Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Jul 13, 2016 in जीवन प्रकाश

कावकाव … की..?    

कावकाव … की..?    

लेखक: शेली स्टायर

काही दिवसांपूर्वी मी बाहेरच्या बागेत बसून गावातल्या वातावरणाचा आनंद घेत होते. अचानक जवळच्या गर्द झाडांमध्ये गोंधळ आणि धामधूम ऐकू येऊ लागली.

माझ्या निवांत दुपारच्या मननामध्ये अचानक अडथळा आला कारण अचानक कावळ्यांची कावकाव सुरू झाली.  गावातील सगळे कावळे जणू त्या जवळच्या  झाडांवर उतरले होते . कावळ्यांची कावकाव किती कर्कश असते याची मला पुन्हा जाणीव झाली. आपल्यातल्या सर्वात सहनशील व्यक्तीलाही ते अस्वस्थ करतील.

एवढ्यात त्या कावळ्यांच्या या गोंगाटात – एका वॉब्लर पक्षाच्या गाण्याचा एकाकी आवाज  मला ऐकू  आला. कावळ्यांच्या त्या कर्कश कावकावीत वॉब्लर पक्षाचे ते गाणे स्पष्ट व मधुर निनादत होते. एका पक्षाचे गाणे इतक्या कावळ्यांच्या गोंधळात उठून ऐकू येत होते हे पाहून मला नवल वाटले.

लगेचच मला इफिस ५: १८ब – २१ या वचनांची आठवण झाली.

 “द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा,  स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंतःकरणात प्रभूसाठी गायने गा.  आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.  ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा.”

या परिच्छेदात पौल हा आपल्या वाचकांना देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीचे गुणविशेष सांगत आहे. त्यातील प्रमुख क्रियापद आहे “ भरत राहा”,त्या क्रियापदानंतर  भरले जाण्याचे वर्णन करणारी सहाय्यक क्रियापदे  आहेत.

१) स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा (१९ अ).
२) गाणी गा आणि  आपल्या अंतःकरणात प्रभूसाठी गायने गा.  ( १९ब).

३)   आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना (२०).

४) .  ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा.

पुन्हा मला प्रकर्षाने  जाणवले की देवाला आनंद देणाऱ्या  वचनाने व मंजुळ गायनाने  भरलेले ह्र्दय आणि मुख असणे किती महत्त्वाचे आहे- देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालणारी व जीवन जगणाऱ्या व्यक्तीची हीच चिन्हे आहेत.

दिवसभरात आपण असंख्य शब्द वापरतो. आपण एकमेकांशी बोलत असताना आपली आध्यात्मिक मानसिकता असणे व तसे  शब्द वापरणे हा आपला गुण हवा. (स्तोत्रे गीते….) ह्या शब्दांमध्ये , गीते, स्तुतीगीते , कोरसेस ह्यांचा समावेश होईल.माझे शब्द , तुमचे शब्द  असे असावेत  की त्यामुळे इतर ख्रिस्ताकडे आकर्षिले जातील.

आता येथे कावळे व वॉब्लर यांचा संबंध  परत येतो.. मला वाटते की अनेकदा माझे शब्द जर पक्षाचे शब्द असे ऐकू आले असते तर ते कावळ्याच्या कावकावीसारखे –कर्कश, मोठ्यांदा बोलणारे , चीड आणणारे , गोंधळाचे आणि बहुदा ऐकणाऱ्याला उत्तेजन  न देणारे असतात (इफिस ४:२९).

माझ्या ह्रदयातून येणारे संगीत (मत्तय १२:३३-३७ नुसार शब्द हे ह्रदयातूनच  येतात) हे देवाच्या आत्म्याशी एकसूर असावे अशी माझी किती उत्कट इच्छा असावी ! ते देवाचे शील –स्वभावगुण दाखवणारे असावेत. कित्येक वेळा मी इतर ख्रिस्ती लोकांशी आध्यात्मिक शब्द तांत्रिक रीतीने बोलत असते पण माझे ह्र्दय खऱ्या रीतीने देवाला धन्यवाद देत नसेल आणि देवाशी एकसूर नसेल तर सुरेल गीता ऐवजी ती कर्कश कावकाव असेल. मी एकमेकांशी जे आध्यात्मिक शब्द  बोलते त्या मागचा हेतू किंवा कारण हे महत्त्वाचे आहे.

आजच्या या जगात आपण असंख्य कावळ्यांच्या कावकावीने वेढलेली आहोत. या क्षणी देवाच्या आत्म्याला समर्पण न केलेले विश्वासी जन तसेच  ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा राहत नाही असे अविश्वासी जन (योहान १४:१६-१७) त्यांच्या शब्दांची दडपून टाकणारी बजबजपुरी , स्वार्थ. भीती, राग , टीकेखोरपणा, स्वधार्मिकता , तिटकारा, यांनी भरलेले शब्द  हे वॉब्लरचे  (आत्म्याने भरलेली व समर्पित ख्रिस्ती व्यक्ती) गाणे ऐकू न येण्यासाठी दडपून टाकत आहे.

पण प्रिय मित्रांनो भिऊ नका. देवाने आमच्या ह्रदयात व मुखात नवे गीत घातले आहे (स्तोत्र ४०:३). आणि त्याचे गीत हे विजयाने राज्य करील! आत्म्याने भरलेल्या विश्वासी व्यक्तीचे एकाकी गीत, ज्यांचे ह्र्दय तुमच्या ह्रदयात गीत का आहे हे समजण्यास भुकेले आहे त्यांच्यासाठी  स्पष्ट व सुंदर निनादत राहील (१ पेत्र ३:१५).

अशा गोड गीत गाणाऱ्या वॉब्लर पक्षांचा थवा आपल्या भोवतालच्या जगावर किती प्रभाव पाडील याचा विचार करा. पण त्यासोबत जर आपण प्रीतीने व ख्रिस्ताच्या भयामध्ये एकमेकांच्या अधीन होत असू तरच.

योहान १३:३४-३५म्हणते “मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हांवर प्रीती केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा.  तुमची एकमेकांवर प्रीती  असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

ऐकणाऱ्या जगाला माझे शब्द कसे ऐकू येतात? त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते माझ्या तारणाऱ्याच्या कानाला ते कसे वाटतात?त्याचे अखेरचे शब्द होते माझे तारण सुरक्षित करणारे : पूर्ण झाले आहे .