नुकतेच कोणीतरी मला म्हणाले, “त्याची तत्वे अगदी आपल्या तत्वांसारखी आहेत.” त्याला म्हणायचे होते की त्याची तत्वे बरोबर आहेत. या विधानावर मी विचार केला आणि ठरवले की असे विधान एक गर्वाचेच विधान ठरत नाही पण नकळत ते बायबलचा अंतिम अधिकार आपल्या स्वत:च्या किंवा गटाच्या अथवा चर्चच्या विश्वासाकडे ओढून घेते . योग्य तत्वांचा अंतिम अधिकार आपल्या स्वत:ला किंवा आपल्या गटाला अथवा चर्चला न देण्याची आपण काळजी घेण्याची गरज आहे. बायबल आणि केवळ बायबल हाच आपला अंतिम अधिकार आहे.
दर महिन्याला “ख्रिश्चन जीवन प्रकाश” चा अंक तुम्हाला सुपूर्त करताना आम्हाला आनंद होतो. तरीही हे मासिक चालू ठेवण्यासाठी तुम्ही दोन गोष्टींद्वारे आम्हाला मदत करावी अशी आमची गरज आहे. १) तुमच्या वर्गणीचे नूतनीकरण करण्यास विसरू नका २) इतरांनी या मासिकाचे नियमित वर्गणीदार होण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. वर्गणीदारांचा आकडा वाढल्याशिवाय मासिक चालवणे फार महागात पडते.
ह्या अंकाचाही नेहमीप्रमाणे लाभ घ्या. यावेळेस मृत्यूनंतर आपले नक्की काय होते, स्वर्ग – आपली आशा ह्या विषयांवरचे लेख आहेत. नेहमीची सदरे आणि समाधानी कसे राहता येते यावरचा लेखही तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे.
ख्रिश्चन जीवन प्रकाश मासिकासाठी व त्याचे वर्गणीदार वाढावे म्हणून प्रार्थना करा.
क्रिस विल्यम्स
अध्यक्ष
Social