दिसम्बर 29, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अत्यंत  निराशेची गव्हाणी

जॉन ब्लूम

ख्रिस्तजन्माची पहिली रात्र एक पवित्र रात्र होती. पण ती शांत रात्र नव्हती. सर्व काही शांत नव्हते. शंभर मैल चालल्यानंतर, योसेफ गर्दीने भरलेल्या बेथलेहेम गावामध्ये पोहोचला.  त्याच्या पत्नीची प्रसूतीची वेळ आली होती. परंतु त्याला आढळले की त्यांच्यासाठी “उतारशाळेत जागा नव्हती” (लूक २:७).

“सर्व खोल्या भरलेल्या आहोत. आम्ही आणखी एकाही व्यक्तीला घेऊ शकत नाही.”

“कृपया, माझी पत्नी आता केव्हाही प्रसूत होईल! आम्हाला थोडीशी एकांताची जागा मिळाली तरी चालेल.”

थकलेल्या मालकाच्या डोळ्यात करुणा आणि संताप मिसळला. त्याचा थकलेला हात त्याच्या डोक्यावर घासत होता. “पाहा, मी तुम्हाला आमचे स्वतःचे घर दिले असते, परंतु आम्ही ते सुद्धा आधीच इतरांना दिले आहे. लोक प्रत्येक कोपऱ्यात आहेत. मग  बाळाच्या जन्मासाठी कशी जागा असणार?”

 येण्यापूर्वी नासरेथमध्ये असताना, योसेफाला खूप आत्मविश्वास होता. त्याला बाळंतपणात मदत करण्याबद्दल काहीच माहिती नव्हती. ते स्त्रियांचे अधिकार होते. पण देवाने त्याचा देवदूत मरीयेकडे आणि नंतर त्याच्याकडे पाठवला होता. देवाने मरीयेला गर्भवती होण्याचे घडवून आणले होते. देवाने सम्राट ऑगस्टसच्या हृदयाचा प्रवाह वळवला होता (नीतिसूत्रे २१:१) यामुळे बेथलेहेमबद्दलची मशीहाची भविष्यवाणी पूर्ण होणार होती. जेव्हा ते तेथे पोचतील तेव्हा देव त्यांच्या गरजा नक्कीच पूर्ण करणार होता. शेवटी, हे मूल देवाचा पुत्र होते!

पण आता योसेफ हताश होत होता. बेथलेहेम लोकांनी भरलेले होते. रोमन जनगणनेमुळे मशीहा बेथलेहेमला आला, पण येथे त्याला डोके ठेवायला जागा उरली नाही.

“येथे इतर धर्मशाळा आहेत का?”

“नाही. सहसा बेथलेहेममध्ये व्यवसायासाठी दोन धर्मशाळांची गरज भासत नाही. या भागात तुमचे नातेवाईक नाहीत का?”

त्यांनी मेरीला वेदनेने ओरडताना ऐकले.

जवळजवळ हताश होऊन, योसेफ बोलतच  राहिला. “नाही. कृपा करून आम्हाला कोणीतरी घरात घेऊ शकेल  का?”

“माझ्या ओळखीच्या प्रत्येकाने आधीच पाहुण्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे.”

कृपया, देवा! कृपया! आम्हाला जागा हवी आहे! आम्हाला एक खोली दे! तुझा देवदूत पाठव! काहीतरी कर!

दोघेही पाच सेकंद एकमेकांकडे तणावपूर्ण नजरेने पाहत राहिले. मग योसेफाने दमून म्हटले, “आम्ही काहीही घेऊ!’

त्याच क्षणी एक स्त्री मालकाच्या मागे आली आणि म्हणाली, “आमच्याकडे मागे एक गोठा आहे.”

“राहेल, त्याची बायको बाळंतपणाच्या बेतात आहे! आपण तिला गोठ्यात ठेवू शकत नाही!”

“मी ऐकलंय ते,” राहेल उत्तरली. “पण आता जास्त वेळ नाही आणि रस्त्यापेक्षा गोठा बरा आहे, याकोब. मी काही गोधड्या आणि स्वच्छ पेंढा घेईन.” तिने योसेफाकडे पाहिले, “मी तुम्हाला मागच्या बाजूला भेटेन. मी बाळंतपणातही मदत करू शकते. तिला सांग की सर्व काही ठीक होईल. देव तुम्हाला मदत करील.”

“धन्यवाद!” योसेफ म्हणाला. “देवा, धन्यवाद!”

पण तो मरीयेकडे वळला तेव्हा त्याला आतल्या आत पस्तावा होऊ लागला. राहेलची मदत ही एक देणगी होती. पण गोठ्यात? त्याच्या विश्वासू पत्नीसाठी आणि सर्वोच्च देवाच्या पुत्रासाठी  हाच  पर्याय तो देऊ शकत  होता का? देवाचा पुत्र गोठ्यात कसा जन्माला येऊ शकतो?

“योसेफ!” मरीयेच्या आवाजात आता तातडी होती.

आता वेळ नव्हता. हळुवारपणे योसेफने मरीयेला उचलले आणि तिला धर्मशाळेच्या मागच्या बाजूला नेले.

मरीया जोराने श्वास घेत होती, तिला त्रास होत होता. “त्यांच्याकडे खोली आहे?”

योसेफला लाज वाटली. पण मरीयेला आश्वासन हवे होते. “त्यांच्याकडे फक्त गोठाच आहे. तो सुद्धा चालेल आता. आपण तो  स्वच्छ करून घेऊ, आणि उतारशाळेच्या मालकाची पत्नी आपल्याला मदत करेल. देव पुरवत आहे.”

“धन्यवाद देवा!” ती कुजबुजली. आणि मग तिने याकोबाच्या मानेला घट्ट पकडले कारण आणखी एका वेदनेने तिची पकड घेतली आणि प्रकाशाला जगात आणखी ढकलले.

त्या रात्री योसेफाला जेथे राहायचे होते  त्यात गोठ्याचा समावेश नव्हता. त्यात त्याच्यासाठी आनंद नव्हता, तो फक्त हताश होऊन तिथे होता.

पण गोठा हा योसेफ किंवा मरीयेबद्दल नव्हता. देवाच्या पुत्राने स्वतःला शून्य केले याबद्दल होता (फिलि. २:७). तो स्वतःला अथांग खोलीपर्यंत नम्र करण्यासाठी आला होता. म्हणून त्याने त्याच्या जन्मासाठी एक गोठा  उधार घेतला. नंतर, आपल्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी एका वेदनादायक मृत्यूनंतर (१ योहान ४:१०), तो एक कबर उधार घेणार होता (मत्तय २७:५९-६०).

पण योसेफला कदाचित बेथलेहेमामध्ये हे काहीही समजले नसेल. त्या गोंधळाच्या क्षणी, त्याला फक्त एवढेच माहीत होते की प्रत्यक्ष आणि विधीनुसार अशुद्धतेने भरलेले गोठा, एवढेच तो मरीया आणि मशीहासाठी देऊ शकत होता. आणि त्याच्या भीती आणि लज्जेशी लढण्यासाठी, तो फक्त असा विश्वास ठेवू शकत होता की देव, जो वेगळ्या रीतीने दुसरे काही  करू शकला असता, पण या खालच्या पातळीला  नेण्यात त्याचा काही गूढ हेतू होता.

आणि हाच आपल्यासाठीही ख्रिस्तजन्माचा संदेश आहे आहे. कधीकधी, देवाचे विश्वासूपणे अनुसरण करण्याचा प्रयत्न करताना, आपण स्वतः एका हताश क्षणात अडकले जातो, आपल्याला अशा ठिकाणी जाण्यास भाग पाडले जाते जिथे आपण जाणे निवडणार नाही. तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे: आपले जीवन आणि परिस्थिती अखेरीस आपली नाही (१ करिंथ. ६:१९-२०). ती येशू ख्रिस्ताबद्दल आहे.

पित्याचे आपल्यासाठी आणि आपल्या त्रासासाठी जे उद्दिष्ट आहे ते आपल्या पलीकडे पसरलेले आहे. आणि बऱ्याचदा त्या क्षणी जे दुर्दैवी वाटते ते मोठ्या दयेचे साधन असल्याचे सिद्ध होते. तुमच्या निराशेच्या जागी ते असे असू शकते की, तुम्हाला सर्वात जास्त गरज असलेली गोष्ट शांतता नसून अधिक विश्वास ही आहे. कारण देव त्याच्या प्रचंड कृपेचे जन्मस्थान म्हणून निराशेच्या गव्हाण्या निवडतो.

Previous Article

देव त्याचे वैभव उघड करतो

Next Article

मानव होणारा राजा

You might be interested in …

तुझा हात तोडून टाकून दे

जॉन ब्लूम देवाच्या पवित्रतेची जाणीव गमावणे हे आध्यात्मिक दृष्टीने धोक्याच्या ठिकाणी असल्याचा इशारा आहे. बाहेरून सर्व काही व्यवस्थित  दिसत असेल: आपली कुटुंबे चांगली असतील. आपल्या सेवा फोफावत असतील. आपल्याला प्रतिष्ठा  मिळत असेल आणि आपली आध्यात्मिक […]

तुमच्या गर्वाबरोबर वाद करा

स्कॉट हबर्ड वेडेपणा असलेल्या व्यक्ती बरोबर राहताना कसे वाटते याची कल्पना तुम्हाला असेल. “मनुष्य संतानाचे  ह्रदय हे  दुष्टतेने भरलेले असते आणि ते जिवंत असतात तोवर त्यांच्या ह्रदयात वेडेपण असते” (उपदेशक ९:३ पं. र. भा.). जर […]

येशूचे वंशज – येशूच्या कुटुंबातील कुप्रसिध्द स्त्रिया

 जॉन ब्लूम येशूशी ठळकपणे संबंधित असणाऱ्या स्त्रियांमध्ये एक विचित्र धागा आढळतो. त्या सर्व स्त्रिया कुप्रसिद्ध होत्या असे म्हणू या का? आणि ही कुप्रसिद्धी त्यांच्या लैंगिक लफड्यातून निर्माण झाली होती.  हे ख्रिस्ताबद्दल काय सांगते? बरेच काही. […]