अक्टूबर 9, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

सर्वोत्तम आरसा

गेरिट स्कॉट डॉसन

वाईट आरसे मला त्रास देतात. कोपऱ्यातील ती चौकट  माझ्या गोलाकार नाकाचे विचित्र चित्र प्रतिबिंबित करते. मी नक्कीच असा दिसत नाही! विमानाच्या बाथरूममधील आरशात चेहऱ्यावर मी कधीही न पाहिलेल्या खाचा आणि डाग दिसतात. हे वास्तव आहे का? मला विरोध करणाऱ्याच्या डोळ्यातील तिरस्कार फक्त माझे अपयश प्रतिबिंबित करतो. माझ्या केवळ कमतरताच तो मला दाखवतो. मी या आरशांपासून आत्मविश्वास गमावून दूर जातो. नक्कीच कोणीही या चेहऱ्याकडे आकर्षित होऊ शकत नाही! मला एक चांगला आरसा हवा आहे.

तसा आरसा बायबलमध्ये आपल्यासाठी आहे. सतराव्या शतकातील पाळक आणि कवी जॉर्ज हर्बर्ट देवाच्या वचनामध्ये आनंदित होते. ते त्यांच्या “द होली स्क्रिप्चर्स” या कवितेची सुरुवात उत्कट प्रेमाने करतात: “हे  पुस्तका! तुझ्यात अनंत गोडवा!…कोणत्याही भागातील कोणत्याही दुःखासाठी मौल्यवान;…तू सर्व आरोग्य आहेस.” हर्बर्ट पुढे शास्त्राची तुलना अशा आरशाशी करतात जो केवळ प्रतिबिंब दाखवण्यापेक्षा आणखी काही करतो. खरे आहे, आपण स्वतःला वचनात स्पष्टपणे पाहतो; आपल्या कल्पनेपेक्षा जास्त दोष तो आपल्याला दाखवतो. पण त्याच वेळी, शास्त्र आपल्याला बदलते. आपण जितके अधिक पाहतो तितके हा आरसा आपल्याला अधिक चांगले बनवतो. हर्बर्ट लिहितात:

येथे पहा; हा कृतज्ञतेचा चष्मा आहे,
जो पाहणाऱ्यांचे डोळे सुधारते
ही विहीर आहे
ती जे दाखवते ते धुवून टाकते.

शास्त्राचा सत्य सांगणारा आरसा आपल्याला उघड करतो आणि घडवतो. अशा आरशाची कल्पना करा जो तुम्हाला हवे तितके आकर्षक बनवेल. नितळ पाण्याच्या विहिरीची कल्पना करा जी केवळ प्रतिबिंब दाखवत नाही नाही तर तुम्हाला घाण आणि डागांपासून स्वच्छ करते. जेव्हा आपण खुल्या मनाने आणि आत्म्यावर अवलंबून राहून शास्त्र वाचतो तेव्हा असेच घडते.

शास्त्राला दिलेली भेट एक परिवर्तन करणारा आरसा बनते. याचे तीन मार्ग पाहू या.

१.खात्री देणारा आरसा

त्या विमानातल्या दुष्ट आरशांनी प्रकट केलेले दोष, बायबलमध्ये आपण स्वतःला जे पाहतो त्याच्या तुलनेत काहीच नाहीत. सत्याच्या या काचेत डोकावण्यासाठी खूप धैर्य लागते. इब्री लोकांस पत्रात वचन हे कार्य कसे करते याचे वर्णन आहे: “कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे” (इब्री लोकांस ४:१२).

ख्रिस्ताने केलेल्या पाचारणानुसार आपण जगत नाही हे जेव्हा आपल्याला माहीत असते, तेव्हा आपण बायबल वाचणे टाळतो. वचन माझ्या आत्म्याला बांधते. माझ्या हेतूंच्या कुरूप सत्यावर पूर्ण प्रकाश पडतो. मी खोट्या देवांची पूजा करताना पकडले गेलो आहे. माझे दुटप्पी हृदय ख्रिस्ती मुखवट्याखाली लपवता येत नाही. शास्त्राच्या सत्यात सर्वकाही प्रकाशात येते.

उदाहरणार्थ, पुढील वचन मला ट्रॅफिक जॅममध्ये नेहमीच पकडते: “माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही” (याकोब १:२०). किंवा मला जे करायचेय त्याच्या व्यस्ततेमध्ये, येशूचे हे शब्द मला थांबवतात: “जसे तू यातील लहानांपैकी एकालाही केले नाहीस, तसेच तू मलाही केले नाहीस” (मत्तय २५:४५). शास्त्राचा आरसा ढोंग दूर करतो आणि आपल्याला स्वतःबद्दलचे सत्य दाखवतो.

“शास्त्र आपल्याला बदलते. आपण जितके जास्त पाहू तितके हा आरसा आपल्याला चांगले बनवतो.”

इब्री लोकांस पत्र पुढे म्हणते, “आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे. (इब्री लोकांस पत्र ४:१३). देवाच्या वचनाच्या आरशात आपल्याला जे दिसते त्यापेक्षा मानवी स्थितीचे वास्तववादी दृश्य  दुसरीकडे कोठेही नाही. आपण या आरशाला चादरीने झाकून ठेवण्याचा किंवा किमान मासिकांच्या ढिगाऱ्याखाली ढकलण्याचा मोह करू शकतो. परंतु शास्त्राच्या आरशाची मला नितांत आवश्यकता आहे हे तो मला दाखवतो

२. सुटकेचा आरसा

आत्मा माझी अभिमानी स्वयंपूर्णता दूर करण्यासाठी शास्त्रातील माझ्या प्रतिबिंबाचा वापर करतो. जेव्हा मी स्वतःला उधळ्या पुत्रामध्ये किंवा रागावलेल्या मोठ्या भावामध्ये, अविश्वासू शिष्यामध्ये किंवा न्याय करणाऱ्या परूश्यामध्ये पाहतो, तेव्हा मला समजते  की मी स्वतःहून देवाला आनंद देणारे जीवन जगू शकत नाही. माझ्या नियंत्रणाखाली सर्व आहे हा भ्रम वचन दूर करते आणि माझी असहाय्यता प्रकट करते. त्यामुळे ख्रिस्त मला दाखवू शकतो की मी त्याच्याशी एकरूप  असल्यास कसा दिसेन.

जर तुम्ही कधी रोमकरांच्या पुस्तकाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला पापाच्या खात्रीपासून तारणापर्यंतची ही घटना माहीत आहे. पहिले तीन अध्याय मला सत्य दडपणारा, मूर्खपणे देवाच्या सत्याची खोट्यासाठी अदलाबदल करणारा म्हणून दाखवतात  (रोम १:१८, २५). या आरशात, आपण सर्वजण जवळजवळ सारखेच दिसतो, “कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो आहोत” (३:२३). मी स्वतःला वचनात हुबेहूब पाहतो, देवाचा आणि मानवासाठी असलेल्या त्याच्या उद्देशांचा शत्रू असा. पण पाहत राहिल्यावर, मी येशूला त्याच्या मृत्यूद्वारे देवाशी माझा समेट करताना पाहतो: “देव आपल्यावर त्याचे प्रेम दाखवतो की आपण पापी असतानाच, ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला” (५:८). दैवी झूम पार्श्वभूमीने माझी प्रतिमा साफ केली जात नाही. उलट तेथे एक महाग, आणि खरे प्रायश्चित्त आहे.

जेव्हा मी शास्त्राच्या आरशात पाहतो तेव्हा मला पुन्हा दृष्टी येते. माझ्या स्वतःच्या निवडींमुळे एकाकी असलेल्या एकाकी पापी व्यक्तीपासून, त्याच्या सर्व नीतिमत्तेत ख्रिस्तासोबत आनंदाने सहवासात असलेल्या व्यक्तीकडे माझी प्रतिमा बदलते. मी स्वतःला येशूमध्ये सामावून घेतलेले पाहतो. मी त्याच्या शरीराचा एक सदस्य आहे, त्याच्यामध्ये असलेल्या इतर सर्वांशी जोडलेला आहे (१२:४-५). माझ्या स्वतःचे हे नवीन दर्शन मला “विश्वास ठेवण्याच्या सर्व आनंदाने आणि शांतीने” भरते (१५:१३).

३. परिवर्तनाचा आरसा

शास्त्राचा आरसा आपल्याला अधिकाधिक ख्रिस्तासारखे बनण्याच्या, आपल्या पवित्रीकरणाच्या प्रवासात देखील प्रेरित करतो. आपण जे पाहतो त्याच्यासारखेच बनतो. उदाहरणार्थ, मला आनंदी लोकांभोवती राहणे आवडते. त्यांचे हास्य, नाचणारे डोळे आणि सततची आशा मला जीवनाकडे त्याच प्रकारे पाहण्यास भाग पाडते. जेव्हा मी असे प्रेम प्रतिबिंबित करणारा चेहरा पाहतो, तेव्हा मी अधिक हसतो आणि अधिक प्रेम करतो. म्हणून जेव्हा मी प्रार्थनापूर्वक येशूकडे वचनातून पाहतो तेव्हा मला आपण काय असायला हवे होते ते दिसते. तो मला माझ्या स्वतःपेक्षा जास्त दाखवतो, परंतु अशा प्रकारे की मी त्याच्या सर्व गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकेन.

योहान त्याचे वर्णन असे करतो: “आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.”

जेव्हा मी हे शब्द वाचतो तेव्हा मला पित्याने कवटाळलेल्या एका प्रिय मुलाची प्रतिमा दिसते. शास्त्रवचन मला परत दाखवते की मी देवाचा आहे. ते मला हे देखील दाखवते की आणखी काही येणार आहे. एके दिवशी, मी येशूला त्याच्या सर्व वैभवात पाहेन – सामर्थ्य आणि नम्रता, सौम्यता आणि वैभव यांमध्ये. आता आपण आरशात अंधुकपणे पाहतो, परंतु नंतर समोरासमोर पाहू (१ करिंथ १३:१२). त्याच्याकडे स्पष्ट नजरेने पाहत, मी त्याच्यासारखा होईन.

त्याचप्रमाणे, पौल दुसरीकडे म्हणतो, “परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत; आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.. . . कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे” (२ करिंथ ३:१८; ४:६)

शास्त्रवचनात, आपण येशूकडे पाहतो. जेव्हा आपण स्वतःपासून दूर जाऊन येशू काय आहे आणि काय करतो याकडे पाहतो तेव्हा तो आपल्याला आतून बाहेर बदलतो. येशू हा आपण जे असायला हवे होते आणि आपण त्याच्यामध्ये जे असू ते दाखवणारा आरसा आहे.

शास्त्राचा  चष्मा

आपण शास्त्राच्या चष्म्यातून पाहतो आणि स्वतःला भयानक अचूकतेने पाहतो. परंतु जर आपण विश्वासाने पाहत राहिलो तर आपल्याला स्वतःला ख्रिस्तामध्ये घेतलेले दिसते. त्याच्या वचनात आपण त्याच्याकडे पाहत असताना तो आपल्याला सुधारत आहे. आपण त्याच्या प्रतिरूपात बनवले जात आहोत.

हर्बर्ट त्याच्या कवितेचा शेवट आणखी एका रूपकाने करतो. तो शास्त्राबद्दल म्हणतो, “स्वर्ग तुझ्यामध्ये सपाट आहे.” ख्रिस्ताच्या स्वर्गीय वैभवाची उंची बायबलच्या सपाट पानांमध्ये आहे. जेव्हा आपण नम्रतेने त्याच्यासमोर खाली पडतो तेव्हाच आपण शास्त्रात ख्रिस्ताकडे जातो. मी शब्दातील पाहिलेले प्रतिबिंब पश्चात्तापाने, मला कृपेसाठी आकांतास प्रवृत्त करते. मग मला कळते की माझी प्रतिमा कशी शुद्ध होते आणि शास्त्रात प्रकट झालेल्या तारणहाराच्या चेहऱ्याच्या गौरवात कशी घेतली जाते.

Previous Article

सामान्य ख्रिस्ती लोकांसाठी  समुपदेशन

You might be interested in …

बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक

 संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १                  प्रास्ताविकरोमन कॅथॅालिक मंडळी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहंचली होती. अनेक मिशनरी पाठवून परिश्रम करत होती. पण चुकीच्या सुवार्तापद्धती वापरत होती. आणि प्रॅाटेस्टंट मंडळीनं तर अजून सुवार्ताप्रसारासाठी मिशनकार्य सुरू करण्याचा विचारही […]

मौल्यवान क्षण तुम्हाला ओलांडून जाऊ देत

ग्रेग मोर्स आम्ही एकटेच बसलो होतो, कित्येक मैल दूरवर कोणीच  दिसत नव्हते. शिखराच्या टोकावरून पलीकडे ‘लेक सुपीरियर’ हे तळे दिसत होते व त्याच्या लाटा खडकांवर आदळत होत्या. एकटेपणाच्या ताज्या हवेचा श्वास आम्ही घेतला. मित्रांबरोबर इथून […]