दिसम्बर 30, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

न आखलेली वळणे

जॉन ब्लूम

“मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो” (नीतिसूत्रे १६:९). येशूचा जगिक पिता योसेफ  याने अनुभवल्याप्रमाणे, वरील वचन म्हणण्याचा आणखी एक मार्ग आहे की, जेव्हा तुमच्या योजना वळवल्या जातात आणि त्यांना दुसरी दिशा दिली जाते, तेव्हा तुम्हाला कळते की मार्ग ठरवणारा खरा कोण आहे.

नासरेथ. योसेफला घरी परतणे बरे वाटले. तोच जुना बाजार आणि तोच जुने व्यापारी. त्याच जुन्या तक्रारी असलेले तेच जुने शेजारी. तेच जुने सभास्थान आणि तोच जुना रब्बी.

खरं तर, गेल्या काही वर्षांच्या अनपेक्षित साहसांनंतर,  सामान्य जीवनात पुन्हा जाणे जरा  विचित्र वाटत होते. हा साधा गालीलातला सुतार किती भयानक प्रवास करत होता.

हे सर्व मरीयेच्या जगाला हादरवून टाकणाऱ्या गर्भधारणेच्या घोषणेपासून सुरू झाले होते. ज्यावर विश्वास ठेवण्यास  त्याला एका देवदूताच्या स्वप्नाची मदत घ्यावी लागली. त्या बातमीने हैराण झाल्यावर तो सावरतो तोच  रोममधून जनगणनेचा हुकूम आला.

योसेफला आठवलं, त्याला किती राग आला होता. एक जुलमी सम्राट लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या शहरात नोंदणी करण्याचे आदेश देत होता.  ऑगस्टसला शेतकऱ्यांकडून मिळणारा कोणताही कर, महसूल गमावायचा नव्हता. आता दावीद राजाचा वंशज म्हणून, योसेफला बेथलेहेमला जाण्यासाठी १०० मैल (१६० किमी) चालावे लागले. हे अत्यंत अन्यायकारक होते. यामुळे त्याच्या व्यवसायात व्यत्यय येणार होता  आणि त्याला न परवडणारा प्रवासाचा खर्च वाढणार होताच, परंतु मरीयेचे तर ते गर्भारपणाचे शेवटचे दिवस असणार होते!

त्याला आठवले की तो त्याच्या एका मित्राकडे आपला राग व्यक्त करत होता. मित्राचा प्रतिसाद होता, “देवा! या जुलमी लोकांपासून आम्हाला सोडवण्यासाठी लवकरच मशीहा पाठव!” आणि मग योसेफाला खुश करण्यासाठी पुढे तो म्हणाला, “अरे, कदाचित तुला तिथे मशीहा दिसेल! संदेष्ट्याने काय म्हटले ते तुला माहिती आहे ना, “हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे” (मीखा ५:२).

त्याच्या मित्राच्या या बोलण्याने कदाचित योसेफाच्या ह्रदयाचा ठोका चुकला असेल. त्याला ते लगेच दिसले! ऑगस्टस त्याच्या सर्व शाही वैभवात, देवाच्या हातात शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी केवळ  एक साधन होता. त्याचा राग आता विस्मयकारक आनंदात विरघळला. हो, योसेफ निश्चितच बेथलेहेममध्ये मशीहा पाहणार होता!

खरं तर, येशूच्या अविश्वसनीय जन्मानंतर, योसेफ बेथलेहेमातच त्यांचे कायमचे नवीन घर बनवण्याची अपेक्षा करत होता. नक्कीच मीखाच्या लिखाणाचा असाच अर्थ होता. तो नुकताच आपला व्यवसाय सुरू करू लागला होता. तेवढ्यात त्याच्या स्वप्नातील देवदूत, मागी लोकांच्या अचानक भेटीनंतर लगेचच पुन्हा आला. “मिसरला पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तिथेच राहा.” हेरोदाला त्यांच्या बाळाला ठार मारायचे होते!

हेरोदाविरुद्धचा  राग योसेफामध्ये पुन्हा पुन्हा उफाळून वर येत होता. आणि सोबत एक भीतीची लाट उसळली. इजिप्तच्या सीमेपर्यंत त्याच्या पत्नी आणि मुलासह त्याला  आणखी १०० मैलांचा पायी प्रवास करायचा  होता, आणि तोही वाळवंटातून.

पण त्याला लगेच आठवले. जर ऑगस्टस देवाचे साधन होता, तर हेरोद काय होता? देवाने त्याच्या मुलाला
इजिप्तला पाठवण्यामागे  कारणे होती. म्हणून योसेफाने त्याच रात्री त्याच्या कुटुंबाला शहराबाहेर नेले.

इजिप्त. ते एक असे ठिकाण होते जे योसेफ कधी पाहण्याचीही अपेक्षा करत नव्हता, राहणे तर दूरच. त्याला त्याच्या कुटुंबाला तिथे कसे खायला घालायचे आणि कोठे राहायचे याची कल्पनाही नव्हती. पण त्याला काळजी करण्याची गरज नव्हती. देवाने त्यांच्यासाठी पूर्वीप्रमाणेच व्यवस्था केली.

आणि मग काही महिन्यांनी आणखी एक स्वप्न आणि आणखी एक आज्ञा: हेरोद मरण पावला होता आणि आता त्याने  मुलाला इस्राएलला परत घेऊन जायचे  होते. योसेफाला  वाटले की याचा अर्थ आम्हाला आता बेथलेहेमला परतायचे आहे.

पण त्याला लवकरच कळले की हेरोदाचा मुलगा, अर्केलाउस, यहूदीयावर राज्य करत आहे. अर्केलाउस हा अत्यंत  क्रूर मनुष्य होता. जर त्याला बेथलेहेममध्ये मशीहा असल्याची चाहूल जरी लागली तरी,  निःसंशयपणे आणखी एकदा हत्येचा प्रयत्न केला जाईल. आणखी एक देवदूतांच्या स्वप्नातील भेट आणि ते नासरेथला परतले.

आणि तिथे ते  किती काळ टिकणार होते कुणास ठाऊक. . .

देवाने योसेफाची येशूचा जगिक पिता म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्याला एक गोष्ट खूप लवकर कळली ती म्हणजे त्याच्या स्वतःच्या योजना समजून घेणे महत्त्वाचे नव्हते. त्याने स्वतःसाठी आणि मरीयेसाठी जे काही भविष्य आखले होते  ते त्या दुसऱ्या एकाच्या योजनेपुढे विरून गेले.

आणि तो विश्वासाच्या मार्गावर चालत असताना, त्याला वारंवार सांगता न येणारी वळणे येत असल्याचे आढळले: रोमन जनगणना, गर्भधारणेच्या सर्वात कठीण काळातला एक कठीण प्रवास, गोठ्यात जन्म, स्थिर उत्पन्न नसणे, हत्येचा प्रयत्न, बाळासह पायी दोन वाळवंटे पार करणे, परदेशात राहणे आणि देवाची वाट पाहत शेवटच्या क्षणी मार्गदर्शन आणि तरतूद मिळवणे. हा मार्ग कठीण, धोकादायक, महागडा, वेळखाऊ आणि आयुष्यातील त्याच्या योजनांना उशीर  करणारा होता.

आणि ही सर्व देवाची इच्छा होती.

योसेफाप्रमाणे, आपल्या जीवनातील अनियोजित, अकार्यक्षम वळणांची देवाने योजना  केली आहे. “देवाचे मार्ग आपले मार्ग नाहीत” (यशया ५५:८-९). ते आपल्याला वारंवार गोंधळात टाकणारे असतात, परंतु ते नेहमीच अधिक चांगले असतात कारण प्रत्येक अनपेक्षित घटनेत आणि विलंबात आपल्याला दिसते किंवा माहीत असते त्यापेक्षा देव कितीतरी जास्त नियोजन करत असतो.

म्हणून जेव्हा तुम्हाला अचानक तुम्ही योजना न केलेल्या दिशेने जात असल्याचे आढळते तेव्हा धीर धरा; महान नियोजकाच्या मनात तुमच्यासाठी आणि असंख्य इतरांसाठी काहीतरी अधिक चांगले आहे.

Previous Article

गुंडाळलेला देव- सामान्य बाळ

You might be interested in …

देव नेहमीच मेज तयार करतो मार्शल सीगल

कदाचित देवाच्या पुरवठ्याची इतकी संथपणे स्वीकारलेली, इतकी गृहीत धरलेली, इतकी नकळत स्वीकारलेला दुसरी कोणती कृती नसेल ती म्हणजे आपले पुढचे जेवण. आज जगातील करोडो लोकांसाठी हे न पेलवणारे आश्चर्य होऊ शकते आणि त्याचा सन्मान केला […]

पुनरुत्थानदिन अजून येत आहे

मार्शल सीगल “जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू” ( १ करिंथ १५:४९) इतके पुनरुत्थानदिन साजरे केल्यानंतर – ज्यांनी येशूला खरेखुरे मरताना पाहिले ते काय सहन करत […]

  “ माझं गौरव”  IV

५- कुणासमोर गौरव ? कोणत्या सात गौष्टींमुळं शिष्यांकडून ख्रिस्ताचं गौरव होतं ते आपण पाहिलं. त्यानंतर त्याचे शिष्य त्यात कसे समाविष्ट आहेत, हे आपण पाहिलं. हे पाहून प्रभू त्याचं गौरव झाल्यामुळं उल्हासून आपल्या बापाला हे सांगत […]