स्कॉट हबर्ड
जे योजना करतात ते देवासारखी कृती करतात. ज्या निर्मात्याने हे विश्व सहा दिवसाच्या आराखड्यानुसार बनवले त्याच्यासारखे आपण काही प्रमाणात दिसू लागतो. “मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले”
( २ राजे १९:२५) असे जो म्हणतो, त्याच्यासारखे आपण होतो. आपण मानव असलो तरी जो लहरीपणाने, मनाला वाटेल तसे न वागता, ठाम संकल्पानुसार (प्रेषित२:२३) नेहमीच निश्चित योजनेने वागतो त्याचे मार्ग अनुसरतो. आपण योजना करणाऱ्या देवाच्या प्रतिमेमध्ये निर्माण केले आहोत आणि जे योजना करतात ते त्याच्याप्रमाणे कृती करतात.
पण जरा थांबा. मला याचीही आठवण करण्याची गरज आहे की जे योजना करतात ते जरा जास्तच देवासारखे वागतात. कधी कधी आपण अशा योजना करतो की, आपण पाणी, धुके, फूल, गवत जे सकाळी असते व रात्री नाहीसे होते त्यासारखे नाहीत. आपल्या योजनांना प्रार्थनाहीन कारणे, स्वावलंबी मने असतात. बऱ्याचदा आपण प्रभूची इच्छा असेल तर (याकोब ४:१५ ) असेही म्हणत नाही.
म्हणून नवे वर्ष येऊन आपल्यापुढच्या कॅलेंडरमध्ये अनेक रिकामे दिवस असताना आपल्या योजनेतून आपणच देव आहोत असे न दिसता, देव कसा प्रकट होईल?
१. एका मर्त्य माणसासारखी योजना करा.
योजना करताना आपण उद्याचे काहीतरी आजमध्ये आणतो. आपण वेळेच्या पुढे धावून आपले तेव्हाचे घ्येय गाठण्यासाठी आता काय करता येईल ह्याचा विचार करतो. या प्रक्रियेत आपण कल्पिलेला उद्या हा अधिकच खरा वाटू लागतो.आपले ह्रदय त्यात राहू लागते. पण याकोब आपल्याला आठवण करून देतो की, “तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते” (याकोब ४:१४). आपण नश्वर आहोत. आपण वाफ आहोत, पण पर्वतासारखी स्वप्ने पहातो. आपण मनातल्या मनात उद्याच्या वाटेवर चालू लागतो आणि आपण कोठे जाणार, काय करणार हे ठरवत राहतो. पण आपण विसरतो की ह्या वाटा कदाचित येणारच नाहीत.
आपल्या नश्वरतेची योग्य जाणीव ही योजना करायला निराश करत नाही पण योजनेची पुनर्रचना करून ती सुधारते. जेव्हा अनंतकाळ जवळ येतो तेव्हा आपण अधिक शहाणपणाने वागतो (योजना करतो). आपल्या योजना खऱ्या काय आहेत हेही आपण विचारात घेतो: त्या फक्त आकृती, कच्चे आराखडे, पेन्सिलच्या रेघोट्या आहेत व ते देवाच्या दयेच्या रबरापुढे आहेत. म्हणून जरी आपल्यापुढे महिने किंवा वर्षे आहेत असे समजून आपण योजना आखल्या तरी त्या प्रत्येकावर आपण शिक्का मारतो की, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू” (याकोब ४:१५).
२. बालकासारखे योजना करा.
आपल्या योजनांमध्ये गर्व अनेक आकार घेतो. “देवाची इच्छा असेल तर” असे म्हणण्याऐवजी आपण म्हणतो, “मी करीन” आपल्या स्वत:वर अवलंबून राहण्याच्या प्रार्थनाहीनते मध्येही तो दिसून येतो.
योजना करताना आपण जॉन न्यूटन यांचे शब्द ऐकण्याची गरज आहे “बालकाचा आत्मा आपल्यामध्ये असणे ही एक महान गोष्ट आहे. ते मार्गदर्शनाशिवाय पाउल पुढे टाकण्यास घाबरतात.” आपण केवळ मर्त्यच नाही तर आपल्याला खूप थोडा वेळ आहे. आपण बालके आहोत – आपल्याला सुज्ञता कमी आहे. आपली दूरदृष्टी चुका करते. हे समजून आपण देवाच्या सान्निध्यात योजना करतो. आणि ते प्रार्थनेने भरून टाकतो.
३. भक्तासारख्या योजना करा.
आता आपण योजना आखल्या आहेत तर पुढच्या दिवसांचे किंवा पुढच्या महिन्यांचे काय? आपल्याला अमर माणसे असे न समजता, मर्त्य बालके असे वागण्यासाठी आपण काय करावे? आपण भक्तासारख्या योजना कराव्या. भक्त लक्षात ठेवतात की इतर सर्व प्राधान्यांपेक्षा एका गोष्टीचे अगत्य आहे (लूक १०:४२). इतर सर्व विनंत्यापेक्षा “परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले” (स्तोत्र २७:४). इतर सर्व आकांक्षापेक्षा “हेच एक माझे काम” (फिली ३:१४). येशूच्या पायापाशी बसा, त्याचे सौंदर्य पाहत राहा . स्वर्गाकडे चालत राहा.
भक्त प्रार्थनेने योजना तर करतातच पण आपले दिवस प्रार्थनेने भरून टाकण्याच्या योजना करतात. देवामागे जाणे हा त्यांच्या योजनेचा मुख्य भाग असतो. या वर्षी माझे बायबल वाचन कसे असेल? मी देवाबरोबर प्रार्थनेत कसा वेळ घालवणार? माझ्या मंडळीतील बंधू भगिनींसोबत मी कशी सहभागिता ठेवणार?
म्हणून भक्तीला प्राधान्य द्या. सर्व योजनांच्या केंद्रस्थानी देवामागे जाण्याच्या योजना करा.
४. उपयोजकासारख्या योजना करा.
योजकाची सर्वात मोठी कसोटी नंतर येते. योजनेच्या वेळेतून बाहेर आल्यावर आपल्या लक्षात येते की देवाची योजना आपल्या योजनेपेक्षा वेगळी आहे. “मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते” (नीति. १९:२१). आणि कितीदा, नव्हे बहुधा देवाची योजना आपल्या योजना बदलून टाकते.
आपला देव हस्तक्षेप करण्यात महान आहे , पुन्हा दिग्दर्शन करणारा आहे आणि तो लोकांचे संकल्प निष्फळ करतो; स्तोत्र ३३:१०. आणि काही वेळा त्याच्या सुज्ञतेने आणि दयेने आपल्याही योजना बिघडवून टाकतो. अशा वेळी आपण सुज्ञतेने ती बिघडलेली योजना स्वीकारावी, आपण काय करणार याची फाडलेली यादी नम्रतेने त्याच्या हातात सोपवावी.
कधी स्वत:ची किंमत कमी करून हसायलाही शिकावे.
प्रत्येक उद्ध्वस्त झालेली योजना ही आपल्याला आठवण करून देते की आपण उपयोजना करणारे आहोत. देव आपल्याला स्वप्ने पाहण्याची प्रतिष्ठा देतो – कधी आपली स्वप्ने पूर्ण झाल्याचे पाहण्याची देणगी देतो . पण त्या प्रतिष्ठेवर तो आपल्याला खात्री देतो की आपल्या योजनांत जरी अपयश आले तरी तो आपले अपयश आपले कल्याण व्हावे म्हणून त्याच्या हातात घेतो (रोम ८:२८).
आपण वाचतो की पौलाला स्पेनला जाणे कधीच शक्य झाले नाही. आणि तसेच आपल्यातील काहींच्या देवाला गौरव देण्यासाठी केलेल्या योजनासुद्धा कधीच सफळ होणार नाहीत. पण त्या रद्द केलेल्या याद्यांमध्ये आपल्याला आपल्या नश्वरतेच्या विधानात नेण्याची क्षमता आहे. “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू,” असे म्हणा” (याकोब ४:१५). मग आपण अधिक सच्चाईने म्हणू, “माझ्या योजना नाहीत पण तुझी इच्छा होऊ दे.” सर्वात चांगले म्हणजे ते आपल्याला शिकवते की, आपल्या सुनियोजित योजनापेक्षा आपण देवाचे हस्तक्षेप कसे स्वीकारावेत.
Social