Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 6, 2018 in जीवन प्रकाश

सर्व पुनरुत्थानाचे ईश्वरविज्ञान एकाच अध्यायात

सर्व पुनरुत्थानाचे ईश्वरविज्ञान एकाच अध्यायात

लेखक – जॉन पायपर

प्रभू उठला आहे! आणि त्या एका घटनेद्वारे अमर्याद आशीर्वादांची रेलचेल आपल्यापर्यंत आली आहे. संबंध विश्वाने त्याला होय म्हटले! देवपित्यानेही. कारण ह्या कृत्याद्वारे जे व्हायला पाहिजे होते ते सर्व केले गेले. तसेच देव-मानव असलेल्या येशूची नव्या गौरवी शरीरातील अस्तित्वाची सुरुवात झाली. याच शरीराने तो या पृथ्वीवर युगानुयुगे राज्य करील. आणखी कितीतरी बाबी सांगता येतील. १ करिंथ १५ मध्ये पुनरुत्थानाचे सर्व ईश्वरविज्ञान आणि त्याद्वारे झालेली प्राप्ती  दिली आहे. येथे त्याचा सारांश दिला आहे. हा एक एक विचार आत खोलवर रुजू द्या. आणि मग नवा आठवडा (तुमचे उरलेले जीवन ) “देवाच्या कार्यात अधिकाधिक तत्पर राहा” कारण “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा”
.
१. ख्रिस्त आपल्यासाठी मेला व परत उठला.
“ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला… व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले”  (१ करिंथ १५: ३-४).

२. मोठ्या जमावाला स्वत:ला दाखवून त्याने आपल्या पुनरुत्थानाची खात्री करून दिली.
“नंतर तो एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत” (१५:६).

३. ख्रिस्त पुन्हा उठला म्हणून आपण आपल्या पापात नाही.
“जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे; तुम्ही अजूनसुद्धा पापातच आहात”
( १५:१७).

४.ख्रिस्त परत उठला म्हणून आपली दु:खद जीवने करुणाजनक नाहीत.
“जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही  फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत” (१५:१९).

५. आपण जे येशूवर विश्वास ठेवतो त्या आपल्याला तो  त्याच्या दुसऱ्या येणाच्या वेळी मेलेल्यांतून उठवील.
“कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील.  पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार,  ख्रिस्त जो प्रथम फळ आहे,  आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले” ( १५:२२-२३).

६. अजिंक्य असा ख्रिस्त आता सर्व विश्वावर राज्य करत आहे.
“कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे. जो  शेवटला  शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय”  (१५:२५-२६).

७. आपली पुनरुत्थित शरीरे ही अविनाशी, वैभवी , सामर्थ्यशाली आणि आध्यात्मिक असतील.
“तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. जे अपमानात पेरले जाते ते गौरवात आठवले जाते. जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते” (१५:४२-४४).

८. आपण जिवंत असू किवा मृत, आपल्याला ख्रिस्ताच्या येणाच्या वेळी एका क्षणात नवी शरीरे दिली जातील.
पाहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा” (१५:५१-५२).

९. मरणाला आता नांगी नाही आणि ते विजयामध्ये गिळून टाकले जाईल.
“जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल विजयात मरण गिळले गेले आहे. अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरण, तुझी नांगी कोठे आहे? (१५:५४-५५).

१०. ख्रिस्ताने पापासाठी दु:ख भोगले आणि नियम शास्त्राची पूर्ती केली.
मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमाशास्त्र आहे.
 पण देवाला धन्यावाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो!” ५६-५७.

११. म्हणून मोठ्या प्रमाणात ख्रिस्ताला उंचावणारी कामे करा कारण त्यातील काहीही व्यर्थ जाणार नाहीत.
“माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हर तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा’ ( १५:५८).”