नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

स्वर्गाची उत्कट इच्छा

 

माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे माझी निराशा होणार नाही कारण नेहमीप्रमाणे पूर्ण धैर्याने आताही माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराच्या व्दारे महिमा होईल याची मला खात्री आहे. कारण माझ्यासाठी जगणे  म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे (फिलिप्पै १: २० व २१).

ज्यावेळी आम्ही आमच्या मृत्यूच्या निश्चिततेसंबंधी विचार करू लागतो तेव्हा ही बाब आम्हाला आमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास व परिवर्तनकारी रीतीने आमच्या आयुष्याच्यातील प्रत्येक दिवसासंबंधी विचार करण्यास भाग पाडते व जसे आम्ही ‘अनंतकाळासंबंधी’ आमचा दृष्टिकोन ठेवतो त्या प्रमाणे आम्ही या पृथ्वीवर ‘वेळेच्या’ सीमेत आमचे आयुष्य व्यथीत करतो.

मृत्यूमध्येसंपूर्णमानवजातीची भागेदारी आहे. तो जीवन बदलणारा घटक आहे.”स्टीव्ह जोब

 

परंतु ख्रिस्तामध्धे विश्वास ठेवणाऱ्यांना स्वत: देवाने पूर्ण आशा (खात्रीपू्र्वक हमी) दिली आहे की ज्याक्षणी आम्ही या पृथ्वीला सोडू त्या क्षणी आम्ही स्वर्गात जाऊ.

ख्रिस्तात विश्वासू असणारे आम्हीया जगात तर राहतो पण आमचे नातेस्वर्गाबरोबरआहे”.

आमचा जेव्हा आमच्या स्वकियांबरोबर वियोग होतो तेव्हा आमच्यासाठी, स्वर्ग आणि अनंतकाळ ही जास्त जवळ होतात. आमची पृथ्वीपेक्षा स्वर्गाबरोबरची  जवळीक आणिओढ अधिकाधिक वाढते कारण आमच्या लक्षात हे जास्तन् जास्त प्रखरतेने येऊ लागते की ज्या वेळी आम्ही ‘येथे’ नसणार’, तेव्हा निश्चितपणे आम्ही ‘तेथे’ असू!

“So where He leads me I can safely go[1]

And in the blessed ‘hereafter’ I shall know

Why in His kindness, He had led me so”

 

एकदा ज्यावेळी पाळक ख्रिस विल्यम्स आम्हाला भेटावयास आले होते, तेव्हा माझी पत्नी रीटा’या जगातून गेल्यानंतर काय घडते’ या संबंधात विचारपूस करू लागली व नेहमीप्रमाणे मी तिला अशा’नकारात्मक’ बोलण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाळक ख्रिस यांनी मला सांगितले की सध्याच्यातिच्याआरोग्यासंबंधीच्या परस्थितीला अनुसरून रीटा एक अ्त्यंत खराखुरा व प्रामाणिक  प्रश्न विचारत आहे कारण तिला या बाबत खरोखरची चिंता आहे  व मी तिला या बाबतीत थांबवू नये.त्यानंतर पाळक ख्रिस विल्यम्स यांनी रीटा बरोबर सविस्तर संभाषण केले. जरीदुर्दैवानेज्या वेळेस पाळक ख्रिस रिटाला समजावून सांगत होते, त्या वेळेस त्यांच्या संभाषणाच्या पुष्कळ वेळ मीत्या खोलीत नव्हतो, तरी,  मी  त्यांना रीटाला सांगताना,  समजावताना व आश्वासन देताना ऐकले की ख्रिस्तामध्ये विश्वासी असणाऱ्या व्यक्तीचे जीवन या पृथ्वीवरच संपत नाही तर, आमच्या ‘सार्वकालिक जीवनाचा’ आरंभ स्वर्गामध्ये लगेच तारणाच्यावेळीच होतो. जेव्हा आम्ही आमच्या तारणाच्या वेळेस असा विश्वास ठेवतो की आम्ही मरणातून जीवनामध्धे गेलेलो आहोत तेव्हाचहे घडते. ही आमची ‘ख्रिस्तामधील आशा’– जी आम्हाला ख्रिस्ताच्या पुनरुथ्थानाव्दारे प्राप्त झालेली आहे–  ही स्वत: देवाने खात्रीपूर्वक दिलेली हमी आहे.

मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो माझे शब्द ऐकतो आणि ज्याने मला पाठविले  त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकार्लीक  जीवन प्राप्त झालेले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तर तो मरणातून जीवनांत पार गेला आहे ” (योहान ५: २४).

पाळक ख्रिस यांनी हेही स्पष्ट करून सांगितले की स्वर्ग हा आम्ही कधी कल्पनाही करू शकत नाही इतका गौरवी आणि प्रभावशाली आहे आणि विश्वासू व्यक्तीच्या कल्पनेच्या व अपेक्षांच्या पलीकडे आहे. पाळक ख्रिस विल्यम्स यांच्या भेटीनंतरमी रीटाला जास्त शांत, आरामशीर आणि स्थिरझालेले पाहिले! नंतर पाळक ख्रिस यांनी पाळक जॉन माक्आर्थर लिखित ‘स्वर्गाचे गौरव’ हे सुंदर पुस्तक आम्हाला भेट म्हणून दिले.

अनेक वर्षांपूर्वी, १९७२ साली, व तरुण असतांना, मी स्वत: गंभीर आजारामुळे  रुग्णालयाच्या खोलीमध्ये तडपत होतो आणि मी त्यातून बरा होईल की नाही या बाबत डॉक्टर हे अगदी साशंक होते! त्यावेळी माझ्या वाचनात जोनी एरिकसन टाडा यांची दोन पुस्तके आलीत.त्यामध्येत्यांनी त्यांना त्यांच्या१७ व्या साली अतिशय तरुण वयात एका जलतरणाच्या तलावत कसा एक मोठा अपघात झाला आणि कसे त्यांनी त्यांच्या तीव्र वेदना, कष्ट, दु:ख, निराशा यांच्याशी सामना देत जीवनाच्या ‘बदललेल्या’ परिस्थितीशी सामना केला आणि कसे केवळ येशू ख्रिस्ताव्दारेच त्यांच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी बदल झालाकीज्यामुळे त्यांना त्यांचे जीवन जगण्याचा एक नवीन उद्देश मिळाला.त्या वेळी मला त्यांच्या व माझ्या परिस्थितीतील संघर्षात पुष्कळ समानता वाटली. त्यांच्या पुस्तकांत त्यांनी एका ठिकाणी ती नमूद केले आहे की “तीव्र वेदना, दु:खे, कष्टे आणि निराशा या ‘जे ख्रिस्तामध्धे विश्र्वासी आहेत’, अश्यांच्या हृदयांत स्वर्गामध्ये जाण्याची एक प्रखर आणि उत्कट इच्छा ‘निर्माण’ करतात!” १९९९ साली जेव्हा माझी आई हे जग सोडून जात होती तेव्हा तिच्यामध्धे अशी ‘उत्कट इच्छा’ मी पाहिली होती व आता तशीच ‘स्वर्गामध्ये जाण्याची उत्कट इच्छा’  मी खूप जवळून माझ्या प्रिय पत्नी रीटाच्या जीवनात घडताना पाहिली आहे!

“…… आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते” (२ करिंथ ५: ८).

माझ्या प्रिय पत्नी रीटाला तिच्या तीव्र वेदना आणि दु:खांतमीवारंवार म्हणतांनाऐकले की “मी या वेदना सहन करू शकत नाही! प्रभू तू मला लवकर घरीघेऊनजा!”

“……येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात रहाण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. ” (फिलिप्पै १: २३ ब)

आमची मुलगी नोला हिने आपल्या आई रीटाला देवाघरी जाण्याच्या काहीं क्षणांआगोदरच अत्यंत सौम्यपणे निरोप देत  म्हटले होते की “आई, तू खूप थकली आहेस! तू आता विश्रांती घे! काही हरकत नाही! तू जेव्हा तुझे डोळे उघडशील तेव्हा तू राजांच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला भेटशील!”

“Every step is getting brighter

As the golden stairs I climb

Every burden is getting lighter

Every cloud is silver-lined

There the sun is always shining

There no tear will dim the eye

At the ending of the rainbow

Where the mountains touch the sky”

[1]अलिसन क्राउस

 

 

क्रमश:

Previous Article

असमाधान

Next Article

उत्तेजनाचे कृपादान

You might be interested in …

पवित्र शास्त्रातील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य

  लेखांक ५                                                 ‘ सर्व पवित्र लिखाणात देवानं आपला प्राण फुंकला आहे’ (२ तीमथ्य ३:१६) तारणाचं मूळ केंद्रस्थान कुटुंब. कुटुंबाच्या तारणाचं साधन ‘कुटुंबातली उपासना.’ उपासनेचा प्राण म्हणजे पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्राचा प्राण पवित्र आत्मा. […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक ४ पुनरुत्थान   शारीरिक मरणाने आत्मा विभक्त होऊन येणारी मधली अवस्था कायम राहणार नाही. विश्वासी तसेच अविश्वासी  व्यक्तींचे वेगवेगळ्या वेळी पुनरुत्थान होणार आहे. येशूच्या पुनरागमनापूर्वी  पुष्कळ लोकांचे शारीरिक मरण होत […]

येशू सांताक्लॉजसारखा असता तर

लेखक: जिमी नीडहॅम काल माझ्या मुलीने एक मोठा प्रश्न विचारला. कारच्या पाठीमागच्या सीटमध्ये तिने मला विचारले “ डॅडी ह्यावेळी सांता आपल्या घरी येणार आहे का? ज्यांना छोटी मुले आहेत असे ख्रिस्ती आईवडील अशा प्रश्नाला घाबरतात. […]