जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

स्वर्गाची उत्कट इच्छा

(लेखांक १०) अखेरचा 

(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला सामोरे जाणारी जीवनकथा )

(viii) आम्हाला ‘स्वर्गासाठी योग्य’ असे ‘नवीन शरीर’ प्राप्त होईल! हे एकदम आमच्या पृथ्वीवरील शरीरासारखेच असेल (ज्यामुळे आम्ही एकमेकांना जाणू व ओळखू शकू) परंतु ते पूर्णत: परिपूर्ण आणि गौरवी असेल. हे शरीर भिंतीतून आरपार जाउ शकेल,  विविध स्वरुपात प्रकट होऊ शकेल, कोणत्याही प्रतिकूल परिणामाशिवाय  थेट स्वर्गात जाऊ शकेल इ. इ.

कारण जे आम्ही ह्या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो; ……ह्यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. ज्याने आम्हाला ह्याकरताच सिध्द केले तो  देव आहे; त्याने आपला आत्मा आम्हाला हमी म्हणून   दिला आहे” (२ करिंथ ५: ४ अ व ५).

ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वत: त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, ‘तुम्हांबरोबर शांती असो! पण ते घाबरुन भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. येशूने त्यांना म्हटले, ‘तुम्ही असे अस्वस्थ व घाबरलले का आहात आणि तुमच्या मनांत शंका का उद्भवल्यात? माझे हात व पाय पाहा. मीच तो आहे; मला चाचपून पहा; जसे मला हाडमांस असलेले पहाता तसे भुताला नसते‘……  त्याने (येशूने) त्यांना विचारले, ‘येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?’ मग त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने  त्यांच्यादेखत खाल्ला……तो (येशू) त्यांना आशीर्वाद देत असतानाच  त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला” (लूक २४:३६ ते ३९,४१ (ब), ४३ व ५१).

(ix) आमचे एकमेकांबरोबर ‘परिपूर्ण’ संबंध असतील. जे आमचे ‘विश्वासामधील’ सर्व प्रियजन आमच्या आगोदर स्वर्गात गेलेले आहेत (आमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार आणि सहविश्वासणारे), त्यांच्याबरोबर आमचे ‘पुनर्मिलन’ होईल.

“Beyond the sunset O glad reunion

With our dear loved ones who have gone before

In that fair homeland we know no parting

Beyond the sunset forevermore!”
                                                             

(x) परंतु स्वर्गामध्ये विवाह संबंध नसतील कारण देवाने ठरविलेल्या संख्येइतकेच लोक त्या ठिकाणी असतील व म्हणून आणखीन उत्पत्तीची जरूरी पडणार नाही. तसेच त्या ठिकाणी ‘रक्षक–मदतनीस’ या नात्याचीही गरज भासणार नाही. त्याच बरोबर  विवाह संबंधांत मिळणाऱ्या शारीरिक संबंधापेक्षाही अधिक आनंद देव स्वत: आम्हांला त्या ठिकाणी देणार आहे.

येशू त्यांस उत्तर दिले……कारण पुनरुत्थानात ते लग्न करून घेत नाहीत किंवा त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील” (मत्तय २२: २९ (अ) व ३०).

(xi) स्वर्ग हे आमच्या अस्तित्वासाठी परिपूर्ण स्थान असेल. त्या ठिकाणी आम्ही देव पिता,  प्रभू येशू, पवित्र आत्मा, देवदूत आणि आकाशातील इतर सर्व रहिवाश्यांबरोबर (विश्र्वासणाऱ्यांबरोबर) अखंड सहभागितेत असू. त्या ठिकाणी आम्हांला देवाचे वर्णन करणापलिकडील सौंदर्य आणि वैभव याची प्रचीती होईल. स्वर्गात दु: ख  आणि  मृत्यू नसणार. ही आमची या पृथ्वीवरील अंतिम इच्छा व प्रतिक्षा आहे आणि जी तेथे आमचा सर्वोच्च आनंद होईल!

तुमचे अंत: करण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत …… आणि  मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; या साठी की, जेथे मी आहे तेथे की तुम्हीही असावे” (योहान १४: १,२ (अ) व ३)

जे लोक तू मला या जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते  तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे  वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की  जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे…….त्यांच्यासाठी मी विनंती करतो;  मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी;  कारण ते तुझे आहेत……. जसा मी या जगाचा नाही तसे ते ही या जगाचे नाहीत……. मी केवळ त्यांच्यासाठी नाही , तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्यांनी सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पिता, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविलेस असा जगाने विश्वास धरावा……. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे असावे; ह्यासाठी की, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पहावा;  कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली आहेस” (योहान १७: ६ & ,,१६,२० & २१ & २४ )

“Home from the earthly journey

Safe for eternity

All that the Saviour promised

That is what Heaven will be”

 

 

(७) (अ) पवित्रशास्त्रानुसार पहिल्या पुनरुत्थानानंतर जे अनंतकाळच्या जीवनाचे आहेत त्यांना   येशूने  त्याच्याबरोबर घेऊन गेल्यानंतर, ७ वर्षांचा मोठ्या संकटाचा  काळ येईल व या ७ वर्षांच्या काळाच्या समाप्तीच्या वेळी, प्रभू येशूचे या पृथ्वीवर, सार्वकालिक जीवन प्राप्त झालेल्या विश्र्वासणाऱ्यांबरोबर १००० वर्षे राज्य करण्यासाठी आगमन होईल. व त्यावेळेस इस्राएल राष्टाचा ‘उद्धार’ होईल. या काळात सैतानाला बांधून ठेवलेले असेल. या एक हजार वर्षांच्या शेवटी सैतानाला ‘थोडा काळ ‘ मोकळे सोडण्यात येईल. तथापी तो पुन्हा जगभरातील सर्व राष्ट्रांना फसवेल आणि देवाच्या संत व यरुशलमेविरुध्द लढाई करण्याकरिता त्यांना गोळा करील. त्या वेळी, देव त्याचा आणि सर्व राष्ट्रांचा नाश करील.  सैतानाला ‘अग्नी व गंधका’ च्या सरोवरांत टाकण्यात येईल ज्या ठिकाणी श्र्वापद’ आणि ‘खोटा संदेष्टा’ आधीच असतील व ते सर्व तेथे ‘अनंतकाळ’ राहतील!

(ब) आणि मग ‘दुसऱे पुनरुत्थान’ घडेल ज्यावेळी ‘देवाचा न्याय’ होईल. त्यासमयी ज्या कोणा व्यक्तीने प्रभू येशूला आपले जीवन समर्पीत केलेले नसेल (सर्व अविश्वासी), त्यांनाही अनंतकाळासाठी नरकामध्ये –‘अग्नी व गंधका’ च्या सरोवरांत टाकले जाईल! ज्या सर्वांची नावें ‘जीवनाच्या पुस्तकात असतील (तारण पावलेले ख्रिस्तामधील विश्र्वासी) त्यांचा ‘न्याय’ त्यांच्या ‘प्रभू येशूच्यासाठी केलेल्या कामानुसार’ चे प्रतिफळ देण्याने करण्यात येईल. त्यानंतर ‘सध्याचे  विश्व हे पूर्णत; ‘विरघळून’ जाईल.

(८) त्यानंतर ‘नवीन स्वर्ग’ आणि ‘नवीन पृथ्वीची’ स्थापना केली जाईल   पवित्र शहर अर्थात नवीन यरुशलेम, याला स्वर्गातून देव स्वत: खाली  पाठवील! हा  ‘सार्वकालिक’ स्वर्ग सध्याच्या स्वर्गापेक्षा भिन्न व पु्ष्कळ जास्त गौरवी असेल आणि संपूर्ण विश्वाला अच्छादेल. त्या ठिकाणी देवाचे सिंहासन असेल आणि देव त्याच्या सर्व लोकांमध्ये  राहील. त्या ठिकाणी ‘भीती, रडणे, अश्रू, वेदना, किंवा शोक’ नसतील आणि  ‘मृत्यू’वर पूर्णपणे विजय पावला  जाईल. त्या ठिकाणी सूर्य अथवा चंद्र नसेल कारण देवाचे गौरव हे प्रकाश देईल. त्या ठिकाणी समुद्र नसेल परंतु देवाच्या आणि कोकर्याच्या सिंहासनातून वाहणाऱ्या ‘जीवनाच्या नदीचे’  पाणी असेल. आणि हे सर्व ‘अनंतकाळ’ राहील!

माझा दृष्टिकोन आता बदलून माझ्या स्वत: च्या जीवनाव्दारे देवाला प्रसन्न करण्याकडे, देवाशी आज्ञाधारक रहाण्याकडे केंद्रित झालेला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला शिकविते की हाच स्वर्गामध्ये जाण्याचा हमखास मार्ग आहे.

“म्हणून, माझ्या प्रिय जनहो, …… देवाबद्दलचा गाढ आदर आणि भीती लक्षात ठेवत देवाच्या आज्ञांचे पालन करा की ज्याव्दारे तुमच्या तारणाचा परिणाम दिसून यावा.” (फिलिप्पै २: १२)

 

विश्र्वासाव्दारे  स्वर्गात जाण्याची मी आतूरतेने वाट पाहत आहे. फक्त देवाला माहीत आहे की मी यासाठी कधी तयार आहे!

माझ्या बाबतीत देवाने जे योजले आहे तेच तो करेल ……” (ईयोब २३:१४ अ)

“When He shall come with trumpet sound

Oh, may I then in Him be found

Dressed in His righteousness alone

Faultless to stand before the Throne

On Christ the solid Rock I stand

All other ground is sinking sand

 

 

 

आत्मा आणि वधू  म्हणतात, ‘ये‘. ऐकणाराही म्हणो, ‘येआणि जो तान्हेला तो येवो, ज्या कोणाला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो” (प्रकटीकरण २२: १७ )

                                                                   समाप्त

 

Previous Article

लेखांक २: जेव्हा देव अन्यायी वाटतो

Next Article

यावर विचार करा

You might be interested in …

वधस्तंभ – देवाची वेदी

 डॉनल्ड मॅकलोईड प्रत्येक विश्वासी व्यक्तीचा प्रायश्चित्तासबंधीचा काही तरी सिद्धांत असतो. अखेर विश्वास हा वधस्तंभावर गेलेल्या तारणाऱ्यावर भरवसा आहे आणि ह्यासबंधी काही समजले नाही तर विश्वास हा अशक्य आहे. विश्वासाला पहिल्यापासून माहीत असते की वधस्तंभावर कोणी […]

मी ख्रिस्ताच्या पूर्णपणे स्वाधीन आहे का?

जॉन पायपर मरियाचा प्रश्न – पास्टर जॉन मी ख्रिस्ताच्या  पूर्णपणे स्वाधीन आहे का नाही  हे मला कसे समजेल? उत्तर – या प्रश्नाचे उत्तर देताना मरिया जे ध्येय व्यक्त करते तेथून सुरुवात करू या, ते म्हणजे […]

गेथशेमाने बाग

लेखांक ३                                     ब –  प्रार्थना अगदी पहिली गोष्ट लक्षात येते ती प्रार्थनेच्या स्थळाबद्दल. प्रत्यक्ष अंतर आणि आध्यात्मिक मन:स्थितीचं अंतर अशी दोन अंतरं आपण पाहिली. त्याचे १२० शिष्य होते. पण चारही शुभवर्तमानं लक्षपूर्वक चाळून पाहा […]