मार्च 6, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आपल्याला  टाकून दिलंय असं तुम्हाला वाटतं का?

डॅन कृव्हर

माझ्या तीन वर्षांच्या मुलाला मरणाकडे नेणाऱ्या दिवसांमध्ये, देवाने मला आणि माझ्या कुटुंबाला त्याच्या कृपामय काळजीची खोल खात्री दिली. एके रात्री मी अतिदक्षता विभागामध्ये माझ्या हातात बायबल घेऊन एकटाच माझ्या मुलाजवळ बसलो होतो. त्याचे आता थोडकेच दिवस राहिले आहेत या जाणीवेने माझे ह्रदय दु:खाने भरून गेले होते. दर क्षणाला आपण याला  गमावणार याच्या ओझ्याचा भार माझ्या छातीवर  पडू लागला. मी हताश होऊन  देवाच्या वचनाकडे वळलो.

कुठे जावे हे न कळल्याने मी बायबलची पाने चाळू लागलो आणि यशया ५३ वर माझी नजर पडली. लगेचच माझी नजर पुढील शब्दांकडे गेली.  “खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले” (यशया ५३:४). यशयाचे शब्द माझ्या खिन्न ह्रदयावर शुष्क जमिनीवर हलकी सर आल्यासारखे पडले आणि माझ्या खेदात मला आवश्यक असलेली सुटका आणि देवाच्या समाधान देणाऱ्या सान्निध्याची जाणीव दिली.

काही दिवसानंतर डॅनिएलच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा मी व माझ्या पत्नीने त्याच्या बिछान्याजवळ गुडघे टेकले- आमच्या मुलाला दिलासा देण्याच्या प्रयत्नाने प्रार्थना करीत. माझे ह्रदय दु:खाने जड झाले होते. डॅनिएलचा हात हातात धरून मी हळुवारपणे त्याच्या केसातून माझी बोटे फिरवत होतो. तरीही  देवाच्या योजनेवर माझा भरवसा होता. पण जेव्हा त्याच्या ह्रदयाचा अखेरचा ठोका वाजला तेव्हा माझे समाधान नाहीसे झाले हे पाहून मला धक्का बसला. “आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हांला झाले” (२ करिंथ १:८).  त्यानंतरच्या तासांमध्ये देवाची जवळीकता, इतक्या लवकर देवाने टाकून दिल्याच्या भावनेत जाते  या जाणीवेशी मी झगडू लागलो.  अशा विरोधाभासाच्या अनुभवाचा आपण कसा अर्थ लावायचा? देवाच्या समाधानदायी सान्निध्यात खात्री  जोडलेलीच असते; पण जेव्हा त्याने आपल्याला टाकून दिले असे वाटते तेव्हा शंका अपरिहार्य असते.

प्रकाश नेहमी असतोच

 काळ्या ढगामागे सोनेरी किनार असते, रात्रीच्या आकाशात आपल्याला दृष्टिक्षेपा पलीकडे एक  मिणमिणता  तारा असतो आणि तो आपल्याला एक महान सत्य सांगत असतो. जरी आपण कधीकधी ‘टाकलेल्या प्रदेशात’ दडलेले असतो तरी हा प्रकाश दडू शकतच नाही. तो आपल्या निराशेतून आरपार जातो आणि आपल्याला आठवण करून देतो की आपले दु:ख जरी खरे आणि वेदनामय असले  तरी तो अखेचा शब्द नाही.

माझ्या मुलाच्या शेवटच्या दिवसांत पौल ज्याला  सांप्रत काळाची दुःखे (रोम ८:८) म्हणतो त्याचा अनुभव मी घेतला. अंधाराने लपवून टाकलेल्या खोलवर दु:ख देणाऱ्या या परीक्षा देवाच्या सार्वभौम सांत्वनामध्ये धरलेल्या असतात; आणि तो अभिवचन देतो की; “कारण आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत.”

लपलेली आशा, सध्याच्या वेदना

रोम ८:१८-१९ मध्ये दोनदा पौल ‘प्रकट केले’ हे शब्द वापरतो. पहिल्यांदा तो म्हणतो – आपल्या सध्याच्या दु:खा पलीकडे असलेले लपलेले अभिवचन (रोम ८:१८). नंतर तो “कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे” ( रोम ८:१९) यामध्येही  याचे वर्णन करतो. अजूनही जे उघड झाले नाही यावर दोनदा भर देऊन तो भविष्यातील जे वैभव आपण पाहू शकत नाही त्या गहन सत्यावर भर देतो.

पौल आपल्याला सांगतो की सृष्टी आणि आपण दोघेही या न दिसणाऱ्या गौरवाने प्रकट व्हावे म्हणून कण्हत आहोत. (रोम ८: १९-२३). आपण देवाचे पुत्र म्हणून आपली ओळख त्या गौरवात प्रकट होण्याची वाट पाहत असताना  आपली सध्याची दु:खे, आपली ही ओढ प्रखर करतात.

आपली “सांप्रत काळची दु:खे” ह्याला खास आव्हान देण्याचे कारण म्हणजे आपला सध्याचा अनुभव आणि देवाचे पुत्र या नात्याने असलेली लपलेली ओळख यांच्यातील तणाव. विश्वासी या नात्याने आपल्याला देवाच्या कुटुंबात दत्तक घेतलेले आहे (रोम ८: १४-१६); परंतु आपण ख्रिस्तामध्ये जे आहोत त्याचे पूर्ण प्रकटीकरण आपल्याला अजून दिसत नाही (रोम ८:२३-२५). सध्या आपण देवाचे पुत्र म्हणून खऱ्या रीतीने आपली ओळख प्रकट होण्याच्या तणावात राहत आहोत.

त्यासोबतच आपला आपल्या देहात वस्ती असलेल्या पापाशी झगडा हा आणि आपल्या परीक्षा – क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार (रोम ८:३५) हे सर्व आपल्याला भारावून टाकतात.  आपल्या दु:खाची सत्यता आणि आपले आंतरिक  युद्ध आपल्याला सतत म्हणायला भाग पडते की, देव जे आपल्याविषयी म्हणतो त्यापेक्षा आपण कमी आहोत. देव आपला खरा बाप आहे ही खात्री आपल्यापासून दूर करण्याचे काम ते करतात.

जेव्हा देवाने मोशेला सुटकेच्या वचनाची घोषणा करायला पाठवले तेव्हा लोकांचा आत्मा इतका भग्न झाला होता की ते हे ऐकू शकत नव्हते (निर्गम ६:९). त्यांच्या निर्दय वास्तवाने त्यांची आशा झाकून टाकली. जर आपणही अशाच ठिकाणी असलो आणि जेव्हा सुटका ही खूप दूर आहे असे वाटते  आणि आपले ह्रदय विश्वास ठेवण्यास झगडते. अशा वेळी आपण काय करावे?

आपली टिकणारी खात्री

पौल याचे उत्तर आपल्याला देतो. आपल्या ख्रिस्ती जीवनातील या तणावाला एक टिकावू सत्य तो सांगतो.
रोम ८ हा अध्याय तो  एका अनिर्वाच्य आत्मविश्वासाने सुरू करतो. “म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच” (रोम ८:१).  आपल्याला आता किंवा पुढे कधीही न्यायदंड नाही. कारण आपण  “जो पाप असे झाला त्याच्याशी जोडले गेले आहोत ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे” (२ करिंथ ५:२१). देवाने त्याच्या कृपेने आपल्याला नितीमत्ता दिली आहे जी आपल्याला अत्यंत भयाण परिस्थितीतूनही मुक्त करते: हा देवाचा आपल्या पापाविरुद्ध असलेला रास्त न्याय आहे.

रोम ८ च्या शेवटच्या परिच्छेदात तो विचारतो, “तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय” ( रोम ८: ३३-३४) ?

रॉबर्ट होल्डेन लिहितात:

या जीवनात विश्वासीयाला ज्या परीक्षांना तोंड द्यावे लागते त्यातील काही अंत:करणाच्या  असतात तर काही बाहेरच्या असतात. आतल्या परीक्षांमध्ये विवेकाने दाखवलेले धोके, देवाच्या क्रोधाची भीती अशा गोष्टी असतात तर बाहेरच्या परीक्षांमध्ये संकटे आणि क्लेश असतात. पहिल्या परीक्षांवर विश्वासीयाने विजय मिळवला नाही तर दुसऱ्या प्रकारच्या परीक्षांत तो  टिकून राहू शकत नाही. जर त्याचा विवेक देवाच्या क्रोधाच्या भीतीखाली झगडत असेल तर त्याच्या क्लेशामध्ये त्याला देवामध्ये खरा धीर आणि खात्री मिळणे शक्य नाही. ख्रिस्त आपल्यासाठी मेला, पुन्हा उठला व आपल्यासाठी प्रार्थना करीत आहे याच्या निश्चित  खात्रीनेच त्याला संकटामध्ये विश्वास मिळू शकतो. आपल्या काळ्या कुट्ट क्षणांमध्ये जेव्हा देवाचे समाधान संपल्यासारखे वाटू लागते , क्लेश आपल्याला ग्रासून टाकत असतात अशा वेळी आपण सुवार्तेची चांगली बातमी ऐकतो: जो देव आपल्याला ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवतो तो आपल्याविरुद्ध कोणताही आरोप टिकू देणार नाही. देव खूप दूर आहे असे वाटले तरी त्याच्या समोरचे आपले स्थान हे सुरक्षित आणि न बदलणारे असते.

आपली आशा ही आपल्या चंचल भावनांवर किंवा आपल्याला वाटणारी त्याच्या सान्निध्याची जाणीव यावर अवलंबून नाही तर ख्रिस्त आपले नीतिमत्त्व आहे या अढळ सत्यावर अवलंबून आहे. आणि यामुळे आपल्याला खात्री मिळते की आपल्याला काहीही, आंतरिक भीती किंवा बाह्य परीक्षा पित्याच्या प्रीतीपासून दूर करू शकणार नाहीत (रोम ८:३५-३९).

खऱ्या जीवनासाठी नीतिमत्ता

माझा मुलगा डॅनिएल याच्या शेवटच्या तीन आठवड्यात मी ‘खऱ्या जीवनासाठी शुभवर्तमान’ हे जेरी ब्रिजेस यांचे पुस्तक वाचत होतो . त्यातला एक परिच्छेद त्याच्या आजारात व नंतरही  माझ्याशी बोलू लागला. त्यामध्ये जेरी ब्रिजेस देवाच्या नीतिमत्तेच्या देणगीमध्ये पौलाचा दररोजचा आनंद याबद्दल असे लिहितात: “ देवासमोर असलेले त्याचे आजचे, उद्याचे आणि अनंतकाळचे स्थान याकडे  विश्वासाने तो येशू ख्रिस्त आणि त्याचे नीतिमत्त्व याकडे पाहत होता.”

जेव्हा मी देव जवळ नाही अशा जाणीवेने झगडत होतो तेव्हा माझ्या भावनांनी मी हे अजमावत होतो. तेव्हा  “ हे प्रभू ख्रिस्ता प्रस्तरा, तू दुर्ग माझा आसरा “ (My hope is built on) या गीताने मला मार्गदर्शन केले. त्यामध्ये ‘कोणत्याही मानवावर न टेकता पूर्णपणे येशूच्या नावावर टेका’ अशा आशयाच्या ओळी आहेत.

माझ्या भावना ह्या देवाच्या स्वीकाराचे मापन करत नाहीत. ख्रिस्ताची नीतिमत्ता जी विश्वासामुळेच मला दिली जाते ती देवाने माझा स्वीकार केला आहे हे जाहीर करते. २ करिंथ १:९ मधील पौलाचे शब्द साध्या शब्दात असे लिहिता येतील. माझ्या जिवाच्या काळ्याकुट्ट रात्रीने मला शिकवले की, मी माझे इतर अनुभव कितीही गोड वाटले तरी त्यावर अवलंबून न राहता ख्रिस्त जो माझे नीतिमत्त्व त्याच्यावरच मी अवलंबून राहावे. माझ्या जीवासाठी तोच एक खोलवर विसावा आहे.

Previous Article

ईयोबाची पहिली कसोटी

You might be interested in …

चिडचिड? विसरून जा

स्कॉट स्मिथ देवाने आपल्यासाठी येशूमध्ये  भरभरून केलेल्या, अढळ, न संपणाऱ्या प्रीतीची आठवण जितकी मी अधिक करतो तितके मी इतरांवर चिडण्याचे विसरून जातो. दुर्दैवाने चिडचिड करावी असे मी स्वत:ला सांगतो. पण जिथे मी कमकुवत आहे तेथे […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ११ (मार्क ३) मला […]

 लोकांतरण व द्वितीयागमन १ व २ थेस्सलनी

भाग ३                        अध्याय २ रा आपण संतांना इशारा, ख्रिस्तविरोधी, सैतानाचं अनीतिचं रहस्य, ख्रिस्तविरोध्याचा अंत, देवाच्या योजनेचं स्वरूप व त्याचे कारण , हे पाच मुद्दे अभ्यासले. आता पुढे जाऊ. (६) तारलेल्यांना ताकीद वरील मुद्यांमध्ये अनीतिच्या […]