अक्टूबर 16, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

क्रिस विल्यम्स

लेखांक ६

(ऑक्टोबर २०१७ मध्ये व्हिटेनबर्ग येथे  ५०० व्या धर्मजागृतीच्या स्मृतीदिनाच्या परिषदेत हा निबंध सादर केला गेला.)

अँग्लिकन

ही खेदाची गोष्ट आहे की अँग्लिकन मंडळी देवाच्या वचनापासून दूर राहिली. याचे पुरावे देता येतील. सम्राट चवथ्या एडवर्ड  पासूनच (१५३७-५३) यांच्यामधीलच एका गटाने धर्मजागृती व प्युरिटन शिकवण उचलून घरली होती. देव फार सामर्थ्यानिशी कार्यरत होता. आणि ब्रिटिश राजवटीसोबतच भारतात अॅंग्लिकन चर्चही आले. त्यामुळे  त्यांच्यामध्ये धर्मसुधारक अँग्लिकनही आले. क्लॅफम सीअरचे प्रतिष्ठित लोक सुवार्ताप्रसाराच्या मिशन सेवेला समर्पित होते. त्यांनी भारत व आशियातील इतर राष्ट्रांमध्ये मिशनरी पाठवण्याचा आग्रह धरला. शाफ्ट्सबरी व विल्बरफोर्स हे पार्लमेंट सदस्य व इंग्लंडमधील गुलामगिरी निर्मूलनाच्या कामी इतरांसह महत्त्वाचे साधन होते. 

अशा धर्मसुधारक सुवार्तावाद्यांच्या द्वारे १७९९ मध्ये द चर्च मिशनरी सोसायटी स्थापण्यात आली. याच काळात द सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज  व द सोसायटी फॉर द प्रॉपगेशन ऑफ द गॉस्पल यांची देखील स्थापना झाली. या सर्व सुवार्तावादी अॅंग्लिकन सोसायटींनी भारत व त्याच्या आजुबाजूच्या राष्ट्रांमध्ये ख्रिस्ती विश्वास प्रस्थापित करण्याची उत्कृष्ट कामगिरी बजावली. लंडन हे सुवार्तावादी लोकांचे, कल्पना व विचारांचे, व पुस्तकांचे  केंद्र बनले. हे सर्व आशियाच्या दूर किनाऱ्यांवरील भूमीवर पोहंचले. वास्तविक याविषयी पुरावादाखल पत्र उपलब्ध आहे. ते ईस्ट इंडीया कंपनीने सुवार्तावाद्यांना व प्युरिटनांना पाठवले आहे. त्याची एक प्रत जॉन ओवेनलाही पाठवलेली दिसते. त्या पत्रात भारतात मिशनरी पाठवण्याची विनंती केली आहे.

प्रेषित थोमाने दक्षिण भारतातील केरळ राज्यात मंडळ्या स्थापल्याच्या आख्यायिका कधीच पुसल्या जाणार नाहीत. पण १ल्या व ६व्या शतकात झालेल्या छळामुळे नेस्टोरियन सिरियन ख्रिस्ती केरळला पळून आले होते. ते व मूळचे थोमापासूनचे ख्रिस्ती व स्वत:ला जेकबाइट म्हणवून घेणारे एकत्र आले. १८००च्या मध्यात अब्राहाम मालपन नावाच्या एका सदस्यावर अँग्लिकन मिशनरींच्या व केरीच्या बॅप्टिस्ट सोबत्यांच्या,वॉर्ड आणि मार्शमन यांच्या सुधारित विश्वासाचा खोलवर प्रभाव पडला. त्यामुळे अर्थोडॉक्स सिरियन चर्चमध्ये धर्मजागृती होऊन ते परत बायबलकडे व नीतिमान ठरले जाण्याविषयीच्या अधिक सुस्पष्ट सिद्धांताच्या ज्ञानाकडे  वळले. हे दक्षिण  भारतातील केरळमधील मारथोमा चर्चचे मूळ होय.

हिंदुत्ववादावरील आघात

प्रॉटेस्टंट धर्मजागृतीने जर युरोपचा मार्ग दुरुस्त केला तर सहाजिकच जगाच्या इतिहासावर अनेक विलक्षण प्रकारे त्याचा आघात झाला. त्या जगतात आशिया व भारताचाही समावेश होतो. युरोपातील या महान क्रांतीकडे भारतातील बुद्धिवादी व समाजवादी विद्वान सुधारकांचे लक्ष वेधले व भारतात सुधारणा करण्यास ते प्रभावित झाले.

राजाराममोहन रॉय, सर सईद अहमद खान, अरुणा असफ अली, इंडियन नॅशनल आर्मीचे (INA) कॅप्टन लक्ष्मी सेहगल, सरोजिनी नायडू, अॅनी बेझंट, महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले व त्याच्या पत्नी सावित्रीबाई आणि पंडिता रमाबाई यांनी योजनाबद्ध आखणी करून यशस्वीपणे भारतीय संस्कृतीत व धर्मात सुधारणा घडवून आणल्या.
स्त्रियांची बंधने झुगारण्यात आली व सतीसारख्या म्हणजे मृत पतीच्या जळत्या चितेवर त्याच्या जिवंत पत्नीला जिते जाळणे, बालविवाह अशा चालींना बंदी घालण्यात आली व विधवांना पुनर्विवाहास परवानगी देण्यात आली. जातिभेद व अस्पृश्यतेवरही प्रहार करण्यात आला. 

सामाजिक सुधारकांखेरीज शुभवर्तमानाच्या सामर्थ्याने भारतावर आघात केला आणि विचारवंत व समर्पित हिंदूंचा येशू ख्रिस्ताला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी पाठपुरावा झाला.  ना. वा. टिळक, पंडिता रमाबाई, बाबा पद्मनजी अशा नावाजलेल्या स्त्री- पुरुषांनी व पुढारपण करणाऱ्या अनेकांनी ख्रिस्ताचा उघडपणे स्वीकार केला. कित्येकांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने सरकारने टपाल तिकिटे काढली. 

शुभवर्तमानाने हिंदुत्ववादावरही अंतर्गत सुधारणांबाबत आघात केला. कलकत्त्यात (सध्याचे कोलकोटा) राजाराम मोहन रॉयवर विल्यम केरींचा व त्यांचे सहकारी विल्यम वॉर्ड व जोशुआ मार्शमन या सेरामपूर टीम म्हणून परिचित असलेल्यांचा प्रभाव पडला आणि तो जवळ जवळ ख्रिस्ती झाला आहे अशी अफवा पसरली. बरे ते असो. पण ज्योतिराव फुलेंबाबतही तेच झाले. त्यांच्यावर तर राजाराम मोहन रॉयपेक्षाही ख्रिस्ती झाल्याचे जास्त आरोप झाले.

राजा राम मोहन रॉय यांनी हिंदुत्ववादात सुधारणा करून स्वत:चाच ब्राम्होसमाज (देवाची सहभागिता ) नावाचा एक पंथ स्थापन केला. तो मूर्तिपूजेरहित तत्त्वज्ञानाचा हिंदुत्ववाद होता. त्यांच्यानंतरचे केशब सुंदर सेन तर त्यांच्यापेक्षाही सुवार्तेने प्रभावित झाले. पण हिंदू संस्कृतीशी ख्रिस्ती विश्वासाची सरमिसळ करून त्यांनी नवीनच कल्पना मांडल्या.

पुढे अनेक ख्रिस्ती कल्पना घेऊन मुंबईतील बुद्धिवंतांनी आणखी सुधारित हिंदुत्ववाद मांडला. त्यांनी प्रार्थना समाजाची ( प्रार्थनेची सहभागिता) स्थापना केली. 

अशा प्रकारच्या अतिप्रक्षुब्ध आघातामुळे धर्मजागृतीकडे टोकाच्या साशंक नजरेने पाहिले जाऊ लागले. म्हणून भारतातील प्रादेशिक भाषेतील एका जुन्या ख्रिस्ती मासिकात मांडलेले विचार मी सदर्भासाठी देत आहे – 

“आपल्याला सांगितले जाते की ख्रिस्ती विचारप्रणाली भ्रष्ट झाली होती म्हणून तिच्यात सोळाव्या शतकात सुधारणा करण्यात आल्या. त्यावरून आता अशा हेतूने योजना आखली जाताना ( हिंदू धर्मात व हिंदू धर्मग्रंथात धर्मजागृती) दिसते की जी सहज साध्य होणारी नाही. पण ती धर्मजागृती अगदी पूर्णपणे भिन्न होती. सुधारकांना रुचेल अशा सुधारणा त्यांनी त्यांच्या धर्मग्रंथात केल्या नाहीत तर सर्व मानवी शोध टाकून देऊन बायबल जसे आहे तसे त्याकडे वळणे याचा त्यात समावेश होता. बायबलमध्ये सुधारणा केल्या गेल्या नाहीत. उलट बायबलचा अधिकार योग्य असल्याचे शाबीत केले. ते दैवी प्रकटीकरण आहे, एकमेव आहे व पुरेसा विश्वसनीय अधिकार असलेले आहे आणि  ते आचरले जावे असे आहे हे मान्य करून त्याचा स्वीकार करण्यात आला. १७ व्या शतकातील धर्मसुधारकांनी स्वत:ला बायबलपेक्षा वरचढ लेखले नव्हते. तर उलट ते जे काही करत होते त्यासाठी ते बायबलकडे दाद मागत होते. त्यांच्याकडे सुधारित शास्त्र (धर्मशास्त्र) नव्हते. तसे असते तर त्यांनी एखादे असभ्य, पूज्य धर्माचा अभाव असलेले तरी धाडसाने त्याला स्वर्गीय म्हणण्याचा  अविर्भाव करणारे असे एखादे शास्त्र तयार करण्याविषयी प्रस्ताव मांडला असता. त्या धर्मजागृतीपेक्षा हिंदुत्ववादाची जागृती किती भिन्न आहे.” (ज्ञानोदय मासिक, १५ ऑगस्ट, १८१९).

समारोप

हाच महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. प्रॉटेस्टंट धर्मजागृतीने बायबलचा पुन्हा शोध लावला. धर्मजागृती बायबलमध्ये सुधारणा करण्यासाठी नव्हती तर संपूर्ण जीवन व आचरण बायबलनुसारच असावे याविषयीची ती धर्मजागृती होती. न बदलणाऱ्या बायबलने धर्मजागृती घडवून आणली. पुरुष व स्त्रिया बायबल वाचू लागले. भाषांतर करू लागले, संदेश देऊ लागले व लोकांना आपल्या बोली भाषेत बायबल उपलब्ध होऊ लागले. आशियातील सुवार्ताप्रसार सेवेत बायबलचे भाषांतर ही एक अद्भुत सेवा ठरली आहे.
बायबलच्या काळात नेमके हेच घडले. योशिया व त्याच्या लोकांना देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला, त्यामुळे लोक पश्चात्तापास प्रवृत्त झाले आणि धर्मजागृती झाली. एज्रा व नहेम्या यांनी धर्मशास्त्राचा शोध घेतला, ते वाचले, त्याचे स्पष्टीकरण केले व देवामध्ये खूप आनंद केला. मग नहेम्याने इस्राएलमधील धर्मजागृतीचे पुढारपण केले.

आपण धर्मजागृतीचा सोहळा साजरा करीत आहोत. हे करीत असता आपण धर्मजागृती वाढत्या वेगाने व्हावी यावर अधिक जोर देऊ या. जगभर मंडळी तडजोड करीत आहे. बायबलचे गाभाभूत सिद्धांत संदेशातून शिकवले गेले पाहिजेत. बालबलच्या ईश्वरी सिद्धांतांचे शिक्षण देताना आज्ञापालनास पाचारण केले गेले पाहिजे व बायबलचा अभ्यास आनंददायी वाटला पाहिजे. पापापासून तारण होते व केवळ ख्रिस्तामध्ये, केवळ कृपेने, केवळ विश्वासाद्वारे नीतिमान ठरले जातो हे फक्त बौद्धिक ज्ञान नसावे तर तो वैयक्तिक अनुभव असावा.

मी फार पूर्वी धर्मजागृती, लूथर किंवा कॅल्विनविषयी ऐकले. फार पूर्वी मी नीतिमान ठरले जाणे व पवित्रीकरण हे शब्दप्रयोग ऐकले किंवा कृपेचा सिद्धांत ही परिभाषा ऐकली. माझे तारण झाले. १२ व्या वर्षापासून मार्क, योहान, प्रेषितांची कृत्ये, गलती व रोमकरांस पत्र या मालिकेनंतर मी संपूर्ण नवा करार वाचून काढला. त्याद्वारे सुवार्तेने माझ्या जीवनाचे रूपांतर झाले. मी १५ वर्षांचा किशोर असताना माझ्या पापाचे ओझे बाळगत असतानाच जीवनाचा अर्थ शोधण्याची खोल उत्कंठा बाळगून होतो. कोणीतरी साक्ष देत असता माझ्या कानावर शब्द पडले की येशूख्रिस्ताद्वारे देवपित्याशी तुम्ही संबंध जोडू शकता. मला पश्चात्तापाला आणि येशूवर प्रभू व तारणारा म्हणून विश्वास ठेवायला उद्युक्त करण्यात आले. आणि प्रत्येक पापाच्या ओझ्याने  भारलेल्या पाप्याला ज्या गोड शब्दांनी दिलासा मिळतो ते शब्द माझ्या कानी पडले, ” ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयास या जगात आला” (१ तीमथ्य १:१५). धर्मजागृतीतील समाधान, कृपेचा सिद्धांत, ख्रिस्त येशूचे सार्वभौमत्व व प्रभुत्व ही परिभाषा समजण्यापूर्वीच  वास्तस्व झाली. धर्मसुधारकांचा विश्वास हा खरोखर बायबलची शिकवण आहे याविषयी आपण सर्व सहमत असू या. 

चला आपणही परत बायबलकडे वळू या. त्यामुळेच धर्मजागृतीची ही आग भडकतच राहील.

समाप्त

Previous Article

प्रभातसमयीचा हल्ला

Next Article

देव तुम्हाला क्षमता देईल

You might be interested in …

देव जगात क्लेश , संकटे, आपत्ती का येऊ देतो? जॉन मॅकार्थर

जॉन मॅकार्थर यांच्या संदेशाचा क्रॉसी ऊर्टेकर यांनी केलेला संक्षिप्त अनुवाद. आपल्या बायबलचा देव पवित्र, चांगला, प्रेमळ, सुज्ञ, सर्वसमर्थ, सर्वज्ञ, कनवाळू, कृपाळू आहे असा आपला विश्वास आहे. यावर  नास्तिक लोक आक्षेप घेऊन म्हणतात, देव जर असा […]

स्तोत्र १४: देवाच्या दीनांचा दिलासा (II)

मनात देव नसलेल्यांचं पूर्वचरित्र आपण पाहिलं. तोंडात त्याचं नाव नाही, कृती दुष्टाईची. अमंगळ मूर्तिपूजेची. व्यवहारातील समंजसपणा नाही. देवभक्ती नाही आंतरबाह्य वाट चुकलेली. शील बिघडलेलं. देवाचं ज्ञान नाही. तारणाच्या योजनेची माहिती नाही. कळस म्हणजे दीनांना भाकरीप्रमाणं […]

प्रसारमाध्यमे आणि मुले  

                                                          लेखक:  जॉश स्क्वायर्स तो टी व्ही बंद करा! माझ्या घरात जर तुम्ही माशी म्हणून घोंगावत असता तर हे वाक्य तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकले असते. सुट्टी असल्याने शाळेचे वेळापत्रक नसते आणि मग कन्टाळा घालवण्यासाठी […]