दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 धडा २६.  १ योहान ५: १- ५ स्टीफन विल्यम्स

                                                                 विश्वास, प्रीती, आज्ञापालन आणि नवा जन्म

“विश्वास ठेवणे” याचा अर्थ काय? आजच्या वापरानुसार एखादा धर्म असणे असा याचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ अनेक “विश्वास” आहेत. सत्य ही समस्या नाही तर आध्यात्मिक गोष्टीचा स्वीकार करणे ही समस्या आहे. बायबलनुसार विश्वासात दोन गोष्टींचा समावेश होतो. त्या विभक्त करता येत नाहीत.
पूर्णपणे अवलंबून राहणे.
• सत्य आणि ज्यावर विश्वास ठेवायचा त्याची यथार्थता.
• केवळ ” विश्वास ठेवणे” पुरेसे नसते. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर अवलंबून असता तेव्हा तो कोण आहे, आणि त्याने जे केले ते सत्य आहे, याला महत्त्व असते. नाहीतर तुमचा विश्वास व्यर्थ आहे, तुम्ही पापापासून तारण  पावलेले असाल किंवा नसाल.

या शास्त्रवचनात योहान तीन धावत्या मुद्यांची सांगड घालतो: विश्वास प्रीती आणि आज्ञापालन; आणि त्यांना नवीन जन्माशी जोडतो.

शास्त्राभ्यास

नवीन जन्म, विश्वास, प्रीती व आज्ञापालन यांची साखळी ( व. १-३)

येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे; आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मलेल्यांवरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत (५:१-३).

लक्षात घ्या की या पुस्तकातून जे तीन प्रमुख मुद्दे वाहताना दिसतात, त्यांचा उल्लेख पहिल्या दोन वचनांमध्ये केला आहे: विश्वास, प्रीती व आज्ञापालन. योहान निदर्शनास आणून देत आहे की हे तीन घटक ख्रिस्ती जीवन व विश्वासी जनांच्या खात्रीचा गाभा आहेत.
• प्रमख कल्पना पहिल्या वचनात  शोधायला हवी, जी ख्रिस्ती जीवनाचे दैवी स्वरूप प्रगट करते.
पहिल्या विधानात  स्वीकार /विश्वासापूर्वी आपला नवीन जन्म झाला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही विश्वास धरत असाल तर ते दर्शवते की तुम्ही आधी नवीन जन्म पावलेले आहात: मी विश्वास ठेवला म्हणून माझा नवीन जन्म झालेला नाही.
योहान दाखवून देत आहे की देवाने मला नवीन जन्म दिला नसता तर मी विश्वास ठेवूच शकलो नसतो. ख्रिस्तावर अवलंबून राहू शकण्यापूर्वी माझा नवीन जन्म (आत्मिक जीवन मिळणे) झाला पाहिजे.
याचा अर्थ माझा विश्वास देखील मला देवाने दिलेले दान आहे. कारण तोच तर केवळ पुनरुज्जीवन करू शकतो.
ही कल्पना प्रमुख गुरुकिल्ली असण्याचे कारण या शास्त्रवचनात नमूद केलेल्या इतर सर्व फळांचे मूळ नवीन जन्म आहे.
• पहिल्या वचनातील पहिली कृती नवीन जन्म आहे (देवाची कृती). त्या कृतीतून दुसरी कृती पुढे येते, विश्वास. (मानवाचा नवीन जन्माला                 प्रतिसाद).
•  वचन १ ब व वचन २ मध्ये प्रीती या तिसऱ्या कृतीचे वर्णन आहे.
पहिली दिशा: उभी ते आडवी – जर मी पित्यावर प्रीती केली तर मी त्याच्या मुलांवर प्रीती करीन (वचन १).
दुसरी दिशा: आडवी ते उभी – जर मी देवाच्या मुलांवर प्रीती करत असेन तर मी देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो.
योहान काय म्हणत आहे? देवावर प्रीती करणे हे आपल्याला बंधुजनांवर प्रीती करण्यापासून विभक्त  करू शकत नाही.
۰         तुम्ही एकलकोंडे संत असू शकत नाही
۰         उलटपक्षी तुम्ही देवाच्या प्रीतीत व भक्तीत मुळावलेले असले पाहिजे.
•          वचन २ व ३ मध्ये चौथ्या कृतीचे वर्णन आहे: आज्ञापालन
▫       ही कृती देवावरील प्रीतीशी निगडित आहे. खरे तर तो म्हणतो आज्ञापालन हेच देवावर प्रीती करणे.
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आज्ञापालनातून तुम्ही देवावर प्रीती करत असल्याचे जर सिद्ध करत  नाही तर तुमचा जिव्हाळा दाखवून तुम्ही देवावर प्रीती करत असल्याचा दावा करू शकत नाही. देव हा प्रभू आहे आणि तुमच्या प्रभूवर प्रीती करणे म्हणजे त्याला प्रभू असे वागवणे.

ही साखळी ख्रिस्ताच्या सामर्थ्याला गुंफली आहे ( वचन ४-५)

आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण जे काही जगापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते. आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा जो विश्वास धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? (५:३ ब -५)

योहानाने विश्वास – प्रीती – आज्ञापालन ही साखळी मूलभूत कारणाला बांधली आहे: नवीन जन्म. हा संदर्भ लक्षात घेऊन आपण या शास्त्रवचनांचा दुसरा भाग समजून घेतला पाहिजे.
• देवाचे आज्ञापालन करणे कठीण नाही. का बरे?
पहिली गोष्ट, त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचे फायदे व त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यातील स्वातंत्र्य याचा आपण विचार केला पाहिजे (रोम १२:२, मत्तय ११:३०).
पण देवाच्या आज्ञांचे पालन त्याच्या मुलांसाठी भार का नाही याचे अगदी मूलभूत कारण आपल्या या शास्त्रभागात वचन ४ मध्ये  दिले आहे – कारण देवापासून जन्मलेली प्रत्येक व्यक्ती जगावर जय मिळवते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर काहीतरी दैवी गोष्ट आपल्यामध्ये घडते, की जी मनापासून स्वेच्छेने आपल्याला आज्ञापालनाला उद्युक्त करते. ती जबरदस्ती नसते.
• देव असे शिकवत नाही की आपण देवाची मुले विजयी असतो म्हणून आपण जगावर जय मिळवतो. मुळीच नाही. आपला विजय आपल्यामध्ये नाही. तो ख्रिस्ताच्या विजयी सामर्थ्यावर आणि जो देवाचा आत्मा आपल्याला नवीन जन्म व नवीन जीवन देतो त्याच्यावर  आधारित आहे; जेथे जुने जीवन निखळून तुटून पडले आहे (कलसै १:१३).
• हे ४थ्या वचनातील शेवटच्या विधानात सिद्ध केले आहे – विजय कोठे आहे? आपल्या आज्ञापालनात नव्हे, आपल्या शुद्धतेत नव्हे, आपल्या देवाशी असलेल्या समर्पणात नव्हे तर आपल्या विश्वासात आहे.
विश्वासाचा अर्थ काय ? त्याचा अर्थ दुसरा जो सत्य आहे, त्याच्यावर अवलंबून राहणे. तो आहे, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त – मानवधारी होऊन आलेला देव. तो आपल्या देहाने सैतानाची कृत्ये नष्ट करायला आला. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो म्हणून त्याचा विजय                        आपल्यामध्ये खात्रीने होतो.
तुम्ही म्हणाल, मी येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा तो विजय माझा होतो. कारण वचन ४ म्हणते की आपला विश्वास जय मिळवतो. पण पुन्हा वचन १ पाहा. “येशू हा ख्रिस्त आहे असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे.” त्यामुळे हे सर्व पुन्हा देवाचे काम आहे याकडेच आपल्याला घेऊन जाते.

मनन व चर्चेसाठी प्रश्न

  • योहान “जगावर जय मिळवण्याविषयी” बोलतो. ख्रिस्ती व्यक्तीला बऱ्याच महान शत्रूंशी सामना करावा लागतो. पण योहान सांगतो की जर आपण ख्रिस्तामध्ये असलो तर आपण जगाला जिंकले आहे.
    चर्चा करा: या शत्रूंवर ख्रिस्त आपल्यामध्ये कसा विजयी होतो? उत्तर ख्रिस्ताच्या कार्याविषयी असावे. आपल्या आचरणावर आधारित नसावे.
    ▫         नैतिक दडपणे (१ योहान २:१६)
    ▫         बौद्धिक दडपणे (पाखंड, १ योहान ४:१)
    ▫         सोबत्यांचे दडपण (छळणूक, योहान १६:३३)
Previous Article

रात्री उच्च स्वराने गा लेखक: स्कॉट हबर्ड

Next Article

ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का? लेखक: ए डब्ल्यू पिंक

You might be interested in …

आशीर्वाद शाप बनू शकतात

मार्शल सीगल आशीर्वाद मिळत असतानाच अगदी न टाळता येणारे, गडद मोह येतात. जीवनात, कामामध्ये अथवा सेवेमध्ये आपल्यालामिळालेला पुरवठा, किंवा उघडलेले दार, किंवा विजय यांचा आनंद घेत असताना आपले आध्यात्मिक संरक्षण आपण बहुधा बाजूला सारतो. येशूवर […]

आपण अधिक चांगल्या देशाची उत्कंठा धरतो

डेविड मॅथीस गेल्या दोन तीन वर्षात टाळेबंदी व सामाजिक अस्थिरता यासोबतच  कित्येक शहरांना नवे अडथळे आणि धोक्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारी यंत्रणा, अधिकारी यांच्याकडे न्यायासाठी ओरड करून या मानवी प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला […]