Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 28, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा २.  १ योहान १:२-३                   जिवंत सहभागिता                                      – स्टीफन विल्यम्स

धडा २.  १ योहान १:२-३ जिवंत सहभागिता – स्टीफन विल्यम्स

 

  • शुभवर्तमानाचा उद्देश काय आहे?
    ▫         तारण, क्षमा, सार्वकालिक जीवन, देवाचे गौरव
    ▫         सहसा हीच उद्दिष्टे नजरेसमोर येतात आणि तीच सत्य व परस्पर संबंधित आहेत. पण योहानाच्या  मनात या शुभवर्तमानाची                      घोषणा करणे हे उद्दिष्ट आहे (१योहान १:१). त्याच्या मनातही दोन उद्दिष्टे  आहेत.
    ۰   तातडीचा  उद्देश – सहभागिता (व. २)
    ۰         अंतिम उद्देश – आनंद (व. ३)
    ▫         आज आपण सहभागितेवर विचार करू.
    •           जेव्हा तुम्ही सहभागितेविषयी विचार करता तेव्हा तुमच्या मनात काय येते? (चर्चा करा)

शास्त्राभ्यास

सार्वकालिक जीवन आले आहे

ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे  व त्याची आम्ही साक्ष देतो, ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व  आम्हांस प्रकट झाले ते तुम्हांस कळवतो (१ योहान १:२).

  • पहिल्या वचनात सुरू झालेला विचार पुढे चालू ठेऊन आपण जे पहिल्या वचनात अभ्यासले त्याचा योहान येथे सारांश देतो:
    ▫         सार्वकालिक जीवन सार्वकालिक पुत्रामध्ये सामावलेले आहे. ते मानवधारी होऊन पृथ्वीवर आले –                                                          प्रेषितांनी पाहिले, ऐकले, न्याहाळले आणि चाचपले. अज्ञेयवादाने जे “आत्मिक” व “भौतिक” असे                                                            दोन भिन्न भाग केले आहेत त्या विचाराला यात मुळीच स्थान नाही. मानवधारी होण्याच्या प्रक्रियेत                                                            अद्भुत तारण देण्याच्या एकाच उद्देशाने दोन जगे एकत्र आली.
    ▫         आणि ख्रिस्तामध्ये प्रेषितांनी देवाविषयी जे काही पाहिले, त्याची त्यांनी आपल्याला  ‘साक्ष दिली’ व  त्याची ‘ घोषणा केली,’                          सार्वकालिक जीवन आले आहे!
    •           आपण सहभागितेच्या विषयाकडे वळण्यापूर्वी योहान सुवार्तेचा प्रसार करण्यासंबंधातील पुढील दोन शब्दप्रयोग वापरतो.
    ▫         पहिला “साक्ष देतो” हा शब्दप्रयोग आपल्याला सांगतो की
    ۰           हा वैयक्तिक अनुभव आहे – साक्ष ही प्रथमदर्शनी जे पाहिले असते त्याविषयी  असते. ती  कोणीतरी सांगितलेली कहाणी नसते.                 तुम्ही स्वत: चव घेतल्याशिवाय  सुवार्ता सांगू शकत नाही.”परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा.”
    ۰          हा तातडीचा संदेश आहे – जेव्हा सत्य कसोटीस लागलेले असते तेव्हा साक्षीदार साक्ष देतो.
    ۰          शिवाय साक्षीदार असामान्य दाव्याविषयी साक्ष देतो. जे ऐकत असतात त्यांना जीवन देऊ केले जात असल्याने सुवार्तेची साक्ष                    देण्याचे काम तातडीचे आहे.
    ▫       दुसरा शब्दप्रयोग “कळवतो” हा दोन गोष्टींविषयी बोलतो:
    ۰         येशूचा जीवन देणारा अनुभव टोकरीखाली लपवून ठेवण्यासाठी देऊ केलेला नाही.  किंवा तो आपल्या नियंत्रणाखाली  ठेवायचा               नाही. तर तो जगाला घोषित करायचा आहे.
    ۰         तसेच हा संदेश भीत घाबरत प्रसारित करायचा नाही. जर जगाला वाचवता येईल अशी  गोष्ट तुमच्याकडे आहे तर त्याविषयी                     तुम्ही  मुळीच भीत भीत बोलण्याचे कारण नाही. पौल म्हणतो की सुवार्तेची घोषणा करण्यासाठी धैर्य ही अत्यावश्यक गोष्ट आहे                 (इफिस६:१९- २०, जसे मी बोलले पाहिजे तसेच बोलावे).
    ۰         योहान केवळ ज्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे त्या सुवार्तेसंबंधी बोलत नाही. तर तो  सार्वकालिक जीवन सहभागितेशी जोडतो.

जिवंत सहभागिता

जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हांस यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशूख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे (१ योहान १:३).

  • या वचनानुसार जो येशू सार्वकालिक जीवन देतो त्याविषयीचे सत्य कळवण्याचा व साक्ष देण्याचा हेतू काय आहे? जिवंत सहभागिता.
    •           योहान सहभागितेच्या दोन दिशांसंबंधी बोलतो.
    ▫         एकमेकांबरोबर सहभागिता
    ▫         देवाबरोबर व ख्रिस्ताबरोबर सहभागिता

देवाबरोबर व ख्रिस्ताबरोबर सहभागिता

  • ख्रिस्ती सहभागिता म्हणजे सर्वांमध्ये सारखे वाटून घेणे. पण सार्वकालिक जीवनाविषयी न बोलता तो सहभागिता हा शब्द का वापरतो?  सहभागिता ही सार्वकालिक जीवनाचा परिणाम  वर्णन करते.
    ▫         योहान १७:३ – येथेही सार्वकालिक जीवनाचा अर्थ पिता व पुत्र यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित होणे  हा आहे –  “पित्याला                        ओळखणे.”
    ▫         खरोखर येथे ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कामाचा समावेश आहे. कारण ख्रिस्तामध्ये देव मानवधारी झाला. आणि                                      आपल्यासाठी रदबदली झाला. जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांचे सर्व अडथळे दूर करण्यात आले. त्यांचा                                              केवळ आध्यात्मिक मरणातून जिवंत होण्यात बदल होतो एवढेच नव्हे तर   त्यांची देवाबरोबर जिवंत सहभागिता                                      सुरू होते.
    ۰           कलसै १:१९-२२

۰         वधस्तंभाचा मुद्दा फक्त क्षमाच नव्हे तर समेट हा देखील होता –  देवासमोर उभे राहण्यात                                                                                असलेले पापाचे सर्व अडथळे दूर करण्यात आले (व. २२).
۰         ख्रिस्तामध्ये आता पाप तुम्हाला देवापासून कदापि विभक्त करू शकत नाही.

आम्हांबरोबर सहभागिता

  • किती स्पष्ट आहे की ख्रिस्ताबरोबर व पित्याबरोबरच्यासहभागितेत आपला प्रवेश होतो. पण योहान आणखी दुसऱ्या सहभागितेत प्रवेश होण्यासंबंधी जोर देऊन बोलतो- केवळ देवाबरोबर सहभागिता नव्हे तर “आमच्याबरोबरही सहभागिता” (वचन ३). असे का बरे?
    ▫         देवाबरोबर सहभागिता असणे म्हणजे मंडळी म्हटलेल्या जागतिक समुदायाचा घटक होणे – देव एका समूहात एकेका                          व्यक्तीचे  तारण करून समाविष्ट करून  घेतो.
    ۰          पण एकमेकांबरोबरची खरी सहभागिता देवाबरोबर खरोखरच्या सहभागितेवर अवलंबून                                                                       असते व तेथूनच तिला इंधन मिळते.
    ۰         देवाशी जिवंत सहभागिता असल्याशिवाय सहभागिताच नाही – ती फक्त ”  चहा                                                                                   बिस्किटाची” सहभागिता असलेला ख्रिस्ती धर्म असतो.
    ▫       तसेच खऱ्या अनुभवाने सुवार्ता समजणे म्हणजे या नव्या समुदायात तुमची कार्य करण्याची पद्धत                                                           बदललेली असते. दोन्ही सहभागिता जोडलेल्या असतात. “ख्रिस्तात असणे” म्हणजे त्यागाने व नम्रपणे मंडळीवर प्रीती करणे व               ऐक्यासाठी झटणे.
    ۰         फिलिपै १:२-५
    ۰         ह्या उभ्या व आडव्या सहभागितेतच जग खऱ्या अर्थाने  ख्रिस्ताला पाहते (योहान१७:२०-२१).

चर्चेसाठी प्रश्न

  • वरवरच्या सहभागितेत सहजपणे मिसळणे का सोपे वाटते? (“कसे काय बरं आहे का?” एवढ्यापुरताच परस्पर   संबंध असणारी मंडळी)
    •           खरी सहभागिता आणि  “चहा बिस्कीटाची” ख्रिस्ती सहभागिता यात काय फरक आहे? वरवरची   सहभागिता बदलून खरी                       जिवंत सहभागिता घडवून आणण्यासाठी असलेले काही व्यावहारिक, साधेसोपे  मार्ग कोणते?
    •           केवळ रविवार सकाळच्या सभेपेक्षा घरांमध्ये घडणाऱ्या सहभागितेचे काय महत्त्व आहे यावर चर्चा करा.  रविवारी जे मंदिरात                   घडू शकत नाही असे घरच्या सभांमध्ये काय घडू शकते?