीचे दु:खद आणि हानिकारक अनुभव ह्यामुळे त्यांना इंधन मिळते. याचा एकंदरीत परिणाम म्हणजे हे प्रतिसाद जे आपल्याला मदत देऊ शकतील त्यांच्यासबंधीचा आपला दृष्टिकोन विकृत होतो, त्यांच्यावरचा भरवसा कमी होतो आणि त्याऐवजी त्यांच्याप्रत विरोधाची भावना निर्माण होते.

जर तुम्ही हा प्रतिकार ऐकला तर तो आपल्याला किती गोंधळलेल्या, धोक्याच्या ठिकाणी घेऊन जात आहे हे तुम्हाला दिसेल. पापी इच्छा, अनाठायी भीती, शंका आणि निराशा देवाने त्याच्या वचनात जे सांगितले आहे त्यासंबंधी आपला विश्वास कमी करतात.  तर गर्व , लज्जा आणि भीती आपल्या बंधू भगिनींवरचा आपला भरवसा कमी करतात. अविश्वास हे एक दुष्ट चक्र होऊ शकते आणि ते आपल्याला एकटे, असुरक्षित करून आणखी फसवते.

तुमच्या आतल्या प्रतिकारावर भरवसा ठवू नका

जेव्हा आपण अविश्वास बाळगतो आणि इतर विश्वासू ख्रिस्ती लोकांना प्रतिकार करतो तेव्हा आपण  “तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस” (नीति ३:५) ही देवाची आज्ञा गंभीरपणे घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासंबंधी बायबलमध्ये दिलेले इशारे अगदी स्पष्ट आहेत.

“परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात” (नीति १: ७).

“तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा” (नीति ३: ७).

मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो (नीति १२: १५).

“जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो. जो शिक्षण अव्हेरतो तो आपल्या जिवाला तुच्छ लेखतो; जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय; आधी नम्रता मग मान्यता” (नीति १५: ३१-३३)

“जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो” (नीति १८:१).

“सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील” (नीति १९: २०).

“जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो” (नीति २८:२६).


ही नीतिसूत्रे  जेव्हा लिहिली तेव्हाच्या काळातील लोक काही आपल्यापेक्षा वेगळे नव्हते. त्यांनाही देवावर अविश्वास दाखवण्याचा मोह होत होता आणि गर्व, लज्जा,  भीती यामुळे इतरांचा सच्चा सल्ला घेण्यासाठी मनात विरोध होत होता. आणि नितीसुत्रांचा लेखक अशा आवेगाला मूर्ख म्हणतो.

आपण आपल्याच बुद्धीवर अबलंबून राहावे म्हणून आपल्याला निर्माण केले नाही. आपण देवाची भीती बाळगावी व जे विश्वास ठेवण्यास योग्य आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे यासाठी आपल्याला घडवले आहे. याचा अर्थ आपल्या प्रतिकारावर विश्वास न ठेवता आपण आपल्या सुज्ञ बंधू भगिनीवर विश्वास ठेवायला हवा.

इतरांवर विश्वास ठेवून प्रभूवर भरवसा टाकणे

सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी हिटलरच्या दहशतवादाच्या धोकेबाज, अविश्वसनीय, गोंधळलेल्या दिवसांमध्ये डीयेत्रिच बॉनहॉपरने त्याच्या ख्रिस्ती बांधवांच्या समाजाला लिहिले-

“ देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याला शोधावे व त्याचे वचन बंधूंच्या साक्षीमध्ये, माणसाच्या मुखाद्वारे आपल्याला मिळावे. म्हणून एका ख्रिस्ती व्यक्तीला  दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीची गरज आहे जो त्याला देवाचे वचन ऐकवेल. जेव्हा तो अनिश्चित व निराश होईल तेव्हा त्याला त्याची पुन्हा पुन्हा गरज लागेल. कारण तो आपणहून स्वत:ला  विश्वास ठेवण्यास मदत करू शकणार नाही. तारणाच्या पवित्र वचनाची घोषणा करणाऱ्या त्याच्या बंधूची गरज त्याला आहे.”

हे खरे आहे. एका ख्रिस्ती व्यक्तीला दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीने देवाचे वचन सांगण्याची गरज आहे. आणि जेव्हा सत्य आणि वास्तव काय आहे याबद्दल आपण गोंधळून जातो आणि इतर ख्रिती व्यक्तीला ते सांगण्यास आतून प्रतिकार होतो तेव्हा तर याची अधिक गरज आहे. कारण देवावर विश्वास ठेवणे हे केवळ आपण स्वत: करत नाही तर ते आपण इतरांसमवेत करतो. देव जो समाज आपल्याला देतो त्यासोबत करतो.

जेव्हा आपण खूपच असुरक्षित असतो

अशा काही कृपा आहेत ज्या देव आपल्याला केवळ इतर बंधू भगिनींद्वारेच पुरवतो. पौलाने लिहिले, “तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते” (१ करिंथ १२:७). तसेच “कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा” (रोम १२: ४-६).
यामुळे देवाची अपेक्षा आहे की आपण स्वत:ला नम्र करावे व आपल्या पापी इच्छा, अवास्तव, अनावश्यक भीती, जिवाला धक्का देणाऱ्या शंका, आणि निराशेचे काळे विचार आपल्या विश्वासाच्या समाजातील विश्वासू व्यक्तीला/ व्यक्तींना  एकांतात सांगावे. कारण त्याने नेमून दिले आहे की त्यांच्याद्वारे आपल्याला आत्म्याची मदत मिळावी. कारण जेव्हा आपण एकटेच असतो तेव्हा पापाच्या फसवेगिरीने आपली मने कठीण होतात.   

Previous Article

ईयोब १:१-५

Next Article

कमकुवतपणाशी युद्ध थांबवा

You might be interested in …

तू माझा त्याग का केलास?

लेखक: डॉनल्ड मॅकलॉइड नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास’” (मार्क १५:३४)? इथपर्यंत येशूला क्रूसावर खिळण्याचा वृत्तांत त्याच्या शारीरिक दु:खसहनाकडे केंद्रित […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण २ दुसऱ्या दिवशी दुपारी […]

ख्रिस्ताचं मन : फिलिपै २:५ (।)

 “ असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो.” फिलिपै २:५ वर्षातून एकदा येणाऱ्या दु:खसहनाच्या सणात वधस्तंभाच्या आठवणींची शांत सावली पडलेली असून मन:शुद्धी व मन:शांती प्राप्त करण्याची जणू वर्षातून एकदा देव ही विशेष संधी […]