दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

लेखांक २

“तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.
प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा” (२ तीम. ३:१४-१७).

प्रस्तावना
तारणाचे मूळ केंद्रस्थान म्हणजे कुटुंब. तारणाचं साधन म्हणजे कुटुंबातील उपासना. त्यात शास्त्राचं स्थान कोणतं ते पाहू. एका ध्येयपूर्ण नमुनेदार ख्रिस्ती कुटुंबातील अनुभवासंबंधी आपण विचार करू.
तीमथीचं कुटुंब खरं ख्रिस्ती कुटुंब होतं. तिथली उपासना, शिक्षण, शास्त्रशिक्षण मार्गदर्शक आहे. शास्त्रासंबंघी त्या कुटुंबाचा काय अनुभव आहे ते पाहू. त्यासाठी आपल्याला २ तीम. ३: ४-१७ वचनांचा अभ्यास करणे भाग आहे. त्या स्पष्टीकरणापूर्वी त्याची पार्श्वभूमी पाहू.

(अ) पार्श्वभूमी – कुटुंब.
नमुनेदार ख्रिस्ती कुटुंब. त्यातील कौटुंबिक उपासना. त्या उपासनेचं केंद्र म्हणजे पवित्र शास्त्र.  या महत्त्वाच्या विषयाची मांडणी आहे ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची.‘शेवटल्या काळी’ (३:१).
प्रियांनो, आपण त्या शेवटल्या काळातच जिणं जगत आहोत, याची जाणीव आपल्याला आहे काय? त्याकरता मनाची खात्री करायला मी तुम्हाला पवित्र आत्म्याच्या हवाली करतो. त्या काळातील भ्रष्टाचाराची तुम्हाला कल्पना हवी असेल तर उत्पत्ती ६:५ वर मनन करा. २ तीम. ३:१-९ त्याच वचनाचे स्पष्टीकरण आहे. तिथं १९गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर मनन करा. ती भ्रष्टाचाराची खोली आहे. सत्याला अडवणं हे त्यांचं काम आहे. सत्य म्हणजे येशू ख्रिस्त! जिवंत तारण! मंडळीमधलं ते जिवंत मुख्य काम. येशूची ओळख करून देण्याचं काम. त्या ओळखीच्या आड येतो हा भ्रष्टाचार! तिला अडवतो. तिची वाढ होऊ देत नाही. हे त्या भ्रष्टाचाराचं काम!

(ब) असल्या सामान्य मंडळीतील वातावरणामध्ये देवाच्या सेवकाला सुवार्तिकाचं काम करावं लागतं.
‘छळ’ हे त्याचं रोजचं अन्न आहे. उपासनेमध्ये स्वत:ला व इतरांना देवाची भेट करवून देण्याचं त्याचं काम आहे. त्याचं जिणंच त्या श्रमानं भरलेलं आहे. पण त्या खस्ता खात असता ‘छळ’ होणार हे ठरलेलंच आहे. ही काट्याची वाट त्याला तुडवावी लागतेच.
प्रियांनो, क्षणभर थांबा. मंडळीसंबंधी, तिच्यातील सभासदांसंबंधी मी जे बोलतो ते त्यांच्या तारणाकरता आहे काय? त्या योगाने त्यांची व प्रभूची भेट होईल काय? ओळख होईल काय? ती वाढेल काय? हे आपण देवाच्या समक्षतेत पाहू या.

(क) ‘कायम टिकून राहा.’
वरील कमालीच्या अडचणीच्या स्थितीमध्ये सामान्य सभासदानं, देवाच्या सेवकानं कसं, राहायचं तरी कसं? ज्या गोष्टी तू शिकलास- ज्या गोष्टींविषयी तुझी खात्री झाली, त्याच्यात कायम टिकून राहा.
तुझ्या कुटुंबामध्ये, कुटुंबातल्या उपासनेमध्ये आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, देवासमोर बसला असता, गुडघे टेकले असता, देवाशी बोलत असता, जे शिकला, ज्याची खात्री झाली, त्या गोष्टींमध्ये कायम टिकून राहा.
कुटुंबाच्या उपासनेत मिळणाऱ्या शिक्षणासारखं शिक्षण नाही. आईच्या सहवासातील तो एकांत, तिच्या प्रीतीचा आवाज! देवाची  रिवरिवणारी समक्षता! शास्त्रातल्या त्या गोड गोष्टी! ह्या सर्वांना ते शिक्षण फार आवडतं! गोड
वाटतं! नकळत मनात शिरतं. तिथं राहातं! त्यानं तिथं कायम राहावं, पुरी पुरी पक्कड घ्यावी. ते कितीतरी कठीण असतं. पण ते झालंच पाहिजे. कारण शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. ते आता आलेच आहेत.
कुटुंबातल्या ह्या गोड उपासनेचं आवडत्या शिक्षणाचं केंद्र कोणतं ते पुढच्या लेखांकात पाहू.

(या लेखानंतर तीमथ्याची दोन्ही पत्रे वाचा. त्यात ‘ सुभक्ती’ च्या जागी उपासना शब्द घालून वाचा. ती वचने स्वतंत्रपणे लिहून काढा. मग कुटुंबातील उपासनेचं महत्त्व अभ्यासा.)


Previous Article

 कुटुंबात ख्रिस्त

Next Article

‘माझी आई’

You might be interested in …

आणिवल्हांडणाची सांगता झाली

…  आणिवल्हांडणाची सांगता झाली संकलन- लीना विल्यम्स “बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरू मारावयाचे तो दिवस आला” लूक २२:७. यरुशलेमाचे रस्ते गजबजून गेले होते. वल्हांडणाचे पवित्र भोजन करण्याचा तो वार्षिक दिवस पुन्हा आला होता. […]

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

लेखक : जेराड मेलीन्जर काही वर्षांपूर्वी माझे आजी व आजोबा अजूनही आमच्याबरोबर होते तेव्हा आम्ही एका पिकनिकला गेलो. आजी पहिल्यासारखी राहिली नव्हती. विस्मरण हळूहळू कायमचे झालेले होते. ते इतके वाढले की तिला माझे किंवा घरच्या […]

चिडचिड? विसरून जा लेखक : स्कॉटी स्मिथ

  देवाने आपल्यासाठी येशूमध्ये  भरभरून केलेल्या, अढळ, न संपणाऱ्या प्रीतीची आठवण जितकी मी अधिक करतो तितके मी इतरांवर चिडण्याचे विसरून जातो. दुर्दैवाने चिडचिड करावी असे मी स्वत:ला सांगतो. पण जिथे मी कमकुवत आहे तेथे देव […]