Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 1, 2018 in जीवन प्रकाश

प्रसारमाध्यमे आणि मुले  

                                                         
लेखक:  जॉश स्क्वायर्स

तो टी व्ही बंद करा!

माझ्या घरात जर तुम्ही माशी म्हणून घोंगावत असता तर हे वाक्य तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकले असते. सुट्टी असल्याने शाळेचे वेळापत्रक नसते आणि मग कन्टाळा घालवण्यासाठी रिमोट चालत असतो.

ह्यावर बंधन टाकण्याचा प्रयत्न करणारे आम्ही एकटेच पालक नाहीत. समुपदेशन, फोन कॉल्स, मेसेजेस आणि चर्चच्या आवारातील संभाषणातही हा विषय वारंवार येतो. “तर मागेल ते मिळावे” अशी धारणा असलेल्या या मुलांच्या पिढीत योग्य पालकत्व कसे करावे? सर्व तंत्रज्ञान यंत्रणेवर साफ बंधन घालायचे किंवा त्याचा उपयोग करून मुलांचे मेषपालत्व करायचे?

नवा शेजार

‘मी बोअर झालोय’ हे आपण सतत ऐकत असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीचा हा आयस्क्रीम, पोहणे, खेळायला बागेत जाणे याच्या इतकाच नित्याचा भाग आहे. मागल्या काळी सुट्टीत हा बोअर कमी व्हायला सामाजिक रचनाच वेगळ्या होत्या. त्याला शेजार म्हणत.
मुले एकत्र येऊन गोट्या, विटीदांडू, लगोऱ्या, सायकल असे निरनिराळे खेळ खेळत. सर्व वयाची मुले एकत्र येऊन कन्टाळा या सामाईक शत्रूला सामना देत.
सध्या अशा रीतीने एकत्र येणे संपुष्टात आले आहे. मुलांना बाहेर पाठवण्याचे धोके वाढते आहेत. फ्लॅटच्या संस्कृतीत शेजार दिसेनासा झाला आहे. आणि मुलांच्या गरजा व मनोरंजन हे फक्त पालकांवर येऊन पडले आहे, ते आता शेजाऱ्यांमध्ये वाटून घेता येत नाही.

अखेरीस पालक थकून जातात. त्यांचे पगाराचे चेक्स संपून जातात. आणि अर्थातच सोपा उपाय म्हणजे मुलांना टी व्ही समोर बसवणे. क्षणातच मुले तृप्त होतात व त्यांचे मनोरंजन होते. हे खूपच सोपे आहे. आणि आपल्या मनाला सोप्या गोष्टी आवडतात.

सहज मिळणाऱ्या सुखासाठी आपली भूक

प्रसारमाध्यमांसाठी वाढत्या वेळ देण्यासाठी कितीही सामाजिक कारणे असतील तरी त्यामागे ह्रदयाची एक समस्या नेहमीच असते. नितीसूत्रेच्या ६ ते २६ अध्यायांमध्ये “आळशी” हा शब्द १४ वेळा आला आहे. खरं तर सुज्ञानाच्या साहित्यामध्ये ‘आळस’ हा पराभूत करणारा एक प्राथमिक घटक आहे.

मानवी ह्रदयाला कमीत कमी कामामध्ये जास्तीत जास्त सुख मिळवायला हवे असते. हे सुखाचे एक तत्त्व आहे. जेव्हा आमची मुले तो टी व्ही चा स्क्रीन उघडतात तेव्हा हेच सुखाचे तत्त्व हुकमी एक्का असते.

त्यांना त्याचा मोबदला मिळतो कारण येथे त्यांना इतरांशी मिळून मिसळून वागण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत, एकमेकांना काही द्यावे लागत नाही, तडजोडी कराव्या लागत नाही आणि नियम पाळून खेळावे लागत नाही. ते त्यांच्या स्वत:च्या जगात असतात व ते चॅनल्स त्यांना जेथे घेऊन जातील तेथे ते जातात. आणि आपल्याला पण त्याचा मोबदला मिळतो. त्यांच्या मनोरंजनाच्या मागण्या नसतात, आपल्याला काही कार्यक्रम आखावे लागत नाहीत किंवा खेळल्यानंतर होणाऱ्या विस्कटलेल्या घराची धास्ती नसते.

आपले पापाने बिघडलेले जग आपल्या पापाने भरलेल्या ह्रदयाला साद घालत असते. पण आनंदाची गोष्ट ही आहे की देवाच्या वचनाची सेवा या अशा सोप्या भुकेवर मात करायला आपल्याला मदत करते. “तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे” (इब्री १२:१).

मनोरंजनाचे  ध्येय

ध्येय तयार करणे हे महत्त्वाचे आहे. जर टी व्ही पाहून तुमच्या मुलांना तुम्ही काय साध्य करावे याची तुम्हाला कल्पना नसेल तर त्यांच्यासाठी काय वर्तन अपेक्षित आहे हे ठरवणेही तुम्हाला फार कठीण जाईल.
आता टी व्ही चा उपयोग करून मुलांमध्ये सद्गुण वाढवणे हे जरा विचित्र वाटते. पण प्रत्येक वागणुकीला आकार देवून ती देवाला सन्मान देण्याचे साध ठरू शकते. “आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा” (कलसै. ३:१७). या बाबतीत माझे ध्येय आहे – जबाबदारी व आत्मसंयमन.
याचा अर्थ जर माझ्या मुलांना टी व्ही चा उपयोग करून मला जबाबदारी आणि आत्मसंयमन शिकवायचे असेल तर दाखवण्यात आलेला कार्यक्रम योग्य हवा, त्यासाठी दिलेला वेळ योग्य हवा आणि त्यांची भावनिक ओढ योग्य हवी. याचा अर्थ प्रसारमाध्यमे वापरताना मुलांनी त्यांच्या डोळ्यांचे, त्यांच्या इछेचे व ह्रदयाचे रक्षण करण्याचे शिकवणे  हे शक्य आहे.

डोळे (विषय)

आपण जोडत असलेल्या उपकरणाचा हा सर्वात कठीण आणि कदाचित सर्वात धोकादायक पैलू आहे. फोन, टॅब्लेट किंवा संगणक उघडून घरातल्या कोणत्याही ठिकाणी बसणे मुलांना सोपे असते. अशा वेळी मुले एखाद्या अयोग्य विषयावर अचानक ठेचाळतील किवा शोधतील.
मुलांनी कोणी जवळपास असेल तरच हे वापरावे यावर मी भर देतो. यामुळे त्यांना विषय दडवता येत नाही व अयोग्य असलेल्या अफाट सामग्रीमध्ये ते सहसा अडकून जाणार नाहीत.

तथापि कितीही काळजी घेतली तरी एखाद्या वाईट ठिकाणी पोचणे सहज शक्य आहे. त्यावेळी माझ्या मुलांनी ताबडतोब पाहणे थांबवावे आणि एकद्या प्रौढ व्यक्तीला जे काही येतेय ते चांगले नाही अशी खबर द्यावी. याचा अर्थ माझ्या मुलांनी पाहण्यासाठी कार्यक्रम निवडण्यापूर्वी योग्य आणि अयोग्य काय आहे हे त्यांनी मला प्रथम दाखवून देण्याची गरज आहे.

भूक (वेळ)

मी आणि माझी मुले सर्व दिवसभर टी व्ही पाहत बसू शकतो. पण ते निरोगी नाही. “आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो” (नीती १३:४). कित्येक वर्षे बालरोगतज्ज्ञ सांगत आहेत की मनोरंजनाचा पडद्यासमोर मुलांनी दोन तासाहून अधिक बसणे योग्य नाही.  आता ती कल्पना पुसून टाकली जात आहे व त्याऐवजी  आपल्याला समतोल हवा आहे.  हे सर्व  मुलांनी पाहावे व त्यासोबत शारीरिक खेळ खेळावे व इतरांबरोबर वेळ घालवावा हे विचार मान्य होत आहेत.
तुमच्या मर्यादा काहीही असोत पण योग्य रीतीने घातलेल्या मर्यादा मुलांना निरोगी सवयी निर्माण करतात. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हवे तेवढे व्हिडीओ पाहू शकणार नाही असे सांगितल्याने ते त्यांच्या भुकेवर नियंत्रण ठेवतात व तो किती वापरावा हे ते शिकतात. त्यांना पाहण्यास ठराविक वेळेची मर्यादा घाला.

त्यानंतर दुसरे काही करण्याची वेळ आहे: काहीतरी वाचा, खेळ खेळा, घरातील नेमलेले काम करा, वाटल्यास खाटेवर झोपून छताकडे पहा – मला त्याची फिकीर नाही – पण सतत पाहत बसण्याने ते त्यांच्या इच्छेला खत पुरवतात त्यावर नियंत्रण ठेवत नाहीत.

ह्रदय (ओढ)

तुमच्या लाडक्या टीव्ही मालिकेचा पुढचा भाग पाहण्याची ओढ कोणाला लागत नाही? पण जेव्हा मुलांच्या भावना टी व्ही च्या स्क्रीनशी बांधल्या जातात तेव्हा ते तोडणे आवश्यक आहे हे समजावे. अशा मुलांमध्ये चिडचिड, झोपेत व्यत्यय येणे, पछाडणारे विचार, इतर मनोरंजनाच्या बाबतीत नाराजी, झाले तर जेवणाचीही कदर न करणे, इतरांशी तोडून वागणे अशी लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी ती व्ही बंद करून मुलांना बाहेर पाठवा.

मनोरंजनाच्या संधीचा वापर करा.  स्क्रीनचा उपयोग जरी समस्या निर्माण करणारा असला तरी त्याद्वारे सुद्धा मुलांना ह्या मुलभूत गोष्टी म्हणजे आपल्या डोळ्यांवर, भुकेवर आणि ह्रदयावर नियंत्रण कसे ठेवावे हे आपण शिकवू शकतो. तथापि यासाठी पालकांनी आपले विचार, शक्ती, आणि वेळ देण्याची गरज आहे व स्वत:ही तसेच वागण्याची गरज आहे. पालकांना जर मुलांच्या जिवाचे रक्षण करायला हवे तर त्यांना स्वत:च्या जिवाचे रक्षण कसे करावे हे प्रथम ठाऊक असायला हवे.
आपल्या मुलांवर योग्य रीतीने प्रेम करा. त्यांना येशूच्या उदाहरणाने चालवा. जेव्हा तुमचे चुकते तेव्हा कबूल करा.

आपले ध्येय मुलांवर व त्याहून अधिक येशूवर प्रेम करण्याचे आहे. तर अशा मनोरंजनाचे हक्क दाखवणाऱ्या मागण्या व पछाडणाऱ्या बाबींना आपण योग्य तऱ्हेने तोंड देण्याची आवश्यकता आहे.