नवम्बर 23, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमच्या शरीराने देवाचा गौरव करा

डेविड मॅथीस

पहिल्या मंडळीचे ख्रिस्ती लोक स्वस्थ बसून जीवन जगत नव्हते. जरी आपल्याला मनन, अभ्यास करायला आणि देवाच्या सान्निध्यात शांत राहण्यास सांगितले आहे तरी येशू, पेत्र, याकोब आणि पौल यांच्या शिक्षणातून ते आपल्याला पुनःपुन्हा सांगतात की शुभवर्तमानाने प्रेरित व्हा आणि विश्वासाने प्रज्वलित होऊन अर्थपूर्ण कृती करा.

चांगले करण्यास वाहून घ्या

प्रथम आपले तरुण सहकारी तीमथ्य व तीत यांना पौल काय सूचना देतो ते पाहू या. “प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी आपल्या चंचल धनावर आशा ठेवू नये, तर चांगल्या कामात श्रीमंत व्हावे, उदार होऊन देण्यासाठी तयार असावे” (१ तीम. ६:१८). तसेच तीतानेही कृतीशील राहायचे होते. फक्त शिक्षणच द्यायचे नव्हते तर सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखवायचे होते (तीत२:७). काही न करता फक्त एक साधा आदर्श नव्हे तर जी चांगली कामे तुम्ही करता त्यामुळे.

आपल्या सहकार्यांनी योग्य आणि चांगली कार्ये करावी अशी पौलाची इच्छा होती. आणि सर्व खिस्ती लोकांनी चांगली कामे करायला केवळ तयार असावे असे नाही तर तत्पर असावे (तीत २:१४) अशी त्याची अपेक्षा होती. “त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे” (तीत ३:८) अशी खात्री त्याला हवी होती. क्रेतमधील खोट्या शिक्षकांची समस्या अशी होती की, “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत” (तीत १:१६). याउलट पौल म्हणतो, “आपल्या लोकांनी आपल्या अगत्याच्या गरजा पुरवल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत” (तीत ३:१४).

तीमथ्य व तीत दोघांसाठी पौलाने लिहिले की जेव्हा “आपण प्रत्येक चांगल्या कामाला सिध्द असतो”  (२ तीम. २:२१; तीत ३:१) तेव्हाच आपण आपल्या रिकाम्या वेळात प्रार्थना करू शकतो.

चांगल्या कामास सिद्ध

चांगल्या कामास सिद्ध हे तत्त्व म्हणून सोपे वाटते पण व्यवहारात ते एक पाचारण आहे आणि आपल्या सध्याच्या काळात ते कठीण झाले आहे. देह आणि रक्ताच्या  या जगात, आता वाहने, टी व्ही, चित्रपट , शारीरिक व भावनिक घटक हे चांगले काम करण्याच्या आध्यात्मिक कामामध्ये येतात. चांगल्या ख्रिस्ती कामाची सुरुवात मनामध्ये, ख्रिस्ताने काबीज केलेल्या ह्रदयामध्ये  होते. तसेच  विश्वासामध्ये त्याचे फायदे अनुभव घेऊन, इच्छेमध्ये त्याच्याकडे लक्ष देऊन, प्रीतीमध्ये इतरांचे चांगले करण्याच्या इच्छेने हे होते.

मग शरीर येते. चांगले करण्यास शरीरे अडखळण होणार की कृती करायला तयार असणार? गरज पुढे असताना आपली इच्छा निष्क्रियतेची सुस्ती मोडणार का? जेव्हा प्रीती बोलावते तेव्हा तेव्हा आपली शरीरे, हात पाय पुढे जाऊन उचलून पुढे ढकलणार का? आपण स्वस्थ न बसता आपले हात पाय शक्तीसह  पुढे नेण्यास तयार असणार का? देवाने दिलेल्या या शरीराचा उपयोग करण्यास मी तयार आणि उत्सुक असणार का ? की मी या युगाप्रमाणे कमीत कमी तसदी घेण्याची त्याला सवय लावली आहे?

शरीर स्वस्थ असेल तर स्वस्थच राहणार. त्याच्यावर जोर  देऊन कार्य करण्याची गरज आहे.

देवाने शरीर निर्माण केले आहे

देवाने आपली शरीरे इतरांनी चालवावे म्हणून निर्माण केली नाहीत.  ती मोल्यवान देणग्या आहेत. देवाने ती टिकवून ठेवली आहेत यासाठी आपण जगावे व त्याच्या गौरवासाठी या जगात चांगले काम करावे . येशूने म्हटले, “त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा” (मत्तय ५:१६). यासाठी शरीराची जरुरी आहे.

१ करिंथ ६:१३ नुसार आपली शरीरे जारकर्मासाठी नाहीत तर “प्रभूसाठी” आहेत. आणि पुढे तो म्हणतो, “देव शरीराच्या बाजूने आहे, त्याविरुद्ध नाही.” त्याने त्याच्या स्वत:च्या पुत्राला मानवी शरीर दिले. का? या जगात त्याची इच्छा पूर्ण करण्याचे पात्र म्हणून.  स्तोत्र ४० मधले बोल इब्री १०:५-७ मध्ये येशू पित्याला म्हणतो;

“तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस; तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.”


तुमची शरीरे सादर करा

आपल्याला सुद्धा पित्याने शरीरे तयार केली आहेत यासाठी की या जगात आपण त्याची इच्छा पूर्ण करावी, आपल्या शरीराने चांगली कामे करावी, त्याद्वारे ख्रिस्ताच्या राज्याचा विस्तार करावा. आपल्याला फक्त नको त्या गोष्टी टाळायच्या नाहीत तर एक मोठा पाठपुरावा करायचा आहे. “तुम्ही आपल्या शरीराद्वारे देवाचा गौरव करा” (१ करिंथ ६:२०).

आपल्याला आपली शरीरे देवाला यज्ञ म्हणून समर्पण करायाची आहेत (रोम १२:१). “आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा” (रोम ६:१३). हे बैठे काम असणार की कृतीचे? बहुधा हे बरीच मेहनत, हालचाल, श्रम कृती घेते. आपण आपल्या अवयवांना कामाला लावतो, आपल्या स्नायूंची हालचाल करतो, आपले पाय गरजेच्या ठिकाणी नेतो, मदतीसाठी हात पुढे करतो.

आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी या जगात देवाने दिलेल्या पाचारणानुसार शरीराची गरज आहे का हा प्रश्न नाही तर दररोजचा दिवस जशा नव्या गरजा पुढे आणेल तेव्हा आपण आपल्या शरीरांचा उपयोग करायला तयार आहोत का हा आहे.

की आपण आपल्या वयानुसार आपल्या शरीराला हळू चालण्याची सवय लावतो, आपल्याला शांत ठेवतो, आणि ख्रिस्ताच्या बोलावण्याचे मानकरी होण्याऐवजी दुसऱ्यांना आपली जबाबदारी देतो?

आपण या जगाशी समरूप होणार का? त्याच्या आरामशीर राहणीला आपला विश्वास व पाचारण सपाट करून देणार? की आपण “देवाची इच्छा समजून घेणारच पण  आपली शरीरे समर्थ तयार अशी देवाला सादर करणार” (रोम १२:२)?

कशासाठी सिद्ध?

फिटनेस’ (धडधाकटपणा) हा आधुनिक शब्द आपल्याला आवडतो. कृतिशील, समर्थ, निरोगी शरीराला ‘फिट’ म्हणणे म्हणजे फक्त शरीर असण्यापेक्षा खूप काही आहे. ते फक्त फोटोमध्ये व स्टेजवर पाहण्यासाठी नाही तर काहीतरी करण्यासाठी आहे. हालचाल करण्यासाठी, कृती करण्यासाठी, जगात काहीतरी साध्य करण्यासाठी आहे. खरा फिटनेस आपली शारीरिक क्षमता हे इतर हेतू साध्य करतात. शरीर हे काहीतरी करण्यासाठी ‘फिट’ असते. प्रश्न आहे की कशासाठी फिट ? येशूमध्ये आपल्याला जगातल्या व्यायामाच्या संस्कृतीपेक्षा आणि त्याच्या खोट्या मूर्तिंपेक्षा खूपच चांगली उत्तरे आहेत. पौलाने आपल्या सहकार्यांना लिहिल्याप्रमाणे  आपण “प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार” हे एक उत्तर आहे. आपण पुढे जाऊन या जगात देवाला दाखवण्यास तयार असण्याची गरज आहे. आपल्या हात पायांसह तयार राहून आपली ऊर्जा, उत्सुकता, यश, जीवन दाखवायला हवे; थकवा नव्हे. आपली मने, ह्रदये, इच्छा पुढे जाण्यास उठून निघण्यास, जगात जाऊन लोकांना मदत करण्यास तयार हवीत. मला कमीत कमी शक्ती कशी वापरता येईल याचा हिशोब घालत नव्हे. आपण इतरांचे चांगले करणारे व तेही आनंदाने करणारे लोक असावेत. हे करताना आपल्या शरीरावर ताण पडणार, गैरसोयी येणारच.

योग्य देखभाल

या पतित जगात आपण आपल्या शरीरांचा आदर राखावा.

ख्रिस्तामध्ये आपल्याला शेतात लपवलेली ठेव सापडली आहे (मत्तय १३ :४४). आता मोलवान मोती आपल्या हातात आहे (मत्तय १३:४५-४६).  आपण ख्रिस्ताला जाणून घेण्याचे अत्युच्च मोल चाखले आहे (फिली. ३:८).

या जीवनाचा आनंद घेऊन शेवट करणे हे फारच क्षणभंगुर आहे. ख्रिस्ताचा आनंद घेणे हे योग्य व प्रभावी हेतू आहे, जो आतासाठी आणि अनंतकाळासाठी आहे. हे आपले जीवन आहे. तोच आपले जीवन आहे.

आणि येशूचा हा आनंद घेताना आपल्या शरीराचा योग्य उपयोग आणि देखभाल केल्याने त्यात आणखी गोडवा येतो. देवाने ती काही फक्त स्वस्थ बसून राहण्यासाठी निर्माण केली नाहीत. त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी आणि मग जगात जेथे गरज आहे तेथे जाण्यासाठी त्याने निर्माण केली आहेत. आणि ही हालचाल आपल्याला अधिक निरोगी आणि आनंदित करत नाही तर आपल्याला प्रीती करण्यास उद्युक्त करते. आणि येशूच्या नावाने अशी प्रीती करताना आपला त्याच्यामधला आनंद खोल आणि विस्तृत होतो.

शरीराची योग्य देखभाल आपल्या बहुतेक जणांमध्ये किमया घडवून आणेल. आपल्याला एक उच्च पाचारण आहे. ते खुद्द देवाच्या हेतूद्वारे  विश्वामध्ये पुढे जाते. ते म्हणजे आपल्या शरीरांना प्रीतीच्या सेवेमध्ये देवाच्या गौरवासाठी कामाला लावणे.

Previous Article

खरे आशीर्वादित होणे म्हणजे काय?

Next Article

नातेसंबंधातील बहुतेक संघर्ष कसे सोडवावेत

You might be interested in …

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का?

ट्रेवीस मायर्स गेल्या वर्षी मला एक हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये रसग्रंथीचा कॅन्सरच्या गाठींमध्ये बदल होतो. तसे अनेक प्रकारचे लिम्फोमा आहेत, या प्रकारचा कॅन्सर अमेरिकेत प्रौढ लोकांना होणाऱ्या लिम्फोमात सातव्या […]

तुझा हात तोडून टाकून दे

जॉन ब्लूम देवाच्या पवित्रतेची जाणीव गमावणे हे आध्यात्मिक दृष्टीने धोक्याच्या ठिकाणी असल्याचा इशारा आहे. बाहेरून सर्व काही व्यवस्थित  दिसत असेल: आपली कुटुंबे चांगली असतील. आपल्या सेवा फोफावत असतील. आपल्याला प्रतिष्ठा  मिळत असेल आणि आपली आध्यात्मिक […]

कोमट कसे राहू नये

लेखक: ग्रेग मोर्स अनेक वर्षे मी समजत होतो की मी ख्रिस्ती आहे -पण मी नव्हतो. माझे आणि देवाचे नाते आहे हे मी शपथेवर सांगे- पण तसे नव्हते. मी कोणत्याही क्षणी मेलो तरी स्वर्गात माझे स्वागत होईल […]